पेरूया प्रेम जपुया माणुसकी' ❤️🖤
आपल्या We Read चा नवीन उपक्रम...💛
'पेरूया प्रेम जपुया माणुसकी' ❤️🖤
आपण आपल्या We Read मध्ये पुस्तकांसोबतच प्रेम,माणुसकी पोहोचवायचं आणि पेरायचं काम करतोय.जमेल तसे 'Helping Hands' तयार करायचं आपण प्रयत्न करतोय.
'एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ' या संत तुकोबांच्या या सुंदर वचनाला डोळ्यासमोर ठेऊन आपण मार्गक्रमण करतोय.खऱ्या अर्थाने गरजूंना आपणाकडून जे जे शक्य होईल ती ती मदत आपण केली पाहिजे. आपण केलेली एक किरकोळ मदत समोरील व्यक्तीच्या जीवनात बदल घडवून आणू शकते. हा आपला विश्वास आहे.'
So आपण We Read मधून जमेल तशी काही निवडक जणांना 'मदतीचा हात'देत असतो.यामध्ये कोणाला वैघकीय,शैक्षणिक इत्यादी संबंधित हेल्प करत असतो.थोडीफार आर्थिक मदत गोळा करून देत असतो.
असंख्यांना मदत करायची असते पण सोशल मीडियावर होणाऱ्या फसवणुकीमुळे अनेकांना इच्छा असून सुद्धा फक्त या भीतीमुळे ते 'मदतीचा हात' देऊ शकत नाही.या आणि इतर कारणांमुळेच आपण 'We Read' अंतर्गत हा कार्य सुरू केला आहे.जेणेकरून कोणाचीही कुठलीही फसवणूक न होता खऱ्या अर्थाने गरज असलेल्या व्यक्तींनाच ही मदत सरळ सरळ पोहोचेल.
आपण केलेली हेल्प ही पारदर्शक असेल आणि सरळ सरळ त्या गरजूलाच मिळेल.सरळ सरळ आपण येथे त्या गरजूच्या 'बँक डिटेल्स आणि माहितीचं' शेअर करणार आहोत'कोणीही मदत करण्याआधी 'क्रॉस चेक' करू शकतो. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जेवढी गरज आहे त्या नुसार तेवढ्याच जणांना आपण मदतीचा आव्हान करणार आहोत.ज्यांना करायची ते करतील बाकीचे पोस्ट शेअर करतील 🖤
यामुळे ज्यांना शक्य होईल तेवढी हेल्प करावी ही विनंती कारण आपण केलेली एक किरकोळ मदत समोरील व्यक्तीच्या जीवनात बदल घडवून आणू शकते.
बाकी 'माणूसच माणसाच्या कामी येईल....❤️
~We Read 💛
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा