जाणीव.....💛
आता काहीच विचित्र वाटतं नाही.कोणी आपल्याला काहीही चुकीचं बोललं,आपलं द्वेष केलं किंवा इतर काही चुकीचे मत बनवून मोकळा झालं, तरीही आता विशेष असं काहीच मनाला वाटतं नाही.
पूर्वी या छोट्या गोष्टींनी फार फरक पडायचं मला, पण आता अजिबात नाही.कोणालाही जास्त 'Explain'करणं बंद केलंय.समोरचा एखाद्या गैरसमजुतीत वाईट समजतो तर समजू दे, भविष्यात त्याचं हा मत बदलेलंच.हाच विचार करून सोडून देतो.
सर्वंच आपले चाहते नसणार,सर्वंच प्रेम करणारे मिळणारे नाहीत हा सत्य जेव्हापासून स्वीकारलं तेव्हापासून सर्वकाही भारी वाटतंय.
कोणीही चुकीच्या शब्दात 'टिका' केली तरीही त्याला 'धन्यवाद/Thank you' म्हणून तेथेच विषय संपवतो.टीका योग्य असेल तर ती स्वीकारून त्यावर 'वर्क' सुद्धा करतो.
एकंदरीत काय तर आता खूप साऱ्या व्यर्थ गोष्टीचं फरक पडणं अजिबात बंद झालंय.आपण आपलं काम प्रामाणिकपणे करायचं बस्स, सर्वांनाच खुश आणि आनंदी आपण ठेऊ शकणार नाही.एकाला खुश करताना दुसरा नाराज होणारच.हाच विचार करून चालतोय...व्यर्थ गोष्टींत वेळ घालायला,वादविवाद करून रडत बसायला आयुष्य खूप छोटा वाटतोय आता.🌱💛😊
©️Moin Humanist🌱
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा