तोत्तोचान ❤️



दोन दिवसांपूर्वी तोत्तोचान या मुळ जपानी भाषेतील जागतिक पातळीवर गाजलेल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद वाचून पूर्ण केलं.आणि तोत्तोचान च्या अक्षरशः प्रेमात बुडालो.आजपर्यंत जेवढं ऐकलं आणि वाचलं होतं या पुस्तकाबद्दल त्यापेक्षा कितीतरी पटीने हे पुस्तक मला प्रचंड आवडलं. मी हे पुस्तक मुळात वाचलं नाही तर अक्षरशः जगलो असे म्हणू शकतो.हे पुस्तक कळत/नकळतपणे मला खूप काही देऊन गेलं.यातील छोट्या छोट्या गोष्टींतून मला खूप काही महत्वपूर्ण शिकायला मिळालं.तोत्तोचान या चिमुकली कडून निरागसता, मासुमियत,माणुसकी,आपुलकी आणि प्रेम शिकता आलं.आजूबाजूच्या छोट्या मोठ्या गोष्टींकडे बघण्याचा नवीन आणि सुंदर दृष्टीकोन मला या पुस्तकाने दिलंय.

तोतोचान सारखं निरागस जगता यायला हवं खरंच.छोट्या छोट्या गोष्टीचं आनंद उपभोगता आलं पाहिजे. बारीक सारीक गोष्टीचं अप्रूप वाटायला हवं.कोणतीही छोटीशी गोष्ट जाणून घेण्यासाठी उत्सुक असायला हवं.एक आदर्श शिक्षक,पालक आणि मुळात माणूस होण्यासाठी तोत्तोचान हे पुस्तक मदत करू शकते.फक्त तसा दृष्टीकोन आपण ठेवायला हवा.तेत्सुको या लेखिकेने आपल्या बालपणाचे निरागस किस्से यामध्ये सांगितले आहेत.तर आपल्या आगळ्या वेगळ्या शाळेचे शिक्षक कोबायाशी बद्दल इतरांना माहिती व्हावी,त्यांचं मुलाबद्दलचं प्रेम जगाला माहिती करून द्यावं,तसंच मुलांना शिकविण्यासाठी त्यांनी कोणकोणते मार्ग अवलंबिले याची माहिती द्यावी हा या पुस्तकामागचा लेखिकेचा प्रामाणिक हेतू आहे 

एकंदरीत खरंच हे पुस्तक जगाला :- 

हजारो फुलं फुलू दे 
विचारधारांचा संघर्ष होऊ दे 
विश्वाला नवजीवन मिळू दे ❤️

हा संदेश देऊन जाते..

दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान घडणारी ही खरी कथा जपानमधील ते तेत्सुको म्हणजेच तोत्तोचान नामक एका स्वच्छंद छोट्या गोडु मुलीची व तिच्या निरागस बालपणाची आहे.तोत्तोचान आपल्या आईवडिलांच्या सोबत राहत असते.तिला तिच्या मनमोकळ्या स्वभावामुळे म्हणा किंवा अतिच निरागसतमुळे शाळेतून काढून टाकल्या जातं. त्यामुळे तिची आई तिला "तोमोई" नावाच्या कोयाबाशी सरांनी चालवलेल्या प्रयोगशील व आगळ्या वेगळया शाळेत टाकते.कोयाबाशी हे शिक्षणतज्ञ आणि संगीत-तज्ञ असतात आणि ते इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने शाळा चालवत असतात.ही शाळा म्हणजे इतर शाळापेक्षा फारच भिन्न असते.या शाळेमध्ये वर्ग म्हणून आगगाडीच्या सहा जुन्या डब्याचा उपयोग केला जात होता.तर इतरांपेक्षा जगावेगळं अभ्यासक्रम आणि शिक्षणपद्धती या शाळेत कोयाबाशी सर त्याकाळी राबवत होते.

या शाळेत तोत्तोचानला प्रवेश मिळतो. आणि येथून सुरू होतो तिच्या आयुष्याला वेगळं वळण देणारं प्रवास."तोमोई विद्यालयाच्या" सुंदर वातावरणात व कोयाबाशी यांच्या सानिध्यात ती घडायला सुरुवात होते.तोतोचानचं निरागसपण आणि त्याला या शाळेची, शिक्षकाची मिळालेली साथ खूप काही शिकवून जाते व या पुस्तकातून ते आपल्याला सुद्धा शिकायला मिळते.
तोतोचानचं जगणं,वागणं,तिचे विविध कारनामे,भोळापण,इतराप्रति असलेली आपुलकी,प्रेम,इतरांना मदत करण्याची वृत्ती,नवीन काहीतरी शिकण्याची धडपड,विविध गोष्टीबद्दल असलेलं कुतूहल आणि कमालीची निरागसता वाचून आपण तिच्या आणि तिच्या शिक्षक व शाळेच्या प्रेमात पडल्या शिवाय राहत नाही..❤️😘

आवर्जून वाचा सर्वांनी,चुकवू नका 😍

©️Moin Humanist✍️
मी वाचलेली पुस्तके ❤️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼