We Read 'Sunday Special'17'वी वाचनीय पुस्तकांची यादी..🌱
https://wa.me/7066495828
आपण We read च्या यादीत सातत्य ठेवण्याचं प्रयत्न करत आहोत..कोणतेही पुस्तकं निवडण्याआधी कृपया संपूर्ण यादी वाचावी...🌱😇
____________________________________________
1)इन्व्हेस्टॉनॉमी ~ प्रांजल कामरा
245₹ घरपोच (शिपिंग फ्री)
तुम्हाला शेअर बाजारात पैसे गुंतवायला भीती वाटते का?
गुंतवणूक सुरू करण्याआधी आपण त्यात तज्ज्ञ असले पाहिजे असे तुम्हाला वाटते
का?
हा सगळा प्रकार म्हणजे बेटींग, जुगार आणि नशीब यांचा आहे असे वाटते का?
असे प्रश्न तुम्हाला पडत असतील तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे म्हणून समजा
आधुनिक मूल्यात्मक तत्वे काय आहेत एवढेच इन्व्हेस्टॉनॉमी समजावून सांगत नाही
तर ते शेअर बाजारातील बरीच गुपितेही आपल्यासमोर उघड करते. पीके म्हणतात की,
‘एखादा मॅट्रीक पास झालेला माणूसही शेअर मार्केटमध्ये जोरदार गुंतवणूक करत
असतो.’या सगळ्याला तशी मानसिकता लागते. तशी मानसिकता जोपासण्यासाठीच
तर या पुस्तकाचा घाट घालण्यात आला आहे.
जेवढे जेवढे तुम्ही जास्त शिकाल तेवढे तेवढे तुम्ही त्यात चक्रवाढ व्याजाने तरबेज
बनाल हे सांगणे नलगे.
2)रिच डॅड पुअर डॅड -रॉबर्ट कियोसाकी
मुळ किंमत-499₹
445₹ घरपोच (शिपिंग फ्री)
गरीब आणि मध्यमवर्गीय लोक पैशांसाठी काम करतात. जीवन तुमच्याशी बोलत नाही, ते तुम्हाला धक्का देतं. प्रत्येक धक्का ही सूचना असते की यातून काही शिक, धडा घे, बदल.
तुमची समस्या तुम्ही स्वतः आहात. तुम्ही स्वतःला बदलू शकता, शिकू शकता, जास्त समजदार बनू शकता.
3)भारताची कुळकथा ~डॉ.मधुकर धावलीकर
मुळ किंमत-450₹
400₹ घरपोच (शिपिंग फ्री)
'भारताचा इतिहास सुरू कधी होतो? महाभारत म्हणजे खरेच ‘जय’ नावाचा इतिहास आहे? इतिहासाचा प्रवास मांडायचा कोणत्या आधारावर? साम्राज्यांच्या उभारणीच्या अन् पतनाच्या आधारावर? धार्मिक प्रभावांच्या पायावर? की साहित्यातील वर्णनांच्या कल्पनांवर? पर्यावरण, आर्थिक अन् सामाजिक बाबी, पुरातत्त्वीय उत्खननातून मिळालेले सबळ पुरावे अशा अभिनव प्रमाणकांचा उपयोग करून प्रागैतिहासिक काळापासून मांडलेला भारताचा इतिहास म्हणजे भारताची कुळकथा '
4)गणिका, महात्मा आणि एक इटालियन ब्राह्मण – मनू एस. पिल्लई
मुळ किंमत-400₹
355₹ घरपोच (शिपिंग फ्री)
जातव्यवस्थेवर उपरोधात्मक लिहिणारा तंजावूरच्या मराठा घराण्यातील राजपुत्रापासून ते हिंदू
मंदिरातील मस्लीम देवतेपर्यंत-एक गणिका, जी योद्धा-राणी बनली तिच्यापासून ते ग्रामोफोनवर
गाणाऱ्या गणिकेपर्यंत स्तनविहीन स्त्रीपासून ते तीन स्तन असलेल्या देवीपर्यंत- आणि पवित्र
संस्कृतची भक्ती करणार्या ब्रिटिश माणसापासून ते व्हिक्टोरिया महाराणीपर्यंत – या पुस्तकातले
विविध विषयांवरील निबंध भारताच्या भूतकाळाकडे बघण्याची एक खिडकीच उघडतात. त्या
खिडकीतून दिसणारे समृद्ध जग पाहून आपण थक्कच होतो. आणि विचार करू लागतो की, यातील
कितीतरी गोष्टी आपण विसरूनच गेलो आहोत आणि कितीतरी गोष्टी आपण जाणूनबुजून पुसून
टाकल्या आहेत.
5)मंडालेचा राजबंदी - अरविंद व्यं. गोखले
285₹ घरपोच (शिपिंग फ्री)
'बाळ गंगाधर टिळक... भारतीयांच्या दृष्टीने लोकमान्य, तर ब्रिटिश साम्राज्यवाद्यांच्या दृष्टीने राजद्रोही! टिळकांना नामोहरम करण्यासाठी राजद्रोही ठरवणे आवश्यक होते; परंतु होते तितकेच अवघड! न्यायबुध्दीचा टेंभा मिरवणा-या परक्या राज्यकर्त्यांनी त्यासाठी जंग-जंग पछाडले. त्या संघर्षात पणाला लागले, ते लोकमान्य टिळकांचे वकिली कौशल्य... आणि तरीही शिक्षा झालीच. सहा वर्षे तुरुंगवास. टिळकांनी ती शिक्षाही स्वीकारली - धीरोदात्तपणे. त्यातूनच जन्माला आला - गीतारहस्य हा ग्रंथराज. शंभर वर्षांपूर्वीचा हा सारा इतिहास पुन्हा पिंजून उभी केलेली एका राष्ट्रभक्ताची संघर्षगाथा. आजही तेवढीच प्रेरणादायी...!'
6)निवडक मुलाखती -भालचंद्र नेमाडे
225₹ घरपोच (शिपिंग फ्री)
आपल्यासारख्यांना वाचकांशी संवाद वगैरे साधण्याचा काय मार्ग उपलब्ध असतो? महाराष्ट्रातली एकजात वर्तमानपत्रादी कोणाच्या हाताशी किंवा हातात किंवा हातची आहेत, एकदा वाचकांशी जवळचे संबंध प्रस्थापित व्हायला लागले, की आपोआप पत्रव्यवहार, भेटीगाठी, चर्चा अपुर्या पडायला लागतात. मग गावोगाव पसरलेले आपले वाचक मनात वेळोवेळी उद्भवणारे वैयक्तिक प्रश्न समाईक करायला उत्सुक असतात. इथे एकाच भाषेतल्या समूहमनातल्य सार्वजनिक चिंता व्यक्त व्हायला लागतात. मुलाखत हा काही वाड:मयप्रकार नाही की समीक्षाही नाही. प्रश्न विचारणार्या मुलाखतकारांच्या भागीदारीनं हा एक रचनाप्रकार होऊ शकतो. मुळात हा एक सांस्कृतिक नाट्यसंवाद असतो.
7)वीरप्पन -सूनाद रघुराम
मुळ किंमत-350₹
295₹ घरपोच (शिपिंग फ्री)
वीरप्पन...! कर्नाटक व तामिळनाडू राज्यांत धुमाकूळ घालणारा भारतातला ‘मोस्ट वॉन्टेड’ क्रूर डाकू. आपल्या टोळीच्या मदतीने वीरप्पन निलगिरी पर्वतराजींमधील समृद्ध जंगलांतून करोडो रुपये किंमतीचे चंदन चोरतो; शंभराहून अधिक हत्तींना क्रूरपणे ठार मारून हस्तिदंत मिळवतो; त्याला पकडण्यासाठी गेलेले विशेष कृतिदलातले पोलीस अधिकारी, वनअधिकारी, पोलिसांना मदत करणारे गावकरी, अशा शंभराहून अधिक लोकांच्या त्याने निर्घृण हत्या केलेल्या आहेत. खंडण्या वसूल करणारा, अपहरणे करणारा, दहशतवाद निर्माण करणारा हा खुनी दरोडेखोर, तस्कर दोन राज्य सरकारांना आदेश देण्याइतका माजतो. इतकेच नव्हे, तर तामीळ दहशतवादी आणि नक्षलवादी संघटनांच्या संपर्कात आल्यावर अचानक त्याला आपण गोरगरिबांचा ‘मसीहा’ असल्याचा साक्षात्कार होतो आणि तो जगातल्या मोठमोठ्या क्रांतिकारकांचे दाखले देऊ लागतो!
8)द सिक्रेट - रॉन्डा बर्न
मुळ किंमत-499₹
455₹ घरपोच (शिपिंग फ्री)
एकदा का हे रहस्य तुम्ही शिकून घेतलंत की तुम्हाला जे हवं ते तुम्ही मिळवू शकता, करू शकता किंवा बनू शकता. मग तुम्हाला कळेल की तुम्ही खरोखरच कोण आहात, तुमच्या अस्तित्वाचा खरा अर्थ ! तुमच्या व्यापकतेची, विशालतेची, खऱ्या शक्तीची जाणिव तुम्हाला होईल आणि त्या वैभवाचीही जे तुमची वाट पहातं आहे. "
9)जुगाड-नवी राजू, जयदीप प्रभू , सिमॉन आहुजा
मुळ किंमत-400₹
We read -375₹ With शिपिंग घरपोच
ज्या कॉर्पोरेट अधिकार्यांना आणि व्यावसायिकांना यशस्वी व्हायचं आहे आणि स्वतःची प्रगतीही करून घ्यायची आहे आणि तीही फक्त साधनसामग्रीच्या बाबतीत
कायमच अभावग्रस्त असणार्या भारतासारख्या देशामध्येच फक्त नाही, तर जगातल्या
सर्वच बाजारपेठांमध्ये त्यांना हे साध्य करायचं आहे, त्यांना हे पुस्तक उपयुक्त वाचनापलीकडेही
आणखी बरंच काही देऊन जातं!’’
10)अॅटॉमिक हॅबिट्स ~: जेम्स क्लियर
मुळ किंमत-399₹
We read -355₹ With शिपिंग घरपोच
या पुस्तकात सवयी अंगी कशा बाणवाव्यात या विषयातील विशेषज्ञ जेम्स क्लियर सांगतात की, छोटे छोटे बदल जीवनात महान परिणाम कशा प्रकारे घडवून आणतात. ते काही सोपी तंत्रं सांगतात, ज्यामुळे जीवनातील अस्ताव्यस्तता कमी होऊन जीवन अपेक्षेप्रमाणे सहज सोपं होईल. या तंत्रांमध्ये ते विस्मरणात गेलेल्या सवयींना क्रमबद्ध करण्याची कला, दोन मिनिटांच्या नियमाची ताकद आणि गोल्डीलॉक्स झोनमध्ये प्रवेश करण्याचे तंत्र यांचा उल्लेख करतात. हे छोटे बदल तुमचं करिअर, नातेसंबंध आणि जीवन यांत परिवर्तन घडवतील. तुम्ही तुमचा दिवस आणि जीवन कसे व्यतीत करता, याविषयीचा तुमचा दृष्टिकोन बदलणारं असं हे पुस्तक आहे.
11)अवकाळी पावसाच्या दरम्यान ची गोष्ट
-आनंद विंगकर
मुळ किंमत-200₹
We read -185₹ With शिपिंग घरपोच
कवी आनंद विंगकर यांची 'अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट' ही कादंबरी एक अकस्मात घडलेली घटना आणि एक अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होते. अस्मानी संकटामागच्या मानवी हस्तक्षेपांचं भान देत, अकस्मात उद्भवलेल्या घटनांच्या मालिकांची अपरिहार्य शोकात्म परिणती दिग्दर्शित करत त्या वातावरणातील बदलते मानवी भाव, मानवी जीजीविषा, कणखरपणा यांचा गंभीर प्रत्यय देते. रंजकतेच्या पारंपरिक कुप्रथांचा त्याग करूनही ही कादंबरी अत्यंत वेधक उतरली आहे. कारण लेखकाचं वृत्तिगांभीर्य आणि भावनात्मक ताटस्थ्य. आत्महत्या करणारं शेतकरी जोडपं, त्यांची थोरली लेक, तिचा प्रियकर यांची चरित्रं आणि एकूण कथानकाचं वाहतेपण प्रभावी आहेच, खेरीज ग्रामसमाजातील व्यवहार, परस्परसंबंधांचे ताणेबाणे यांच्यातील अस्सलतेमुळे ही कादंबरी अधिक मोठा आवाका धारण करते. कादंबरी वाचून संपवताना आपण ती वाचण्याआधीचे उरत नाही, हे तिचं महत्त्वाचं यश आहे.
12)दुनियादारी - सुहास शिरवळकर
325₹घरपोच (शिपिंग फ्री)
ही आहे एक काल्पनिक सत्यकथा !
तुमची, माझी, आपल्या मित्रांची , घराघरातून नित्य घडत असणारी .म्हणूनच जो पर्यंत दोस्ती-यारी, दुष्मनी , आनंद – दु:ख, प्रेम – मत्सर या भावना मानवी मनात अनंत आहेत; तो पर्यंत ही काल्पनिक परंतु प्रातिनिधिक असलेली सत्यकथा अमर आहे.
13) खऱ्या शिक्षणाच्या शोधात -डेव्हिड ग्रीबल
We read -325₹ With शिपिंग घरपोच
खऱ्या शिक्षणाच्या शोधात ' या पुस्तकात ब्रिटन, इव्कॅडोर, भारत, इस्त्रायल , जपान, न्यूझीलंड, स्विझरलँड आणि अमेरिका या देशांतील शाळांचे वर्णन आहे. शाळेची पूर्ण फी भरण्यास तयार असलेल्या आणि चोखंदळपणे निवडलेल्या पालकांच्या नात मुलांपासून ते इतर शाळांनी बाद केलेल्या, तसचं दारिद्रयात खितपत पडलेल्या कुटुंबातील मुलांपर्यंत सर्व प्रकारची मुलं या शाळांचे विद्यार्थी आहेत. शाळांचे परिसरदेखील तितकेच वैविध्यपूर्ण आहेत. त्यांत उपेक्षितांची वस्ती असलेली हार्लेम सिटी आहे. दिल्लीतला आश्रम आहे.
14)नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे जीवन राजकारण आणि संघर्ष – कृष्णा बोस
मुळ किंमत-400₹
We read -355₹ With शिपिंग घरपोच
नेताजींवर पायाभूत संशोधन करणाऱ्या बोस कुटुंबातील
नामांकित सदस्य कृष्णा बोस यांच्या लेखणीतून उतरलेला
सुभाषचंद्र बोस यांचा संपूर्ण जीवनेतिहास.
बोस कुटुंबातील सदस्य आणि आदरणीय विदुषी कृष्णा बोस यांनी सहा दशकांच्या
कालावधीत लिहिलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवन, राजकारण आणि संघर्ष या
ग्रंथातून बोस यांच्या लहानपणापासून ते ऑगस्ट १९४५ मध्ये झालेल्या नश्वर अंतापर्यंत
त्यांच्या जीवनाचा आढावा घेतला आहे. यामध्ये एक क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिक या
जोडीला ‘एक माणूस’ म्हणून ते कसे होते हे अगदी ठळकपणे दिसून येतं.
15)द हिडन लाईफ ऑफ ट्रीज ~ पीटर वोह्लेबेन
300₹ घरपोच (शिपिंग फ्री)
झाडांचेही सामाजिक जीवन असते हे शास्त्रज्ञांना ज्ञात होतेच. पण वोह्ललेबेन यांनी हीच गोष्ट वाचकांसमोर अतिशय सुरेख पद्धतीने मांडली आहे.
16)घोस्ट रायटर -आशिष महाबळ
मुळ किंमत-250₹
We read -215₹ With शिपिंग घरपोच
विज्ञान संशोधनाची नवनवी क्षेत्रं विकसित होत असताना विज्ञानकथा लेखनानेही नव्या कल्पना धुंडाळाव्यात, अशी अस्सल विज्ञानप्रेमी वाचकांची अपेक्षा असते. या संग्रहातल्या कथा ही अपेक्षा नक्कीच पूर्ण करतात. विज्ञानकथावाचनाची आपली इयत्ता वाढवतात.
17)संघर्षाची मशाल हाती -नरसय्या आडम
मुळ किंमत-400₹
We read -325₹ With शिपिंग घरपोच
नरसय्या आडम म्हणजेच आडम मास्तरांशी माझा दीर्घकाळ परिचय आहे. आधी कामगार कार्यकर्ता, नंतर सोलापूर महापालिकेचे नगरसेवक आणि पुढे तीन वेळा आमदार म्हणून मी त्यांना पाहिलं आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव आणि केंद्रीय कमिटीचे सदस्य म्हणूनही त्यांनी भरीव कामगिरी केली आहे.
18)लोकांचे संविधान- रोहित डे
मुळ किंमत-500₹
We read -400₹ With शिपिंग घरपोच.
रोहित डे यांचं हे पुस्तक संविधानाचा भारतीयांवरील प्रभाव अधोरेखित करणारं
आहे. जनसामान्यांच्या जीवनात संविधानाने घडवलेले बदल आणि त्याचे परिणाम
यांविषयी या पुस्तकात उदाहरणांनिशी केलेलं विवेचन आपल्या संविधानाचं सामर्थ्य
उलगडून दाखवणारं आहे.
19)कास्ट मॅटर्स - सूरज एंगडे
मुळ किंमत-460₹
We read -375₹ With शिपिंग घरपोच
या स्फोटक पुस्तकात, जगातल्या अनेक खंडांमध्ये शिक्षण घेतलेले पहिल्या पिढीचे दलित अभ्यासक, जातीबाबत खोलवर रुजलेल्या धारणा आणि तिचं बहुस्तरीय स्वरूप विशद करतात. दररोज नरकयातना भोगावा लागणारा दलित आणि प्रेम व विनोदबुद्धीनं भारलेली त्याची अपूर्व बंडखोरीही यात आढळते. दलितांमधील अंतर्गत जातीभेदांपासून ते उच्चभ्रू दलितांचं वर्तन आणि त्यांच्यातील आधुनिक काळातल्या अस्पृश्यतेची विखुरलेली रूपं ब्राह्मणी सिद्धांताच्या अटळ प्रभावाखाली कार्यान्वित असतात. जोवर दलित सत्ता मिळवण्यासाठीच्या लढ्यात नेतृत्वस्थानी नसतील आणि ब्राह्मणवादाविरोधात ब्राह्मण उभे राहणार नाहीत, तोवर जातीचं अस्तित्व राहणार असल्याची मांडणी एंगडे करतात.
20)ब्रेव्ह न्यू वर्ल्ड-अल्डस हक्सले
We read -325₹ With शिपिंग घरपोच
ज्याप्रमाणे पोलादाशिवाय मोटरगाड्या आणि विमानं बनवता
येणार नाहीत, त्याचप्रमाणे सामाजिक अस्थैर्याशिवाय
शोकांतिका लिहिणं शक्य होणार नाही.
ब्रेव्ह न्यू वर्ल्ड १९३२मध्ये प्रसिद्ध झाली तेव्हा हक्सले आणि
त्याचे वाचक दोघांनाही या कादंबरीतील जग हे भयंकारी
डिस्टोपियन जग आहे याची कल्पना होती. पण सांप्रत काळी
‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’ वाचणाऱ्यांची ही एक युटोपिया आहे अशी
चुकीची कल्पना होण्याची शक्यता आहे.
उपभोक्तावादाची वाटचाल अशीच चालू राहिली तर हक्स्लेंच्या
कल्पनेतील जग वास्तवात आलेलं पाहण्याचे दिवस दूर नाहीत.
आजकाल सुख आणि समाधान हेच सर्वोच्च मूल्य झाले आहे.
उपभोक्त्यांचे जास्तीतजास्त समाधान करण्यासाठी जैवतंत्रज्ञान
आणि सामाजिक अभियांत्रिकीचा होणारी वाढता वापर
आपल्याला एका भयंकारी विनाशाच्या दिशेने कसा घेऊन
चालला आहे हे तुम्हाला समजून घ्यायचे असेल तर ब्रेव्ह न्यू
वर्ल्डमधील विज्ञान आणि तंत्रज्ञान, सुखी समाधानी जीवन आणि
आयुष्याचा अर्थ यावरील सखोल ऊहापोह वाचलाच पाहिजे.
21)केदारनाथ 17 जून -डॉ.प्रकाश कोयाडे
मुळ किंमत-390₹
We read -340₹ With शिपिंग घरपोच.
जोपर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत ही गिधाडे जवळ
येत नसतात ! ते आपल्या मरणाची वाट पाहत घिरट्या घालत आहेत,
म्हणूनच आपण मरायचं नाही..."
"आपल्याला जिवंत रहावंच लागेल!"
एका सत्य घटनेवर आधारीत कादंबरी...केदारनाथ १७ जून !
22)फुकटचेच सल्ले~डॉ.रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी
185₹ घरपोच (शिपिंग फ्री)
वाचाल तर वाचाल, असे आम्हाला शिकवले गेले होते. म्हणून आम्ही वाचत गेलो आणि वाचलेले जे काही होते त्यामुळेच संपन्नपणे वाढलो. अलीकडेही ‘वॉचाल' तर बिघडाल असे पोटतिडकीने सांगूनही वाचनावर बहिष्कार का टाकला जात आहे, याचा उलगडा होऊ शकत नाही. अनुत्तरित प्रश्नांवर खूप चिंतन करून उत्तर शोधायचे असते म्हणून आम्ही त्या शोधात वेळोवेळी जे काही लिहीत गेलो त्यातील काही लिखाण ‘फुकटचे सल्ले' म्हणून या पुस्तकात एकत्रितपणे दिले आहे.हे सल्ले फुकटचे असले तरी त्यांना अनुभवांचा आधार आहे. म्हणून ते महत्त्वाचे ठरतात. तेव्हा सदरचे पुस्तक विकत घेऊन आमचे हे फुकटचे सल्ले आपल्या जीवनात उपयोगात आणाल अशी आशा आहे.
23)असा झाला पुणे करार +नाही नाचणार आदिवासी आता+मरण स्वस्त होत आहे+महात्म्याची अखेर
एकूण 4 पुस्तके
मुळ किंमत-600₹
We read -495₹ With शिपिंग घरपोच
24)जीव जिथे गुंतलेला -डॉ. अतुल गवांदे
We read -255₹ With शिपिंग घरपोच
जीव जिथे गुंतलेला...’ हे डॉ. अतुल गवांदे यांचे मूळ इंग्रजी अनुभवकथन. त्याचा मराठीत अनुवाद नीला चांदोरकर यांनी केला आहे. वैद्यकीय व्यवसायात तंत्रज्ञानाचा कितीही शिरकाव झाला असला, तरी त्याचा पाया अजूनही अधांतरीच आहे. रुग्णाचा जीव वाचवणेहे डॉक्टरचे कामअसले, तरी तोही माणूस असतो. त्याच्या कडूनही चुका होऊ शकतात किंवा कधी कधी काही विचित्र गोष्टींना डॉक्टरांना सामोरे जावे लागते. अशा वेळी समोर असलेल्या रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरने केलेले प्रयत्न योग्य ठरल्यास रुग्ण आनंदाने घरी जातो किंवा ते प्रयत्न चुकल्यास रुग्णाचा मृत्यू होतो. वैद्यकीय क्षेत्रात अशा अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी सातत्याने घडत असतात.
25)सलोख्याचे प्रदेश -सबा नक्वी
मुळ किंमत-250₹
We read -225₹ With शिपिंग घरपोच
भारतात अनेक जाती - धर्मांचे लोक राहतात. प्रत्येक समाजाच्या चालीरीती, रूढी परंपरा वेगळ्या असतात. तरी 'अनेकतात एकता' म्हणतो त्याप्रमाणे येथील प्रमुख हिंदू व मुस्लीमांच्या परंपरा, सण, उत्सव, एकत्र साजरे होतात.
अशा काही ठिकाणी भेट देऊन तेथील समजाचे चित्रण सवा नक्वी यांनी 'सलोख्याचे प्रदेश' मधून दाखविले आहे.
26)चिखल घाम आणि अश्रू -बिअर ग्रील्स
मुळ किंमत-400₹
We read -375₹ With शिपिंग घरपोच
बेअर ग्रील्स वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जिवंत राहिला आहे आणि प्रतिकूल परिस्थितीत निसर्गाशी कसं जुळवून घेऊन स्वतःला जिवंत ठेवायचं हे देखील तो आपल्या दर्शकांना सांगतो. चिखल घाम आणि अश्रू हे पुस्तक म्हणजे बेअर ग्रील्सची जीवनकथा आहे.
27)डेझर्टर -विजय देवधर
मुळ किंमत-425₹
We read -345₹ With शिपिंग घरपोच.
गंथर बान्हमान यांच्या 'आय डेझर्टेड रोमेल' या पुस्तकाचा विजय देवधर यांनी केलेला हा अनुवाद आहे.
हे पुस्तक म्हणजे एक अद्भूत साहस कथा आहे. अनेक साहसी घटना आणि थरारक प्रसंगामुळे ते रोमांचकारी
झाले आहे. बान्हमान यांचे स्वानुभव आणि कल्पना यांची बेमालूम सरमिसळ असलेले हे कथानक आहे.
28)अखेरचे शिलेदार -पी साईनाथ
मुळ किंमत-350₹
We read -325₹ With शिपिंग घरपोच
अखेरचे शिलेदार' या पुस्तकात स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ असलेले काही जण त्यांची गोष्ट आपल्याला सांगतात. आदिवासी, दलित, इतर मागासवर्गीय,
मुस्लीम, हिंदू आणि शीख पंथाची माणसं आहेत ही. ते वेगवेगळ्या भाषा बोलतात. भारताच्या विविध प्रांतांतली, विभिन्न संस्कृती जपणारी आणि वेगवेगळ्या पाश्वभूमीची ही मंडळी आहेत. काही आस्तिक आहेत; तर काही नास्तिक. काही डावे, काही गांधीवादी; तर काही आंबेडकरवादी.
29)गढीवरून -राजा गायकवाड
मुळ किंमत-300₹
We read -250₹ With शिपिंग घरपोच
कृषी-परंपरेतल्या बहुजनांच्या आणि त्यातल्या जराश्या उच्च स्थानावर बसलेल्या किंवा फलाण्या जातीत जन्म घेतल्यामुळे आपण उच्च स्थानावरच आहोत, असं समजून वागणाऱ्या माणसांच्या आत असलेले मानसिक-सामाजिक-सांस्कृतिक आणि राजकीय गंड यांना हात घालणाऱ्या कथा या संग्रहामध्ये बहुसंख्येने आहेत.
30)दुर्दम्य - भारतीय सैन्य नेतृत्त्वाची उत्तुंग शिखरे
मेजर जनरल शशिकान्त पित्रे (निवृत्त)
मुळ किंमत-350₹
We read -305₹ With शिपिंग घरपोच.
दुर्दम्य म्हणजे नेमकं काय? जिगरी दोस्त मन्नू रावतचा फोन आला, ‘‘हाऊ आर युअर लेग्ज, पंकज?'' नेहमीच्या टोलेजंग हास्यानिशी पंकज जोशींनी उत्तर दिले, ‘‘कौनसी टांगें, मन्नू? टांगें तो अब हैंही नहीं!'’ त्यांच्या पोटात, मूत्रपिंडात आणि यकृतात एकूण नऊ गोळ्या घुसल्या होत्या. माणेकशा यातून केवळ जगलेच नाहीत, तर स्वतंत्र भारताचे पहिले फील्डमार्शलही झाले...! ले. जनरल एसपीपी थोरात, अॅृडमिरल भास्करराव सोमण, फील्डमार्शल सॅम माणेकशा, ले. जनरल प्रेम भगत, ले. जनरल सगतसिंग आणि ले. जनरल पंकज जोशी. भारतीय सैन्यदलातील पराक्रमाची सहा उत्तुंग शिखरे! त्यांच्या अमर कर्तृत्वाच्या या स्फूर्तिदायक कहाण्या...
31)स्वामी-रणजित देसाई
मुळ किंमत-350₹
We read -325₹ With शिपिंग घरपोच
महाराष्ट्रातल्या जनतेला जिने मंत्रमुग्ध केले, अशी मराठी सारस्वतातील अजरामर साहित्यकृती. रणजित देसाई : मराठी साहित्याला समृद्ध करणारे थोर साहित्यिक. १९४६ साली `भैरव` या कथेला लघुकथास्पर्धेत वाचकांकडून एकमुखाने पहिले पारितोषिक.
32)न्याय – मायकल सॅंडेल
मुळ किंमत-400₹
We read -330₹ With शिपिंग घरपोच
खोट बोलण हे नेहमीच वाईट असतं का?
व्यक्तिस्वातंत्र्याला काही मर्यादा असली पाहिजे का?
अपवादात्मक परिस्थितीत एखाद्याचा खून करावा लागल्याचं समर्थन करता येऊ शकेल का?
मुक्त बाजरपेठ खरंच मुक्त आहे का?
विषमता कमी करण्यासाठी ठरावीक लोकांवर कर आकारणं न्याय्य आहे का?
33)पर्व -डॉ.एस.एल. भैरप्पा
मुळ किंमत - 550₹
We read-455₹घरपोच.(शिपिंग फ्री)
व्यासरचित महाभारतातील आभाळाएवढ्या उंचीची पात्रे; परंतु सगळ्यांचे पाय मातीचे. अवघी जीवनमूल्ये कसोटीला लावणारे समरप्रसंग. संघर्ष. प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व वेगळे. प्रत्येकाच्या प्रेरणा वेगळ्या. प्रत्येकाचे प्राक्तनही वेगळे. त्याचबरोबर अनेक चमत्कार; दैवी शाप; दैवी वर. मानवी पातळीपेक्षा वेगळ्या पातळीवर जाणारे कथानक. कर्नाटकमधील अग्रगण्य कादंबरीकार तत्त्वचिंतक डॉ. एस.एल. भैरप्पा यांनी या चमत्कारांच्या, शापांच्या आणि वरदानांच्या भरभक्कम पडद्याआड लपलेल्या माणसांचा शोध घेतला.
34)मऱ्हाटा पातशाह -केतन कैलास पुरी
मुळ किंमत-300₹
We read -250₹ With शिपिंग घरपोच
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व समकालीन चित्रांचा व त्यांच्या व्यक्तीमत्वाचा ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे या पुस्तकात लेखक केतन पुरी यांनी आढावा घेतला आहे
35)युगंधर -शिवाजी सावंत
मुळ किंमत-750₹
We read -625₹ With शिपिंग घरपोच
हजारो वर्षांपासून श्रीकृष्ण भारतीय मन व्यापून दशांगुळे उरला आहे. भारतीय समाज व संस्कृती यांवर त्याचा अमीट असा ठसा उमटलेला आहे. ‘श्रीमद्भागवत’, ‘महाभारत’, ‘हरिवंश’ व काही पुराणांत श्रीकृष्णचरित्राचे अधिकृत संदर्भ सापडतात. परंतु गेल्या हजारो वर्षांत त्यावर सापेक्ष विचारांची आणि अतक्र्य चमत्कारांची पुटंच पुटं चढलेली आहेत. त्यामुळे त्याचं ‘श्री’युक्त सुंदर, तांबूसनीलवर्णी, सावळं रूपडं घनदाट झालं आहे, वास्तवापासून शेकडो योजनं दूर दूर गेलं आहे. श्रीकृष्ण हा ‘भारतीय’ म्हणून असलेल्या जीवनप्रणालीचा पहिला उद्गार आहे! त्याच्या चक्रवर्ती जीवनचरित्रात भारताला नित्यनूतन व उन्मेषशाली बनविण्याचा ऐवज ठासून भरला आहे. श्रीकृष्णाच्या जीवनसरोवरातील दाटलेलं शेवाळ तर्कशुद्ध सावधपणे अलगद दूर सारल्यास त्याचं ‘युगंधरी’ दर्शन शक्य आहे, हे ‘मृत्युंजय’कारांनी जाणलं. आणि त्यांच्या प्रदीर्घ चिंतनातून, सावध संदर्भशोधनातून, डोळस पर्यटनातून व जाणत्यांशी केलेल्या संभाषणातून साकारली ही साहित्यकृती – ‘युगंधर’!
36)भुरा -शरद बाविस्कर (11 वी आवृत्ती)
मुळ किंमत-500₹
We read -425₹ With शिपिंग घरपोच
धुळे जिल्ह्यातील रावेर या लहानशा खेड्यात एका कोरडवाहू शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या, रोजंदारीवर पडेल ते काम करून भाषाशिक्षण आणि तत्त्वज्ञानाच्या ओढीने वेगवेगळ्या देशातील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये शिकलेल्या, भाषा आणि तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासाठी जग पालथे घालणाऱ्या, तत्त्वज्ञानासारख्या गहन आणि गंभीर विषयाच्या अभ्यासाने समृद्ध झालेल्या, 'भुरा' ही आपली जातजाणीव ओलांडून मार्क्स, अल्थुझर, ग्राम्शी , महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपर्यंत पोहोचूनही स्वतंत्रपणे आपले सामाजिक वास्तव संवेदनशीलतेने आणि तेवढ्याच कठोर वैचारिक शिस्तीने तपासणाऱ्या प्रा. शरद बाविस्कर यांचे हे प्रांजळ आत्मकथन..
37)संभाजी -विश्वास पाटील
मुळ किंमत-825₹
We read -725₹ With शिपिंग घरपोच
औरंगजेबाच्या पाच लाख फौजेशी सलग आठ वर्षे कडवी झुंज देणारा मराठ्यांचा दुसरा छत्रपती, ज्याने वयाच्या बत्तीसाव्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर आपले मस्तक दिले; पण शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील एकही महत्त्वपूर्ण किल्ला आपल्या आरमारातील एकही जहाज गमावले नाही! गेली सव्वातीनशे वर्षे या विचारी,कवी-राज्यकत्र्याची आणि पराक्रमी सेनानीची गाथासंशयाच्या धडप्यामध्ये गुंडाळून ठेवली गेली होती!आजचे अग्रगण्य प्रतिभावंत कादंबरीकार विश्वास पाटील यांनासह्याद्रीच्या निबिड दऱ्याखोऱ्यांनी,सागरखाड्यांनी आणि दुर्लक्षिलेल्या दुर्मिळ कागदपत्रांनी सांगितलेली शिवपुत्र संभाजीराजांचीचित्तथरारक, वादळी, पण वास्तव गाथा!!
38)संताजी घोरपडे -रवि मोरे
225₹घरपोच(शिपिंग फ्री)
स्वामींच्या आज्ञेव्यतिरिक्त आम्ही काहीच नव्हतो. विश्वासाची जाती म्हणावी तरी स्वामींची आणी आमची शफत तुळशीबेलाच्या ‘श्री’ वरील आहे. स्वामींचे मांडीवर आम्ही उसे ठेऊन निजावे, आमचे मांडीवर स्वामींनी उसे ठेवावे, शरीर मात्र भिन्न, आत्मा एकच. आम्ही कोणे गोष्टीस अंतर पडलो नाही. आम्ही ऐसे सेवक नव्हे जे स्वामींचे स्मरण न करता आधी आपला बहुमान घेऊ. याचा पर्याय कागदी काय म्हणून लिहावा. स्वामी वडील. हे यश येते ते स्वामींचेच पुण्येकरून येते. आमचा अभिमान सर्व गोष्टीचा स्वामींशी. पूर्वीपासून स्वामींनीच गौरविले; तेथे वस्राचेच काय म्हणून लिहावे. पूर्वीपासून अंगीकार आमचा स्वामींनी केला आणी आम्हास बंधू म्हणविलें. हाच भाव सिद्धी पावला पाहिजे. स्वामीं व्यतिरिक्त आम्ही काही नाही. जैसी पूर्वी आज्ञेप्रमाणे वर्तणूक केली तैसीच करू.
39)महामाया निळावंती -सुमेध
मुळ किंमत-350₹
We read -325₹ With शिपिंग घरपोच
1992 साली घडलेली एक अजब घटना. एक बाप निळावंतीची पोथी शोधत सह्याद्रीच्या जंगलात येतो. त्याच्यासोबत आहे त्याच्या मुलाचा बर्फात अन मिठात ठेवलेला मृतदेह. ह्या जतन केलेल्या मृतदेहाला जिवंत करण्यासाठी बाप जंगजंग पछाडतो. शेवटी त्याला अनपेक्षितरित्या जंगलात साक्षात निळावंतीचं अस्तित्व सापडतं. बाप आपल्या मुलाच्या मृतदेहाला जिवंत करू शकतो का? वनदेवता निळावंती अजूनही अस्तित्वात आहे का? तिची भाषा म्हणजे कोणती भाषा? निळावंती जर आजही अस्तित्वात असेल तर चारशे वर्षांपूर्वी ती मेली नव्हती का?
40)जात समजून घेताना~ Gail Omvedt
मुळ किंमत-250₹
We read -225₹ With शिपिंग घरपोच
हे पुस्तक म्हणजे जात आणि जातिअंताचा संघर्ष या ऐतिहासिक विषयाचा अंतर्दृष्टीने घेतलेला अभ्यासपूर्ण शोध आहे. भारतीय परंपरा म्हणजेच हिंदू परंपरा आणि ब्राम्हणी परंपरा ; ब्राम्हण्यवाद म्हणजेच हिंदू धर्म असे स्वाभाविकपणे गृहीत धरले जाते. अंतर ब्राम्हण्यवाद म्हणजे वेदांवर आधारित भारतीय संस्कृती अशा धारणेवर आधारित आणि भारतीय संस्कृतीचा मूळ वारसा आर्याच्या परंपरेतील आहे अशा समग्र गृहीतकाला ही मांडणी आव्हान देते. भारतातील सेक्युलर भूमिकेचा पुरस्कार करणारेसुद्धा याच ‘ब्राम्हण्यवादी दृष्टिकोनात अडकले आहेत.
41)भटक्यांचे लग्न +आणि आदिमानव माणूस झाला+लिहित्या लेखकाचे वाचन +बराक ओबामा
एकूण 4 पुस्तके
मुळ किंमत-600₹
We read -495₹ With शिपिंग घरपोच
42)मी गालिब बोलतोय -शब्बीररोमानी
We read -255₹ With शिपिंग घरपोच
मिर्झा गालिब म्हणजे उर्दु शायरीतलं अजरामर नाव. मानवी भावभावनांना शब्दांचं कोंदण देणारा हा खरा युगकवी. त्याच्या कवितेइतकंच त्याच्या व्यक्तिमत्त्वाचं गारूड शायरीच्या चाहत्यांवर शेकडो वर्षे कायम आहे. शब्दांच्या श्रीमंतीसारखीच खानदानी श्रीमंतीही असलेला हा अवलिया, पण त्याच्या आयुष्यानं अशी वळणं घेतली की ती ही त्याच्या कवितेसारखीच भावविभोर ठरली. अशाच त्याच्या जीवनप्रवासातल्या खाचखळग्यांचा हा अनोखा प्रवास. स्वतः गालिबने जसा सांगितला असता, तसाच.
43)लॉर्ड्स ऑफ द डेक्कन – अनिरुद्ध कणिसेट्टी
मुळ किंमत-500₹
We read -400₹ With शिपिंग घरपोच
सहसा विशाल भारतीय उपखंडाचा इतिहास सांगताना, आधुनिक काळातील भारताचा मोठा भाग एकाच राजाच्या आधिपत्याखाली असण्याचा काळ अत्यल्प असल्याचं सांगितलं जातं. परकी आक्रमणं आणि गंगेच्या खोऱ्यातील राजकारण यांनी बहुतांश लोक झपाटून गेल्याचं दिसतं मात्र उर्वरित उपखंडाचा इतिहास हा अत्यल्प प्रमाणात आणि सहसा फक्त तळटीपांच्या स्वरूपात दिला जातो. कनिसेट्टी यांच्या या विद्वत्तापूर्ण आणि निःपक्षपातीपणे लिहिल्या गेलेल्या पहिल्याच पुस्तकाचं गंभीरपणे स्वागत झालं आहे.
44)अंबालक्ष्मी+खंडोबा+सूर्याची सावली -नितीन थोरात
एकूण 3 पुस्तके
मुळ किंमत-850₹
We read -725₹ With शिपिंग घरपोच
45)साद घालतो कालाहारी -मार्क आणि डेलिया ओवेनस
मुळ किंमत-530₹
475₹ घरपोच (शिपिंग फ्री)
'क्राय ऑफ कालाहारी’ हे पुस्तक म्हणजे कालाहारी वाळवंटात सात वर्षे राहिलेल्या मार्क आणि डेलिया ओवेन्स यांच्या जंगली प्राण्यांच्या सहवासातील अनुभवांवर आधारित कादंबरी आहे. त्याचा मंदार गोडबाले यांनी मराठी अनुवाद केला आहे. बदली कपड्यांचा एक जोड आणि एक दुर्बीण वगळता बाकी विशेष काही न घेता मार्क आणि डेलिया या तरुण अमेरिकन जोडप्याने प्राणिजीवनाचा अभ्यास करण्यासाठी आफ्रिकेचे विमान पकडले. तिथे पोहोचल्यावर एक जुनाट लँडरोव्हर गाडी विकत घेऊन त्यांनी कालाहारी वाळवंटात (डिसेप्शन व्हॅली) खोलवर मजल मारली.
46)एकलव्य -विजय देवडे
मुळ किंमत-390₹
We read -340₹ With शिपिंग घरपोच.
महाभारतातलं असं एक पात्र जे कुरुक्षेत्रावरच्या युद्धामध्ये असतं तर त्या युद्धाचं चित्र कदाचित बदललं गेलं असतं. एकलव्यानं गुरुदक्षिणेत अंगठा गुरू द्रोणाचार्य यांना दिला, त्याच्या निष्ठेनं सर्वांना भुरळ घातली. अशी गुरुदक्षिणा देऊन साहस, त्याग, निष्ठा व समर्पणाच्या जोरावर परत पर्वतासारखा उभा राहून एकलव्यानं आदर्श निर्माण केला.
भुंकणाऱ्या कुत्र्याच्या तोंडात फक्त आवाजाच्या दिशेनं बाण मारून लक्ष्यवेध करणारा एकलव्य बाणावर इतकं नियंत्रण असणारा महाभारतातला एकमेव धनुर्धर म्हणजे एकलव्य! तो एक बुद्धिमंत हुशार राजा होता, त्यांनीही अनेक युद्ध लढली. युद्धात कृष्णालाही नमायला लावणारा तो एक शक्तिशाली धनुर्धर आणि योद्धा होता.
एकलव्य ही कादंबरी वाचल्यावर आपल्या मनाजवळ असलेला राजा.
एकलव्य आपल्याला निश्चित सापडेल.
47)भंडारभोग आणि चौंडक' - राजन गवस
मुळ किंमत-420₹
We read -350₹ With शिपिंग घरपोच
रूढीपरंपरांचा बळी म्हणजे देवदासी... याच रूढीपरंपरांचा आणखी एक बळी म्हणजे जोग्या! ग्रामीण भागात असे देवीला वाहिलेले किती तरी जोगते आढळतात. यांचं जीवन देवदासीपेक्षाही भयावह...! देवदासी झुलवा लावू शकते. एखाद्या पुरुषाची रखेल म्हणून राहू शकते. ती मेली, तर प्रेताला माणसं जमतात. कुणाच्या तरी बांधाला जागा मिळते; पण जोगत्याच्या तिरडीला माणूसच मिळणं कठीण... त्याचा स्पर्शही इंगळीसारखा... त्याच्या नशिबी फक्त अंधार... तोही पुरुषासारखा पुरुष असतो; पण रूढीपरंपरांच्या ओझ्यानं त्याला सगळंच गमवावं लागतं तर,
आपल्या समाजातील देव, धर्म, अनिष्ट रूढीपरंपरांचा बळी म्हणजे देवदासी. `जोगतीण देवाची, मालकी गावाची` ही आपल्या बोलीतील म्हण तिच्या जगण्याचं सार सांगते. देवाच्या नावावर समाजातील राक्षसी वृत्तींनी निर्माण केलेल्या प्रथेच्या बळी ठरलेल्या देवदासी स्त्रियांची होरपळ `चौंडकं` ही कादंबरी वाचकांसमोर ठेवते. स्त्रीदु:खाचा नेमका वेध, बोलीची सर्व सामर्थ्य पचवून राजन गवस यांनी `चौंडकं`मध्ये घेतला आहे. `सुली`च्या व्यक्तिरेखेतून एक ठसठशीत वेदना आपल्यासमोर येते. देवदासीच्या जगण्यातील सर्व दु:ख आणि तिच्या समस्यांचा वेध घेणारी कादंबरी म्हणून `चौंडकं`ची नोंद विशेषत्वानं करावी लागेल.
48)आदिवासी बोधकथा -एक पुनकर्थन
मुळ किंमत-250₹
We read -215₹ With शिपिंग घरपोच
हे पुस्तक खरंच खूप जबरदस्त आणि अप्रतिम आहे.यातील प्रत्येक कथा उत्कृष्ट असून यामध्ये दिलेली वारली चित्रं तर खूप भन्नाट आहेत..गोष्ट सांगण्यासाठी आदिवासी स्त्रिया वारली चित्र काढत असतं. या कथांमध्ये आदिवासींची सारी जीवनपध्दती चित्रित केलेली आढळते.जीवनाचा सह-आनंद लुटलेला दिसतो.आदिवासी समाजातून बहरलेलं तत्वज्ञान यामध्ये सापडतो,त्यांची निसर्गाप्रति असलेली कृतज्ञता आणि प्राणिमात्रांवरचं प्रेम यामध्ये आपल्याला दिसतो.
49)रिबेल सुलतान -मनू एस. पिल्लई
We read - 350 ₹घरपोच(शिपिंग फ्री)
‘हेवा वाटावा अशा शैलीत सहजतेने केलेली दख्खनच्या इतिहासाची
पुनर्निर्मिती… हे फारच मोठे यश असून यामुळे विद्वत्तापूर्ण अभ्यासास
चालनाच मिळेल.’ – रुद्रांग्शु मुखर्जी
‘चमकदार कथनशैली… अस्सल सनसनाटी कथानक, शेवटचं
पान संपवल्याखेरीज पुस्तक खाली ठेववत नाही.’
50)इस्राइल : युद्ध, युद्ध आणि युद्धच - वि.ग. कानिटकर
450₹घरपोच (शिपिंग फ्री)
वि. ग. कानिटकरांनी इस्त्रायल: युद्ध, युद्ध आणि युद्धच!' या ग्रंथात सर्व प्रश्नांची क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडणी केली आहे. अरब इस्त्रायल प्रश्न हा केवळ काही राष्ट्रांमधील सीमावाद नसून त्याला एक व्यापक अर्थ आहे, असे ते मानतात. हा व्यापक अर्थ आहे ज्यू इतिहास आणि संस्कृतीतून निर्माण होणारी राजकीय-सामाजिक व्यवस्था आणि इस्लामी जागतिक दृष्टिकोनातून निर्माण झालेली अरब राज्यव्यवस्था यामध्ये हा अर्थ समजण्यासाठी इस्रायलच्या भूमिकेचे पूर्ण रूप त्याच्या अस्तित्वाला मान्यता मिळण्यासाठी आहे, हे लक्षात घ्यावे लागते..
51)मोठी माणसं -नरेंद्र चपळगावकर
We Read -255₹घरपोच (शिपिंग फ्री)
पारतंत्र्य आणि स्वातंत्र्य यांच्या संधिकाळात आपल्या समाजजीवनावर अनेक व्यक्तींनी प्रभाव टाकला, त्यातील काहींची ही व्यक्तिचित्रे . त्यांची कार्यक्षेत्रे, त्यांचे राजकीय विचार, त्यांच्या कार्यपद्वती आणि त्यांच्या जीवननिष्ठाही वेगवेगळ्या असल्या तरी त्यांच्यात एक समान सूत्र आहे. त्यांच्या जीवननिष्टेचा एक पदर स्वातंत्र्याच्या चळवळीशी, तर दुसरा समाजाच्या प्रबोधनाशी जोडला गेलेला आहे. या संगळ्या व्यक्तीनी काही शाश्वत मूल्ये आपल्या मनाशी घट्ट बाळगली होती, व्यक्तिगत जीवनातील इच्छा-आकांक्षा आणि गरजा यांना बांध घालून समाजाचे ऋण फेडण्यासाठी, त्याच्या वैचारिक उन्नयनासाठी त्यांनी आपले कष्ट आणि बुद्धी वापरली. अशी असंख्य माणसे त्या काळात होऊन गेली, या पुस्तकातील व्यक्तिचित्रांमध्ये त्या सर्वांचे स्मरण अंतर्भूत आहे. आपला देश स्वातंत्र्याची पंचाहत्तरी पूर्ण करत असताना या मोठ्या माणसांचे स्मरण नक्कीच प्रस्तूत ठरावे.
52)पॅपिलॉन+बँको -हेन्री शरियर (रविंद्र गुर्जर)
एकूण 2 पुस्तके
We read - 495 ₹घरपोच(शिपिंग फ्री)
आत्मविश्वास आणि धाडस, बळकट शरीराच्या जोरावर मनुष्य किती सामर्थ्य दाखवू शकतो,
हे सांगणारी ही कादंबरी आहे.
53)काजळमाया – जी. ए. कुलकर्णी
375₹घरपोच (शिपिंग फ्री)
कालाधिष्ठित कथावस्तू, कथानक विकासाचे निश्चित टप्पे, घटनाबहुलता आणि रहस्यप्रधानता ही वैशिष्ट्ये असूनही जीएंची कथा कथानकनिष्ठ कथा होत नाही याचेही अंतिम कारण त्यांच्या कथेचा प्रतीकात्मक धर्मच. दृष्टिमापाने किंवा श्रवणमापाने दीर्घ आणि सैल वाटणाऱ्या जीएंच्या कथा प्रतीतीच्या दृष्टीने अतिशय बांधेसूद, अतिशय गोळीबंद, अतिशय दाट, सूक्ष्म आणि घट्ट विणीच्या असतात, फार घाटदार असतात. भारत सरकारचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालेल्या ‘काजळमाया’ या संग्रहात वाचकांना भुरळ घालणाऱ्या ‘प्रदक्षिणा’, ‘अंजन’, ‘विदूषक’, ‘कळसूत्र’ अशा कथांचा समावेश आहे.
54)महाभारत पहिला इतिहास - वि.ग. कानिटकर
We read - 455 ₹घरपोच(शिपिंग फ्री)
महाभारत इतिहास की महाकाव्य?" यावर जरी वादविवाद आहेत, तरी जगभराच्या वाचकांमध्ये महाभारताबद्दल प्रचंड आकर्षण आहे. धर्मशास्त्र, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, नीतिशास्त्र, साहित्य इत्यादी सर्वच या ग्रंथात समाविष्ट असले, तरी मानवी मनाचा तळ शोधण्याचे या प्रथा अलोकिकत्व केवळ वादातीत आहे. त्यामुळे अनेक प्रतिभावंत लेखकांना महाभारतकथा लिहिण्याचा मोह पुनः पुन्हा होतो. हे पुस्तक पहिला इतिहास म्हणून लिहिले गेले असले, तरी एखादा अभिजात कादंबरी इतकी त्याची वाचनीयता आहे.
55)मृत्यू कथा' ~आशुतोष भारद्वाज 🌿
320₹घरपोच (शिपिंग फ्री)
'मृत्यू कथा' हे वास्तववादी लेखन प्रकारातील एक उल्लेखनीय असेच पुस्तक आहे, असे म्हणावे लागेल. अत्यंत बारकाईने घेतलेली माहिती, चिकित्सकपणे शोधलेले मर्म यामुळे हे वाचन वाचकास समृद्ध करून जाते. या गतिमान, सहानुभूतिपूर्ण, धाडसी आणि कधी कधी तर रक्तच गोठवून टाकेल, अशा पुस्तकातून बस्तरचा प्रत्यक्ष परिसर, कथानकातील पात्रे, तेथील नागरी युद्धाचे सामाजिक परिणाम या सगळ्या गोष्टी डोळ्यांसमोर जिवंत होऊन उठतात.
56)अवणी T1 -नवाब शफाअत अली खान
We read Price - 225₹घरपोच
अवनीचा बंदोबस्त हा तिला मारूनच करणे योग्य होते की अयोग्य?” हे पुस्तक तुम्हाला तुमचे उत्तर मिळवून देण्यास नक्कीच मदत करेल ही अशा व्यक्त करतो.
57)वाट तुडवताना -ऊत्तम कांबळे
We Read - 225₹ घरपोच (शिपिंग फ्री)
वाट तुडवताना' हे रूढ अर्थाने आत्मकथन आहे; पण आत्मचरित्राची समग्रता त्यात नाही. अर्थात लेखकालाही ते अभिप्रेत नाही. श्री. उत्तम कांबळे यांच्या विद्याजीवनाची जडणघडण ज्यातून कळते, असे हे विशिष्ट क्षेत्रीय आत्मकथन आहे. .....
58)एका रानवेडयाची शोधयात्रा -कृष्णमेघ कुंटे
WE Read :- 275₹घरपोच (शिपिंग फ्री)
मदुमलाईच्या जंगलातला एक तरुणप्रसन्न जीवनानुभव त्यातल्या सा-या चढउतारांसह, रौद्रथरारांसह आणून देणारं हे उत्कट पुस्तक असंच अनुभवण्याजोगं पुस्तक आहे... कृष्णमेघ जेथे रमला त्या मदुमलाईच्या प्रेमात पाडणारं... आणि त्याच्या हातून जे निसटलं त्याबद्दल हुरहूर लावणारं... वाचकांच्या जंगलजाणिवा प्रगल्भ करणारं, सहजसुंदर शैलीतलं... '
59)शिरसवाडी नि कंट्या ~गणेश बर्गे
एकूण 2 पुस्तके
मुळ किंमत-500₹
We read -400₹ With शिपिंग घरपोच
शिरसवाडी म्हणजे लव आणि रुपाली यांच्यातलं अविरत प्रेम, शिरसवाडी म्हणजे लव आणि जयु यांच्यातलं बंधुत्व, शिरसवाडी म्हणजे लव आणि गावकऱ्यांनी केलेल्या एका अनाथ मुलाचा सांभाळ. यातच शिरसवाडीचे कथानक नकळतपणे पकड घेत. वाचण्याचा वेग वाढू लागतो तस आपण शिरसवाडी मध्ये पोहचतो.
60)मृत्युंजय-शिवाजी सावंत
मुळ किंमत-640₹
We read -555₹ With शिपिंग घरपोच
असा हा कर्ण, भीष्माचं पतन होईपर्यंत समरांगणात पायच टाकणार नव्हता! इंद्रानं पूर्वीच त्याची कवचकुंडलं आपल्या पुत्रासाठी अर्जुनासाठी म्हणून दानाच्या मिषानं त्याच्यापासून हस्तगत केलीच होती. परशुरामांनी, ‘तुला ऐन युद्धाप्रसंगी ब्रह्मास्त्र स्फूरणार नाही.’ असा मर्मभेदी शाप त्याला दिला होता. महेंद्र पर्वतावरच्या ब्राह्मणाचे ‘तुझ्या रथाचं चक्र, भूमीही युद्धात अशीच रूतवून ठेवील!’ हे उद्गार कोणीही विसरू शकत नव्हतं. जगात अनेकांनी दान केलं असेल पण पण मरणाच्या दारातील एवढं चित्तथरारक, उत्तुंग एकनिष्ठ, अजोड दान तो एकटाच करू जाणत होता पहिला पांडव! ज्येष्ठ कौंतेय! अजोड दानवीर, सूर्यपुत्र!
61)मेळाघाटावरील मोहोर, डॉ.रवींद्र आणि स्मिता कोल्हे
मुळ किंमत - 350₹
We Read किंमत -325₹घरपोच (शिपिंग फ्री)
एका आगळ्या समाजपरिवर्तनाच्या प्रयोगाची ही कहाणी मेळघाट म्हणजे सातपुडा पर्वतातील घनदाट अरण्यप्रदेश. येथे तापी-खापरा-सिपना या नद्यांच्या संगमावरचं गाव बैरागड. दारिद्रयानं पोखरलेलं, आजारानं ग्रासलेलं, अज्ञानात पिचलेलं हे छोटं गाव . १९९० च्या आसपास डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे येथे आले.
62)स्टार्टअपविषयी सर्व काही -अनंत सरदेशमुख
Binding: पेपरबॅक
मुळ किंमत -300₹
We Read किंमत -275₹घरपोच (शिपिंग फ्री)
स्टार्टअप म्हणजे नेमकं काय, इथपासून स्टार्टअप उद्योजकांची अपेक्षित गुणवत्ता, उद्योगकल्पनेचा शोध, उद्योगाची आखणी, भांडवलउभारणी, स्टार्टअपची रचना आणि व्यवस्थापन, स्टार्टअपचा वाढविस्तार अशी चौफेर नि समग्र मांडणी करणारं मराठीतलं एकमेव सोपं आणि माहितीपूर्ण पुस्तक... स्टार्टअपविषयी सर्व काही अनंत सरदेशमुख यांचे ‘स्टार्टअपविषयी सर्व काही' हे पुस्तक माहितीपूर्ण, बोधप्रद व स्फूर्तिदायक आहे. रंजक संवादातून विषयाची प्रस्तुती, एका बैठकीत पुस्तकाचे पूर्ण वाचन करायला लावते.
63)अवघा देहचि वृक्ष जाहला - वीणा गवाणकर
Binding: पेपरबॅक
मुळ किंमत -250₹
We Read किंमत -250₹घरपोच (शिपिंग फ्री)
"माणूस इथूनतिथून एकच आहे, यावर माझा विश्वास आहे. सर्व सजीव परस्परावलंबी आहेत, परस्परपूरक आहेत. पृथ्वीबाबत आपण न्याय्य वर्तन केलं नाही, तर या ग्रहावर आपण टिकून राहणं अशक्य आहे. कोणताही विकास पूर्ण समजुतीनंच व्हायला हवा. सर्व प्रकारच्या संजीवांचा त्यात विचार व्हायला हवा. निसर्गातील संतुलन राखलं गेलं पाहिजे... खनिज, वनस्पती, प्राणी, माणूस... सर्वांमध्ये! " हे विचार आहेत रिचर्ड बेकर यांचे. वृक्षांचे संगोपन, संवर्धन आणि संरक्षण यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्चणार्या पर्यावरणरक्षकाची ही प्रेरणादायी चरितकहाणी...
64)फॉरेस्ट बाथिंग
मुळ किंमत-250₹
We Read -225₹घरपोच (शिपिंग फ्री)
65)अर्थसाक्षर व्हा आणि पैशाचे मानसशास्त्र
एकूण 2 पुस्तके
मुळ किंमत - 650₹
We Read -585₹ घरपोच (शिपिंग फ्री)
66)झांबळ -समीर गायकवाड
मुळ किंमत-280₹
We read -245₹ With शिपिंग घरपोच
भेटलेली माणसे घनदाट होती !
थेट पोचायास कोठे वाट होती ?
कवीश्रेष्ठ सुरेश भट यांच्या ह्या काव्यपंक्ती आहेत.
काळजाला हात घालण्याची ताकद या ओळींत
आहे. याच तोलामोलाची माणसं या कथांत
भेटतील, ही माणसं अनेकाथांनी घनदाट होती.
त्यांच्यातली माणुसकी ओतप्रोत होती, मानवी
जीवन मूल्यांवरचा त्यांचा विश्वास अफाट होता,
त्यांची नाती अतुट मायेची होती आणि मुख्य
म्हणजे अंधाराच्या उंबऱ्यावरच्या प्रकाशखुणा
त्यांच्या भाळी होत्या. ही माणसं आपल्या
अवतीभवतीच असतात तरीही त्यांच्यातल
वेगळेपण आपल्याला उशिराने जाणवतं
67)आंबेडकर-जीवन आणि वारसा – शशी थरूर
255₹घरपोच (शिपिंग फ्री)
68)नाही मानियले बहुमता विवेकवादी चिंतन -नंदा खरे
मुळ किंमत-800₹
We read -675₹ With शिपिंग घरपोच
सुमारे तीस वर्षांच्या पटावर घडलेल्या लेखनापैकी हे काही निवडक लेख. वेगवेगळ्या नियतकालिकांसाठी, वेगवेगळ्या काळांत, वेगवेगळ्या विषयांवर लिहिले गेलेले. त्यामुळे त्यांतलं सूत्र शोधणं कठीण आहे; पण अशक्य मात्र नाही. कारण लिहिणारा माणूस एकच आहे. त्या माणसाची विज्ञान-विवेक यांच्यावर असलेली निष्ठा, सगळ्या लोकांना सुखी-समाधानी आयुष्य मिळावं अशी आस, आणि मुख्य म्हणजे – माणसांवर नि जगण्यावर असलेलं निरतिशय प्रेम – सुरुवातीपासून शेवटपर्यंत अभंग राहिलेलं दिसतं. मराठी वाचकाला, आणि त्यातही ज्ञानाकरता भुकेल्या असलेल्या तरुण दोस्तांना विज्ञान, तत्त्वज्ञान, विवेकवाद या विषयांवरचं सकस साहित्य उपलब्ध करून दिलं पाहिजे हा ध्यास त्यामागे आहे. हे एकदा लक्षात आलं, की तर्ककठोर भाव, नर्मविनोद, श्रद्धेसारख्या गोष्टींशी संवादण्याचा खुलेपणा, तत्त्वज्ञानातल्या कूटप्रश्नांबद्दलचं कुतूहल, वैचारिक शिस्त, विषयांचं अफाट वैविध्य, भाषिक लवचीकपणा… अशा अनेक गुणांचं नवल वाटेनासं होतं. चिंतनाचा पैस अवाढव्य आहे खरा पण केंद्रबिंदूपाशी मात्र तुम्हां-आम्हां सगळ्यांच्या जगण्याविषयीची आस्था आहे.
69)रफ स्केचस -सुभाष अवचट
मुळ किंमत-400₹
We read -330₹ With शिपिंग घरपोच
प्रख्यात चित्रकार सुभाष अवचट यांनी रेखाटलेली ही रफ स्केचेस आपल्याला तीच विरळा संधी देतात. आयुष्यात त्यांना भेटलेली माणसं, त्यांचं वेगळेपण, स्वतःची चित्रं, त्या चित्रांमागचा विचार, त्यामागची प्रोसेस,जगभरातले चित्रकार, त्यांचं म्हणणं, माणसाला व्यापून असलेल्या भाव-भावना अशा नाना गोष्टींना सहजपणे कवेत घेत जाणारं अवचटांचं लिखाण त्यांच्या चित्रांइतकंच उत्स्फूर्त आणि लखाखतं आहे.
70)कार्ल मार्क्स – राहुल सांकृत्यायन
We read -320₹ With शिपिंग फ्री
~We Read ❤️♥️
https://wa.me/7066495828
https://chat.whatsapp.com/J58KV2PCm97CRz4L8K7v8o
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा