डेझर्टर 🖤



'वाचलं नव्हे तर अनुभवलं !

काल रात्री या पुस्तकाचा माझा 'अविस्मरणीय' असा प्रवास समाप्त झाला.तेव्हापासून जणू मीच या पुस्तकातील नायक असलेल्या 'गंथर बान्हंमान'चा बोट धरून हा 'साहसी' प्रवास करून आलोय असं मला वाटतंय.मी माझ्या उभ्या आयुष्यात कधी 'वाळवंट'बघितला नव्हता,तो मला या पुस्तकातून बघायला नव्हे तर अनुभवायला मिळालं !
धगधगत्या 'सहारा वाळवंटात'लेखकांनी असंख्य संकटाचा सामना करत केलेल्या या धाडसी आणि संघर्षमय प्रवासाने,"कुठल्याही परिस्थितीत हार मानायची नाही तर शेवटपर्यंत प्रयत्न करत राहायचे" ही महत्वाची शिकवण दिली.🖤

मी यात एवढा गुंतलो होतो की मला आजूबाजूचं काही भानच राहिलं नव्हतं.एकूण 320 पृष्ठसंख्या असलेल्या या अप्रतिम पुस्तकाचा शेवटच होऊ नये असं वाटतं होतं.'गंथरच' हे अनुभव सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत वाचकांना कमालीचं गुंतवून ठेवतो.कोठेही थोडं सुद्धा बोअर न होऊ देता; एक विलक्षण अनुभव देऊन जातो.या पुस्तकाचा वाचन एक सुखद अनुभव ठरतो,जो कायमस्वरूपी आपल्या स्मरणात घर करून जातो.यातील विविध घडलेल्या घटना व प्रसंगाचे केलेले वर्णन वाचताना जणू ते आपल्यासमोर घडत असल्याचा भास आपल्याला होतो.

या पुस्तकाची सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे या पुस्तकाचा 'विजय देवधर'सरांनी केलेला अतिशय उत्कृष्ट असा अनुवाद जो वाचकाला आपण 'अनुवाद' वाचतोय असं थोडं सुद्धा वाटू देत नाही.'यातील नायकच जणू आपल्याला त्याची ही कहाणी स्वतःमराठीतून सांगतोय असं वाटतं राहते.'आय डेझर्टेड रोमेल' या पुस्तकाचा देवधर सरांनी एवढं सुंदर अनुवाद करून मराठीत साहित्यात एक उत्तम भर टाकल्याबद्दल त्यांचे खरंच आभार मानायला हवे.

कथानकाबद्दल....💙

सैन्यातून पलायन केलेल्या सैनिकाला 'डेझर्टर'म्हणतात.ही कहाणी अश्याच एका डेझर्टर ची आहे.ज्याने 1941 साली द्वितीय महायुद्ध सुरू असताना 'जर्मन' सैन्यातून पळ काढला होता.युद्धाच्या काळात सैन्यातून पलायन करणे ही 'बंडखोरी'समजली जायची आणि या "चुकीला अजिबात माफी नव्हती"होती ती फक्त कठोर शिक्षा आणि ती शिक्षा म्हणजेच .....मृत्यूदंड !

आता आपण एकदा चुकीने सुद्धा सैनिकांच्या हाती लागल्यावर आपलं '"राम राम सत्य"होईल याची पुरेपूर कल्पना असताना आणि पुढील संभावित असलेले असंख्य धोके ठाऊक असताना 'गंथर बान्हंमान' हा धोका पत्कारतो.'गंथर हिटलरच्या 'जर्मन सैन्यात 'कुरेयर' चं काम करत असतो. त्याची नेमणूक' ही दक्षिण आफ्रिकेतील अतिविशाल सहारा वाळवंटात झालेली होती.रोमेल 21 व्या पँझर डिव्हिजन येथे तो आपली सेवा बजावत असतो.

पण अचानक असं नेमकं काय घडतं
की, तो सैन्यातून पलायनासारखं धाडसी निर्णय घेतो ? 

या प्रश्नाच्या उत्तरासाठी हे पुस्तकं वाचणे गरजेचं आहे.मी त्याबद्दल येथे काही लिहिणार नाही.

तर तो आता योग्य व्यवस्थित प्लॅनिंग करून आपल्या एका मित्रांसोबत पलायन करतो.पण पुढे त्यांच्यासाठी वाटेत काय वाढून ठेवलं आहे ? याची त्या दोघांना कल्पना नसतेच.त्याच्या या मित्राचा त्याला काही काळ सहवास लाभतो पण लवकरच तो एकटा पडतो आणि एकट्याने पुढील प्रवास सुरूच ठेवतो. सहारा वाळवंटाचा वालुकामय प्रदेश ओलांडून त्याला
आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर पोहोचायचे असते.
इथपर्यंतचा हा संपुर्ण प्रवास त्याच्या एकट्याचा आहे.

'धगधगत्या वाळवंटात' आधी 'मोटारसायकलने ,ट्रकने तर थोडा पायी केलेला हा रोमांचक प्रवास फार वाचनीय आहे.फक्त आणि जिवंत राहण्यासाठी केलेला हा संघर्ष खूप काही शिकवून जाणारा आहे.थरारक,रोमांचक आणि अंगावर काटे आणणारा 'गंथर'चा हा प्रवास थक्क करून जाणारा आहे.

शेवटी पुस्तकातील आवडलेलं वाक्य....

अडचणीच्या काळात माणूस जेव्हा विचार करू लागतो, तेव्हा हजार गोष्टी त्याला सतावतात. अन् अडचणी ह्याही एकेकट्यानं येत नाहीत. संकटं ही नेहमी झुंडीनं आणि तीपण अतिशय वेगानं कोसळत असतात. अशा वेळी तितक्याच वेगानं विचार करून क्षणात निर्णय घेणं ही गोष्ट महत्त्वाची ठरते.💛

©️Moin Humanist🖤

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼