साखळीचे स्वातंत्र्य ♥️


खरोखर "हंगर स्टोन" चं काम 
करणार एक अप्रतिम पुस्तकं 🌿

अशक्य वाटणाऱ्या किंवा कधी ध्यानीमनीही नसणाऱ्या शक्यतांचा प्रत्यय ‘ब्लॉकचेन’मुळे आपल्याला येऊ लागला आहे. केंद्रीकरणामुळे निर्माण होणारी मक्तेदारी थांबणे, त्यामुळे विकेंद्रीकरणाचे वाढणारे महत्त्व, योग्य व्यक्तींना योग्य मोबदला मिळवून देण्याचे स्वप्न, पारदर्शकता, माहितीचा योग्य मोबदला, एकाधिकारशाही किंवा संघशाहीपासून सुटका करून घेण्यासाठी तंत्रज्ञानाचे महत्त्व अशा विचारांचे पुनरुत्थान झाले. ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाकडे एखादी तांत्रिक भपकेदार जादूगिरी म्हणून न पाहता, या विचारांचे द्योतक म्हणून पाहिले तर या तंत्रज्ञानाचा विकास वा वापरदेखील त्या दिशेने होईल. कारण हे विचार अमलात आणण्यासाठी फक्त ‘ब्लॉकचेन’ पुरेसे नाही, त्यास इच्छाशक्ती, नेतृत्व, जनसामान्यांचा आधार वा योग्य दबाव, हे सारे आवश्यक आहे.

 कोणतीही महत्त्वाची गोष्ट ‘किचकट, गुंतागुंतीची’ आहे किंवा हा ‘फक्त तज्ज्ञ मंडळींचा विषय’ आहे असे दर्शवून तीपासून जनसामान्यांना दूर ठेवले जाते. ही नीती आर्थिक, वैज्ञानिक, सामाजिक, राजकीय वा वित्तीय क्षेत्रांमध्ये सर्रास वापरली जाते. मग फक्त नावापुरते, मर्यादित पद्धतीने ‘ब्लॉकचेन’चा वापर करून मिरवता येते. पण त्याने नेमके कोणते उद्देश साध्य झाले- जे आधी शक्य नव्हते, याचे उत्तर देता येणे गरजेचे आहे.

ब्लॉकचेन तंत्रज्ञान फक्त नवलाईच्या किंवा किचकटतेच्या कचाटय़ात न अडकता; ते ज्या विचारांचे द्योतक बनले आहे त्यांना अमलात आणण्यासाठी मदत करेल, अशी आशा बाळगू या आणि येत्या दशकात सर्वानी मिळून त्या दृष्टीने प्रयत्न करू या.. 

                                  - गौरव सोमवंशी ♥️

तर मी काही दिवसांपूर्वी गौरव सोमवंशी दादा लिखित "साखळीचे स्वातंत्र्य " हे आजच्या काळात सर्वांत महत्वाच्या वेळेवर आणि एका महत्वपूर्ण विषयावर लिहलेलं पुस्तक दुसऱ्यांदा वाचून,समजून घेतलं.आणि एका नव्या तंत्रज्ञानाशी परिचित झालो.
बिटकॉइन आणि ब्लॉकचेन या तंत्रज्ञानाबद्दल अतिशय सोप्या आणि साध्या भाषेत अनेक चांगल्या उदाहरणासोबत या पुस्तकात जी माहिती दिली ती खरंच फार महत्वाची आहे.किचकट विषय असला तरीही सोप्या मराठी भाषेत लेखकांनी ते ज्या पद्धतीने पटवून दिलं आहे ते वाचकांना कोठेही बोअर करत नाही.विशेष माझ्यासारख्या आर्टस् बॅकग्राऊंड असलेल्या विद्यार्थ्यांला हे पुस्तक समजु शकते तर सर्वांनाच हे पुस्तक समजायला अजिबात कठीण जातं नाही हा विश्वास वाटतो. हे पुस्तक वाचताना जणू एक शिक्षकच आपल्या विद्यार्थ्यांना ब्लॉकचेनचे धडे देतोय असं आपल्याला वाटत असते.

बिटकॉइन, मेटाव्हर्स, एनएफटी वा टोकनॉमिक्स अशा नवप्रणाली असोत अथवा संगणकशास्त्र, शेती वा कोणत्याही आर्थिक-सामाजिक रचना असोत;
येत्या काळात अशा जवळपास सर्वच क्षेत्रांना कवेत घेणाऱ्या आणि त्यांत बदल घडवण्याची क्षमता असलेल्या 'ब्लॉकचेन' या नवतंत्रज्ञानाचा सखोल वेध लेखकांनी यामध्ये घेतला आहे.जे वाचून आपल्या मनातील असंख्य प्रश्नांची उत्तरे आपल्याला अगदी सहज मिळून जातात. बिटकॉइन आणि ब्लॉकचेन बद्दल पसरलेले असे कितीतरी गैरसमज या पुस्तकाच्या वाचनाने दूर होतात.आतापर्यंतचा क्रिप्टो चा इतिहास तर भविष्यात होणारा या तंत्रज्ञानाचा विकास याबद्दल वाचत असताना हा तंत्रज्ञान नव्हे तर खरंच तत्वज्ञान आहे या गोष्टींवर आपला विश्वास बसतो.हे पुस्तक एकूण 8 भागात विभागलं असून यामध्ये आणि 56 प्रकरणे आहेत.आणि यातील प्रत्येक प्रकरण वाचत असताना प्रत्येक प्रकरणातुन आपल्याला काहीतरी नवीन गवसतं.

बिटकाॅईनची निर्मिती कशी झाली ?कोणी व का केली ?
बिटकाॅईन आणि ब्लाॅकचेन म्हणजे नेमकं काय ?हे दोन्ही एकच आहेत का वेगवेगळे ? हा नेमका प्रकार तरी काय आहे? याचा आपल्या दैनंदिन जीवनात काय आणि कशाप्रकारे उपयोग होऊ शकतो?हा तंत्रज्ञान कितपत विश्वासू आहे ?या तंत्रज्ञानाचे इतिहास आणि भविष्य काय ? या इतर वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे लेखकाने अगदी विस्तृत आणि सुंदरपद्धतीने अनेक सोपी,रोचक उदाहरणे देऊन दिलेली आहे.ज्यामुळे हे पुस्तकं फारच वाचनीय बनते.कुठलाही ज्ञान कधीही केव्हाही वाया जात नाही त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा ज्ञान आपल्या जवळ असायला हवं आणि भविष्याचा विचार करता तंत्रज्ञानाचा ज्ञान तर प्रत्येकाला असायलाच हवं तशाच एका तंत्रज्ञानापैकी या एका तंत्रज्ञानाबद्दल माहिती घेणे हे फार महत्वाचे आहे.इंग्रजी मध्ये तर याबद्दल असंख्य पुस्तके, लिहिली गेली आहेत पण मराठीत तरी हवं तसं पुस्तक याबद्दल नव्हतं जे सहज आणि सोप्या भाषेत आपल्याला याबद्दल माहिती देईल.आणि ही कमी हे पुस्तक कमी करून आपली ओळख नवीन तंत्रज्ञानाशी करून देते.

हे पुस्तक पुढील ८ भागात आणि 56 प्रकारात मोडते.यातील प्रत्येक भागात विविध प्रकरण येतात ज्यामध्ये आपल्या फार वाचनीय अशी माहिती मिळते.बाकी या 8 भागाचे व प्रत्येक प्रकरणाचे शिर्षक वाचूनच आपल्याला या पुस्तकातून नेमकं काय मिळणार आहे याचा अंदाज येतो.

अनुक्रमणिका वाचूनच किती ज्ञान मिळणार आहे याची प्रचिती येते..🔥

ऋणनिर्देश

प्रस्तावना

■भाग १ : ब्लॉकचेनचा परिचय

१. काचेचे इंजिन !
२. 'तंत्र'ज्ञान नव्हे, 'तत्त्व'ज्ञान! 
३. एकाच वेळी सगळीकडे आणि सर्वांचे....

■भाग २ : पैशाचा इतिहास

४. पैशाचा उगम

५. पैशाची स्मृती....

६. पोलोने पाहिलेला पैसा

■भाग ३ : बँकिंग आणि बिटकॉइन

७. बाकडे निघाले अर्थसत्तेकडे...

८. साखळीतील पहिली कडी

■भाग ४ : सायफरपंक चळवळ

९. तत्त्व आणि तंत्र

१०. एका क्रांतीची उत्क्रांती

११. सातोशी नाकामोटो कोण आहे ?

१२. क्रांतीचे वाहक होताना...

■भाग ५ : ब्लॉकचेन तंत्रज्ञानातील विविध संकल्पना १३. हॅशिंग... हॅशकॅश ते ब्लॉकचेन !

१४. सही रे सही!

१५. आकड्यांचे सुरक्षाकवच

१६. गोष्ट छोटीच, पण....

१७. बहुमताचे कोडे

१८. संदेशांची साखळी

■भाग ६ : चला, बिटकॉइन समजून घेऊ या!

१९. व्यवहार, विश्वास आणि सुरक्षा

२०. जोडोनिया 'बिटकॉइन' उत्तम वेव्हारें....

२१. बिटकॉइनची मार्गदर्शक नोंदवही

२२. नोंदवही - चलन !

२३. चार शून्य बिटकॉइन ! २४. ब्लॉक ते ब्लॉकचेन

२५. बिटकॉइनची बक्षिसी

२६. संख्या आणि मूल्य

२७. बिरबल, बदल आणि बिटकॉइन

२८. 'बिटकॉइन कॅश' आणि 'सेगविट'

२९. बिटकॉइनला पर्याय....

३०. बिटकॉइनवरील आक्षेप किती खरे ?

■भाग ७ : ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे विविध प्रकार

३१. केंद्रित की विकेंद्रित ?

३२. ब्लॉकचेन हेच मध्यस्थ !

३३. 'अदृश्य' ईथिरियम !

३४. 'ईथर'चे टोकन !

३५. भेदभावरहित तंत्रव्यासपीठ

३६. 'स्मार्ट' मध्यस्थ !

३७. फक्त ३९ दिवस....

३८. जुने जाऊ द्या मरणालागुनी...

■भाग ८ : विकेंद्रित, विश्वासार्ह आणि पारदर्शक जगाकडे....

३९. तंत्रज्ञान समन्वय

४०. निरपेक्ष बँकिंग...

४१. डिजिटल सरकार !

४२. 'ब्लॉकचेन धोरणा'ची गरज मार्ग...

४३. अधिकारांसाठी दुसरा

४४. 'दुसऱ्या मार्गा'वरील प्रयोग....

४५. रक्तहिरे रोखण्यासाठी... ४६. आर्थिक सामिलीकरण

४७. विश्वासाचा सेतू

४८. शिवारातला सहकार

४९. शेती, वस्तुजाल आणि ब्लॉकचेन ५०. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी...

५१. स्वतःच्या घरी दूरचा....

५२. 'मध्यस्था'ची मक्तेदारी मोडताना....

५३. माहितीचा मोबदला

५४. टोकनॉमिक्स अर्थात टोकनमय जग!

५५. वेब ३.०, एनएफटी आणि मेटाव्हर्स

५६. विचारांची 'तंत्र'क्रांती....

इत्यादी. या प्रत्येक भागातील स्वतंत्र प्रकरणातुन आपल्याला ब्लॉकचेनच्या इतिहासापासून तर भविष्याबद्दल सर्वकाही माहिती मिळते.असंख्य पैलू कळतात.असंख्य वाचलेले,ऐकलेले गैरसमज दूर होऊन नवीन ज्ञानाची भर आपल्या संग्रहात होते एवढं मात्र नक्की..

आवर्जून वाचा आणि जाणून घ्या ब्लॉकचेन या तंत्रज्ञान नव्हे तर तत्वज्ञानाबद्दल..🌿

Thank u so much Gaurav Somwanshi Dada ♥️Lots Of Love 🌿♥️

©️Moin Humanist✍️🌿

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼