आणखी काही प्रश्न 💙


काही दिवसांपूर्वी 'अनिल अवचट' लिखित
'आणखी काही प्रश्न'हे महत्वपूर्ण पुस्तकं वाचुन समजून घेतलं.'बाबांनी'यामध्ये मांडलेल्या प्रश्नांनी मला स्तब्ध केलं , विचार करायला भाग पाडलं; तर घराच्या चार भिंतीच्या पलीकडे बघण्यासाठी प्रवृत्त सुद्धा केलं.बाहेरच जग किती साऱ्या 'जटील आणि भयंकर' प्रश्नांनी ग्रासलेला आहे हे मला या पुस्तकातून कळालं.

लेखकांनी वेध घेतलेल्या महत्वपूर्ण प्रश्नांनी याकडे बघण्याचा माझं  दृष्टीकोन बदललं.कितीतरी महत्वाची नवीन माहिती मला यातून मिळाली.लेखकांनी या पुस्तकातून वाचकापुढे फक्त महत्वपूर्ण प्रश्नच मांडलेले नाही,तर त्या प्रश्नांची पार्श्वभूमी,मुळ समस्या, त्या प्रश्नांवर नेमके सुरू असलेले काम,त्यावर आतापर्यंत निघालेले उपाय इत्यादी सर्वकाही सहज सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडले आहेत.

जे वाचत असताना आपण अनेक वेळा अंतर्मुख होऊन जातो.

या पुस्तकातील प्रत्येक पृष्ठातून लेखकांनी केलेला सखोल 'अभ्यास आणि पावलोपावली घेतलेली 'मेहनत' जाणवते.प्रत्येक प्रश्नांचा केलेला एकूण अभ्यास,त्या प्रश्नांच्या निगडित केलेली त्या संबंधित तज्ञांसोबत दीर्घ चर्चा,प्रत्यक्षात जाऊन घेतलेल्या अनुभवामुळे आपल्याला त्या-त्या प्रश्नांचा मुळ गाभा कळायला मदत होते.

अश्या कितीतरी प्रश्नांकडे आपण आजपर्यंत दुर्लक्ष करत होतो ही जाणीव आपल्याला होते.एकंदरीत असंख्य अश्या महत्वपूर्ण प्रश्नांकडे आपली नजर वळवण्याचा प्रयत्न हे पुस्तकं सुंदरीत्या करण्यात यशस्वी होतं.

हे पुस्तकं वाचून समजून-उमजून घेतल्यानंतर आपण "आयुष्याच्या धावपळीत थोडं थांबून या प्रश्नांकडे डोळसपणे नक्कीच विचार करायला प्रवृत्त होतो आणि हाच या पुस्तकाचं यश आहे असं मला वाटतं.

160 पृष्ठसंख्या असलेल्या पुस्तकांतून लेखकांनी, 'एच आय व्ही एड्स आणि एड्सग्रस्त रुग्ण ,डोक्यावर मैला घेऊन जाणारे सफाई कामगार,धरण बांधकाम व तेथील मजूर,क्षारपड जमीन आणि त्यामुळे होणारे नुकसान,जंगलतोड आणि त्याचे परिणाम ,बर्न वॉर्ड मध्ये भाजलेल्या स्त्रियाचं दुखणं व आक्रोश,दिवसागणिक निसर्गाचं होणार ऱ्हास,घटस्फोट झालेल्या आई-वडिलांची मुलं,ऊसतोड कामगारांच त्रासमय जीवन ,ट्रक ड्रायव्हराचं   विश्व इत्यादी बाबी संबंधित प्रश्न आपल्या समोर मांडले आहेत.फक्त प्रश्नच मांडले नाहीत,तर त्याचा चोहीबाजूने केलेला अभ्यास सुद्धा या पुस्तकात मांडलेला आहे जो वाचताना आपण एक महत्वपूर्ण 'संदर्भग्रंथ'अभ्यासतोय असं आपल्याला वाटतं.

एकूण,हे पुस्तकं वाचून बाजूला ठेऊन देण्यासारखं अजिबात नाही,तर हे पुस्तकं वाचून यात मांडलेल्या त्या त्या प्रश्नांबद्दल वेळोवेळी मनन-चिंतन करून आपण आपल्या परीने हे प्रश्न चिघळत जाण्यापासून रोखण्यासाठी नेमकं काय करू शकतो याबद्दल विचार करण्यासारखं आहे.

नक्की नक्की वाचा...🌱

©️Moin Humanist🖤

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼