सध्या सिमॉन द बोव्हुआर चं 'द सेकंड सेक्स' परत एकदा वाचतोय,समजून घेतोय त्यानिमित्ताने
सध्या सिमॉन द बोव्हुआर चं 'द सेकंड सेक्स' परत एकदा वाचतोय,समजून घेतोय त्यानिमित्ताने....💛
पूर्वी इतरांप्रमाणे 'आई बहिणीच्या' नावावर शिव्या द्यायला काहीच वाटायचं नाही.स्त्रीला कमी लेखायचो.एकंदरीत महिलांना 'चूल आणि मुलं' पर्यत मर्यादित ठेवणाऱ्या या संकुचित विचारसरणीचं मी प्रतिनिधित्व करत होतो.
कारण तेव्हा वाचन आणि चांगल्या माणसांचा सहवासच मला लाभला नव्हतं.जसं आपल्या आजूबाजूचं वातावरण असतो,सेम तसेच तुम्ही घडत असता.याप्रकारेचं मी सुद्धा घडत होतो.
घर व बाहेरील वातावरणामुळे महिलांकडे कधी आदराने बघण्याची दृष्टीच मला मिळालेली नव्हती,दृष्टीकोन नव्हता.समाजाचा एक हिस्सा असल्याने माझे विचार सुद्धा अतिशय खालच्या दर्जाचे होते.
एकंदरीत समजतं नव्हतं नाही आणि समजून देणारं सुद्धा कोणीही नव्हतं.मग पुढे प्रवेश झाला पुस्तकांचा आणि सुरुवात झाली परिवर्तनाला..
वाचनाची आवड लागल्यापासून मिळेल ते वाचत होतो, समजून घेत होतो.वाचनामुळे मला हक्काचे पुस्तकं रुपात सोबती मिळाले.चांगली आणि महत्वाची दृष्टीकोन बदलणारी पुस्तके आयुष्यात येत गेली आणि मला समृद्ध करत गेली.
पुस्तकामुळेच महिलांचे महत्व मला कळतं गेले,असंख्य गैरसमजुती दूर झाल्या.इतिहासातील महिलांचे अफाट योगदान आणि त्याग कळतं गेले.एकंदरीत महिलांपेक्षा सामर्थ्यवान कोणीही नाही या गोष्टीची प्रचिती येत गेली...सहानुभूती निर्माण झाली तर नाही म्हणू शकत पण दृष्टीकोन मात्र बदलला.
एक आदर,सन्मान आणि रिस्पेक्ट मनात निर्माण झाली.एकंदरीत खऱ्या अर्थाने पुस्तकांनी अनेक बाबतीत समृद्ध केलं.कोणतीही स्त्री ही अबला नसते तर ती योद्धा असते,तिच्याएवढं सामर्थ्य आणि हिम्मत पृथ्वीतळावर कोणातही नाही ,नसते याची मला प्रचिती आली.
कितीही मोठा योद्धा असला तरीही तिला जन्म देणारी ही एक स्त्रीचं असते हा वाक्य मला खऱ्या अर्थाने उमजलं.💛🌱
©️Moin Humanist💛
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा