आदिवासी बोधकथा ❤️

एकाच बैठकीत वाचून पूर्ण केलेलं हे अंडररेटेड पुस्तक खरंच खूप जबरदस्त आणि अप्रतिम आहे.यातील प्रत्येक कथा उत्कृष्ट असून यामध्ये दिलेली वारली चित्रं तर खूप भन्नाट आहेत..गोष्ट सांगण्यासाठी आदिवासी स्त्रिया वारली चित्र काढत असतं. या कथांमध्ये आदिवासींची सारी जीवनपध्दती चित्रित केलेली आढळते.जीवनाचा सह-आनंद लुटलेला दिसतो.आदिवासी समाजातून बहरलेलं तत्वज्ञान यामध्ये सापडतो,त्यांची निसर्गाप्रति असलेली कृतज्ञता आणि प्राणिमात्रांवरचं प्रेम यामध्ये आपल्याला दिसतो. भारतीय संस्कृतीतला विविधपणा,चैतन्य अनुभवायचं असेल तर उघड्या काना-डोळ्यांनी आणि मोकळ्या मनाने आपल्या आजूबाजूला ऐकायची,पाहायची आणि त्यावर विचार करायची गरज आपल्याला आहे..वारली चित्रं हे फक्त नक्षीकाम नसून त्यापलीकडे जाऊन याचा महत्व खूप आहे.या चित्रांचा मुळ एतद्देशीय संदर्भ कथांचा आहे.ही चित्रं मुळात कथाकथनाची साधनं होती आणि आहे. या चित्रांमध्ये भन्नाट गोष्टींचा खजिना दडलेला असतो.आज वारली चित्रं फक्त व्यापारीकरणातून केवळ नक्षीकाम बनली आहेत.त्यांचे एतद्देशीयपण चादरी आणि कपडे खपवण्याच्या कामी लागले आहे.हे खरंच खूप दुःखद आहे..

कष्टकरी संघटनेच्या प्रदीप प्रभू आणि शिराझ बलसारा यांनी गावागावांतून या वारली कथा गोळा करून इंग्रजीत ग्रथित केल्या आणि त्यातीलच 15 निवडक कथांचा पुनकर्थन मराठी वाचकांसाठी या पुस्तकात केलं आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानायला हवे..💜

नक्की नक्की वाचा.
मी काही दिवसांत याबद्दल माझं अनुभव लिहीन..🙏

©️Moin Humanist ✍️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼