पॅपिलॉन ♥️


कल्पना करा की,🌿

वयाच्या पंचवीशीत तुमच्यावर तुम्ही न केलेल्या खुनाचा आरोप लागतो.'खटला चालतो आणि तुम्हाला 'जन्मठेपेची शिक्षा होते.'फ्रेंच गियाना'सारख्या तुरुंगात तुम्हाला रवाना करण्यात येते.'जो समुद्राच्या मध्यभागी एका बेटांवरील खेड्यात असतो.जेथून पळ काढणे कमालीचं कठीण आणि तेवढंच धोकादायक असतं,एवढं असताना सुद्धा तुम्ही तेथून पळ काढण्यात यशस्वी होता आणि काही महिने स्वातंत्र्याचा उपभोग घेतल्यानंतर दुर्दैवाने पुन्हा पकडल्या जाता.

तुम्हाला परत 'गियाना'येथे आणण्यात येतं आणि कोर्ट मार्शल' करून पलायन केल्याची शिक्षा म्हणून 2 वर्ष 'एकांतवासाची'शिक्षा देण्यात येते.तुमची रवानगी 'सेट जोसेफ'या तुरुंगात करण्यात येते.'येथे तोंड पूर्णपणे बंद,संपूर्ण शांतता अभिप्रेत असते.थोडं सुद्धा बोलण्याची आणि बाहेर पडण्याची परवानगी अजिबात नसते.24 तास पोलिसांचा कडक पहारा येथे असतो.थोड्या सुद्धा चुकीला येथे माफी नसते.'सूर्याचा प्रकाश सुद्धा या 'कोठडीत' पडू नये अशी व्यवस्था केलेली असते.
2 वर्ष म्हणजेच 730 दिवस, वेड न लागता तुम्हाला 'नरभक्षक'नाव पडलेल्या या तुरुंगात काढावे लागतात.

मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडू न देता,प्रचंड इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही 2 वर्षे तेथे यशस्वीरित्या काढता.कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना तब्बल तेरा वर्षाच्या कालखंडात 7 वेळा पलायन करता, पण काही कारणाने अयशस्वी होता.

तरीही 'न हारता न थकता'प्रयत्न करत तुम्ही आठव्या प्रयत्नात यशस्वी होता.स्वातंत्र्याची आस तुम्हाला शांत बसू देतं नाही.तुम्ही ठरवता ते शेवटी करून दाखवता.

'स्वतंत्र होण्याचं तुमचं स्वप्न तुम्ही पूर्ण करता !

आता यशस्वी पलायनानंतर सुमारे 30 वर्षांनी
तुम्ही एक पुस्तकं लिहिता आणि तुम्हाला तेरा वर्षात आलेले अफाट, संघर्षमय आणि रोमहर्षक अनुभव तुम्ही त्यातून वाचकांसमोर मांडता आणि त्या पुस्तकाला
नाव देता,

'पॅपिलॉन' म्हणजे 'फुलपाखरू'
'गुन्हेगारी जगातील तुमचं हे टोपण नावं.

आता तुम्ही म्हणजेच 'हेन्री शॅरियर' !♥️

'हेन्री शॅरियर' लिखित व 'रवींद्र गुर्जर' अनुवादित याच पुस्तकाचा माझा प्रवास अखेर समाप्त झाला. सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत खिळवून ठेवणारं हे अप्रतिम पुस्तकं मला जाम आवडलं नि भावून गेलं.जणू मीच 'हेन्री उर्फ 'पॅपिलॉन'सोबत अविस्मरणीय असा साहसपूर्ण प्रवास करून आलोय असं मला वाटतंय.मी पूर्णपणे या मध्ये हरवून गेलोय.हे सर्वकाही घडलेलं अफाट कथानक डोळ्याने बघून आल्याची प्रचिती मला आली.

संघर्ष करण्याची तयारी,प्रचंड आत्मविश्वास,
न चुकता प्रयत्न करत राहण्याची वृत्ती,
कमालीची इच्छाशक्ती आणि काहीही झालं तरी माघार न घेण्याची जिद्द.....इत्यादी बरंच काही मला यातून शिकायला मिळालं."वाचावं आणि वाचतच जावं" असं हे एक कमालीचं पुस्तकं आहे.लेखकांनी ज्या उत्तमरीत्या हे पुस्तकं लिहलं आहे, तेवढच्याच उत्कृष्ट पध्दतीने 'रवींद्र गुर्जर'यांनी याचं सहज/सोप्या भाषेत अनुवाद केला आहे जो फारच वाचणीय झाला आहे.

आत्महत्येचा विचार मनात येणाऱ्या आणि आपल्या आयुष्यातील दुःखाला त्रासून गेलेल्या वाचकांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे.कारण,'पपीचे'संघर्ष वाचून त्या वाचकांना कमालीची प्रेरणा मिळेल व आपले दुःख-दर्द फार छोटे 'शूद्र' वाटतील.आपण विचार सुद्धा करू शकतं नाही;एवढे दुःख आणि संघर्ष पुस्तकातील नायकाच्या आयुष्यात आले होते, पण त्यांना जुमानता तो शेवटपर्यंत प्रयत्न करत राहतो.शारीरिक आणि मानसिकरित्या काहीही झालं तरीही खचत नाही आणि शेवटी यशस्वी होतो.आपल्या आयुष्याच्या इतर अडीअडचणी सोबत आपण 'पपी'च्या अडचणी आणि समस्यांसोबत तुलना करून बघायला हवं.पॅपिलॉन वाचून आपल्याला खरंच आपलं आयुष्य सुखकर वाटून जातो एवढं नक्की !

हे पुस्तकं वाचून, मला स्वतःचे 'दुःख आणि अडचणी' खूप खूप कमी वाटतं आहेत. 'स्वातंत्र्य'असण्याचं  महत्व मला कळालं.एका नव्या जगाचा आणि जबरदस्त व्यक्तिमत्वाचा रोमांचकारी अनुभव आला.जबरदस्त आत्मविश्वास आणि बळकट शरीरसंपदा या दोन दैवी देणग्यांच्या जोरावर एक सामान्य माणूस आयुष्यात किती प्रचंड साहस करू शकतो,हे मला समजलं.💛

आवर्जून वाचा...🌾

©️Moin Humanist🌱

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼