महामाया निळावंती ♥️
गेल्या एका आठवड्यापासून सुरू असलेला या आगळ्या-वेगळ्या कादंबरीचा विलक्षण प्रवास आज अखेर पूर्ण झाला.वाचकाला पूर्णपणे शेवटपर्यंत गुंतवून ठेऊन एका वेगळ्याच विश्वाची सफर घडवून आणण्याची ताकद अंगी ठेवणारी 'सुमेध दादा'लिखित 'महामाया निळावंती'ही कादंबरी 'मस्ट रीड'आहे.
'सुरुवातीपासून शेवटपर्यंत' खिळवून ठेवणारी ही कादंबरी एक 'रोलर कोस्टर'आहे;जो वाचकाला एकाच ठिकाणी बसवून एका नवीन दुनियेतुन फिरवून आणायचं काम करतो.शेवटच्या पृष्ठापर्यत हादरे देणारा या कादंबरीचा कथानक डोकं सुन्न करून जातो.वाचकाच्या मनावर चढलेली या कादंबरीची 'झिंग'वाचन समाप्त होऊन सुद्धा काही दिवस मात्र कमी होतं नाही,तर यातील कथानक आणि पात्र काही केल्या वाचकांचा पिच्छा सोडतं नाही.
'जणू आपण एक भव्य 'वेबसिरीज'बघतोय असा भास आपल्याला होतो,हे सर्वकाही आपल्या डोळ्यासमोरच घडतंय असं आपल्याला अनेक वेळा वाटून जातं.'
या प्रवासाला सुरुवात केल्यानंतर 'आपण आपल्या या विश्वात राहत नाही',तर या कादंबरीच्या एका वेगळ्याच विश्वात पूर्णपणे हरवून जातो.आपल्याला आजूबाजूचं काहीच भान राहतं नाही,आपण यातील एक भाग होऊन जातो.यामधील पात्रांशी संवाद साधू लागतो,त्यांच्या सुख-दुःखाशी एकरूप होऊन जातो, तर घडलेल्या घटनांशी आपसूकच जोडल्या जातो.यातील विक्रम विभूते,नलू,आनंदा,घैसास गुरुजी,कुशल रायरीकर,हेलबर्ग,बाजिंदा इत्यादी पात्र आपल्या स्मरणातून लवकर जातं नाही.
लेखकांनी यामध्ये विविध प्रसंग,स्थळ आणि पात्रांच केलेलं सुरेख वर्णन आणि दिलेली रोचक माहिती फार जमेची बाजू आहे.कादंबरीच्या प्रत्येक पृष्ठातून लेखकाने घेतलेली मेहनत आणि केलेला अभ्यास झळकतो,जाणवतो.
प्रेम,द्वेष,हिंसा,क्रोध,आपुलकी,माणुसकी,दुःख,रहस्य,थ्रिल,भीती आणि इत्यादी बरंच काही यामध्ये आहे.एकंदरीत काय ?तर हे रसायन फार जमून आलं आहे.एकदा हे हातात घ्यावं आणि शेवटपर्यंत सर्वकाही विसरून जावं असं हे रसायन आहे.मुळात ही कादंबरी फक्त "वाचायची नाही तर अनुभवायची गोष्ट आहे."
थोडक्यात कथानक......✨
400 वर्षांपूर्वी निळावंती सह्याद्रीच्या जंगलात राहायची. बाजिंद्याने स्वतःच्या फायद्यासाठी निळावंतीशी लग्न केलं. तिच्याकडून पशुपक्ष्यांची भाषा शिकून घेतली. स्वार्थासाठी तिचा वापर करून घेऊन नंतर तिचा खून केला. सह्याद्रीच्या खोऱ्यात बाजिंदा आणि निळावंतीची प्रेमकथा अजूनही चवीने सांगितली जाते. ह्या निळावंतीची पोथी कुप्रसिद्ध आहे. जो वाचतो त्याला एक तर वेड तरी लागतं किंवा त्याचा मृत्यू तरी होतो असं म्हटल्या जातं.
तर,या कादंबरीच्या कहाणीला सुरुवात होते.
अलीकडच्या काळात म्हणजेच 1992 साली घडलेल्या एका विचित्र घटनेपासून.
विक्रम विभूते नामक इसम वरी नमूद केलेल्या 'निळावंतीची पोथी' शोधत सह्याद्रीच्या जंगलात येतो. त्याच्यासोबत असते त्याची छोटी मुलगी नलू व त्याच्या मुलाचा(आनंदा)एका लाकडी पेटीत बर्फ व मिठामध्ये ठेवलेला 'मृतदेह'.ह्या जतन केलेल्या मृतदेहाला जिवंत करण्यासाठी, लॉजिक आणि सायन्सला विसरून फक्त 'निळावंतीच्या पोथीवर' विश्वास ठेवून आपल्या मुलाच्या प्रेमात आंधळा झालेला हा बाप सह्याद्रीच्या या जंगलात आलेला असतो.तो आपल्या मुलाच्या मृतदेहाला जिवंत करण्यासाठी अतोनात प्रयत्न करतो.पण त्याला हवं तसं यश मिळतं नाही,पण तरीही तो हताश होतं नाही आणि आपले प्रयत्न सुरू ठेवतो आणि अशातच अनपेक्षितपणे त्याला निळावंतीचे दर्शन होतात......🌱
आता,
ही निळावंती नेमकी कोण ?
निळावंती अजूनही अस्तित्वात आहे का? तिची भाषा म्हणजे कोणती भाषा? निळावंती जर आजही अस्तित्वात असेल तर चारशे वर्षांपूर्वी ती मेली नव्हती का? बाजिंद्याने निळावंतीचा खून केला नव्हता का? तिचा खून कोणी केला होता? खून होऊनही निळावंती जिवंत कशी राहिली? आणि महत्वाचं म्हणजे विक्रम आपल्या मुलाच्या मृतदेहाला जिवंत करण्यात यशस्वी होतो का ?
ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे 'महामाया निळावंती'त.वाचकांना मिळतील.त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे कादंबरीतच शोधली तर बेस्ट होईल...
आवर्जून वाचा...♥️
©️Moin Humanist✨
अप्रतिम...तु जे लिहल आहे त्यामुळे पुस्तक वाचनाची आतुरता वाढली..आहे..तुझ लिखाण म्हणजे आता एखादा movie च ट्रेलर आपण बघितला असता movie बघितलाच पाहिजे अस वाटते तस तुझ पुस्तकाचा अनुभव वाचला असता ते पुस्तक आवर्जून वाचवे असे वाटते..असे खूप छान लिखाण तुझे आहे...तुझ अभिनंदन...अशीच वाचनाची चळवळ उंच उंच होत जावो..अशी माझ्याकडून तुला शुभेच्या...
उत्तर द्याहटवा