पॅपिलॉन ♥️

कल्पना करा की,🌿 वयाच्या पंचवीशीत तुमच्यावर तुम्ही न केलेल्या खुनाचा आरोप लागतो.'खटला चालतो आणि तुम्हाला 'जन्मठेपेची शिक्षा होते.'फ्रेंच गियाना'सारख्या तुरुंगात तुम्हाला रवाना करण्यात येते.'जो समुद्राच्या मध्यभागी एका बेटांवरील खेड्यात असतो.जेथून पळ काढणे कमालीचं कठीण आणि तेवढंच धोकादायक असतं,एवढं असताना सुद्धा तुम्ही तेथून पळ काढण्यात यशस्वी होता आणि काही महिने स्वातंत्र्याचा उपभोग घेतल्यानंतर दुर्दैवाने पुन्हा पकडल्या जाता. तुम्हाला परत 'गियाना'येथे आणण्यात येतं आणि कोर्ट मार्शल' करून पलायन केल्याची शिक्षा म्हणून 2 वर्ष 'एकांतवासाची'शिक्षा देण्यात येते.तुमची रवानगी 'सेट जोसेफ'या तुरुंगात करण्यात येते.'येथे तोंड पूर्णपणे बंद,संपूर्ण शांतता अभिप्रेत असते.थोडं सुद्धा बोलण्याची आणि बाहेर पडण्याची परवानगी अजिबात नसते.24 तास पोलिसांचा कडक पहारा येथे असतो.थोड्या सुद्धा चुकीला येथे माफी नसते.'सूर्याचा प्रकाश सुद्धा या 'कोठडीत' पडू नये अशी व्यवस्था केलेली असते. 2 वर्ष म्हणजेच 730 दिवस, वेड न लागता तुम्हाला 'नरभक्षक'ना...