माझे प्रेमाचे प्रयोग ❤️



भुख़ देखी है.. देखी है तिरस्कार करती आँखें
कदमो सें चल चल कर रास्तों के नाम बदलते देखा है... 
अपने टूटे हुए स्वाभिमान के साथ, 
खुद को काम बदलते देखा है,
देखी है नाउमींदी,अपमान देखा है,
ना चाहते हुए भी माँ बाप का 
झुकता आत्मसन्मान देखा है,
सपनों को टुटते देखा है,
अपनों को छुटते देखा है....

हालात कि बंजर जमीं फाड के निकला हुँ,
बेफिकर रहिये मैं शोहरत कि धुप में नहीं जलुँगा...
आप बस साथ बनाये रखयेगा,
अभी तो मैं लंबा चलुँगा...!!!!❤️🌿

झाकीर खानच्या वरील लाईन्स कादंबरीच्या शेवटी लेखक आपल्याला मनोगतात वापरतात.व खऱ्या अर्थाने या लाईन्स आपल्याला या कादंबरीतून व लेखकाच्या आतापर्यंतच्या जीवनातून अनुभवायला मिळतात.जणू काही या लाईन्स फक्त या पुस्तक आणि लेखकासाठीच लिहिल्या गेल्या आहेत असं वाटून जातं.एवढं साम्य आपल्या ही कादंबरी वाचून शेवटी या लाईन्स वाचताना जाणवतो.तर ठीक या काही ओळीतच लेखकांनी मांडलेलं त्यांचं या कादंबरीत आतापर्यंतचं आयुष्य अधोरेखित होतो.

तर काही दिवसांपूर्वी अमित मरकड  दादा लिखित 'माझे प्रेमाचे प्रयोग' या अप्रतिम अश्या या कादंबरीचा माझा प्रवास संपला.आणि कितीतरी दिवसांची असलेली आतुरता अखेर संपली.कितीतरी दिवसांनी ही कादंबरी वाचण्यासाठी मी कमालीचा आतुर होतो.पण अखेर आतुरता संपली आणि एकाच बैठकीत ही कादंबरी वाचून पूर्ण केली.वाचून संपल्यावर असंख्य भावना माझ्या मनात दाटून आल्या.कारण कोठेतरी हे पुस्तक अनेक वेळा मला टच आणि रिलेट झालं.आणि अनेकांना ते टच होईल रिलेट होईल यात काही वाद नाही.
यातील काही प्रसंग,वर्णन वाचकाला आपल्या आयुष्यातील वाटतात.असंख्याना आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण ही कादंबरी करून देते.ते म्हणतात ना की,कोणालाही पहिलं प्रेम हे विसरता येत नाही याची प्रचिती ही कादंबरी वाचताना येते.प्रेमाची एक नवीन परिभाषा तर प्रेमाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन ही कादंबरी देऊन जाते.पहिल्या पृष्ठपासून तर शेवटच्या पृष्ठापर्यत वाचकाला एकाच जागी कोठेही जरा सुद्धा बोअर न करता एका आगळ्या वेगळया प्रेम कहाणीची रंजक सफर ही कादंबरी घडवून आणते.

कधी हसवणाऱ्या,कधी रडवणाऱ्या तर कधी काही बाबतीत अक्षरशः विचार-चिंतन करायला भाग पाडणाऱ्या या कादंबरीचा मुळ गाभा म्हणा किंवा कथानक हा फार सुंदर आहे.आणि त्यातच लेखकाची लेखनशैली आणि कथा वाचकांपुढे मांडण्याची पध्दत जबरदस्त आहे.सुरुवातीला वर्तमानात घडलेल्या घटनेची थोडी झलक दाखवून मग भूतकाळात जाऊन त्या घटनेमागच्या पार्श्वभूमीचं केलेलं कथन हे वाचायला फारचं इंटरेस्टिंग वाटते.Like एखाद्या चित्रपटासारखं हा कथानक पुढे जातो जे वाचत असताना आपण खरोखर या प्रवासाचा एक भाग होऊन जातो.

आजपर्यंत मी प्रेमाबद्दल विशेष काही वाचलेलं म्हणा किंवा अनुभवलेलं नव्हतं पण या कादंबरीतून खूप काही सुखद/दुःखद,चांगलं - वाईट मला अनुभवता आणि घेता आलं.यामध्ये "प्रेमाचे प्रयोग" जरी असले तरी प्रत्येक प्रकरणात लेखकांनी वाचकांच्या डोळ्यांत अंजन घालायचं काम केलंय हे सुद्धा तेवढंच खरं आहे.या कादंबरीतुन मला एकंदरीत खऱ्या प्रेमाची खरी ताकद समजून घेता आली,सच्च्या प्रेमाचा खरा अर्थ उमजला,एक आगळी वेगळी प्रेम कहाणी जाणून घेता आली,लेखकांनी केलेल्या कितीतरी चुकांतून महत्वपूर्ण धडे घेता आले,खऱ्या मैत्रीची/मित्रांची गरज आणि महत्व ओळखता आले तर आईवडिलांच्या निष्पाप प्रेमाच्या किंमतीची जाणीव झाली.

अजिबात सोपं नसतं आपल्या आयुष्यात आपल्याकडून झालेल्या चुका स्वीकारणं आणि आजपर्यंत केलेले चांगले,वाईट कृत्य मान्य करून त्या खुल्या मनाने जगजाहीर करणं.खरंतर हे फार मोठ्या हिमतीच काम आहे.या आधी महात्मा गांधींनी आपण केलेले सत्याचे प्रयोग आपल्या आत्मचरित्रातून मांडले होते तर या पुस्तकात लेखकांनी आपले "प्रेमाचे प्रयोग'  कुठलाही आडपडदा न ठेवता खुल्यामनाने मांडलेले आहेत त्यासाठी लेखकाच्या हिमतीची दाद दिली पाहिजे. कारण प्रत्येकातचं आपलं खाजगी आयुष्य आणि त्या आयुष्यात केलेल्या काही घोडचूका एका पुस्तकातून दुनियेसमोर मांडण्याची अजिबात हिम्मत नसते.

आपल्या आयुष्यात आलेले संकटे,आलेल्या विविध संधी पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून "आग लगे बस्ती मे हम हमारे मस्ती मे" म्हणत मौज करणे,वडिलांचा पैसा घरी खोटं बोलून वाया घालवणे,चुकीच्या संगतीला लागून स्वतःला भाई ,गुंड समजून इतरांना त्रास देणे,कुटुंबाला अंधारात ठेऊन फक्त एन्जॉय करणे,आतापर्यंत झालेल्या चुकांतून झालेला मनस्ताप,दरवेळी झालेल्या चुकांतून शिकून नवीन सुरुवात करायचं प्रयत्न परत करणे आणि मग करत त्याच त्याचं चुका करून त्यातून पदरी पडलेलं अपयश पण या अपयशाला न जुमानता संकटा समोर हार न मानता शेवटपर्यंत लढतं राहत.समाज ,कुटुंबाच्या विरोधात जाऊन शेवटी ज्या मुलींवर आपण पहिलं सच्चा-खरा प्रेम केलं होतं त्याला आयुष्यभराचं जीवनसाथी बनवणे इथपर्यंतचा हा प्रवास नक्कीच सोप्पा नव्हता.आणि सर्वांनाच हे अजिबात जमतं नाही.

लेखकांप्रमाणेच आपण सर्वांनीच हे असले कृत्य कधीतरी आयुष्यात केलेले असतातच.यामध्ये ग्रामीण भागातुन शिक्षणासाठी शहरात आलेल्या मुलांचा प्रमाण जास्त असतो.योग्य मार्गदर्शना अभावी व चुकीच्या सोबतमुळे म्हणा किंवा आकर्षणामुळे म्हणा
हे सर्वकाही अनेकांच्या वाट्याला आलेलं असतंच.पण सर्वांना ते काही मांडायला जमतं नाही.पण लेखकांनी ही एक सुरुवात केली आहे.यशाच्या गोष्टी वाचण्यासोबतच अपयशाच्या गोष्टी सुद्धा वाचून त्यातून बोध घेणं आज गरजेचं आहे.

याबद्दलच लेखक म्हणतात की  :- 

पाच - सहा वर्षांपूर्वी नैराश्य आणि आत्मशंकेच्या भयानक गर्तेत अडकलो असताना मनाशी ठरवलं होतं की , जर काही नाहीच झालं आपल्याकडून या जन्मात , तर किमान आपण आपली गोष्ट तर लिहुच ! सगळ्याच गोष्टी का असाव्या यशाच्या आणि गुलाबी प्रेमाच्या ? एखादी असावी अपयशाची , काळ्या प्रेमाची , दिशाहीन जगण्याची ! कारण माझ्यासारखं जगणं अनेकांच्या वाट्याला येतं , फक्त त्या सर्वांनाच व्यक्त होण्याची संधी मिळत नाही अथवा त्यांना ते जमत नाही . म्हणून आपण ते लिहायचंच.

आणि ते शेवटी लेखकांनी लिहलंच.💕

या प्रेमाच्या प्रयोगातून कितीतरी जणांनी विशेष करून माझ्यासारख्या युवकांनी बोध घ्यायला हवं.प्रत्येक गोष्टीला एक योग्य ती वेळ असतेच त्या वेळात ते कार्यच करायला हवं.शिक्षण आणि ध्येयासाठी अभ्यास-मेहनत करायच्या कालावधीत फक्त तेच करायला हवं.प्रेम ही भावना फार शुद्ध आहे ती सुखावणारी असते. पण फक्त प्रेमाला धरूनच बाकी सर्वकाही विसरून प्रेमालाच ध्येय बनवणे हे फार चुकीचं आहे.प्रेमासोबतचं शिक्षण,करियर,कुटुंब आणि इतर गोष्टींकडे सुद्धा लक्ष देणे फार गरजेचे असते.सर्वकाही विसरून स्वतःला मजनू समजून प्रेमासाठी आपलं आयुष्य पणाला लावणे हे अनेकांना घातक ठरू शकतं. कारण सर्वांनाच हवा तसा आणि खरा प्रेम/साथी मिळत नसतो हे सुद्धा तेवढंच खरं आहे.आणि जेव्हा तो मिळतं नाही तर काही जण आत्महत्येसारखा टोकाचा पाऊल उचलताना आपल्याला आजूबाजूला दिसतातच.याबद्दल सुद्धा व्यक्त होणं गरजेचं होतं आणि आहे.

तर शेवटी मला आवडलेले या कादंबरीतील काही विचार येथे शेअर करतो जे मनाला फार टच करून गेले :- 

1)आयुष्यात कितीतरी वेळा आपण आपल्या स्वतःची पारख आपल्या निर्णयावर करतो आणि निर्णय हे ' तकलादू ' असतात , ' फसवे ' असतात असं वाटतं . कारण निर्णयांवर आपला आनंद आपण कसा काय ‘ डिपेंड ' ठेवू शकतो ? मुळात आपल्या स्वतःचा आनंद , आपण एखाद्या निर्णयावर किंवा एखाद्या मतावर ठाम करू शकत नाही . जिथे आपण अपेक्षा करतो , तिथं आपण दुखावतो किंवा सुखावतो आणि त्यावर जर आपण आपले मत बदलत असू तर मात्र आपण नक्की कोणत्या कॅटेगरीत मोडतो ? याचा विचार ज्याने त्यानेच केलेला बरा . आपल्या भावना , आपल्या निर्णयावर हुकमत करतात आणि आपण असं म्हणतो मी जिंकलो किंवा मी सुखावलो . एखादी व्यक्ती मिळवण्यासाठी आपण आपला स्वाभिमान गहाण ठेवत नाही तेव्हाच त्या व्यक्तीला आपली किंमत राहते . नात्यात जेव्हा दोघांचाही सर्वस्व पणाला लागलेलं असतं तेव्हाच ते नातं बहरतं . कुण्या एकाचंच सर्वस्व आणि स्वाभिमान पणाला लागला तर तो व्यक्ती धुळीला मिळालाच म्हणून समजा.

2)आयुष्यात प्रत्येक क्षणाला , आपल्याला एक चेहरा भेटत असतो . प्रत्येक चेहऱ्याशी आपण बांधले जातोच , असे नाही . जे चेहरे मनात उतरलेले असतात त्यांना मात्र आपण कधीच मनातून हाकलवू शकत नाही . त्या चेहऱ्यासोबत क्षणाक्षणाला पाहिलेली स्वप्ने दिवसेंदिवस ' मॅक्झिमम ' होत राहतात , ती फक्त आणि फक्त परिस्थितीशी माघार घेऊन आपण ती ' मिनिमम ' बनवलेली असतात . नाती स्वप्नांपेक्षा उंच असावी म्हणजे ती जगता येतात . स्वप्नाला बऱ्याच छटा असल्या तरी त्यातली कुठली छटा आपल्याला हवी आहे , हे जास्त महत्त्वाचं असतं . सगळेच रंग एका वेळस अनुभवता येत नाहीत . एक एक रंगाचा उलगडा होतो , एक - एक रंगात स्वतःला सामावून घेता यायला हवं तरच तो रंग आपला होऊ शकतो एवढं नक्की !

3)कॉलेजने माझ्यात खरा बदल केला . आजवरच्या आयुष्यात मी किती क्षुल्लक आयुष्य जगलो होतो , हे माझ्या लक्षात आलं . माझ्या कुपमंडूक वृत्तीच्या बाहेर किती मोठं जग होतं . मी किती अज्ञानी होतो , ते माझ्या लक्षात आलं . महात्मा गांधी , आंबेडकर , फुले यांच्या कार्याचा आवाका खऱ्या अर्थाने मला कळू लागला . आपल्यामध्ये चांगल्या गोष्टींची पेरणी होण्याचा एक ठरावीक काळ असतो तो काळ आपल्या आजूबाजूच्या माणसांवर अवलंबून असतो . माणूस ओळखायचा असेल किंवा स्वतः ला ओळखायचं असेल तर आपण शांत राहणं , विचार करणं आणि ऐकून घेणं या गोष्टी करणं गरजेचं असतं . ' वाचाल तर वाचाल ' हे मात्र अगदी खरंय . आणखी एक गोष्ट माझी मलाच जाणवली की , मी ज्या ज्या गोष्टींवर हसलो होतो ; त्या गोष्टींवर , जोक बनवले होते त्या गोष्टी आता मला पटत होत्या , मी त्या गोष्टींवर विचार करत होतो . शाहू - फुले - आंबेडकर यांच्यासारखा क्रांतिकारी विचार करणं है येरागबाळ्याचं काम नाही . मी शिकलो , घडतोय ते फक्त या थोर माणसांच्या वाचनामुळे - लिखाणातून - कार्यातून . एखाद्याच्या विचारांचा आणि कार्याचा प्रभाव आपल्याला अंतर्बाह्य बदलवू शकतो .

4)आई - बापाच्या जिवावर आयुष्य जगणं खरंच किती सोपं असतं ना ?, हे जगणं आपल्याला स्वतःच्या हिमतीवर करायचं असत ; तेव्हा आपल्यामध्ये हिंमत आपल्यात ते बळ कधीच एकवटत नसतं . कारण आपल्याकडं काहीतरी करून दाखवण्यासाठी जी ' धमक ' लागते , जी ' क्वालिटी ' लागते ती आपल्यामध्ये असल्याशिवाय आपण कधीच चमकणार नाही , हे सत्य होतं आणि असणारच . आपण फक्त विचार करत बसतो आणि आपली ' तुलना ' दुसऱ्यासोबत करत बसतो.

5)दुःखाला काळ , वेळ , माणूस त्याच्याशी काही घेणं - देणं नसतं . ते फक्त येतं , थोडा त्रास देऊन आपलं आयुष्य उलथापालथ करून जातोसुद्धा , हे मला त्या दिवशी कळलं होतं . वेळ दोन माणसांना जवळ आणू शकते , पण एकमेकांना सांभाळून घ्यायचं सगळ्यात मोठं काम त्या दोन माणसांचं असतं . एकमेकांना बांधून ठेवणं हे सर्वस्वी त्यांचंच काम असतं . आपण कितीही चांगले गुणी असून काहीच उपयोग नसतो खरंतर आपल्या त्या गुणांना वाव देणारी , त्याचं कौतुक करणारी , आपल्याला सर्वतोपरी सांभाळणारी व्यक्ती तुमच्या आयुष्यात हवी असते . तुम्हाला फसवणारी व्यक्ती , तुम्हाला अंधारात ठेवणारी व्यक्ती तुम्हाला उद्ध्वस्त करू शकते हे मात्र नक्की . निसर्गाने देवानं आपल्याला जन्माला घालताना फक्त बाई आणि पुरुष ही दोनच शरीरं जन्माला घातली . पण त्या दोन व्यक्तींमध्ये जन्मणारे हे सगळे गुण त्यांच्यात येण्याला कोण असतं बरं कारणीभूत ?❤️

नक्की वाचा.समजून,उमजून घेऊन आवर्जून विचार करा.खूप काही लिहायचं आणि मांडायचं होतं पण मला वाटतं ते तुम्ही या कादंबरीतच वाचायला आणि अनुभवायला हवं..🥰
लेखकाच्या आगामी लिखाणाच्या प्रतीक्षेत..

©️Moin Humanist✍️
मी वाचलेली पुस्तके 🥰

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼