गुरू आयोनि लडका......♥️


किशोर बळी लिखित अवघ्या 104 पृष्ठसंख्या असलेली, 'गुरू आयोनि लडका म्हणजेच 'गुरुजी आलेत रे पोरा'ही अप्रतिम छोटेखानी कादंबरी वाचून पूर्ण केली आणि काहीतरी वेगळं वाचल्याची प्रचिती आली.

यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा गावापासून चार कि.मी अंतरावर असलेल्या, 'गणेशपुर गावातील साईनगर 'पारधी तांड्यामधील एका जिल्हा परिषद शाळेची आणि तेथे नव्याने रुजू झालेल्या शिक्षकाची ही भावस्पर्शी कथा आहे.ही कादंबरी" शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधला उत्कट भावबंध नक्कीच आहे, पण ही गोष्ट फक्त एका आदर्श शिक्षकाची आणि सुंदर शाळेचीच नसून एका अस्वस्थ शिक्षकाची आणि बंद पडत चाललेल्या जिल्हा परिषद शाळांची आहे".जी वाचकांना अस्वस्थ करून विचार करायला भाग पाडते.

या तांड्यातील शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाल्यावर आलेले वेगवेगळे अनुभव लेखकांनी या कादंबरीत सुंदरीत्या शब्दबद्ध केले आहेत.त्यासोबतच शिक्षकाला केंद्रस्थानी ठेवून तांड्यावरील लहान मुलांचं निरागस भावविश्व उलगडण्याचा या कादंबरीरून त्यांनी प्रयत्न केला आहे.जे वाचताना 'माडगूळकरांच्या 'बनगरवाडीची'तर 'मुनघाटे' लिखित 'माझी काटेमुंढरीची शाळा'ह्या कादंबरीची प्रामुख्याने आठवण येते.

या 'तांड्यातील विद्यार्थी,गावकरी,त्यांच्या समस्या,गावातील अंधश्रद्धा,शिक्षण क्षेत्रातील राजकारण,गरिबी,दुःख,दारिद्र्य,निरक्षरता, इत्यादी कितीतरी महत्वपूर्ण गोष्टींवर या कादंबरीमतून प्रकाश टाकलं गेलं आहे.जो विचार करायला प्रवृत्त करतो.

लेखकाच्या मते :-

"जिल्हा परिषदेतील शाळा बंद पडणे म्हणजे पर्यायाने गोरगरिबांच्या लेकरांचे भवितव्य अंधःकारात ढकलण्यासारखे आहे. 'ज्याचा पैसा त्याचं शिक्षण' अशी नवी काॕन्व्हेंटी शिक्षणप्रणाली रुजत चाललेली असताना तळमळीने काहीतरी मांडण्याचा यातून प्रयत्न केला आहे."

जिल्हा परिषदेच्या या शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाल्यावर सर्वप्रथम विद्यार्थी व गावकऱ्यांशी जुळवून घेण्यापासून सुरू झालेला हा प्रवास यांच्यात एक वेगळं स्नेहबंध निर्माण होऊन समाप्त होतो.या शिक्षकाने राबवलेले विविध उपक्रम,केलेली जनजागृती व महत्वपूर्ण काम आणि मुलांशी जोडलेली नाळ हे सर्वकाही यातून अधोरेखित होते.जे वाचत असताना आपण सुद्धा याचा भाग होऊन जातो.यातील विविध पात्रे आणि त्यांच्या बोलीभाषेतील संवाद वाचून चेहऱ्यावर स्मित येतं तर कधी डोळ्यांतून अश्रूं सुद्धा.

खरंच लेखकांना हा 'तांड्यातील'जग फार जवळून अनुभवता आलं,त्याच्याशी एकरूप होऊन आपलं जगणं अधिक समृद्ध करता आहे आणि त्यांनी तो वाचकांपुढे ठेऊन महत्वाचं काम केलं आहे असं मला वाटतं.

नक्की वाचा...♥️💕

©️Moin Humanist🌱

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼