We Read 'Saturday Special'14 वी वाचनीय पुस्तकांची यादी 💙🖤

We Read 'Saturday Special'
14 वी वाचनीय पुस्तकांची यादी 💙🖤

कृपया संपूर्ण यादी शेवटपर्यंत
वाचूनच पुस्तके निवडावी..प्रत्येक नव्या यादीत आपण काही नवीन वेगवेगळी पुस्तके वाढवतोय..❤️
https://wa.me/7066495828
__________________________________________
आजच विशेष ऑफर ...💛

◆वीणा गवाणकर यांची एकूण 9 पुस्तके
मुळ किंमत -1735₹
We Read - 1500₹ घरपोच (शिपिंग फ्री)

1)डॉ. आयडा स्कडर
2)एक होता कार्व्हर
3)सर्पतज्ज्ञ : डॉ. रेमंड डिटमार्स
4)डॉ. सालिम अली
5)डॉ. खानखोजे (नाही चिरा...)
6)लीझ माइट्नर
7)रोझलिंड फ्रँकलिन
8)रॉबी डिसिल्वा एका मनस्वी कलाकाराचा प्रवास | 
9)अवघा देहचि वृक्ष जाहला ...
____________________________________________

1)लढा नर्मदेचा -नंदिनी ओझा
We read किंमत - 325₹घरपोच (शिपिंग फ्री)

नर्मदा बचाव आंदोलन! विस्थापित होणाऱ्या आदिवासींना लढण्याचं बळ मिळालं, ते या सशक्त जनआंदोलनानं. त्या बळावर त्यांनी आपलं घर-दार, जंगल, जमीन वाचवण्यासाठी दीर्घकाळ लढा दिला. त्या तीन दशकांच्या झुंजीची ही संघर्षमय सत्यकथा... आंदोलनाचा इतिहास, विस्थापनापूर्वीचं अन् नंतरचं आदिवासींचं जीवन, त्यांची संस्कृती, आदिवासी कार्यकर्त्यांची भूमिका अन् योगदान हे सारं या कथेतून उलगडत जातं. या लढ्याचा कणा असलेले दोन प्रमुख आदिवासी नेते ही कथा सांगताहेत आपल्या बोलीभाषेतून. त्यांच्या मुलाखतींमधून मांडलेला मौखिक इतिहास – लढा नर्मदेचा... '

2)द एलेफन्ट व्हिस्परर - लॉरेन्स अँथनी
मुळ किंमत -570₹
We Read - 490₹ घरपोच (शिपिंग फ्री)

"दक्षिण आफ्रिकेत प्राणिसंवर्धनाचे काम करणार्‍या लॉरेन्स अँथनीला जेव्हा एक ‘गुंड’ जंगली हत्तींचा कळप त्याच्या थुला थुला अभयारण्यात स्वीकारण्याबद्दल गळ घातली जाते, तेव्हा त्याचे सामान्य व्यवहारज्ञान त्याला सांगत होते की त्यांना नाकारावे; पण त्याने होकार दिला तरच त्या कळपाची जगण्याची शेवटची संधी होती. जर त्याने कळप नाकारला असता, तर तो ठार केला गेला असता. त्यांचे प्राण वाचवण्यासाठी अँथनीने त्यांना स्वीकारले. पुढच्या काही वर्षांत तो त्यांच्या कुटुंबाचा भाग बनला. त्यांच्याशी संबंध प्रस्थापित व्हावा म्हणून जसा तो प्रयत्न करत गेला, तसे त्याच्या लक्षात आले की त्यांच्याकडून त्याला आयुष्याबद्दल, निष्ठेबद्दल आणि स्वातंत्र्याबद्दल खूपच शिकण्यासारखे आहे. आकाराने प्रचंड पण तरीही मनाने दयाळू असणार्‍या प्राण्यांबरोबरची अँथनीची ‘द एलेफंट व्हिस्परर’ ही कथा अतिशय हृदयस्पर्शी, उत्कंठावर्धक, मजेशीर आणि कधीकधी विषण्ण करणारी आहे. आफ्रिकेतील अभयारण्यातील आयुष्याची त्याला पार्श्वभूमी आहे. त्यातील सहज न विसरता येणारी पात्रे आणि अनोखी प्राणिसृष्टी ह्यांच्या पार्श्वभूमीवरची ही गोष्ट आनंद देऊन जाते. प्राणिमित्रांना आणि साहसी कथा आवडणार्‍यांना तर ही गोष्ट खूपच आवडेल. "

3)निसर्गकल्लोळ - अतुल देऊळगावकर
We read किंमत - 275₹घरपोच (शिपिंग फ्री)

कुठे कोरडा दुष्काळ, तर कुठे ओला. कुठे ढगफुटी, तर कुठे अवकाळी गारपीट. एकीकडे वारंवार वणवे, तर दुसरीकडे महापूर. सर्वत्र चर्चा एकच : हवामान कल्लोळ! यात दोष कुणाचा? निसर्गाचा नक्की नाही. तो तर पोरका होतोय! बेसुमार वृक्षतोड, बेफाम खाणकाम. अनिर्बंध बांधकाम आणि अविचारी पाडकाम. मानवाने निसर्गाची हत्या चालवली आहे. पण निसर्गाची हत्या म्हणजे माणसाची आत्महत्या. कशी, ते सांगत आहे...

4)सत्तर दिवस -विजय देवधर
195₹घरपोच (शिपिंग फ्री)
उठ सुठ मरणाची भाषा करणाऱ्यांसाठी जगण्याची जिद्द काय असते हे जर बघायचे असेल तर त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावेच. अतिशय जबरदस्त अनुभव _/\_ तुझको है सलाम जिंदगी..

5)युगंधर -शिवाजी सावंत
मुळ किंमत - 750₹
We read Price - 655 ₹घरपोच(शिपिंग फ्री)

हजारो वर्षांपासून श्रीकृष्ण भारतीय मन व्यापून दशांगुळे उरला आहे. भारतीय समाज व संस्कृती यांवर त्याचा अमीट असा ठसा उमटलेला आहे. ‘श्रीमद्भागवत’, ‘महाभारत’, ‘हरिवंश’ व काही पुराणांत श्रीकृष्णचरित्राचे अधिकृत संदर्भ सापडतात. परंतु गेल्या हजारो वर्षांत त्यावर सापेक्ष विचारांची आणि अतक्र्य चमत्कारांची पुटंच पुटं चढलेली आहेत. त्यामुळे त्याचं ‘श्री’युक्त सुंदर, तांबूसनीलवर्णी, सावळं रूपडं घनदाट झालं आहे, वास्तवापासून शेकडो योजनं दूर दूर गेलं आहे. श्रीकृष्ण हा ‘भारतीय’ म्हणून असलेल्या जीवनप्रणालीचा पहिला उद्गार आहे! त्याच्या चक्रवर्ती जीवनचरित्रात भारताला नित्यनूतन व उन्मेषशाली बनविण्याचा ऐवज ठासून भरला आहे. श्रीकृष्णाच्या जीवनसरोवरातील दाटलेलं शेवाळ तर्कशुद्ध सावधपणे अलगद दूर सारल्यास त्याचं ‘युगंधरी’ दर्शन शक्य आहे, हे ‘मृत्युंजय’कारांनी जाणलं. आणि त्यांच्या प्रदीर्घ चिंतनातून, सावध संदर्भशोधनातून, डोळस पर्यटनातून व जाणत्यांशी केलेल्या संभाषणातून साकारली ही साहित्यकृती – ‘युगंधर’!

6)डेझर्टर -विजय देवधर
We read - 385₹घरपोच(शिपिंग फ्री)

गंथर बान्हमान यांच्या 'आय डेझर्टेड रोमेल' या पुस्तकाचा विजय देवधर यांनी केलेला हा अनुवाद आहे.
हे पुस्तक म्हणजे एक अद्भूत साहस कथा आहे. अनेक साहसी घटना आणि थरारक प्रसंगामुळे ते रोमांचकारी
झाले आहे. बान्हमान यांचे स्वानुभव आणि कल्पना यांची बेमालूम सरमिसळ असलेले हे कथानक आहे.

7)प्राणिमित्रांच्या जगात ~विजय देवधर ♥️
210₹घरपोच(शिपिंग फ्री)

पक्षी, प्राणी आणि जलचर हे जीवसृष्टीचे अविभाज्य घटक आहेत;पण कुत्रा, मांजर हे पाळीव प्राणी आणि बैल, घोडा, गाय, म्हैस असे काही उपयुक्त प्राणी सोडले, तर आपण इतर प्राण्यांची फारशी दखल घेत नाही. मग हे प्राणी आपण फक्त प्राणिसंग्रहालयातच पाहतो. त्यांचं जीवन, त्यांचं विश्व आपल्याला सर्वस्वी अपरिचितच असतं; पण वाघ-सिंहांसारख्या हिंस्र, आक्रमक प्राण्यांवरही मुलांसारखं प्रेम करणारी माणसं या जगात आहेत.

8)स्त्री विरुद्ध पुरुष -शिवराज गोर्ले
We read किंमत - 285₹घरपोच (शिपिंग फ्री)

जगातील सर्वांत बलवान पुरुष असो की सर्वांत बुद्धिमान पुरुष असो – तो एका स्त्रीच्या पोटीच जन्म घेतो. इतिहास असंही सांगतो की, स्त्रीनंच शोधली शेती, स्त्रीनंच साधली प्रगती. स्त्रीनंच घडवली संस्कृती आणि स्त्रीनंच घडवला पुरुष! मग हा पुरुषच तिचा ‘शत्रू’ कसा झाला? स्त्रीला कनिष्ठ, दुय्यम लेखून स्वातंत्र्य तिचं हिरावून घेऊन, तिच्यावरच अत्याचार का करू लागला? स्त्री आणि पुरुष यांच्यात नैसर्गिक भेद होतेच. त्या भेदांनीच का हा कावा साधला? भेद तर आहेतच... पण भेद आहेत म्हणून तर आकर्षण आहे, स्त्री-पुरुष मीलनातूनच हे जीवन उमलत असतं. म्हणूनच परस्परांवाचून दोघांचंही अस्तित्व – अधुरंच नव्हे, अशक्य आहे! शिवाय... ‘नर आणि मादी’ यांखेरीजही स्त्री-पुरुष नात्याचे किती लोभस फुलोरे आहेत.

9)तिमिरातुनी तेजाकडे -डॉ. नरेंद्र दाभोलकर
मुळ किंमत -525₹
We Read - 475₹ घरपोच (शिपिंग फ्री)

अंधश्रध्दानिर्मूलन व नरेंद्र दाभोलकर हे आज समानार्थी शब्द झाले आहेत. ही कमाई आहे पाव शतकाच्या अथक वाटचालीची अंधश्रध्दानिर्मूलनाचा विचार, उच्चार, आचार, संघर्ष व सैद्धांतिक मांडणी या पाचही आघड्यांवर अंनिस आणि नरेंद्र दाभोलकर कार्यरत आहेत. या क्षेत्रात या स्वरूपाचे असे व्यापक कार्य भारतातही अपवादानेच असेल. अंधश्रध्दानिर्मूलनाशी संबधित सर्व विषयांची अभ्यासपूर्ण, सखोल तात्विक मांडणी या पुस्तकात आहे. विषेश म्हणजे, परिणामकारक कृतिशीलतेमुळे यातील विचारांना आत्मप्रत्ययाची झळाळी प्राप्त झाली आहे. युगानुयुगे लागलेल्या अंधश्रद्धेच्या ग्रहणाचा तिमिरभेद करून तेजाकडे वाटचाल करता येईल, असा विश्वास वाचकांत निर्माण करण्यात हे पुस्तक मोलाची कामगिरी बजावेल. '

10)गणिका, महात्मा आणि एक इटालियन ब्राह्मण – मनू एस. पिल्लई
We read Price - 355₹घरपोच.(शिपिंग फ्री)

जातव्यवस्थेवर उपरोधात्मक लिहिणारा तंजावूरच्या मराठा घराण्यातील राजपुत्रापासून ते हिंदू
मंदिरातील मस्लीम देवतेपर्यंत-एक गणिका, जी योद्धा-राणी बनली तिच्यापासून ते ग्रामोफोनवर
गाणाऱ्या गणिकेपर्यंत स्तनविहीन स्त्रीपासून ते तीन स्तन असलेल्या देवीपर्यंत- आणि पवित्र
संस्कृतची भक्ती करणार्या ब्रिटिश माणसापासून ते व्हिक्टोरिया महाराणीपर्यंत – या पुस्तकातले
विविध विषयांवरील निबंध भारताच्या भूतकाळाकडे बघण्याची एक खिडकीच उघडतात. त्या
खिडकीतून दिसणारे समृद्ध जग पाहून आपण थक्कच होतो. आणि विचार करू लागतो की, यातील
कितीतरी गोष्टी आपण विसरूनच गेलो आहोत आणि कितीतरी गोष्टी आपण जाणूनबुजून पुसून
टाकल्या आहेत.

11)माइंडमास्टर -विश्वनाथन आनंद
295₹घरपोच(शिपिंग फ्री)

विश्वनाथ आनंद म्हणजे 64 घरांचा राजा. बुद्धिबळाच्या पटावरचा अनभिषिज्ञ सम्राट. तब्बल पाच वेळा विश्वविजेतेपदावर मोहोर उमटवणारा विजेता. त्यांच्या या आत्मकथनात लहानग्या विशीपासून ते विश्वविजेत्याच्या जडणघडणीतील अनेक टप्पे उलगडत जातात. बुद्धिबळाच्या गंतवून टाकणाऱ्या पटाइतकंच हे आत्मकथन गुंतवून टाकतं. वयाच्या सहाव्या वर्षी सुरू झालेला आनंदचा प्रवास, विश्वविजेतेपदावर वर्चस्व गाजवत त्यानं रशियाची मोडीत काढलेली मक्तेदारी, जगाच्या कानाकोपऱ्यात स्पर्धांसाठी केलेला प्रवास, क्रीडा प्रकारातलं राजकारण, त्याचं कुटुंब ते अगदी निवृत्तीच्या संकेतांमधली त्याची तगमग अशा अनेक गोष्टींना स्पर्शून जातात.

12)न्याय – मायकल सॅंडेल
We Read -355₹घरपोच (शिपिंग फ्री)

खोट बोलण हे नेहमीच वाईट असतं का?
व्यक्तिस्वातंत्र्याला काही मर्यादा असली पाहिजे का?
अपवादात्मक परिस्थितीत एखाद्याचा खून करावा लागल्याचं समर्थन करता येऊ शकेल का?
मुक्त बाजरपेठ खरंच मुक्त आहे का?
विषमता कमी करण्यासाठी ठरावीक लोकांवर कर आकारणं न्याय्य आहे का?

13)फिन्द्री -सुनिता बोर्डे
350₹घरपोच (शिपिंग फ्री)

प्रचंड म्हणजे प्रचंड आवडली ही कादंबरी.लेखिकेने ज्याप्रमाणे एका नकोशी असलेल्या मुलीची आणि त्याची आईची दुःख आणि संघर्षपूर्ण असलेली गाथा या कादंबरीतून वाचकांसमोर मांडली आहे, त्याला खरंच तोड नाही.कुठल्याही अलंकारिक भाषेचा वापर न करता,एकदम सोप्या आणि साध्या भाषेत लिहली गेलेली ही कादंबरी वाचकांवर एक प्रकारची मोहिनी पाडते. सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत एकाच ठिकाणी खिळवत ठेवणाऱ्या या कादंबरीची खासियत आहे,तिची मांडणी.लेखिकेला जे काही सांगायचं-मांडायचं होतं ते उद्देश त्यांनी खूपच चांगल्या पद्धतीने साध्य केलं आहे.
समस्त स्त्री जातींची सत्य व्यथा आणि कैफियत आपल्याला पावलोपावली यातून वाचायला मिळते.

14)नाथ हा माझा -काशिनाथ घाणेकर
मुळ किंमत - 395₹
We read Price - 335₹घरपोच.(शिपिंग फ्री)

नाथ हा माझा हे व्यक्तिचरित्राच्या धाटणीत लिहिलं गेलेलं विलक्षण आत्मकथन आहे. एका डॉक्टरचं वैद्यकीय पेशाला बगल देत सिनेमाच्या रूपेरी पडद्याला आपलंसं करणं आणि त्यासाठीचा त्याचा संघर्ष यांचं पारदर्शी चित्रण कांचन घाणेकर यांनी मांडलं आहे. तीस वर्षीय डॉ.काशिनाथ घाणेकर आणि त्यांच्या प्रेमात आकंठ बुडालेली पंधरा वर्षीय कांचन यांची ही प्रीतीगाथा आहे. कांचन आणि डॉ. घाणेकर यांच्यात दोन दशकं फुललेल्या प्रेमाच्या अंकुराची ही गोष्ट बहुआयामी स्त्री-पुरुष नातेसंबंध आणि तथाकथित चौकटीबाहेरच्या नात्यांबाबतची सामाजिक मानसिकता यावरही प्रकाश टाकते.एका नायकाच्या जडणघडणीचा काळ ते उतरणीचा काळ, त्यातली घालमेल, तडफड यांचं हृदयस्पर्शी चित्रण यात अनुभवायला मिळतं. डॉ. घाणेकर यांचं हे चरित्र मराठी सिनेसृष्टीलाही प्रेरणादायी ठरलं. या पुस्तकावर आधारित ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून 2018 सालचा हा सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट ठरला आहे.

15)द लास्ट गर्ल -नादिया मुराद
मुळ किंमत - 460₹
We read Price - 395₹घरपोच.(शिपिंग फ्री)

नोबेल शांतता पुरस्कार विजेतीची कहाणी़...नादिया मुराद ही अत्यंत धाडसी यजिदी तरुणी आहे. तिनं इसिसची लैंगिक गुलामगिरी सोसली आहे. तिनं कल्पनातीत यातना आणि अपमान भोगला आहे. नादियाच्या सहा भावांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं आणि त्यानंतर काही काळातच, तिच्या आईलाही ठार मारण्यात आलं. त्यांचे मृतदेह सामूहिक कबरींत लोटण्यात आले...पण तिनं लढा दिला...इराकमधील तिचे बालपणीचे शांततामय दिवस... घरच्यांचा कायमचा वियोग आणि अमानुषतेचा सामना... ते जर्मनीत लाभलेली सुरक्षितता यादरम्यानचा प्रवास या आत्मकथनातून उलगडत जातो.

16)चिखल घाम आणि अश्रू -बियर ग्रील्स
मुळ किंमत - 400₹
We read Price - 355₹घरपोच.(शिपिंग फ्री)

17)भुरा -शरद बाविस्कर (11 वी आवृत्ती)
मुळ किंमत - 500₹
We read किंमत - 425₹ घरपोच (शिपिंग फ्री)

धुळे जिल्ह्यातील रावेर या लहानशा खेड्यात एका कोरडवाहू शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या, रोजंदारीवर पडेल ते काम करून भाषाशिक्षण आणि तत्त्वज्ञानाच्या ओढीने वेगवेगळ्या देशातील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये शिकलेल्या, भाषा आणि तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासाठी जग पालथे घालणाऱ्या, तत्त्वज्ञानासारख्या गहन आणि गंभीर विषयाच्या अभ्यासाने समृद्ध झालेल्या, 'भुरा' ही आपली जातजाणीव ओलांडून मार्क्स, अल्थुझर, ग्राम्शी , महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपर्यंत पोहोचूनही स्वतंत्रपणे आपले सामाजिक वास्तव संवेदनशीलतेने आणि तेवढ्याच कठोर वैचारिक शिस्तीने तपासणाऱ्या प्रा. शरद बाविस्कर यांचे हे प्रांजळ आत्मकथन.

18)आडवाटेची पुस्तके -निखिलेश चित्रे
मुळ किंमत - 300₹
We Read -255₹घरपोच (शिपिंग फ्री)

19)शिवपुत्र राजाराम -डॉ प्रमिला जरग
495₹घरपोच (शिपिंग फ्री)

मराठ्यांच्या राष्ट्रजीवनातील अत्यंत कठीण अशा काळात अकरा वर्षं नेतृत्व करणाऱ्या छत्रपती राजारामांची चरितकहाणी आहे ‘शिवपुत्र राजाराम.’ मराठी सरदार आणि मुत्सद्दी यांना एकत्र आणून बलाढ्य अशा मोगल साम्राज्याला टक्कर देण्यासाठी प्रेरित करणाऱ्या, त्यांच्या शौर्याला, आक्रमक वृत्तीला पूर्ण स्वातंत्र्य देणाऱ्या, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत मराठी वीरांनी उभारलेल्या प्रखर स्वातंत्र्यलढ्याचं नेतृत्व करणाऱ्या राजाराम महाराजांची तेजस्वी जीवनगाथा.

20)केदारनाथ 17 जून -डॉ.प्रकाश कोयाडे
355₹घरपोच(शिपिंग फ्री)

जोपर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत ही गिधाडे जवळ
येत नसतात ! ते आपल्या मरणाची वाट पाहत घिरट्या घालत आहेत,
म्हणूनच आपण मरायचं नाही..."
"आपल्याला जिवंत रहावंच लागेल!"
एका सत्य घटनेवर आधारीत कादंबरी...केदारनाथ १७ जून !

21)बाबासाहेबांच्या 21 ग्रंथाचे सार -वैभवकुमार शिंदे
मुळ किंमत - 280₹
We Read -250₹घरपोच (शिपिंग फ्री)

22)गढीवरून -राजा गायकवाड
मुळ किंमत -300₹
We Read - 255₹ घरपोच (शिपिंग फ्री)

कृषी-परंपरेतल्या बहुजनांच्या आणि त्यातल्या जराश्या उच्च स्थानावर बसलेल्या किंवा फलाण्या जातीत जन्म घेतल्यामुळे आपण उच्च स्थानावरच आहोत, असं समजून वागणाऱ्या माणसांच्या आत असलेले मानसिक-सामाजिक-सांस्कृतिक आणि राजकीय गंड यांना हात घालणाऱ्या कथा या संग्रहामध्ये बहुसंख्येने आहेत.

23)महामाया निळावंती -सुमेध
मुळ किंमत - 350₹
We read किंमत - 325 घरपोच (शिपिंग फ्री)

1992 साली घडलेली एक अजब घटना. एक बाप निळावंतीची पोथी शोधत सह्याद्रीच्या जंगलात येतो. त्याच्यासोबत आहे त्याच्या मुलाचा बर्फात अन मिठात ठेवलेला मृतदेह. ह्या जतन केलेल्या मृतदेहाला जिवंत करण्यासाठी बाप जंगजंग पछाडतो. शेवटी त्याला अनपेक्षितरित्या जंगलात साक्षात निळावंतीचं अस्तित्व सापडतं. बाप आपल्या मुलाच्या मृतदेहाला जिवंत करू शकतो का? वनदेवता निळावंती अजूनही अस्तित्वात आहे का? तिची भाषा म्हणजे कोणती भाषा? निळावंती जर आजही अस्तित्वात असेल तर चारशे वर्षांपूर्वी ती मेली नव्हती का?

24)फॅक्चर्ड फ्रीडम -कोबाड गांधी
मुळ किंमत - 300₹
We Read -255₹घरपोच (शिपिंग फ्री)

25)सलोख्याचे प्रदेश -सबा नक्वी
मुळ किंमत - 250₹
We read किंमत - 225₹घरपोच (शिपिंग फ्री)

भारतात अनेक जाती - धर्मांचे लोक राहतात. प्रत्येक समाजाच्या चालीरीती, रूढी परंपरा वेगळ्या असतात. तरी 'अनेकतात एकता' म्हणतो त्याप्रमाणे येथील प्रमुख हिंदू व मुस्लीमांच्या परंपरा, सण, उत्सव, एकत्र साजरे होतात.
अशा काही ठिकाणी भेट देऊन तेथील समजाचे चित्रण सवा नक्वी यांनी 'सलोख्याचे प्रदेश' मधून दाखविले आहे.

26)निसर्गायण -दिलीप कुलकर्णी
We read Price - 240₹घरपोच.(शिपिंग फ्री)
आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव, आक्रमकता ही ह्या समस्येला कारणीभूत आहे आणि केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव, स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे आपल्या समोर उभ्या ठाकल्या आहेत. ही मनोवृत्ती जोवर बदलत नाही, तोवर ह्या समस्या सुटणार नाहीत. हा बदल कसा असला पाहिजे? तो कशानं शक्य होईल? आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान ह्यांच्या आधारे या बदलाची दिशा शोधणारं हे पुस्तक. '

27)विंचवाचे तेल -प्रशांत रुपवते, सुनीता भोसले
295₹घरपोच (शिपिंग फ्री)

विंचवाचं तेल’ म्हणजे ‘गुन्हेगारी जमाती’विरुद्ध वापरलं जाणारं जहाल अस्त्र. बाहेर याला ‘सूर्यनारायण तेल’ म्हणूनही ओळखतात. पोलीस खातं आरोपीने केलेले, न केलेले गुन्हे कबूल करावेत यासाठी ‘थर्ड डिग्री’मध्ये या तेलाचा वापर करतं.
आरोपीच्या लिंगाला हे तेल लावलं जातं. त्यामुळे लिंगाला सूज येते आणि प्रचंड दाह होतो. तुमची सृजनताच मारून टाकायची… उद्ध्वस्त करायची…
पोलीस डिपार्टमेंटचं हे विंचवाचं तेल या समाजव्यवस्थेने… या संस्कृतीने साऱ्या बहुजन समष्टींसाठी विशेषत: दलित भटक्या-विमुक्तांविरुद्ध नाना रूपात वापरलंय… तर याच समष्टीतील ही पोर… सुनीता भोसले… पारधी या ‘गुन्हेगार’ असा शिक्का बसलेल्या जमातीत तिचा जन्म झाला. पारधी असल्याचे भोग तिलाही सुटले नाहीत. पण पोर बहाद्दर… तिने या ‘विंचवावर’ जालीम उपाय शोधला… तो म्हणजे भारतीय संविधानाचा! जयभीमच्या नाऱ्याचा!
समस्त पारधी समष्टीत भिनलेलं विष उतरवण्याचा प्रयत्न वयाच्या अकराव्या वर्षापासून करणाऱ्या या कार्यकर्तीची ही ज्वलंत जिंदगानी… विंचवाचं तेल

28)धर्म आणि समलैंगिकता -देवदत्त पट्टनायक
(अनुवाद -सोनाली नवांगुळ)
मुळ किंमत - 220₹
We read Price - 185₹घरपोच

29)मूकद्दर -स्वप्निल कोलते पाटील
मुळ किंमत - 300₹
We Read -255₹घरपोच (शिपिंग फ्री)

30)एकलव्य -विजय देवडे
मुळ किंमत - 390₹
We Read -355₹घरपोच (शिपिंग फ्री)

31)अर्थाच्या शोधात -व्हीकटर फ्रँकलन
मुळ किंमत - 200₹
We read किंमत - 185₹ घरपोच (शिपिंग फ्री)

32)नर्मदे हर हर -जगन्नाथ कुंटे
We read Price - 255₹घरपोच

नर्मदा भारतातील एक प्राचीन नदी. तिची परिक्रमा म्हणजे नर्मदेला चालत प्रदक्षिणा घालण्याची परंपराही हजारो वर्षापूर्वीची. आज या परिक्रमेला भक्तीबरोबरच उत्कंठेचेही वलय लाभले आहे. श्रद्धापूर्वक परिक्रमा कशी करावी, याचे सविस्तर वर्णन जगन्नाथ कुंटे यांनी 'नर्मदे हर हर'मध्ये केले आहे. मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्राचा सीमा भाग असं विस्तीर्ण प्रदेश या परिक्रमेत येतो. सर्वाधिक परिक्रमा मध्य प्रदेशातून होते.

33)त्याने गांधीला का मारले -अशोक कुमार पांडे
मुळ किंमत - 300₹
We read किंमत - 255घरपोच (शिपिंग फ्री)

34)घोस्ट रायटर -आशिष महाबळ
225₹घरपोच (शिपिंग फ्री)

विज्ञान संशोधनाची नवनवी क्षेत्रं विकसित होत असताना विज्ञानकथा लेखनानेही नव्या कल्पना धुंडाळाव्यात, अशी अस्सल विज्ञानप्रेमी वाचकांची अपेक्षा असते. या संग्रहातल्या कथा ही अपेक्षा नक्कीच पूर्ण करतात. विज्ञानकथावाचनाची आपली इयत्ता वाढवतात.

35)प्रबुद्ध -भा.द खेर
मुळ किंमत - 450₹
WE Read :- 385₹घरपोच (शिपिंग फ्री)

36)मऱ्हाटा पातशाह -केतन कैलास पुरी
Paperback/New
मुळ किंमत - 300₹
We read Price - 255₹घरपोच.(शिपिंग फ्री)

37)झुंड -बाबाराव मुसळे
मुळ किंमत -580₹
We Read - 455₹ घरपोच (शिपिंग फ्री)

38)कास्ट मॅटर्स -सूरज एगंडे
मुळ किंमत - 425₹
We Read -385₹घरपोच (शिपिंग फ्री)

39)झोंबी -आनंद यादव
मुळ किंमत - 420₹
WE Read :- 365₹घरपोच (शिपिंग फ्री)

आजच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत अस्वस्थ होऊन धुमसणे हाच ग्रामीण जीवनाचा स्थायीभाव आहे. त्या अस्वस्थपणाचा स्फोट मराठी साहित्यात सुरू झालाच आहे. हे व्हायला हेवेच होते. शिवाय, साऱ्या जगातलं साहित्य समृद्ध केलं आहे. ते या `झोंबी`सारख्या वाचकाला अस्वस्थ करणाऱ्या ग्रंथांनीच! पु. ल. देशपांडे

40)पिरॅमिडच्या प्रदेशात - डॉ. अच्युत बन
मुळ किंमत - 250₹
We read Price - 225₹घरपोच.(शिपिंग फ्री)

41)झांबळ -समीर गायकवाड
मुळ किंमत - 280₹
We Read - 255 घरपोच (शिपिंग फ्री)

भेटलेली माणसे घनदाट होती !
थेट पोचायास कोठे वाट होती ?
कवीश्रेष्ठ सुरेश भट यांच्या ह्या काव्यपंक्ती आहेत.
काळजाला हात घालण्याची ताकद या ओळींत
आहे. याच तोलामोलाची माणसं या कथांत
भेटतील, ही माणसं अनेकाथांनी घनदाट होती.
त्यांच्यातली माणुसकी ओतप्रोत होती, मानवी
जीवन मूल्यांवरचा त्यांचा विश्वास अफाट होता,
त्यांची नाती अतुट मायेची होती आणि मुख्य
म्हणजे अंधाराच्या उंबऱ्यावरच्या प्रकाशखुणा
त्यांच्या भाळी होत्या. ही माणसं आपल्या
अवतीभवतीच असतात तरीही त्यांच्यातल
वेगळेपण आपल्याला उशिराने जाणवतं.

42)तिसरा स्तंभ – रघुराम राजन
We read किंमत - 425घरपोच (शिपिंग फ्री)

सरतेशेवटी, या पुस्तकातील इतिहासातला फेरफटका आशावाद सूचित
करणारा आहे. आपली जीवनमूल्ये अपरिवर्तनीय नाहीत, ती बदलतात.
डॉक्टर मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर म्हणाले होते, ‘वैश्विक नैतिकतेची
कमान खूप उंच आहे; पण ती न्यायाकडे झुकणारी आहे

43)रावण राजा राक्षसांचा - शरद तांदळे
मुळ किंमत - 390₹
We read Price - 350₹घरपोच.(शिपिंग फ्री)

44)मोहम्मद पैगंबर चरित्र
WE Read :- 275₹घरपोच (शिपिंग फ्री)

45)लैंगिकता शिक्षण -डॉ.विठ्ठल प्रभू
मुळ किंमत - 250₹
WE Read :- 225₹घरपोच (शिपिंग फ्री)

हा विषय तसा नाजूक आणि स्फोटकसुद्धा. तरीही, लैंगिकता हा तुम्हां-आम्हां सर्वांच्या आयुष्याचा एक अविभाज्य पैलू आहेच. त्यामुळेच लैंगिकता या विषयाबाबतचे संकोच, दडपणं, गाढ अज्ञान अन् गैरसमजही दूर व्हायला हवेत. म्हणून याबाबत ‘योग्य’ काय आणि ‘अयोग्य’ काय, हे सा-यांना समजेल, अशा वैज्ञानिक परिभाषेत लिहिलेलं, ‘वाचावंच’ असं, एका अधिकारी तज्ज्ञाचं पुस्तक. '

46)इजिप्सी -रवि वाळेकर
मुळ किंमत - 750
We Read किंमत -650 घरपोच (शिपिंग फ्री)

47)वाचत सुटलो त्याची गोष्ट -निरंजन घाटे
मुळ किंमत - 300₹
We Read -255₹घरपोच (शिपिंग फ्री)

48)साद घालतो कालाहरी
We read - 465₹घरपोच (शिपिंग फ्री)

'क्राय ऑफ कालाहारी’ हे पुस्तक म्हणजे कालाहारी वाळवंटात सात वर्षे राहिलेल्या मार्क आणि डेलिया ओवेन्स यांच्या जंगली प्राण्यांच्या सहवासातील अनुभवांवर आधारित कादंबरी आहे. त्याचा मंदार गोडबाले यांनी मराठी अनुवाद केला आहे. बदली कपड्यांचा एक जोड आणि एक दुर्बीण वगळता बाकी विशेष काही न घेता मार्क आणि डेलिया या तरुण अमेरिकन जोडप्याने प्राणिजीवनाचा अभ्यास करण्यासाठी आफ्रिकेचे विमान पकडले. तिथे पोहोचल्यावर एक जुनाट लँडरोव्हर गाडी विकत घेऊन त्यांनी कालाहारी वाळवंटात (डिसेप्शन व्हॅली) खोलवर मजल मारली.

49)इन्कलाब विरुद्ध जिहाद - लक्ष्मीकांत देशमुख
670₹घरपोच (शिपिंग फ्री)

इन्किलाब विरुध्द जिहाद हि ख-या अर्थाने मराठीमधली एक महाकादंबरी आहे. जागतिक दर्जाची खरीखुरी आतंरराष्ट्रीय मराठी कादंबरी हा या कादंबरीचा युनिक पॉइंट आहे.

50)नपेक्षा -अशोक शहाणे
मुळ किंमत - 250
We read किंमत - 225घरपोच (शिपिंग फ्री)

51)प्रिय इंदिरा -पंडित जवाहरलाल नेहरू
मुळ किंमत - 300₹
We Read -255₹घरपोच (शिपिंग फ्री)

52)आपले भवताल -डॉ.नितीन हांडे
मुळ किंमत - 200
We read किंमत - 185₹ घरपोच (शिपिंग फ्री)

53)स्वामी-रणजित देसाई
We read-300₹घरपोच(शिपिंग फ्री)

महाराष्ट्रातल्या जनतेला जिने मंत्रमुग्ध केले, अशी मराठी सारस्वतातील अजरामर साहित्यकृती. रणजित देसाई : मराठी साहित्याला समृद्ध करणारे थोर साहित्यिक. १९४६ साली `भैरव` या कथेला लघुकथास्पर्धेत वाचकांकडून एकमुखाने पहिले पारितोषिक.

54)काजळमाया – जी. ए. कुलकर्णी
375₹घरपोच (शिपिंग फ्री)

कालाधिष्ठित कथावस्तू, कथानक विकासाचे निश्चित टप्पे, घटनाबहुलता आणि रहस्यप्रधानता ही वैशिष्ट्ये असूनही जीएंची कथा कथानकनिष्ठ कथा होत नाही याचेही अंतिम कारण त्यांच्या कथेचा प्रतीकात्मक धर्मच. दृष्टिमापाने किंवा श्रवणमापाने दीर्घ आणि सैल वाटणाऱ्या जीएंच्या कथा प्रतीतीच्या दृष्टीने अतिशय बांधेसूद, अतिशय गोळीबंद, अतिशय दाट, सूक्ष्म आणि घट्ट विणीच्या असतात, फार घाटदार असतात. भारत सरकारचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालेल्या ‘काजळमाया’ या संग्रहात वाचकांना भुरळ घालणाऱ्या ‘प्रदक्षिणा’, ‘अंजन’, ‘विदूषक’, ‘कळसूत्र’ अशा कथांचा समावेश आहे.

55)महाभारत पहिला इतिहास - वि.ग. कानिटकर
We read - 455 ₹घरपोच(शिपिंग फ्री)

महाभारत इतिहास की महाकाव्य?" यावर जरी वादविवाद आहेत, तरी जगभराच्या वाचकांमध्ये महाभारताबद्दल प्रचंड आकर्षण आहे. धर्मशास्त्र, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, नीतिशास्त्र, साहित्य इत्यादी सर्वच या ग्रंथात समाविष्ट असले, तरी मानवी मनाचा तळ शोधण्याचे या प्रथा अलोकिकत्व केवळ वादातीत आहे. त्यामुळे अनेक प्रतिभावंत लेखकांना महाभारतकथा लिहिण्याचा मोह पुनः पुन्हा होतो. हे पुस्तक पहिला इतिहास म्हणून लिहिले गेले असले, तरी एखादा अभिजात कादंबरी इतकी त्याची वाचनीयता आहे.

56)छावा -शिवाजी सावंत
We read - 675₹घरपोच

आजतागायत संभाजीमहाराजांच्या पराक्रमाच्या वर्णनाची मोहिनी कायम राहिली आहे. संभाजीराजांचे तामसी, अविचारी रूप पुसून टाकून संवेदनशील, हळवं, करारी आणि देशप्रेमी रूप या चरित्रातून दृगोचर होतं. 'संभाजीराजे खरच व्यसनांध असते, तर शेवटच्या कठोर साजेच्या प्रसंगी पारच ढासळले असते. कारण ती साजाच तेवढी क्रूर आणि अमानवी होती, ' असं सावंत दाखवून देतात. शिवाजीराजांचे पुत्र त्यांना शोभणारे वीर, साहसी होते, यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे. सावंत यांची रसाळ, ओघवती शैली ऐतिहासिक प्रसंग उभे करताना अधिकच खुलते. पानोपानी उत्कंठा वाढत जाते. वाचकाला खिळवून ठेवण्याची ताकद कादंबरीचेही सामर्थ्य आहे.

57)समांतर -सुहास शिरवळकर
240₹घरपोच (शिपिंग फ्री)

मुळात खरं तर माझी इथ येण्याची इच्छाच नव्हती. इथंच काय, या क्षणापर्यंत मी अशा कोणत्याच ठिकाणी कधी गेलो नव्हतो. वाफगावकरनं इतकी मनधरणी केली केली... त्याचं मन मोडायचं नाही, म्हणून केवळ मी आलो होतो' या वाक्यानं कादंबरीची सुरुवात होते आणि उत्सुकता चालवण्याचीही! सुहास शिरवळकर यांची ही आणखी एक कादंबरी एका वेगळ्या जगात नेऊन सोडते.

58)कोकणातील दलितांचे रीतिरिवाज आणि लोकगीते – उर्मिला पवार
We Read -285₹घरपोच (शिपिंग फ्री)

उर्मिला पवार यांचे कथावाङ्मय, त्यांचे आत्मकथन आणि वेळोवेळी त्यांनी दिलेली व्याख्याने यांचा मी चाहता आहे. ‘कोकणातील दलितांचे रीतिरिवाज आणि लोकगीते’ या ग्रंथाचे वैशिष्ट्य हे की त्यात त्यांनी निव्वळ संकलन न करता त्यात कोकणाचा इतिहास, भूगोल, जीवनपद्धती आणि भाषा या सर्वांशी असलेला दाखवून दिला आहे. समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र या सर्वच विद्याशाखेतील अभ्यासकांना या पुस्तकात अनेक महत्त्वाच्या गोष्टी सापडतील. म्हणूनच या संशोधनपर लेखनाला त्यांच्या स्वतंत्र लेखनाइतकेच महत्त्व आहे.

59)मृत्युंजय-शिवाजी सावंत
We read-555₹घरपोच(शिपिंग फ्री)

असा हा कर्ण, भीष्माचं पतन होईपर्यंत समरांगणात पायच टाकणार नव्हता! इंद्रानं पूर्वीच त्याची कवचकुंडलं आपल्या पुत्रासाठी अर्जुनासाठी म्हणून दानाच्या मिषानं त्याच्यापासून हस्तगत केलीच होती. परशुरामांनी, ‘तुला ऐन युद्धाप्रसंगी ब्रह्मास्त्र स्फूरणार नाही.’ असा मर्मभेदी शाप त्याला दिला होता. महेंद्र पर्वतावरच्या ब्राह्मणाचे ‘तुझ्या रथाचं चक्र, भूमीही युद्धात अशीच रूतवून ठेवील!’ हे उद्गार कोणीही विसरू शकत नव्हतं. जगात अनेकांनी दान केलं असेल पण पण मरणाच्या दारातील एवढं चित्तथरारक, उत्तुंग एकनिष्ठ, अजोड दान तो एकटाच करू जाणत होता पहिला पांडव! ज्येष्ठ कौंतेय! अजोड दानवीर, सूर्यपुत्र!

60)श्रीमान योगी -रणजीत देसाई
We read-555₹घरपोच(शिपिंग फ्री)

रणजीत देसाई शिवाजी महाराजांच्या जीवनावरील प्रसिध्द ऐतिहासिक कादंबरी

61)संभाजी -विश्वास पाटील
We read-655₹घरपोच(शिपिंग फ्री)

औरंगजेबाच्या पाच लाख फौजेशी सलग आठ वर्षे कडवी झुंज देणारा मराठ्यांचा दुसरा छत्रपती, ज्याने वयाच्या बत्तीसाव्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर आपले मस्तक दिले; पण शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील एकही महत्त्वपूर्ण किल्ला आपल्या आरमारातील एकही जहाज गमावले नाही! गेली सव्वातीनशे वर्षे या विचारी,कवी-राज्यकत्र्याची आणि पराक्रमी सेनानीची गाथासंशयाच्या धडप्यामध्ये गुंडाळून ठेवली गेली होती!आजचे अग्रगण्य प्रतिभावंत कादंबरीकार विश्वास पाटील यांनासह्याद्रीच्या निबिड दऱ्याखोऱ्यांनी,सागरखाड्यांनी आणि दुर्लक्षिलेल्या दुर्मिळ कागदपत्रांनी सांगितलेली शिवपुत्र संभाजीराजांचीचित्तथरारक, वादळी, पण वास्तव गाथा!!

62)इस्राइल : युद्ध, युद्ध आणि युद्धच - वि.ग. कानिटकर
450₹घरपोच (शिपिंग फ्री)

वि. ग. कानिटकरांनी इस्त्रायल: युद्ध, युद्ध आणि युद्धच!' या ग्रंथात सर्व प्रश्नांची क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडणी केली आहे. अरब इस्त्रायल प्रश्न हा केवळ काही राष्ट्रांमधील सीमावाद नसून त्याला एक व्यापक अर्थ आहे, असे ते मानतात. हा व्यापक अर्थ आहे ज्यू इतिहास आणि संस्कृतीतून निर्माण होणारी राजकीय-सामाजिक व्यवस्था आणि इस्लामी जागतिक दृष्टिकोनातून निर्माण झालेली अरब राज्यव्यवस्था यामध्ये हा अर्थ समजण्यासाठी इस्रायलच्या भूमिकेचे पूर्ण रूप त्याच्या अस्तित्वाला मान्यता मिळण्यासाठी आहे, हे लक्षात घ्यावे लागते..

63)पर्व -डॉ.एस.एल. भैरप्पा
We read Price - 485₹घरपोच.(शिपिंग फ्री)

व्यासरचित महाभारतातील आभाळाएवढ्या उंचीची पात्रे; परंतु सगळ्यांचे पाय मातीचे. अवघी जीवनमूल्ये कसोटीला लावणारे समरप्रसंग. संघर्ष. प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व वेगळे. प्रत्येकाच्या प्रेरणा वेगळ्या. प्रत्येकाचे प्राक्तनही वेगळे. त्याचबरोबर अनेक चमत्कार; दैवी शाप; दैवी वर. मानवी पातळीपेक्षा वेगळ्या पातळीवर जाणारे कथानक. कर्नाटकमधील अग्रगण्य कादंबरीकार तत्त्वचिंतक डॉ. एस.एल. भैरप्पा यांनी या चमत्कारांच्या, शापांच्या आणि वरदानांच्या भरभक्कम पडद्याआड लपलेल्या माणसांचा शोध घेतला. आधुनिक मानववंशशास्त्रीय, समाजशास्त्रीय, संकल्पनांच्या प्रकाशझोतात महाभारतातल्या व्यक्तिरेखांच्या वर्तनाची संगती लावली. त्यामुळेच पर्व ही महाभारताची एक विलक्षण प्रत्ययकारी अनुभूती देणारी कलाकृती ठरली. तशीच खळबळजनकही. त्या महाकादंबरीचा हा रसपूर्ण मराठी अनुवाद. सहजसुंदर.

64)रिबेल सुलतान -मनू एस. पिल्लई
We read - 350 ₹घरपोच(शिपिंग फ्री)

‘हेवा वाटावा अशा शैलीत सहजतेने केलेली दख्खनच्या इतिहासाची
पुनर्निर्मिती… हे फारच मोठे यश असून यामुळे विद्वत्तापूर्ण अभ्यासास
चालनाच मिळेल.’ – रुद्रांग्शु मुखर्जी
‘चमकदार कथनशैली… अस्सल सनसनाटी कथानक, शेवटचं
पान संपवल्याखेरीज पुस्तक खाली ठेववत नाही.’

65)थिजलेल्या काळाचे अवशेष - नीरजा
We read-355₹घरपोच(शिपिंग फ्री)

मराठी साहित्यातील कविता आणि कथा या क्षेत्रांत नीरजा यांनी स्वत:चे एक स्थान तयार केले आहे. ‘थिजलेल्या काळाचे अवशेष' ही त्यांची पहिलीच कादंबरी, या क्षेत्रातही त्या आपला ठसा निर्माण करतील, असा विश्वास देऊन जाते.

66)कास्ट मॅटर्स - सूरज एंगडे
We read-385₹घरपोच(शिपिंग फ्री)

या स्फोटक पुस्तकात, जगातल्या अनेक खंडांमध्ये शिक्षण घेतलेले पहिल्या पिढीचे दलित अभ्यासक, जातीबाबत खोलवर रुजलेल्या धारणा आणि तिचं बहुस्तरीय स्वरूप विशद करतात. दररोज नरकयातना भोगावा लागणारा दलित आणि प्रेम व विनोदबुद्धीनं भारलेली त्याची अपूर्व बंडखोरीही यात आढळते. दलितांमधील अंतर्गत जातीभेदांपासून ते उच्चभ्रू दलितांचं वर्तन आणि त्यांच्यातील आधुनिक काळातल्या अस्पृश्यतेची विखुरलेली रूपं ब्राह्मणी सिद्धांताच्या अटळ प्रभावाखाली कार्यान्वित असतात. जोवर दलित सत्ता मिळवण्यासाठीच्या लढ्यात नेतृत्वस्थानी नसतील आणि ब्राह्मणवादाविरोधात ब्राह्मण उभे राहणार नाहीत, तोवर जातीचं अस्तित्व राहणार असल्याची मांडणी एंगडे करतात.

67)अंबालक्ष्मी+खंडोबा+सूर्याची सावली -नितीन थोरात
एकूण 3 पुस्तके
मुळ किंमत - 850₹
We Read -750₹घरपोच (शिपिंग फ्री)

68)अखेरचे शिलेदार -पी साईनाथ
325₹घरपोच (शिपिंग फ्री)

अखेरचे शिलेदार' या पुस्तकात स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ असलेले काही जण त्यांची गोष्ट आपल्याला सांगतात. आदिवासी, दलित, इतर मागासवर्गीय,
मुस्लीम, हिंदू आणि शीख पंथाची माणसं आहेत ही. ते वेगवेगळ्या भाषा बोलतात. भारताच्या विविध प्रांतांतली, विभिन्न संस्कृती जपणारी आणि वेगवेगळ्या पाश्वभूमीची ही मंडळी आहेत. काही आस्तिक आहेत; तर काही नास्तिक. काही डावे, काही गांधीवादी; तर काही आंबेडकरवादी.

69)मृत्यू कथा' ~आशुतोष भारद्वाज 🌿
320₹घरपोच (शिपिंग फ्री)

'मृत्यू कथा' हे वास्तववादी लेखन प्रकारातील एक उल्लेखनीय असेच पुस्तक आहे, असे म्हणावे लागेल. अत्यंत बारकाईने घेतलेली माहिती, चिकित्सकपणे शोधलेले मर्म यामुळे हे वाचन वाचकास समृद्ध करून जाते. या गतिमान, सहानुभूतिपूर्ण, धाडसी आणि कधी कधी तर रक्तच गोठवून टाकेल, अशा पुस्तकातून बस्तरचा प्रत्यक्ष परिसर, कथानकातील पात्रे, तेथील नागरी युद्धाचे सामाजिक परिणाम या सगळ्या गोष्टी डोळ्यांसमोर जिवंत होऊन उठतात.

70)शेअर बाजार - जुगार? छे, बुद्धिबळाचा डाव!
-रविन्द्र देसाई
We read-265₹घरपोच(शिपिंग फ्री)

शेअर म्हणजे कंपनीच्या मालमत्तेवर आपला हक्क आणि नफ्यात पूर्ण हिस्सेदारी; पण कंपनीला तोटा झाला, तर मात्र आपल्यावर काहीच जबाबदारी नाही. चांगल्या शेअर्समुळे म्हणून तर समृद्धीची गंगाच दारी अवतरू शकते. पण मुळात शेअर्स म्हणजे काय? ते मिळतात कुठे? चांगले शेअर्स नेमके ओळखायचे कसे? त्यांच्या खरेदीची व विक्रीची योग्य वेळ कोणती? इन्ट्रा-डे आणि डिलिव्हरी व्यवहारांतील खाचाखोचा कोणत्या? कंपनीची कार्यक्षमता नेमकी कशी जोखायची? ताळेबंद व नफा- तोटा पत्रक कसे वाचायचे? एखादी कंपनी उद्यासुद्धा फायद्यात राहील की नाही, हे इंटरनेटवरील उपलब्ध माहितीवरून आजच ओळखायचे कसे? नेमके हेच तर सारे सांगितले आहे या पुस्तकात! तुमच्या सा-या शंकांचे अत्यंत सोप्या शब्दांत निरसन करणारे मराठीतील एकमेव सचित्र पुस्तक शेअर बाजार जुगार? छे, बुद्धिबळाचा डाव! '

71)डोंगरी ते दुबई -हुसेन जैदी
We read-400₹घरपोच(शिपिंग फ्री)

मुंबईवर ६० वर्षे आपला प्रभाव पाडणारे गुंडाच्या टोळ्यांचे डॉन होते. त्यात हाजी मस्तान, करीम लाला, वरदराजन मुदलियार, छोटा राजन, अबू सालेम हे होते. पण या सर्वांवर कडी केली ती दाऊदने. या सर्वांची तपशीलवार माहिती काढून अभ्यासपूर्वक त्यांच्यावर लिहिलेले हे पहिलेच पुस्तक आहे.

72)नाही मानियले बहुमता : विवेकवादी चिंतन -नंदा खरे । संकलन-संपादन – विद्यागौरी खरे, मेघना भुस्कुटे, धनंजय मुळी, रविकांत  पाटील
We Read - 650₹ घरपोच (शिपिंग फ्री)

सुमारे तीस वर्षांच्या पटावर घडलेल्या लेखनापैकी हे काही निवडक लेख. वेगवेगळ्या नियतकालिकांसाठी, वेगवेगळ्या काळांत, वेगवेगळ्या विषयांवर लिहिले गेलेले. त्यामुळे त्यांतलं सूत्र शोधणं कठीण आहे; पण अशक्य मात्र नाही. कारण लिहिणारा माणूस एकच आहे. त्या माणसाची विज्ञान-विवेक यांच्यावर असलेली निष्ठा, सगळ्या लोकांना सुखी-समाधानी आयुष्य मिळावं अशी आस, आणि मुख्य म्हणजे - माणसांवर नि जगण्यावर असलेलं निरतिशय प्रेम - सुरुवातीपासून शेवटपर्यंत अभंग राहिलेलं दिसतं. मराठी वाचकाला, आणि त्यातही ज्ञानाकरता भुकेल्या असलेल्या तरुण दोस्तांना विज्ञान, तत्त्वज्ञान, विवेकवाद या विषयांवरचं सकस साहित्य उपलब्ध करून दिलं पाहिजे हा ध्यास त्यामागे आहे.

73)दस्तावेज -आनंद विंगकर
625₹घरपोच (शिपिंग फ्री)

आनंद विंगकर या मराठीतील प्रथितयश कवी आणि लेखकाची 'दस्तावेज' ही कादंबरी म्हणजे आत्मचरित्र आणि सर्जनशील कथन या दोन वाङ्मयप्रकारांचा हृद्य आणि प्रभावी असा मेळ आहे. परिवर्तनवादी राजकीय चळवळीतील एका कार्यकर्त्याच्या आत्मशोधाचा हा प्रदीर्घ प्रवास आपल्याला अतिशय गुंतागुंतीच्या व्यवस्थांच्या गाभ्याचे दर्शन घडवतो.

74)लॉर्ड्स ऑफ द डेक्कन – अनिरुद्ध कणिसेट्टी
We Read -455₹घरपोच (शिपिंग फ्री)

सहसा विशाल भारतीय उपखंडाचा इतिहास सांगताना, आधुनिक काळातील भारताचा मोठा भाग एकाच राजाच्या आधिपत्याखाली असण्याचा काळ अत्यल्प असल्याचं सांगितलं जातं. परकी आक्रमणं आणि गंगेच्या खोऱ्यातील राजकारण यांनी बहुतांश लोक झपाटून गेल्याचं दिसतं मात्र उर्वरित उपखंडाचा इतिहास हा अत्यल्प प्रमाणात आणि सहसा फक्त तळटीपांच्या स्वरूपात दिला जातो. कनिसेट्टी यांच्या या विद्वत्तापूर्ण आणि निःपक्षपातीपणे लिहिल्या गेलेल्या पहिल्याच पुस्तकाचं गंभीरपणे स्वागत झालं आहे.

75)पावनखिंड -रणजित देसाई
We read-225₹घरपोच(शिपिंग फ्री)

महाराज आणि त्यांच्या मावळ्यांविषयी वाचाव तेवढ कमीच आहे. महाराजांचा प्रत्येक मावळा हा हिरे, रत्न मणिकांहूनही अनमोल आहे. महाराज आणि त्यांच्या मावळ्यांविषयी वाचताना अभिमान वाटतो, अनेकदा ऊर भरून येतो, अनेकदा डोळेही पाणवतात, अशी स्वामीनिष्ठा बघन तर प्रश्न पडतो की कुठून येते एवढी स्वामिनिष्ठा, आता त्या साठी स्वामीही तसाच असावा लागतो म्हणा.

76)वॉल्डन -हेन्री डेव्हिड थोरो
325₹घरपोच (शिपिंग फ्री)

वॉल्डन हे अमेरिकन ट्रान्सेंडेंटलिस्ट लेखक हेन्री डेव्हिड थोरो यांचे पुस्तक आहे. हा मजकूर लेखकाच्या नैसर्गिक वातावरणातील साध्या राहणीचे प्रतिबिंब आहे. हे काम स्वातंत्र्याची वैयक्तिक घोषणा, सामाजिक प्रयोग, आध्यात्मिक शोधाचा प्रवास, व्यंगचित्र आणि - काही प्रमाणात - स्वावलंबनासाठी एक पुस्तिका आहे.

77)शेतकऱ्याचा असूड’-महात्मा फुले
We read-160₹घरपोच(शिपिंग फ्री)

हे महात्मा जोतीराव फुले यांनी निर्मिलेले फार सुंदर रूपक आहे. शेतकऱ्याच्या खांद्यावर असणारा हा असूड केवळ शेतकीत साहाय्य करणाऱ्या जनावरांसाठीच वापरला जातो असे त्यांना वाटत नाही. सर्व प्रकारच्या शोषणाविरुद्ध आणि शोषकांविरुद्धही हा असूड वापरला पाहिजे.

78)रफ स्केचस -सुभाष अवचट
We read Price - 355₹घरपोच

प्रख्यात चित्रकार सुभाष अवचट यांनी रेखाटलेली ही रफ स्केचेस आपल्याला तीच विरळा संधी देतात. आयुष्यात त्यांना भेटलेली माणसं, त्यांचं वेगळेपण, स्वतःची चित्रं, त्या चित्रांमागचा विचार, त्यामागची प्रोसेस,जगभरातले चित्रकार, त्यांचं म्हणणं, माणसाला व्यापून असलेल्या भाव-भावना अशा नाना गोष्टींना सहजपणे कवेत घेत जाणारं अवचटांचं लिखाण त्यांच्या चित्रांइतकंच उत्स्फूर्त आणि लखाखतं आहे.

79)शिरसवाडी नि कंट्या ~गणेश बर्गे
एकूण 2 पुस्तके
425₹घरपोच (शिपिंग फ्री)

शिरसवाडी म्हणजे लव आणि रुपाली यांच्यातलं अविरत प्रेम, शिरसवाडी म्हणजे लव आणि जयु यांच्यातलं बंधुत्व, शिरसवाडी म्हणजे लव आणि गावकऱ्यांनी केलेल्या एका अनाथ मुलाचा सांभाळ. यातच शिरसवाडीचे कथानक नकळतपणे पकड घेत. वाचण्याचा वेग वाढू लागतो तस आपण शिरसवाडी मध्ये पोहचतो.

80)अवणी T1 -नवाब शफाअत अली खान
We read Price - 225₹घरपोच

अवनीचा बंदोबस्त हा तिला मारूनच करणे योग्य होते की अयोग्य?” हे पुस्तक तुम्हाला तुमचे उत्तर मिळवून देण्यास नक्कीच मदत करेल ही अशा व्यक्त करतो.
       
81)वाट तुडवताना -ऊत्तम कांबळे
We Read - 225₹ घरपोच (शिपिंग फ्री)

वाट तुडवताना' हे रूढ अर्थाने आत्मकथन आहे; पण आत्मचरित्राची समग्रता त्यात नाही. अर्थात लेखकालाही ते अभिप्रेत नाही. श्री. उत्तम कांबळे यांच्या विद्याजीवनाची जडणघडण ज्यातून कळते, असे हे विशिष्ट क्षेत्रीय आत्मकथन आहे. .....

82)ऑन द फिल्ड -प्रगती बाणखेले
मुळ किंमत - 240₹
WE Read :- 200₹घरपोच (शिपिंग फ्री)

83)लोकांचे संविधान- रोहित डे
We read - 450 ₹घरपोच(शिपिंग फ्री)

रोहित डे यांचं हे पुस्तक संविधानाचा भारतीयांवरील प्रभाव अधोरेखित करणारं
आहे. जनसामान्यांच्या जीवनात संविधानाने घडवलेले बदल आणि त्याचे परिणाम
यांविषयी या पुस्तकात उदाहरणांनिशी केलेलं विवेचन आपल्या संविधानाचं सामर्थ्य
उलगडून दाखवणारं आहे.

84)एका रानवेडयाची शोधयात्रा -कृष्णमेघ कुंटे
WE Read :- 275₹घरपोच (शिपिंग फ्री)

मदुमलाईच्या जंगलातला एक तरुणप्रसन्न जीवनानुभव त्यातल्या सा-या चढउतारांसह, रौद्रथरारांसह आणून देणारं हे उत्कट पुस्तक असंच अनुभवण्याजोगं पुस्तक आहे... कृष्णमेघ जेथे रमला त्या मदुमलाईच्या प्रेमात पाडणारं... आणि त्याच्या हातून जे निसटलं त्याबद्दल हुरहूर लावणारं... वाचकांच्या जंगलजाणिवा प्रगल्भ करणारं, सहजसुंदर शैलीतलं... '

85)वोलगा गंगा -राहुल सांकुत्यान
मुळ किंमत - 350
We read किंमत - 325घरपोच (शिपिंग फ्री)

86)दुनियादारी - सुहास शिरवळकर
325₹घरपोच (शिपिंग फ्री)

ही आहे एक काल्पनिक सत्यकथा  !
तुमची, माझी, आपल्या मित्रांची , घराघरातून नित्य घडत असणारी .म्हणूनच जो पर्यंत दोस्ती-यारी, दुष्मनी , आनंद – दु:ख, प्रेम – मत्सर या भावना मानवी मनात अनंत आहेत; तो पर्यंत ही काल्पनिक परंतु प्रातिनिधिक असलेली सत्यकथा अमर आहे.

87)पॅपिलॉन+बँको -हेन्री शरियर (रविंद्र गुर्जर)
एकूण 2 पुस्तके
We read - 495 ₹घरपोच(शिपिंग फ्री)

आत्मविश्वास आणि धाडस, बळकट शरीराच्या जोरावर मनुष्य किती सामर्थ्य दाखवू शकतो,
हे सांगणारी ही कादंबरी आहे.

88)झाडाझडती - विश्वास पाटील
मुळ किंमत - 425₹
We read Price - 385₹घरपोच.(शिपिंग फ्री)

तुमच्या बागा फुलाव्यात, ऊसमळे झुलावेत, साखर कारखाने निघावेत, यंत्रं चालावीत, तुमच्या घराघरात वीज खेळावी, म्हणून आम्ही आमची गावं आणि आमचं भवितव्य धरणाच्या घशात कोंबलं. विकासाचा नारळ फोडण्यासाठी दगड म्हणून आमची डोकी वापरलीत. खोबरं तुम्हाला मिळालं आणि आम्ही पाण्यासाठी, साध्या स्मशानासाठी भिका मागायच्या. जिवंतपणी आणि मेल्यावरही झडती चालूच. गाव आणि देव पाठीवर बांधून चालणार्याे हजारो धरणग्रस्तांची मन सुन्न करणारी कादंबरी. '

89)संघर्षाची मशाल हाती -नरसय्या आडम
मुळ किंमत -400₹
We Read किंमत -355₹ घरपोच (शिपिंग फ्री)

90)अग्निपंख -डॉ.एपीजे अब्दुल कलाम
Binding: Paperback
220₹ घरपोच (शिपिंग फ्री)

91)गोष्ट पैश्यापाण्याची- प्रफुल्ल वानखेडे
235₹घरपोच (shipping फ्री)

92)मोई कुन आमी कुन ?
मुळ किंमत - 200₹
We read किंमत - 185₹ घरपोच (शिपिंग फ्री)

93)करुणेचे कॉपीराईट्स -वैभव भिवरकर (कवितासंग्रह)
मुळ किंमत - 200₹
We read किंमत - 185घरपोच (शिपिंग फ्री)

94)शहीद-कुलदीप नय्यर
We read किंमत - 295घरपोच (शिपिंग फ्री)
भयमुक्त होऊन मरणाला कवेत घेणार्‍या भगत सिंग यांचा अखेरपर्यंतचा जीवनप्रवास…

95)ग्रीकपुराण-सुप्रिया सहस्रबुद्धे
We read किंमत - 295घरपोच (शिपिंग फ्री)

ग्रीस आणि भारत या देशांना अतिशय प्राचीन संस्कृतीचा उज्ज्वल वारसा लाभला आहे. मौखिक आणि चिरंतन महाकाव्यांची निर्मिती करणारे हे दोनच देश आहेत. दोन्ही देशांतील महाकाव्यांत आणि पुराणकथांमध्ये विलक्षण साम्यही दिसून येतं. या महाकाव्यांचा विषय संहारक युद्ध हा असून त्यातून प्रकट झालेलं तत्त्वज्ञान, डोकावणारा इतिहास, मानवी प्रवृत्ती, धर्माच्या संकल्पना या सर्व घटकांमुळे ही महाकाव्यं विविध पातळ्यांवर समृद्ध ठरतात. या पुस्तकात सुरुवातीला लेखिकेने ग्रीक वाङमयाची पार्श्वभूमी दिली आहे. पुढे ग्रीक पुराणकथांची वैशिष्ट्यं सांगून अभिजात साहित्यमूल्य असलेल्या रोचक ग्रीक पुराणकथा लेखिकेने पुस्तकासाठी वेचल्या आहेत. त्यात झ्यूस, हेरा, अथिना यांसारख्या देवतांच्या कथा आणि ऑर्फीयस व पॅन्डोरा सारख्या इतर कथांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे ओडिसी व इलियड ही महाकवी होमरने साकारलेली महाकाव्यं, एस्किलस-सॉफोक्लिस-युरिपिडीस लिखित शोकांतिका यांचाही आढावा घेऊन लेखिकेने एक व्यापक वाङ्मयीन पट या पुस्तकाला प्राप्त करून दिला आहे. प्राचीन ग्रीक माणसाच्या श्रद्धा-अंधश्रद्धा, आकांक्षा, तत्त्वज्ञान, स्वप्न, कल्पना प्रतिबिंबित करणारं असं हे
अभिजात वाङमय मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन अंतर्मुख करतं.

~We Read ❤️♥️
https://wa.me/7066495828

https://chat.whatsapp.com/J58KV2PCm97CRz4L8K7v8o

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼