We Read 100 वाचनीय पुस्तकांची यादी 💙
कृपया संपूर्ण यादी शेवटपर्यंत वाचूनच पुस्तके निवडावी....
https://wa.me/7066495828
__________________________________________
आजचं विशेष ऑफर...💛
◆ व्यंकटेश माडगूळकर यांच्या 41 पुस्तकांचा सेट....
मुळ किंमत :- 6115₹
We read :- 4990₹घरपोच (शिपिंग फ्री) ◆
__________________________________________
1)पारधी -गिरीश प्रभुणे
मुळ किंमत - 450₹
We read Price - 400₹घरपोच.(शिपिंग फ्री)
समाजाने वेशीबाहेर ढकललेल्या आणि ख-याखु-या स्वातंत्र्यापासून आजही वंचित राहिलेल्या एका अन्यायग्रस्त जमातीची ही आक्रोशकथा आहे... त्या जमातीच्या व्यथावेदनांशी समरस होऊन त्या सग्यासोय-यांच्या उत्कर्षासाठी झटणा-या एका तळमळीच्या कार्यकर्त्याने ही मांडलेली कैफियत आहे...
2)मृत्यू पाहिलेली माणसे -गौरी कानेटकर
मुळ किंमत - 200₹
We read Price - 185 ₹घरपोच(शिपिंग फ्री)
3)मी संदर्भ पोखरतोय -पवन नालट
मुळ किंमत - 280₹
We read Price - 250₹घरपोच (शिपिंग फ्री)
मला माहीत होतं थडग्यांवर जीव लावणारी माणसं सर्वच धर्मांत असतात माणसांवर जीव लावणारी माणसं सापडत नाहीत कुठेही! धर्मानं बांधल्या होत्या कधीच्याच कबरी माणसाचं अस्तित्व खोल पुरून कधी मंदिरावर उभारलेल्या कळसामधून कधी मशिदीवर रोवलेल्या चंद्रकोरीमधून माणसांच्या विचारांना विचारांनी तिलांजली देणारी माणसं विवेकाचा कत्लेआम करत असतात दररोज...
4)कुतूहलापोटी -अनिल अवचट
मुळ किंमत - 200₹
We read Price - 185₹घरपोच
#stronglyrecommended
माणसाचा जन्म हे एक मोठे कुतूहल आहे. जन्मानंतरही अनेक गोष्टींबद्दल प्रश्न उभे राहतात. त्याबद्दल आश्चर्य वाटत राहते. लेखक, कलावंत अनिल अवचट यांनाही कित्येक गोष्टींबद्दल मनात प्रश्न निर्माण होतात. त्याचे उत्तर शोधण्याच्या ध्यासातून त्यांना खूप वेगळी, अद्भुत माहिती हाती येते. हीच माहिती त्यांनी 'कुतूहलापोटी'मधून वाचकांना सांगितली आहे.
5)शोध -मुरलीधर खैरनार
मुळ किंमत - 600₹
We read Price - 555₹घरपोच(शिपिंग फ्री)
6)डेझर्टर -विजय देवधर
We read Price - 350₹घरपोच(शिपिंग फ्री)
गंथर बान्हमान यांच्या 'आय डेझर्टेड रोमेल' या पुस्तकाचा विजय देवधर यांनी केलेला हा अनुवाद आहे.
हे पुस्तक म्हणजे एक अद्भूत साहस कथा आहे. अनेक साहसी घटना आणि थरारक प्रसंगामुळे ते रोमांचकारी
झाले आहे. बान्हमान यांचे स्वानुभव आणि कल्पना यांची बेमालूम सरमिसळ असलेले हे कथानक आहे.
7)धग – उद्धव शेळके
मुळ किंमत - 325₹
We read Price - 285₹घरपोच(शिपिंग फ्री)
‘धग’ ही कादंबरी आहे एका सामान्य शिंपिणीची कहाणी. परिस्थितीविरुद्ध तिने दिलेल्या लढ्याची ही गाथा.
“कौतिक” ही एक सामान्य स्त्री, पण तिची झुंज असामान्य आहे. परिस्थितीपुढे ती वाकते आणि म्हणूनच कादंबरी मनाला अधिक जाऊन भिडते. कारण हा शेवट अपरिहार्य असतो. स्थितीचे अनुलंघ्य कवच फोडण्यासाठी करफोड करणारा माणूस, हाच ह्या कादंबरीचा केंद्रबिंदू आहे.
8)गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामीगांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी
मुळ किंमत - 425₹
We Read -485₹घरपोच (शिपिंग फ्री)
स्वातंत्र्यवीरांची मृत्यूनंतरही विटंबना केलीच पाहिजे का?’’ - नरहर कुरुंदकर • सावरकरांना न्यायालयाने गांधीहत्येच्या आरोपातून पूर्णपणे निर्दोष ठरविले असताही गेल्या पंधरा वर्षांपासून त्यांना बदनाम करण्याची मोहीम कशी चालू आहे? • त्यांच्याविरुद्ध न्यायालयात पुरावा तरी कोणता होता? • गांधीहत्येनंतर वीस वर्षांनी नियुक्त झालेला कपूर आयोग हा न्यायालयाच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी होता काय? • अहवालात आयोगाने सावरकरांना दोषी धरणारे अधिकारबाह्य मतप्रदर्शन कसे केले? • आयोगासमोर कोणता नवा पुरावा तरी आला होता काय? • मुंबई व दिल्ली पोलिसांनी बनावट कागदपत्रे कशी तयार केली होती? • सावरकरांचे गांधीजी, काँग्रेस व नेहरूंचे सरकार यांच्याशी संबंध कसे होते? • शेवटच्या काळात गोडसे सावरकरांच्या विरोधी का झाला होता? • गांधीहत्येमुळे सावरकरवादावर होणाऱ्या विपरीत व आत्मघातक परिणामाचा विचार तरी सावरकरांनी केला असेल की नाही? - अशा सर्व प्रश्नांचा कायदा, वास्तव, तर्क व न्यायबुद्धी यांच्या आधारे अभ्यासपूर्ण चिकित्सा करणारा ग्रंथ. '
9)झांबळ -समीर गायकवाड
मुळ किंमत - 280₹
We Read - 255 घरपोच (शिपिंग फ्री)
भेटलेली माणसे घनदाट होती !
थेट पोचायास कोठे वाट होती ?
कवीश्रेष्ठ सुरेश भट यांच्या ह्या काव्यपंक्ती आहेत.
काळजाला हात घालण्याची ताकद या ओळींत
आहे. याच तोलामोलाची माणसं या कथांत
भेटतील, ही माणसं अनेकाथांनी घनदाट होती.
त्यांच्यातली माणुसकी ओतप्रोत होती, मानवी
जीवन मूल्यांवरचा त्यांचा विश्वास अफाट होता,
त्यांची नाती अतुट मायेची होती आणि मुख्य
म्हणजे अंधाराच्या उंबऱ्यावरच्या प्रकाशखुणा
त्यांच्या भाळी होत्या. ही माणसं आपल्या
अवतीभवतीच असतात तरीही त्यांच्यातल
वेगळेपण आपल्याला उशिराने जाणवतं.
10)मोठी माणसं -नरेंद्र चपळगावकर
मुळ किंमत - 300₹
We Read -255₹घरपोच (शिपिंग फ्री)
पारतंत्र्य आणि स्वातंत्र्य यांच्या संधिकाळात आपल्या समाजजीवनावर अनेक व्यक्तींनी प्रभाव टाकला, त्यातील काहींची ही व्यक्तिचित्रे . त्यांची कार्यक्षेत्रे, त्यांचे राजकीय विचार, त्यांच्या कार्यपद्वती आणि त्यांच्या जीवननिष्ठाही वेगवेगळ्या असल्या तरी त्यांच्यात एक समान सूत्र आहे. त्यांच्या जीवननिष्टेचा एक पदर स्वातंत्र्याच्या चळवळीशी, तर दुसरा समाजाच्या प्रबोधनाशी जोडला गेलेला आहे. या संगळ्या व्यक्तीनी काही शाश्वत मूल्ये आपल्या मनाशी घट्ट बाळगली होती, व्यक्तिगत जीवनातील इच्छा-आकांक्षा आणि गरजा यांना बांध घालून समाजाचे ऋण फेडण्यासाठी, त्याच्या वैचारिक उन्नयनासाठी त्यांनी आपले कष्ट आणि बुद्धी वापरली. अशी असंख्य माणसे त्या काळात होऊन गेली, या पुस्तकातील व्यक्तिचित्रांमध्ये त्या सर्वांचे स्मरण अंतर्भूत आहे. आपला देश स्वातंत्र्याची पंचाहत्तरी पूर्ण करत असताना या मोठ्या माणसांचे स्मरण नक्कीच प्रस्तूत ठरावे.
11)गढीवरून -राजा गायकवाड
मुळ किंमत -300₹
We Read - 255₹ घरपोच (शिपिंग फ्री)
कृषी-परंपरेतल्या बहुजनांच्या आणि त्यातल्या जराश्या उच्च स्थानावर बसलेल्या किंवा फलाण्या जातीत जन्म घेतल्यामुळे आपण उच्च स्थानावरच आहोत, असं समजून वागणाऱ्या माणसांच्या आत असलेले मानसिक-सामाजिक-सांस्कृतिक आणि राजकीय गंड यांना हात घालणाऱ्या कथा या संग्रहामध्ये बहुसंख्येने आहेत.
12)विद्रोही तुकाराम -डॉ.आ ह साळुंखे
मुळ किंमत - 500
We read किंमत - 450₹घरपोच (शिपिंग फ्री)
तुकाराम महाराज यांच्याबद्दल वारकरी संप्रदाय आणि एकूणच मराठीजणांमध्ये नितांत आदर आहे. त्यांच्या अभंगवाणीतून सामान्यांना जीवनाचे सार समजते. संत साहित्यातून तुकाराम महाराजांचे जे चरित्र रंगविले आहे, ते त्यांच्या प्रत्यक्ष व्यक्तिमत्वाशी विसंगत आहे. असहाय्य भोळसट, व्यवहारशून्य, सदैव टाळ कुटीत असलेले त्यांचे चित्र नाही. उद्दाम, अहंकारी धर्मसत्तेला आव्हान देणारे लढवय्ये संत, असे त्यांचे खरे व्यक्तिमत्व आहे. वयाच्या विशीत त्यांना सामाजिक न्यायाचा साक्षात्कार झाला. त्यातून लोकांची कर्जखते त्यांनी इंद्रायणीच्या डोहात बुडविली. शुद्ध भावना, शुद्ध आचरण, रंजल्या-गांजलेल्यांना मदत करणे, हीच ईश्वरभक्ती आहे, असे त्यांनी सांगितले. समाजव्यवस्थेला न्यायचे अधिष्ठान देऊन त्यांनी समाजव्यवस्थेविरुद्ध, अन्यायाविरुद्ध लढा उभारला. संत तुकाराम महाराजांविषयी वेगळा व वास्तवतेला धरून असलेला दृष्टिकोन आ. ह. साळुंखे यांनी 'विद्रोही तुकाराम'मधून मांडला आहे. त्यातून तुकाराम महाराजांचे खरे व्यक्तिमत्व कळते.
13)जिज्ञासापुरुष ह्युएनत्संग -डॉ.आ.ह साळुंखे
मुळ किंमत - 280₹
We read Price - 250₹घरपोच.(शिपिंग फ्री)
14)अर्थसाक्षर व्हा - अभिजित कोलपकर CA
मुळ किंमत - 400₹
We read Price - 355₹घरपोच.(शिपिंग फ्री)
15)महामाया निळावंती -सुमेध
मुळ किंमत - 350₹
We read किंमत - 325 घरपोच (शिपिंग फ्री)
16)डॉ.आंबेडकरांच्या सहवासात -डॉ.सविता आंबेडकर
मुळ किंमत - 600₹
We read किंमत - 555 घरपोच (शिपिंग फ्री)
17)सलोख्याचे प्रदेश -सबा नक्वी
मुळ किंमत - 250₹
We read किंमत - 225₹घरपोच (शिपिंग फ्री)
भारतात अनेक जाती - धर्मांचे लोक राहतात. प्रत्येक समाजाच्या चालीरीती, रूढी परंपरा वेगळ्या असतात. तरी 'अनेकतात एकता' म्हणतो त्याप्रमाणे येथील प्रमुख हिंदू व मुस्लीमांच्या परंपरा, सण, उत्सव, एकत्र साजरे होतात.
अशा काही ठिकाणी भेट देऊन तेथील समजाचे चित्रण सवा नक्वी यांनी 'सलोख्याचे प्रदेश' मधून दाखविले आहे.
18)न्याय – मायकल सॅंडेल
मुळ किंमत - 400₹
We Read -355₹घरपोच (शिपिंग फ्री)
19)छावा -शिवाजी सावंत
मुळ किंमत - 750₹
We read Price - 675₹घरपोच
आजतागायत संभाजीमहाराजांच्या पराक्रमाच्या वर्णनाची मोहिनी कायम राहिली आहे. संभाजीराजांचे तामसी, अविचारी रूप पुसून टाकून संवेदनशील, हळवं, करारी आणि देशप्रेमी रूप या चरित्रातून दृगोचर होतं. 'संभाजीराजे खरच व्यसनांध असते, तर शेवटच्या कठोर साजेच्या प्रसंगी पारच ढासळले असते. कारण ती साजाच तेवढी क्रूर आणि अमानवी होती, ' असं सावंत दाखवून देतात. शिवाजीराजांचे पुत्र त्यांना शोभणारे वीर, साहसी होते, यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे. सावंत यांची रसाळ, ओघवती शैली ऐतिहासिक प्रसंग उभे करताना अधिकच खुलते. पानोपानी उत्कंठा वाढत जाते. वाचकाला खिळवून ठेवण्याची ताकद कादंबरीचेही सामर्थ्य आहे.
20)आदिवासी बोधकथा -एक पुनकर्थन :-
प्रदीप प्रभू/सिराझ बलसारा
मुळ किंमत - 250₹
We read - 225₹ घरपोच.(शिपिंग फ्री)
हे पुस्तक खरंच खूप जबरदस्त आणि अप्रतिम आहे.यातील प्रत्येक कथा उत्कृष्ट असून यामध्ये दिलेली वारली चित्रं तर खूप भन्नाट आहेत..गोष्ट सांगण्यासाठी आदिवासी स्त्रिया वारली चित्र काढत असतं. या कथांमध्ये आदिवासींची सारी जीवनपध्दती चित्रित केलेली आढळते.जीवनाचा सह-आनंद लुटलेला दिसतो.आदिवासी समाजातून बहरलेलं तत्वज्ञान यामध्ये सापडतो,त्यांची निसर्गाप्रति असलेली कृतज्ञता आणि प्राणिमात्रांवरचं प्रेम यामध्ये आपल्याला दिसतो. भारतीय संस्कृतीतला विविधपणा,चैतन्य अनुभवायचं असेल तर उघड्या काना-डोळ्यांनी आणि मोकळ्या मनाने आपल्या आजूबाजूला ऐकायची,पाहायची आणि त्यावर विचार करायची गरज आपल्याला आहे.कष्टकरी संघटनेच्या प्रदीप प्रभू आणि शिराझ बलसारा यांनी गावागावांतून या वारली कथा गोळा करून इंग्रजीत ग्रथित केल्या आणि त्यातीलच 15 निवडक कथांचा पुनकर्थन मराठी वाचकांसाठी या पुस्तकात केलं आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानायला हवे..
21)शिकता शिकविता -निलेश निमकर
मुळ किंमत - 300₹
We read Price - 255₹घरपोच
22)नर्मदे हर हर -जगन्नाथ कुंटे
मुळ किंमत - 300₹
We read Price - 255₹घरपोच
23)लॉर्ड्स ऑफ द डेक्कन – अनिरुद्ध कणिसेट्टी
मुळ किंमत - 500
We Read -455₹घरपोच (शिपिंग फ्री)
24)तीन व्यक्तित्वांची महान गाथा. अभिजात अशा कादंबऱ्या आता संच स्वरूपात उपलब्ध मृत्युंजय, छावा आणि युगंधर -शिवाजी सावंत
मुळ किंमत - 2140
We Read -1855₹घरपोच (शिपिंग फ्री)
25)अवणी T1 -नवाब शफाअत अली खान
मुळ किंमत - 250₹
We read Price - 225₹घरपोच
26)रफ स्केचस -सुभाष अवचट
मुळ किंमत - 400₹
We read Price - 355₹घरपोच
27)शूद्र पूर्वी कोण होते ?-डॉ.बाबासाहेब आंबेडकर
मुळ किंमत - 300₹
We read किंमत - 285₹घरपोच (शिपिंग फ्री)
28)बा भीमा (कॉमिक्स)
185₹घरपोच (शिपिंग फ्री)
29)केदारनाथ 17 जून -डॉ.प्रकाश कोयाडे
मुळ किंमत - 390₹
We Read -355₹घरपोच (शिपिंग फ्री)
30)आस्तिकशिरोमणी चार्वाक -डॉ.आ.ह.साळुंखे
मुळ किंमत -250₹
We read किंमत - 225घरपोच (शिपिंग फ्री)
चार्वाकांविषयी गैरसमज दूर करणारे एक अप्रतिम पुस्तक. चार्वाकांचे विचार आजही उपयुक्त आहेत. चार्वाकांचा देहात्मवाद, जडवाद, बुध्दीचे स्वातंत्र्य जपणे, प्रत्यक्ष प्रमाण व लौकिक अनुमानाचा पुरस्कार करणे, कर्मकांडांना विरोध इ. अनेक गोष्टी काळाच्या ओघात सत्य ठरल्या आहेत.
31)अंगुलीमाल -उल्हास निकम
मुळ किंमत -250₹
We read किंमत - 225₹घरपोच (शिपिंग फ्री)
32)नरसिंहावलोकन -विनय सीतापती
मुळ किंमत - 375₹
WE Read :- 355₹घरपोच (शिपिंग फ्री)
33)गुंतवणूक आर्थिक स्वातंत्र्याकडे जाण्याचा मार्ग – बेन कार्लसन , रॉबिन पॉवेल
मुळ किंमत - 250₹
We read Price - 215₹घरपोच.(शिपिंग फ्री)
34)बुद्धांच्या संस्कारक्षम गोष्टी 1&2 -सागर शिंगणे
We read किंमत - 175₹घरपोच (शिपिंग फ्री))
35)आपले भवताल -डॉ.नितीन हांडे
मुळ किंमत - 200
We read किंमत - 185₹ घरपोच (शिपिंग फ्री)
36)रिवर्क -जेसन फ्राईड
मुळ किंमत - 250₹
We read किंमत - 225₹ घरपोच (शिपिंग फ्री)
37)तिसरी क्रांती -अरुण साधू
मुळ किंमत - 450₹
We Read -400₹घरपोच (शिपिंग फ्री)
मानवी इतिहासातील समतावादी समाजरचनेचा अट्टाहासाने केलेला असा भव्य, महत्वाकांक्षी आणि क्लेशकारक प्रयोग संपला. पण ज्यासाठी रशियन जनतेने रक्त, घाम आणि अश्रू दिले त्या आदर्शांचे काय? स्तिमित करून टाकणा-या सोवियेत क्रांतीचा रोमहर्षक, विस्तीर्ण पट... '
38)बाबासाहेबांच्या 21 ग्रंथाचे सार -वैभवकुमार शिंदे
मुळ किंमत - 280₹
We Read -250₹घरपोच (शिपिंग फ्री)
39)फिन्द्री -सुनीता बोर्डे
मुळ किंमत - 350
We read किंमत - 310 घरपोच (शिपिंग फ्री)
40)डॉ.बाबासाहेब आंबेडकर – धनंजय कीर
मुळ किंमत - 900₹
We read Price - 785 ₹घरपोच(शिपिंग फ्री)
एवढी तेवढी प्रतिकूलता कोणाच्याही वाट्याला कधीमधी येते. पण जन्माबरोबरच प्रतिकूलता डोंगरासारखी पुढ्यात हजर असलेल्या माणसाने काय करावे? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात प्रतिकूलतेने जे तांडव घातले ते पचवून बाबासाहेब माणूस म्हणून प्रस्थापित झाले, चैतन्याने लक्षलक्ष उजळून निघाले. ती दीप्ती अशी अभिनव होती की तिने बाबासाहेबांच्या कोटीकोटी बांधवांना जागृत करून ‘मदायत्तं तु पौरुषं’चा मंत्र त्यांच्या प्राणांत भरला आणि त्यांना माणूस म्हणून जगायला शिकवले. ती अद्भुत कहाणी प्रत्यक्षात कशी घडली याची रोमांचकारी हकीकत या महाचरित्रात संयमशील समरसतेने सांगितलेली आहे. चरित्रनायकाचे प्रसाद्पूर्ण दर्शन झाल्याचे समाधान चरित्रकार धनंजय कीर यांच्या शब्दांतून मिळते
41)वोलगा गंगा -राहुल सांकुत्यान
मुळ किंमत - 350
We read किंमत - 325घरपोच (शिपिंग फ्री)
42)नपेक्षा -अशोक शहाणे
मुळ किंमत - 250
We read किंमत - 225घरपोच (शिपिंग फ्री)
43)मित्रांना शत्रू करू नका डॉ.आ ह साळुंखे
आणि चार्वाक -सुरेश व्दादशीर
मुळ किंमत - 250₹
We Read -225₹घरपोच (शिपिंग फ्री)
44)सूर्याची सावली -नितीन थोरात
मुळ किंमत - 250₹
WE Read :- 225₹घरपोच (शिपिंग फ्री)
45)फॅक्चर्ड फ्रीडम -कोबाड गांधी
मुळ किंमत - 300₹
We Read -255₹घरपोच (शिपिंग फ्री)
46)बळीवंश -डॉ.आ ह साळुंखे आणि
सेपियन्स – मानव जातीचा अनोखा इतिहास- युव्हाल नोआ हरारी
मुळ किंमत - 1000₹
We Read किंमत -850₹ घरपोच (शिपिंग फ्री)
47)संताजी घोरपडे -रवि मोरे
मुळ किंमत - 250₹
We read Price - 225₹ घरपोच.(शिपिंग फ्री)
48)सर्वोत्तम भूमिपुत्र गोतम बुद्ध -डॉ.आ ह साळुंखे
मुळ किंमत - 700₹
We read Price - 625₹ घरपोच.(शिपिंग फ्री)
49)औरंगजेब -यदुनाथ सरकारव(मराठी)
मुळ किंमत - 550
We read किंमत - 505₹घरपोच (शिपिंग फ्री)
50)फुलेल तेव्हा बघू -विनोदकुमार शुक्ल
मुळ किंमत - 300₹
We read किंमत - 255घरपोच (शिपिंग फ्री)
51)प्रकाशवाटा -प्रकाश आमटे
मुळ किंमत - 200₹
We read Price - 185₹घरपोच.(शिपिंग फ्री)
52)धर्म आणि समलैंगिकता -देवदत्त पट्टनायक
(अनुवाद -सोनाली नवांगुळ)
मुळ किंमत - 220₹
We read Price - 185₹घरपोच
53)आडवाटेची पुस्तके -निखिलेश चित्रे
मुळ किंमत - 300₹
We Read -255₹घरपोच (शिपिंग फ्री)
54)धडपडणा-या तरुणाईसाठी -संदीपकुमार साळुंखे
We Read -255₹घरपोच (शिपिंग फ्री)
स्वप्नं पाहायला कुणी शिकवावं लागत नाही. तरुणाई स्वप्नाळू असतेच मुळी. पण स्वप्नं सहजासहजी साकार होत नाहीत. ती कठोर परीक्षा घेतात आणि कोणतीही दयामाया न दाखवता अनेकांना अपयशाचे रट्टे देतात. साहजिकच पदरी निराशा येते. पुढची वाट दिसेनाशी होते. काय करावं, कुठे जावं... काही कळत नाही. मार्गदर्शक मित्र भेटत नाही... अशा असंख्य तरुणांना थोरल्या भावाच्या नात्यानं धीर देणा-या, उठून उभं राहण्यासाठी हात देणा-या आणि स्वप्नं साकार करण्यासाठी नेमकी कोणती साधना कशी नि केव्हा करायची, हेही समजावून सांगणा-या एका तरुणाचं हे बावनकशी लखलखतं आत्मकथन... एकेकाळी रस्त्यावरचं शेण वेचून गोवऱ्या रचणारा तो गरीब ग्रामीण युवक आज एक यशस्वी उच्चपदस्थ सनदी अधिकारी आहे. पण स्वत:च्या यशाच्या धुंदीत तो बांधवांना विसरलेला नाही. भेटतील त्या सा-यांना प्रेरणेचे दिवे आंदण देत तो सांगतोय - नवं ताजं अनुभवामृत. आजच्या अन् उद्याच्या तरुणाईसाठी... '
55)लर्न टू अर्न- पीटर लिंच
मुळ किंमत - 370₹
We Read -345₹घरपोच (शिपिंग फ्री)
56)अर्थाच्या शोधात -व्हीकटर फ्रँकलन
मुळ किंमत - 200₹
We read किंमत - 185₹ घरपोच (शिपिंग फ्री)
57)महात्मा जोतीराव फुले – धनंजय कीर
मुळ किंमत - 475₹
We read किंमत - 425₹घरपोच (शिपिंग फ्री)
58)त्याने गांधीला का मारले -अशोक कुमार पांडे
मुळ किंमत - 300₹
We read किंमत - 255घरपोच (शिपिंग फ्री)
59)एकलव्य -विजय देवडे
मुळ किंमत - 390₹
We Read -355₹घरपोच (शिपिंग फ्री)
60)खंडोबा -नितीन थोरात
मुळ किंमत - 280
We read Price - 300घरपोच.(शिपिंग फ्री)
61)भंगार -अशोक जाधव
मुळ किंमत - 200₹
We Read -185₹घरपोच (शिपिंग फ्री)
62)मी संदर्भ पोखरतोय - पवन नालट
मुळ किंमत - 280₹
We Read किंमत -240₹ घरपोच (शिपिंग फ्री)
63)ध्यानसुत्र -ओशो
मुळ किंमत - 280₹
WE Read :- 250₹घरपोच (शिपिंग फ्री)
64)मी देशाला काय देऊ शकतो - एपीजे अब्दुल कलाम
मुळ किंमत - 250₹
We read किंमत - 215घरपोच (शिपिंग फ्री)
65)स्वातंत्र्यवीर सावरकर – धनंजय कीर (जयंती विशेष)
मुळ किंमत - 825₹
We read Price - 725₹घरपोच(शिपिंग फ्री)
धनंजय कीरांनी लिहिलेले हे चरित्र म्हणजे सावरकरांच्या तुफानी, स्फोटक आणि स्फूर्तिदायक जीवनाचे एक असाधारण, समग्र, सर्वांगीण व समतोल असे चित्रण आहे. चरित्रातील माहिती अद्ययावत असून त्यात स्वातंत्र्यवीरांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंवर सत्यानिष्ठेने प्रकाश टाकण्यात आला आहे.
66)झुंड -बाबाराव मुसळे
मुळ किंमत -580₹
We Read - 455₹ घरपोच (शिपिंग फ्री)
67)हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ – भालचंद्र नेमाडे
मुळ किंमत - 750
We read किंमत - 675₹ घरपोच (शिपिंग फ्री)
68)सोयरीक घराशी | अंजली कीर्तने
मुळ किंमत - 350₹
We read किंमत - 320₹ घरपोच (शिपिंग फ्री)
69)कास्ट मॅटर्स -सूरज एगंडे
मुळ किंमत - 425₹
We Read -385₹घरपोच (शिपिंग फ्री)
70)जातिव्यवस्थेचे उच्चाटन-डॉ.बाबासाहेब आंबेडकर
मुळ किंमत - 300₹
WE Read :- 255₹घरपोच (शिपिंग फ्री)
71)पिरॅमिडच्या प्रदेशात - डॉ. अच्युत बन
मुळ किंमत - 250₹
We read Price - 225₹घरपोच.(शिपिंग फ्री)
72)राजश्री शाहू छत्रपती – धनंजय कीर
मुळ किंमत - 725₹
We read Price - 755₹घरपोच(शिपिंग फ्री)
धनंजय कीर ह्यांनी लिहिलेले हे शाहू छत्रपतींचे चरित्र आहे. व्यक्ती वादग्रस्त आणि ज्या समाजात ती वावरली तो समाजही वादळी. या दोघांचे वस्तुनिष्ठ आणि अभिनिवेशरहित चित्रण करणे अवघड. पण किरांकडे चरित्र लेखनाची किमया आहे. ‘नामूलं लिख्यते’ ही धारणा आहे आणि चरित्रविषयांप्रमाणे रूप घेणारी लेखनकला आहे. त्यामुळे हे चरित्र वाचनीय झाले आहे. समाजक्रांतीचा प्रेषित असणारा मनुष्यच महान ठरतो, हे कीरांच्या चरित्रलेखनाचे सूत्र आहे. सावरकर, आंबेडकर, फुले यांच्या चरित्र-परंपरेतील, शाहू छत्रपती हे एक पुढचे पाऊल आहे.
73)ऑन द फिल्ड -प्रगती बाणखेले
मुळ किंमत - 240₹
WE Read :- 200₹घरपोच (शिपिंग फ्री)
74)खुलुस - समीर गायकवाड
मुळ किंमत - 300
We Read -285₹घरपोच (शिपिंग फ्री)
75)मुखवटा -अरुण साधू
मुळ किंमत - 400
We Read -355₹घरपोच (शिपिंग फ्री)
रक्ताच्या नात्याचा संबंध देखील उरला नाही, अशा घराच्या रगाड्याला जुंपलेली ती आहे सत्तर वर्षांची निपुत्रिक बालविधवा. तिला कादंबरीची नायिका तरी कसे म्हणायचे! आहे खरी कथाभागाच्या वेंâद्रस्थानी. उसन्या नातेवाईकांच्या मुला-बाळांना मायेच्या घट्ट धाग्यांनी जखडून ठेवणारी. शेतीला जखडलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबाची ससेहोलपट, त्यामुळे नव्या-जुन्या पिढ्यांमध्ये होणारी घुसमट, वंशसातत्याची सनातन आस, पुरुषी संस्कृतीने स्त्रियांच्या व्यापक सर्जनशीलतेकडे फिरविलेली पाठ आणि उच्चकुलीनतेचा टेंभा मिरविणा-या घराण्याच्या अंधा-या तळघरातील अज्ञात रहस्ये अशा विविध स्तरांवर वावरणा-या व-हाडच्या पाश्र्वभूमीवरील या बहुपदरी व गुंतागुंतीच्या कादंबरीत तसे अनेक नायक व नायिका सापडतील. मग या वृद्धेलाच नायिका का करू नये? तिनेच आपल्या कर्तृत्वाने व निष्ठेने या घराण्याच्या परंपरा जपून त्यांना नवी वळणे दिली आहेत. अखेर प्रत्येक घरातील वैशिष्ट्यपूर्ण कुलसंस्कृती, आचार-विचार व स्वयंपाक-संस्कृती देखील डोळ्यात तेल घालून जतन करतात व त्यात भर घालतात त्या परक्या घरातून आलेल्या स्त्रियाच ना! '
76)गांधी का मरत नाही -चंद्रकांत वानखेडे
मुळ किंमत - 200₹
We read किंमत - 185₹ घरपोच (शिपिंग फ्री)
77)द आंत्रप्रन्यूर -शरद तांदळे
मुळ किंमत - 250
We read किंमत - 225₹घरपोच (शिपिंग फ्री)
द आंत्रप्रन्योर हे पुस्तक माणसाला विशेषता तरुणांना स्वताची औकात दाखऊन देणारं पुस्तक आहे. शरद तांदळे सरांनी त्यांचा जीवन प्रवास मंडला आहे.
78)शहीद भगत सिंग यांची जेल डायरी
मुळ किंमत - 350₹
We Read - 325 घरपोच (शिपिंग फ्री)
79)सावरकरांचा बुध्दिवाद आणि हिंदुत्ववाद -शेषराव मोरे
मुळ किंमत - 250₹
We Read - 245 घरपोच (शिपिंग फ्री)
स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे गैरसमज आणि विपर्यास असा दुहेरी शाप मिळालेले महापुरुष. अनुयायांनी त्यांना नीट जाणून घेतले नाही आणि विरोधकांनीही त्यांच्याबद्दलचे पूर्वग्रह कधी दूर सारले नाहीत. त्यांच्याबद्दलच्या मतमतांतराच्या गदारोळात त्यांचे खरे विचार समजून घेऊन त्यांचे मूल्यमापन करणे भल्याभल्या विचारवंतांनाही जमले नाही. या पार्श्वभूमीवर सावरकरी विचारांबद्दलच्या अनेक मूलभूत प्रश्नांची वस्तिनिष्ठ उत्तरे देणारा, खरे बुद्धिवादी सावरकर समजावून देणारा आणि गैरसमज व विपर्यास या दुहेरी शापातून त्या महापुरुषाची सुटका करणारा हा ग्रंथ...
80)मोई कुन आमी कुन ?
मुळ किंमत - 200₹
We read किंमत - 185₹ घरपोच (शिपिंग फ्री)
81)पिढीजात - श्रीकांत देशमुख
मुळ किंमत - 650₹
We read किंमत - 585₹ घरपोच (शिपिंग फ्री)
'एकाएकी नवनाथच्या डोळ्यांतून पाणी आलेलं. किती साधं असतं या लोकांचं जगणं. किती साधी आणि सोपी मागणी. मरणाची भीती नाही. जन्माला आलेले सारेच जाणार आहेत. कितीतरी मोठे आले आणि गेले. आम्ही तर साधी माणसं. पोटापुरतं मागणारी. धरणीमातेला मृत्यू थांबव, हे त्यांचं मागणं नाही; तर फक्त जीवन अमर ठेव. किती साधी प्रांजळ मागणी. नवनाथ थरारून गेला. काय बोलावं, हे त्याला कळेना. या सरकारी नोकरीमुळं जगण्याचे कितीतरी स्तर आपण जवळून पाहतोय. यापूर्वी आपण करत असलेल्या मास्तरकीत हे सारं पाहता आलं असतं? खरी निखळ माणसं आपल्या भोवतालच्या भेडसावणाNया गर्दीपासून, गळेकापू स्पर्धांपासून कितीतरी दूर असतात. लांबलांब पसरलेल्या डोंगररांगांच्या एखाद्या खोल घळीत वाढणाNया एखाद्या अज्ञात झाडासारखी. जगाच्या कल्याणाची आणि जीवनाच्या अमरत्वाची मागणी करणारे असे कितीतरी तुकोबा, ज्ञानोबा खेड्यापाड्यांतून, आदिवासी वस्त्या, लमाण तांड्यांतून भेटतील. त्यांच्या या निरागस प्रार्थनेमुळंच तर हे जग जिवंत नाही ना? '
82)माझे प्रेमाचे प्रयोग -अमित मरकड
मुळ किंमत-250₹
We Read - 225₹घरपोच (शिपिंग फ्री)
83)लैंगिकता शिक्षण -डॉ.विठ्ठल प्रभू
मुळ किंमत - 250₹
WE Read :- 225₹घरपोच (शिपिंग फ्री)
हा विषय तसा नाजूक आणि स्फोटकसुद्धा. तरीही, लैंगिकता हा तुम्हां-आम्हां सर्वांच्या आयुष्याचा एक अविभाज्य पैलू आहेच. त्यामुळेच लैंगिकता या विषयाबाबतचे संकोच, दडपणं, गाढ अज्ञान अन् गैरसमजही दूर व्हायला हवेत. म्हणून याबाबत ‘योग्य’ काय आणि ‘अयोग्य’ काय, हे सा-यांना समजेल, अशा वैज्ञानिक परिभाषेत लिहिलेलं, ‘वाचावंच’ असं, एका अधिकारी तज्ज्ञाचं पुस्तक. '
84)ऋतुचक्र – दुर्गा भागवत
मुळ किंमत - 225₹
We read किंमत - 215₹ घरपोच (शिपिंग फ्री)
85)इजिप्सी -रवि वाळेकर
मुळ किंमत - 750
We Read किंमत -650 घरपोच (शिपिंग फ्री)
86)द सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग फक -मार्क मॅन्सन
Paperback/New
मुळ किंमत - 250₹
We read Price - 225₹ घरपोच.(शिपिंग फ्री)
87)पार्टनर -वपु काळे
मुळ किंमत - 200₹
We read किंमत - 185₹ घरपोच (शिपिंग फ्री)
पार्टनर एखाद्या क्षणी आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळावा किंवा आनंदाचा वर्षाव व्हावा आणि त्या क्षणी सगळ्यात आधी आपण पुकारा करत सुटावे आपल्या प्रिय माणसाचा तो असतो `पार्टनर`
88)झोंबी -आनंद यादव
मुळ किंमत - 420₹
WE Read :- 365₹घरपोच (शिपिंग फ्री)
आजच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत अस्वस्थ होऊन धुमसणे हाच ग्रामीण जीवनाचा स्थायीभाव आहे. त्या अस्वस्थपणाचा स्फोट मराठी साहित्यात सुरू झालाच आहे. हे व्हायला हेवेच होते. शिवाय, साऱ्या जगातलं साहित्य समृद्ध केलं आहे. ते या `झोंबी`सारख्या वाचकाला अस्वस्थ करणाऱ्या ग्रंथांनीच! पु. ल. देशपांडे
89)डोंगराएवढा -के. शिवराम कारंथ
मुळ किंमत - 180₹
WE Read :- 155₹घरपोच (शिपिंग फ्री)
प्रतिकूल परिस्थीती आणि निसर्गाशी दोन हात करत जगणारे गोपालय्या आणि त्यांना साथ देणारी पत्नी शंकरम्मा यांचे सहजीवन तसेच त्यांचा मुलगा त्या उभयतांना भेटायला येत नसल्याची हृदयातील वेदना व त्यांच्या कणखर जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारी मनोवेधक कादंबरी. मुळात कट्टद गोविंदय्या या व्यक्तीचं बोलणं, वागणं, सच्चेपणा आणि धीरोदात्त वृत्ती या कादंबरीच्या प्रेरणास्थानी आहे. लेखकाने त्यांच्या जीवनावर आधारित गोपालय्या हे पात्र साकारले आहे.
90)बाजिंद -गणेश मानूगडे
मुळ किंमत - 220₹
WE Read :- 185₹घरपोच (शिपिंग फ्री)
बाजिंद’ ही एक ऐतिहासिक रहस्यकथा आहे. धनगरवाडीचा कारभारी सखाराम आपल्या तीन सहकाऱ्यांसह एक फिर्याद घेऊन शिवाजी महाराजांकडे रायगडावर जायला निघतो. रस्त्यात गुप्तहेर बहिर्जी नाईकांचा चेला असलेल्या खंडोजीशी नाट्यमयरीत्या झालेली त्यांची भेट, या चौघांना रायगडावर प्रवेश मिळवून द्यायचं त्यानं दिलेलं आश्वासन, खंडोजी आणि सावित्रीची प्रेमकथा, शिर्के – बेरड वैर, बहिर्जी नाईकांनी शिर्क्यांवर केलेला हल्ला, तसेच बाजी आणि मुघल सरदार हुसेनखानची कथा, बाजीला अवगत असलेली पशू-पक्ष्यांची भाषा, मृत्युसमयी त्याने आपल्या वंशजाला ‘बाजिंद’ला त्या भाषेचा दिलेला वारसा, . थरारक, धक्कादायक आणि नाट्यमय घटनांनी, वळणांनी ही कादंबरी पुढे सरकत राहते. नाट्यमय वळणं घेत, रहस्यमयतेने शेवटपर्यंत वाचकांची उत्कंठा ताणून धरणारी ही कादंबरी बहिर्जी नाईकांच्या बुद्धिचातुर्याची साक्ष देते आणि शिवरायांचं स्वराज्य हे सुराज्यही होतं, याचंही दर्शन घडवते. युद्धाचा थरार, भावनांची गुंतागुंत आणि प्रखर राष्ट्रप्रेम याचं अद्भुत रसायन म्हणजे ‘बाजिंद’ ही कादंबरी.
91)तुम्ही IAS कसे व्हाल -डॉ.विजय अग्रवाल
मुळ किंमत - 200₹
We read किंमत - 185घरपोच (शिपिंग फ्री)
92)फॉरेस्ट बाथिंग
मुळ किंमत-250₹
We Read -225₹घरपोच (शिपिंग फ्री)
93)प्रिय इंदिरा -पंडित जवाहरलाल नेहरू
मुळ किंमत - 300₹
We Read -255₹घरपोच (शिपिंग फ्री)
94)असा लुटला भारत
मुळ किंमत - 350₹
We Read -295₹घरपोच (शिपिंग फ्री)
वास्को द गामा’ने समुद्रमार्गे हिंदुस्थानात येण्याचा मार्ग शोधला व तीन शतके हिंदुस्थानात युरोपियन व्यापार्यांचा हैदोस चालला. हिंदुस्थानातील संपत्ती, मुबलकता व भौगोलिक-नैसर्गिक संपत्ती पाहून हिंदुस्थानला जणू विषारी विळखाच बसला. या लोभी देशांनी राजकीय कटकारस्थाने केली, करारनामे व त्यांचे योग्य पालन न करता विश्वासघात केला. जुलूम केला. फसवणूक केली. चुकीची व्यापारधोरणे, नवाबांनी कंपनीला दिलेल्या प्रचंड रकमा, बंगालचा र्हास, दुष्काळी परिस्थिती, मृत्यूचे वाढते थैमान याने देश ठाासला. मुघल सत्तेला वाईन भेट देऊन, मसाल्याच्या पदार्थांवर आक्रमण करून येथील बाजारपेठा ब्रिटिश-डच-फ्रेंच-पोर्तुगिजांनी काबीज केल्या. आपल्या पराक्रमी योद्ध्यांनी प्राणांची बाजी लावून शह दिला व युद्धे जिंकली; पण मुस्लीम नवाब कंपनीच्या हातातलं बाहुलं बनले. घनघोर युद्धे लावून युरोपियनांनी व त्यांच्या कंपन्यांनी भारतास लुटले. स्वत:च्या तिजोर्या भरल्या. मन विषण्ण करणार्या, मानवतेला हरताळ फासणार्या वास्तवाचे भीषण दर्शन.
95)वॉल्डन - हेन्री डेव्हिड थोरो
मुळ किंमत - 350₹
We read किंमत - 315₹घरपोच (शिपिंग फ्री)
96)मी देशाला काय देऊ शकतो - एपीजे अब्दुल कलाम
मुळ किंमत - 250₹
We read किंमत - 215घरपोच (शिपिंग फ्री)
97)अंबालक्ष्मी -नितीन थोरात
मुळ किंमत - 280₹
We Read -250₹घरपोच (शिपिंग फ्री)
98)हू किल्ड करकरे - हसन मुश्रीफ
Binding: पेपरबॅक
पृष्ठ संख्या -344
मुळ किंमत - 425
We Read किंमत -385 घरपोच (शिपिंग फ्री)
99)डिप्रेशन -अच्युत गोडबोले
मुळ किंमत - 250₹
We read किंमत - 225₹घरपोच (शिपिंग फ्री)
100)अखेरची लढाई
मुळ किंमत - 240₹
We read किंमत - 190₹घरपोच (शिपिंग फ्री)
अखेरची लढाई ही कादंबरी सवाई माधवराव पेशवे आणि नाना फडणीसांच्या जीवनातील विविध घटना-प्रसंगांवर आधारित आहे. नाना फडणीस उणीपुरी दोन तपे पेशवाईच्या कारभारात होते. सवाई माधवराव पेशव्यांच्या माता-पित्याचे अकाली निधन झाल्यानंतर पेशवाईचा वारस म्हणून त्यांनी सवाई माधवरावांची डोळ्यांत तेल घालून काळजी घेतली. त्यांचा आपल्या पुत्राप्रमाणे सांभाळ केला. माधवराव लहान असल्याने नानाच पेशव्यांच्या वतीने सर्व निर्णय घेत आणि राज्यकारभार पाहात असत. याच कालावधीत मुजोर झालेल्या निजामाला अद्दल घडविण्यासाठी नानांनी युद्ध पुकारले आणि आपल्या चातुर्याने (व दैवाची साथ लाभल्याने) ते जिंकून निजामाला सर्व अटी मान्य करायला लावून, शरण येण्यास भाग पाडले. पेशवे आणि दौलतीसाठी नाना फडणीसांना असाच परकीयांचा आणि स्वकीयांचाही सामना करावा लागला.💚
~We Read 💛🖤
https://chat.whatsapp.com/J58KV2PCm97CRz4L8K7v8o
थॅन्क्स मोईन
उत्तर द्याहटवा