आशा देणारी पुस्तके 💛

आयुष्याचा एक काळ असा होता जेव्हा चोहीकडे संपूर्ण काळोख दिसायचा.🥺

'हॉस्पिटल- दवाखान्याच्या' चकरा मारून जाम वैताग आला होता.'गोळ्या,स्लाईन्स व इंजेक्शन' घेऊन खूप त्रासलो होतो.एका आजारामुळे इतर आजार बळावले होते.आपल्या आजारामुळे 'आई वडिलांना' होणारा त्रास हा असहनिय होता माझ्यासाठी.त्यांच्या काळजीने माखलेल्या चेहऱ्याकडे बघूनच फार वाईट वाटायचं.

हे सर्व आरोग्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे व आपल्या हलगर्जीपणामुळे झालं आहे याचा पश्चाताप व्हायचं.कशातच मन रमायचं नाही.वाचन सोडून काहीच करावं वाटायचं नाही.कशातच स्वारस्य वाटतं नव्हतं.एकंदरीत जगायची इच्छाच बाकी राहिली नव्हती.

खूप थकल्यासारखं वाटायचं. 

बस्स आता इथेच कायमचं थांबून जावं असं वाटतं होतं.

मनात येणारे भयंकर विचार हे फार विचित्र असायचे.रात्रभर झोपेचा पत्ता नसायचं.काही क्षणासाठी डोळे लागताचं विचित्र चित्रं दिसायचं आणि मी खलबळून जाग व्हायचो.मनातील घुसमट सांगायला,मोकळेपणाने व्यक्त व्हायला कोणीच हक्काचा मित्र जवळ नव्हतं होती ती फक्त लाडकी पुस्तके.

या काळात हक्काची सोबत होती ती फक्त पुस्तकांचीच.त्यामुळे मी फक्त वाचायचो आणि वाचत राहायचो.पूर्णपणे 'पुस्तकाच्या विश्वात' हरवून जायचो.पुस्तकाच्या कथानकाशी एकरूप व्हायचो,त्यातील पात्रांशी संवाद साधायचो.

पुस्तकांनीच मला मार्ग दाखवलं, गाईड केलं आणि एक आशेची किरण दिली.'इथे थांबणे नाही'म्हणत मला लढायची हिम्मत दिली.कितीतरी अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे सोप्या आणि साध्या भाषेत देऊन मला नेमकं जगायला शिकवलं.

मी फक्त पुस्तके वाचली नाही तर ती जगली आणि वाचून-जगून समृद्ध झालो.आजारपणात सुद्धा उभारी मला माझ्या पुस्तकांनीच दिली आहे.

अनेकांसाठी पुस्तके ही साध्य नसून साधन असेल पण माझ्यासाठी साधन आणि साध्य सुद्धा माझी पुस्तकेच आहे.

माझी माझ्या पुस्तकांसोबत मैत्री खूप घट्ट आहे.पुस्तकासोबत माझा जो बॉंड जुडलेला आहे त्याला मी कुठलीही उपमा देऊ शकत नाही.

 माझी पुस्तके माझा जीव की प्राण आहे. आयुष्यातील सर्व संपत्ती गेली तरी चालेल पण माझ्यासोबत माझी पुस्तके असली तरीही मी नव्याने भरारी घेऊ शकतो हा मला विश्वास वाटतो.

पुस्तकांनी आजपर्यंत जगवलं आहे आणि मुळात माणूस म्हणून जगायचं कसं हे शिकवलं आहे.मी फक्त पुस्तके वाचत नाही त्यांच्याशी बोलतो,गप्पा मारतो.त्यांची पुरेपूर काळजी घेतो.जेव्हा माझ्या सोबत कोणीही नव्हतं तेव्हा माझी लाडकी पुस्तके माझ्यासोबत होती आणि तीच कायम राहतील.सर्वांत जास्त सुकून मला माझ्या पुस्तकांसोबतच मिळतो.

आज जेव्हा कोणी विचारतो की तुला सारखी पुस्तकेच का वाचतो ?तुला कंटाळा येत नाही का ?किंवा एवढं मोठं संग्रह करून काय करायचं आहे ?तेव्हा त्यांना मला वरील गोष्ट सांगावी वाटते.

कारण पुस्तकांनी आशा आणि विश्वास दिला नसता तर मी कोठेतरी तेव्हाच संपलो असतो...♥️💛

ता.क :-आरोग्य जपा...आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका 💛😊

©️Moin Humanist♥️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼