अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट 🌿

काही दिवसांपूर्वी आनंद विंगकर सर लिखित "अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट" ही महत्वपूर्ण विषयावरील अस्वस्थ करणारी व एकंदरीत सुन्न करून सोडणारी कादंबरी वाचून पूर्ण केली.तेव्हाच मला याबद्दल लिहायचं होतं पण शब्दचं मिळत नव्हते.🙂 आज कादंबरी वाचून एक आठवडा पार पडला तरीही या कादंबरीचं भारुड माझ्यावरून उतरलेलं नाही.अजूनपर्यंत आतून कोठेतरी मी या कादंबरीच्या विश्वातचं वावरतोय.यातील पात्र आणि प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून गेलेले नाहीत.निःशब्द करून सोडून ,विचारांच्या चक्रात बुडवणाऱ्या या कादंबरीने मला आतून हेलावून सोडलंय. शेतकऱ्याचं दुखणंच यातून मांडलेलं नाही तर त्यापेक्षा कितीतरी मुख्य गोष्टींवर लेखकांनी भाष्य करून वाचकांच्या डोळ्यांत अंजन घातलं आहे.हे ही कादंबरी फक्त दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्याची कथाच नसून वास्तव दाखवणारा एक आरसा आहे. यातून लेखक आपल्यासमोर भयानक वास्तव मांडतात, विविध असंख्य प्रश्न उपस्थित करतात आणि आपल्याला विचार करायला भाग पाडतात. महाराष्ट्रातील एका गावात एका अवकाळी पावसाच्या दरम्यान घडलेली ही एका शेतकऱ्याची हृदयविदारक कथा आहे.ऐन सुगीच्या वेळेला तोंडाशी आलेला घास.अवकाळी पाऊस...