तोत्तोचान ❤️
दोन दिवसांपूर्वी तोत्तोचान या मुळ जपानी भाषेतील जागतिक पातळीवर गाजलेल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद वाचून पूर्ण केलं.आणि तोत्तोचान च्या अक्षरशः प्रेमात बुडालो.आजपर्यंत जेवढं ऐकलं आणि वाचलं होतं या पुस्तकाबद्दल त्यापेक्षा कितीतरी पटीने हे पुस्तक मला प्रचंड आवडलं. मी हे पुस्तक मुळात वाचलं नाही तर अक्षरशः जगलो असे म्हणू शकतो.हे पुस्तक कळत/नकळतपणे मला खूप काही देऊन गेलं.यातील छोट्या छोट्या गोष्टींतून मला खूप काही महत्वपूर्ण शिकायला मिळालं.तोत्तोचान या चिमुकली कडून निरागसता, मासुमियत,माणुसकी,आपुलकी आणि प्रेम शिकता आलं.आजूबाजूच्या छोट्या मोठ्या गोष्टींकडे बघण्याचा नवीन आणि सुंदर दृष्टीकोन मला या पुस्तकाने दिलंय. तोतोचान सारखं निरागस जगता यायला हवं खरंच.छोट्या छोट्या गोष्टीचं आनंद उपभोगता आलं पाहिजे. बारीक सारीक गोष्टीचं अप्रूप वाटायला हवं.कोणतीही छोटीशी गोष्ट जाणून घेण्यासाठी उत्सुक असायला हवं.एक आदर्श शिक्षक,पालक आणि मुळात माणूस होण्यासाठी तोत्तोचान हे पुस्तक मदत करू शकते.फक्त तसा दृष्टीकोन आपण ठेवायला हवा.तेत्सुको या लेखिकेने आपल्या बालपणाचे निरागस किस्से यामध्ये सांगितले आहेत.तर आपल्या आगळ्या...