खैरमोडेंचे 12 खंड आणि मी ♥️

मला आठवतं 2019 मध्ये कॉलेजच्या 2nd Year ला असताना मला 'डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अजून खूप काही जाणून घ्यायचं होतं.'धनंजय किरांनी' लिहलेलं चरित्र वाचून मी 'बा भीमाच्या'अजून जास्त प्रेमात पडलो होतो.

यामुळेच मी 'बाबासाहेबांवर लिहलेल्या इतर काही पुस्तकांचा शोध घ्यायला सुरुवात केली होती.सोशल मीडियावर असलेल्या काही अभ्यासू वाचकांना विचारलं आणि काही पुस्तकातील संदर्भ वाचून तेव्हा मला प्रथमचं 'चांगदेव खैरमोडे' यांनी बाबासाहेबांवर 12 खंडात लिहलेल्या विस्तृत चरित्राबद्दल कळालं🌱.

मी 'Amazon/Flipcart वर जाऊन बघितलं तेथे हे उपलब्ध नव्हते.मग गुगल वर चेक केलं तेव्हा एका वेबसाईटवर मला हे '12 खंड' दिसले.मला प्रचंड आनंद झाला,पण तेव्हा या सेटची किंमत बघूनच मी जाम निराश झालो.तेव्हा या 12 खंडाची एकूण किंमत होती 3490₹ रु..जी माझ्यासाठी खूप जास्त व आवाक्याच्या बाहेर होती.

त्यामुळे तेव्हा मला हे खंड घेता आले नाही व तूर्तास तो प्लॅन रद्द करावा लागला.लवकरात लवकर हे खंड घेण्यासाठी मी येथून पैसे जुडवायला सुरुवात केली.आणि अशातच मला एका ग्रुपवरून कळालं की 12 जानेवारीला 'जिजाऊ जन्मोत्सवानिमित 'मातुतीर्थ सिंदखेडराजाला'मला हे 12 खंड सवलतीत मिळतील.
तेव्हा तर मला आभाळ ठेंगण झालं होतं.

मी 12 जानेवारी पर्यत एकूण 2500 रु जमा केले होते.मला खात्री होती की एवढ्या पैशात मला हे खंड मिळून जातील.

2020 मध्ये 12 जानेवारीला मी' सिंदखेडराजा'ला गेलो आणि या खंडाची शोध मोहीम सुरू केली.सर्व स्टॉल बघितल्यावर एका स्टॉलवर येऊन माझी ही 'शोध मोहीम' संपली.मला खात्री होतीच की मला येथे हे सवलतीत मिळून जातील.

पण विक्रेत्याने 3200₹ च्या खाली द्यायला नकार दिला.माझी जाम निराशा झाली व पुन्हा माझी इच्छा अपूर्णच राहून गेली.

पुढे मार्च महिन्यात लॉकडाऊन लागला.सर्वकाही बंद झालं.नंतर ऑक्टोबर मध्ये मी ऑनलाईन 'खजिना पुस्तकांचा'आता सुरू असलेलं ( We Read ) ही वाचन चळवळ 'सुरू करून वाचकांना सवलतीत पुस्तके पोहोचवायला सुरुवात केली आणि असंख्य पुस्तके पोहचवण्यात यशस्वी झालो.

2021 मध्ये मी आवर्जून हे खंड यादीत ऍड करून सरळ पब्लिकेशन ला संपर्क केला आणि 5 सेट्स बोलावले.तेव्हा मला हा एक सेट फक्त 2500₹ मिळाला.एक सेट स्वतःसाठी विकत घेऊन मी
बाकीचे सेट्स मी 2950₹ मध्ये मी इतरांना घरपोच पोहोचवायला सुरुवात केली.

तेव्हापासून आतापर्यंत असंख्याना सवलतीत पोहोचवले आणि पोहोचवत आहे.💛

एकंदरीत हे बघा किती भारी आहे ना ?

एकेकाळी मला पैशाअभावी हे खंड वाचायला मिळतं नव्हते,तेच खंड मी आता भारतभरातील वाचकांना पोहोचवतोय....♥️

पुस्तके तुमचा पत्ता शोधून तुमच्याजवळ येतातच..🌱

एकंदरीत सुकून मिळतोय....📚

जय भीम 💙

©️Moin Humanist💙

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼