वोल्गा ते गंगा ❤️
काही दिवसांपूर्वी मी चक्क इ.स पूर्व 6000 ते इ.स 1922 या काळाचा प्रवास करून आलो.हा प्रवास मी राहुल सांकृत्यायन सर यांच्या "वोल्गा ते गंगा" या पुस्तकातून केला.या पुस्तकाने मला कमालीचं गुंतवून ठेऊन काळानुसार समाजात होत गेलेले सामाजिक,राजकीय,सांस्कृतिक,भौगोलिक आणि धार्मिक बदलाबद्दल सोप्या शब्दांत माहिती दिली.खरंच मानव समाज आज जिथे आहे, तेथपर्यंत तो अगदी प्रारंभीच पोचलेला नव्हता;आजचा टप्पा गाठण्यासाठी त्याला कितीतरी मोठमोठया संघर्षांना तोंड द्यावे लागले होते.याची प्रचिती मला हे पुस्तक वाचत असताना पावलोपावली आली. कितीतरी प्रसंग वाचून मी थक्क झालो.
हे मूळ हिंदी भाषेतील हे पुस्तक 1944 मध्ये प्रकाशित झाले आणि त्याच वर्षी ते मराठी मध्ये अनुवादित करण्यात आले. आणि अनुवाद सुद्धा अप्रतिम व भन्नाट झालं असून तो अनुवाद अजिबात वाटतंच नाही.हे पुस्तक एक महाकाव्य आहे.इ.स.पूर्व 6000 ते इ. स 1922 या संपूर्ण कालावधीचा सामान्य जनतेच्या दृष्टिकोनातून मानवी विकासाचा मागोवा घेण्यात आला आहे.जो वाचत असताना आपण पूर्णपणे यामध्ये हरवून जातो.यातील वेगवेगळ्या काळातील प्रत्येक कथा वाचत असताना फारच भारी वाटतं.वेगवेगळ्या काळात मानवी जीवनात येणारे सामाजिक,सांस्कृतिक,आर्थिक,धार्मिक आणि राजकीय बदल आपल्याला वेगवेगळ्या काळातील या कथेतून जाणवते.वोल्गा नदीच्या किनारी.जेव्हा मानव शिकारी-संकलक होता तेव्हापासून तर आधुनिक मानवी इतिहासपर्यत
या पुस्तकात, लेखकाने मानवजातीच्या उत्क्रांतीचे चित्रण फारच उत्कृष्ट पद्धतीने केले आहे..
लेखकाने वेगवेगळ्या कालखंडातील मानवी विकासाचे वर्णन त्या कालखंडाशी निगडित लघुकथांमधून अतिशय क्रमवारपणे केले आहे.लेखकांनी प्रत्येक स्तरावर विविध विषयाला स्पर्श केला आहे. त्या काळातील सामान्य लोकांच्या संवादांच्या मदतीने ते प्रत्येक कालावधीच्या जीवनाचे विविध तपशील वाचकांसमोर ठेवतात. सुरुवातीच्या काळातील समाज हा स्त्रीप्रधान होता.ज्यांचा जीवन मांस आणि पाण्यावर पूर्णपणे निर्भर होता..या पुस्तकात एकूण 19 कथा आहेत आणि त्यामध्ये काही 100 वर्षांचे अंतर दिले आहे. ख्रिस्तपूर्व ६००० ते इ.स. १९२२ पर्यंतच्या मानव समाजाच्या प्रगतीचे ऐतिहासिक, आर्थिक व राजकीय वस्तुस्थितीच्या आधारे केलेले हे ललितकथांच्या स्वरूपातील संपूर्ण चित्रण 'वोल्गा ते गंगा' या एकाच पुस्तकातून वाचायला मिळणे हा एक सुखद अनुभव ठरतो.या वेगवेगळ्या कथांमधील बदल विश्वासार्ह आहे.या कथांच्या शैलीत पुरेशी विविधता आहे. वर्णन, संभाषण, आत्मचरित्र, प्रपंच आदींमधून लेखकाने लोकांचे विचार मांडले आहेत आणि समाजात होणाऱ्या बदलांवर लोकांच्या प्रतिक्रियाही दाखवल्या आहेत.8000 वर्षांच्या कालखंडात लेखकाने संपूर्ण इतिहासाचा सारांश मांडला आहे. या कथासंग्रहाबाबत राहुल सांकृत्यायन स्वतः लिहितात की- "लेखकाच्या प्रत्येक कथेमागे त्या युगाशी संबंधित जड साहित्य आहे, ज्यामध्ये जगातील किती भाषा, तुलनात्मक भाषाशास्त्र, माती, दगड, तांबे, पितळ यांचा समावेश आहे. ❤️
एकंदरीत प्राचीन इतिहासापासून ते आधुनिक इतिहासापर्यत विविध काळात येणारे सर्वकाही बदल वेगवेगळ्या कथेनुसार यामध्ये दिलेले असून हे पुस्तक खूपच वाचनीय आहे. सुरुवातीला असलेली मातृप्रधान संस्कृती पुरुषप्रधान संस्कृतीत कशी होत गेली हे बघणे फार इंटरेस्टिंग आहे.या पुस्तकातील पहिली कथा वोल्गा तटावरील आहे. ज्यामध्ये 8000 वर्षांपूर्वीच्या जमातीची कौटुंबिक रचना, आहार आणि जीवनशैलीचा उल्लेख आहे. वोल्गा ते गंगेपर्यंतच्या पहिल्या चार कथा इ.स.पूर्व 6000 पर्यंतच्या आहेत. 2500 BC पासून समाजाचे चित्रण करते. निशा, दिवा, अमृतश्व आणि पुरुहुत, या चार कथा त्या काळातील आहेत जेव्हा माणूस त्याच्या अॅडम अवस्थेत होता, आदिमानव म्हणून राहत होता आणि शिकार करून पोट भरत होता. त्या काळातील समाज आणि परिस्थितीचे चित्रण करताना लेखकांनी कल्पनाशक्तीची मदत घेतली आहे, पण तो काळ या कथांमध्ये आपल्या पाहायला आणि अनुभवायला मिळतो.
इतर कथांमध्ये, वैदिक भारतातील कथा, वेदोत्तर भारत, बुद्धाच्या काळातील कथा लिहिल्या गेल्या आहेत. या पुस्तकात जातीवादाच्या कारणांमध्ये जाण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अश्वघोषाचे बुद्धचरित आणि सौंद्रानंद हे इ.स.पूर्व ५० पूर्वीच्या 'प्रभा' या कथेत जाणवतात. सुपर्णा यौधेय, भारतातील गुप्त कालखंड म्हणजे इ.स.पूर्व 420. को, रघुवंशापर्यंत, अभिज्ञान शाकुंतलम आणि पाणिनी यांचा काळ सांगणारी कथा आहे. त्याचप्रमाणे, दुर्मुख कथा, ज्यामध्ये इसवी सन 630 चा काळ दिसतो, ती आपल्याला हर्षचरित, कादंबरी, ह्युएन त्सांग आणि एत्सिंग यांच्याशी जोडते. चक्रपाणी नावाची चौदावी कथा इसवी सन 1200 च्या नैशादचरिताची आणि त्या कालखंडाची ब्लू प्रिंट आपल्यासमोर मांडते.❤️
©️Moin Humanist✍️
मी वाचलेली पुस्तके ❤️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा