कोरलाईन ❤️
काही दिवसांपासून काहीतरी हटके,रंजक आणि रोमांचक वाचायचं होतं.त्यामुळे ही अनुवादित कादंबरी वाचायला घेतली. मुखपृष्ठ आणि प्लॉट वाचून तर फारच उत्सुक झालो.थोडंफार गुगल केल्यावर एकंदरीत भारी वाटली.ब्रिटिश लेखक नेल गेमन लिखित 2002 साली प्रकाशित झालेल्या या इंग्रजी कादंबरीला असंख्य पुरस्कार मिळाले आहेत.तर यावर आधारित चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार सुद्धा मिळाला आहे.मग सर्वकाही कामे आटोपून रात्री वाचायला सुरुवात केली.आणि एकाच बैठकीत वाचून पूर्ण सुद्धा केली.एकंदरीत ऑगस्ट महिन्याची सुरुवात चांगली झाली.डायमंड पब्लिकेशन कडून मराठीत अनुवाद झालेल्या या कादंबरीचा अनुवाद फारच अप्रतिम झालं आहे.ही कादंबरी वाचायला फारच इंटरेस्टिंग आहे जी आपली उत्सुकता शेवटपर्यंत टिकवून ठेवते.हास्य,भय,जादू आणि मनोरंजन सर्वकाही यामध्ये आपल्याला अनुभवायला मिळते.
" भीती वाटत असतानाही जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करता , तेव्हा त्याला ' धाडस ' म्हणतात . "
या 2 ओळी "कोरलाइन" या कादंबरीचा सारांश आपल्याला देऊन जातात..❤️
कादंबरीचा प्लॉट काही याप्रमाणे आहे :-
कोरलाईन जोन्स नामक ही एक छोटीशी मुलगी तिच्या पालकांसह एका जुन्या घरात राहायला येते.लहान अपार्टमेंटमध्ये विभागलेले हे घर असते.कोरलाईन च्या शाळा सुरू व्हायला काही दिवस बाकी असतात.ती या नवीन घरात खूप कंटाळते त्याच्या सोबत खेळायला,बोलायला तेथे विशेष कोणीही नसतं. त्याचे पालक आपापल्या कामातच सतत व्यस्त असतात.एका पावसाळ्याच्या दिवशी, कोरलाईनला दिवाणखान्याच्या दूरच्या कोपर्यात एक बंद दरवाजा सापडतो. त्याची आई ते गूढ दरवाजा उघडते, परंतु तो रस्ता एका भिंतीने वेढलेला असल्याचे आढळून येते. दुसऱ्या बाजूला अजून एक अपार्टमेंट आहे, जे अजूनही विक्रीसाठी आहे. दुसऱ्या दिवशी, कोरलाईन फिरायला जाण्याचा आणि तिच्या शेजाऱ्यांना भेटण्याचा निर्णय घेते,त्याचे शेजारी असलेले मिस प्रिमरोज आणि मिस फोर्सिबिला कोरलाईनला चेतावनी देतात की ती भयंकर धोक्यात आहे, आणि पोटमाळामधील एक वृद्ध माणूस तिला उंदीरापासून सावध करतो.
एकेदिवशी तिची आई घरी नसल्याचं फायदा घेऊन कोरलाईन घरी एकटीच असल्याने,ती सर्व खबरदारीकडे दुर्लक्ष करते.आणि तो दरवाजा उघडण्याचा निर्णय घेते व दरवाजा उघडते.पण यावेळी, तिला तेथे पूर्वीप्रमाणे विटांची भिंत दिसत नाही,दिसतो तो एक लांब गडद कॉरिडॉर.जो तिला तिच्यासारख्याच घराकडे घेऊन जातो. कोरलाइन जेव्हा तो दरवाजा ओलांडून जाते , तेव्हा पलीकडे अगदी तिच्या घरासारखंच हुबेहूब ( त्याहून जरा मजेदारच ) घर तिला सापडतं . पण इकडे तिचे दुसरे आईबाबा असतात , त्यांच्या डोळ्यांऐवजी चमकदार काळी बटणे असतात.या "दुसर्या जगात" सर्व काही चांगले आणि मनोरंजक,जादुई असते,तिचे हे दुसरे पालक दयाळू असतात,तिची खोली खेळण्यांनी भरलेली असते.ही खेळणी जिवंत असतात जे इकडून तिकडे मुक्तपणे फिरू आणि उडू शकतात.
परंतु नंतर तिला समजते की या जगातील प्रत्येक गोष्ट पहिल्या दृष्टीक्षेपात दिसते तितकी चांगली नाही. कोरलाईन विचित्र आणि भितीदायक प्राण्यांना भेटते, घराची दुसरी बाजू पाहते -खरं तर, ही जागा आत्म्यांसाठी एक भयानक तुरुंग असतं.तिच्या या दुसऱ्या आईला कोरलाईनला त्याची छोटी मुलगी म्हणून तिला कायमचंच आपल्याकडे ठेवून घ्यायचं असतं.आणि तिथून कधीच परत जाऊ द्यायचं नसतं.स्वत:ची सुटका करून घेऊन परत आपल्या नेहमीच्या घरी जाण्यासाठी आता कोरलाइनला आपली सगळी बुद्धी आणि बैईपणाला लावायचं असतं.❤️
आता कोरलाईन आपल्या स्वतःच्या घरी परत येऊ शकते का ? हो तर कश्याप्रकारे ?
तिचे ते दुसरे आईबाबा नेमके कोण असतात ?
इत्यादी काही असंख्य प्रश्नांची रंजक उत्तरे या कादंबरीत आपल्याला वाचायला मिळतील.
नक्की वाचा ❤️
©Moin Humanist ✍️
मी वाचलेली पुस्तके❤️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा