पुस्तकांनी मला काय शिकवले किंवा मी आजपर्यंत पुस्तकापासून काय शिकलो ?? भाग :- 1 💜

पुस्तकांनी माझ्या आयुष्यावर खूप प्रभाव पाडलेलं आहे.पुस्तकांनी मला नेहमीच योग्य ती दिशा दाखवण्याचं कार्य केलं आहे.पुस्तकांनीच मला घडवलंय.योग्य ते लिहायला,बोलायला आणि वागायला शिकवलं आहे.आज मी पदवीधर झालो,नागरी सेवेची तयारी करतोय आणि पुढे उच्च शिक्षणासाठी वेगवेगळ्या विद्यापीठाच्या प्रवेशासाठी तयार होतोय तर ते फक्त पुस्तकामुळेच.पुस्तकानेच मला स्वप्न बघायला आणि ती स्वप्न पूर्ण करायला शिकवलंय..शाळेत व्यवस्थित निबंध सुद्धा न लिहू शकणारा आज मी थोडंफार लिहू शकतो हे फक्त पुस्तकामुळेच.दहावी पास व्हायची सुद्धा खात्री नसणारा मी पदवीधर झालो ते फक्त पुस्तकामुळेच.वाया गेलेला पोट्ट आहे तो त्याचं काही खरं नाही पासून तर एक सुशिक्षित आणि अभ्यासू मुलगा आहे तो भविष्यात तो एक अधिकारी बनणार आहे इथपर्यंत चा प्रवास मी पूर्ण करू शकलो ते फक्त पुस्तकामुळेच.पुस्तक वाचनाने मी आज घडलोय आणि घडतोय.पुस्तकांमुळेच माझ्या विचारांत आमूलाग्र बदल झाले आहेत.पुस्तकांनीच योग्य त्या वेळेवर मला साथ दिली.जेव्हा कोणीही जवळ नव्हतं तेव्हा पुस्तके माझ्या जवळ होती आणि आज सर्वजण आहेत तेव्हासुद्धा पुस्तके माझ्या सोबतच आहे.पुस्तकांनी ...