आशा देणारी पुस्तके 💛

आयुष्याचा एक काळ असा होता जेव्हा चोहीकडे संपूर्ण काळोख दिसायचा.🥺 'हॉस्पिटल- दवाखान्याच्या' चकरा मारून जाम वैताग आला होता.'गोळ्या,स्लाईन्स व इंजेक्शन' घेऊन खूप त्रासलो होतो.एका आजारामुळे इतर आजार बळावले होते.आपल्या आजारामुळे 'आई वडिलांना' होणारा त्रास हा असहनिय होता माझ्यासाठी.त्यांच्या काळजीने माखलेल्या चेहऱ्याकडे बघूनच फार वाईट वाटायचं. हे सर्व आरोग्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे व आपल्या हलगर्जीपणामुळे झालं आहे याचा पश्चाताप व्हायचं.कशातच मन रमायचं नाही.वाचन सोडून काहीच करावं वाटायचं नाही.कशातच स्वारस्य वाटतं नव्हतं.एकंदरीत जगायची इच्छाच बाकी राहिली नव्हती. खूप थकल्यासारखं वाटायचं. बस्स आता इथेच कायमचं थांबून जावं असं वाटतं होतं. मनात येणारे भयंकर विचार हे फार विचित्र असायचे.रात्रभर झोपेचा पत्ता नसायचं.काही क्षणासाठी डोळे लागताचं विचित्र चित्रं दिसायचं आणि मी खलबळून जाग व्हायचो.मनातील घुसमट सांगायला,मोकळेपणाने व्यक्त व्हायला कोणीच हक्काचा मित्र जवळ नव्हतं होती ती फक्त लाडकी पुस्तके. या काळात हक्काची सोबत होती ती फक्त पुस्तकांचीच.त्यामुळे मी फक्त वा...