देहनगरीची अदभूत सफर ❤️

देहनगरीची अद्भुत सफर 💜

काहीच दिवसांपूर्वी मी एक उत्कृष्ट आणि माहितीपूर्ण आकर्षक,रंगीत पुस्तक वाचलं..हे पुस्तक मला एवढं आवडलं की मी एकाच बैठकीत हे पुस्तक वाचून समाप्त केलं..हे पुस्तक म्हणजे डॉ.वृंदा चापेकर लिखित देहनगरीची अद्भूत सफर हे होय..या पुस्तकात आपल्या संपूर्ण शरीराची गोष्ट एकदम सोप्या आणि भन्नाट शब्दात सांगितलेली आहे.आपल्या शरीरातील इंद्रिये  आपल्याला त्यांचे परिचय करून देतात जे वाचत असताना आपण थक्क होतो..आपल्या शरीराबद्दल आपल्याला अजिबात माहिती नसलेली रोचक माहिती या पुस्तकातून मिळते..

या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणात हृदय,फुफ्फुस,मूत्रपिंड यांसारखे एकेक प्राणभूत अवयव तसंच रक्तप्रवाहासारखा अतिमहत्त्वाचा घटक विसम्यकारक रितीने प्रथम पुरुषी भाषेत आपलं आत्मकथन करतो.शरीरातील प्रत्येक अवयव आपलं मनोगत सांगत असताना तो स्वतःविषयी महत्वपूर्ण माहिती आपल्याला देतोच त्याबरोबरच आलेल्या कडूगोड अनुभवांचे मजेशीर कथन सुद्धा उत्कृष्ट पध्दतीने करतो.याबरोबरच तो आपल्या वैघकीय समस्या,त्यांच्या निवारणाचे उपाय, आयुष्यक्रमण करत असताना भविष्यातील धोक्याविषयी सावधतेचे इशारे आणि ते रोखण्यासाठी घ्यावयाची खबरदारी इत्यादी बद्दल माहिती देतो..मुळात एवढ्या सोप्या शब्दांत जी माहिती दिली आहे ती समजण्यासाठी खूप सोपी आहे. विज्ञानातील किचकट संकल्पना आपल्याला लगेच या पुस्तकातून समजून जाते.

पेशी,मेंदू,डोळा,कान, नाक,त्वचा,थायरॉईड, घसा,हृदय,फुप्फुस,रक्तप्रवाह,पोट,आतडं,गर्भाशय,स्तन,मूत्रपिंड,इत्यादी इंद्रिये आपल्याला त्यांच्या भाषेत जी महत्वपूर्ण माहिती पुरवतात ते वाचताना आपले मनोरंजन तर होतेच पण ज्ञानात कितीतरी पटीने भर पडते.जागोजागी देण्यात आलेले सुंदर आणि मनमोहक रंगीत चित्र बघून आपण पुस्तकाच्या अजून कितीतरी पटीने प्रेमात पडतो.हे पुस्तक किशोर वयातील मुलांपासून तर वृद्धापर्यत सर्वांनी वाचायला हवे असे आहे.या पुस्तकांसाठी वृंदा मॅम यांना खूप खूप धन्यवाद..

थोडक्यात लेखिकेच्या भाषेत सांगायचं असल्यास....❤️

आपल्या पापणीची प्रत्येक उघडझाप किंवा हृदयाचा प्रत्येक ठोका पेशींनी पुरवलेल्या ऊर्जेशिवाय अशक्य आहे. आणि विशिष्ट इंधन मिळाल्याशिवाय पेशी आवश्यक ऊर्जेची निर्मिती करू शकत नाहीत. पेशींना होणारा या इंधनाचा पुरवठा आपल्या उदराच्या पोकळीत अत्यंत छोट्या अडचणीच्या जागेत वास्तव्य करणाऱ्या स्वादुपिंडाकडून म्हणजे पँक्रियाकडून केला जातो.सांगायचा मुद्दा इतकाच की, आपण मनुष्यप्राणी म्हणून ज्या हालचाली करतो किंवा जी कृती करतो ती प्रत्यक्षात आपले अवयव घडवून आणत असतात. त्यामागे विशिष्ट प्रसंगी घडून येणाऱ्या रासायनिक प्रक्रिया आणि त्यातून कार्यान्वित होणारी संदेशवहणाची अजब यंत्रणा आपल्या शरीरात कार्यरत असते आणि ही यंत्रणा आपल्या शरीरातील अवयवांच्या परस्परपूरक सहकार्यातून चालते. तेव्हा आपल्या एखाद्या जरी अवयवाने कामचुकारपणा केला किंवा विशिष्ट वेळी विशिष्ट काम केलं नाही, तर आपल्या शरीराचा डोलारा ढासळू शकतो..इत्यादी रोचक माहितीसाठी प्रत्येकाने हे पुस्तक वाचावे असे आहे..❤️


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼