आपल्या पुस्तकांची काळजी कशी घ्यावी ?
पुस्तके खरेदी करून वाचण्यात जो आनंद मिळतो तो कशातच नाही हा माझा ठाम मत आहे..पुस्तक संग्रही करून आपला छोटासा वयक्तिक ग्रंथालय असावा हा प्रत्येक पुस्तक प्रेमीचं एक विशेष स्वप्न असतोचं.आपल्या ग्रंथालयात बसून पुस्तके वाचण्यात जो आनंद आहे तो दुसरा कशातच नाही. कोणताही पुस्तक प्रेमी आपला हा स्वप्न पूर्ण करण्यासाठी दर्जेदार पुस्तके खरेदी करून संग्रही करत असतो आणि ती वाचत असतो..आता पुस्तके खरेदी करून बरीच पुस्तके संग्रही केल्यानंतर एक प्रश्न निर्माण होतो किंवा एक समस्या उध्दभवते की आता आपल्या या लाडक्या पुस्तकांची काळजी कशी घ्यावी ??पुस्तकांची देखरेख कशी करावी ??जेणेकरून आपली पुस्तके नेहमी व्यवस्थित आणि चांगली राहतील..हा प्रश्न प्रत्येक पुस्तक प्रेमीला नेहमी भेडसावत असतो तर या पुस्तकाचं उत्तर आपण या पोस्ट मध्ये शोधण्याचा प्रयत्न करूया..पुस्तकं म्हणजे आपला जीव की प्राण. पुस्तके हेच आपले खरे मित्र आहेत.जशी आपण आपल्या इतर वस्तूंची योग्य ती काळजी घेत असतो तशीच आपल्याला आपल्या पुस्तकांची सुद्धा घ्यावी लागेल. फक्त पुस्तके संग्रही करून आणि वाचूनच काही फायदा नाही तर पुस्तकांची योग्य काळजी घेणे हे सुद्धा जरुरीचे आहे असे मला वाटते आणि म्हणूनच मी एका आईप्रमाणे माझ्या पुस्तकांची काळजी घेत असतो.पुस्तकांना काहीही हानी पोहोचणार नाही याची मी नेहमी काळजी घेत असतो.कारण येणाऱ्या पिढीच्या हातात मला माझा हा खजिना सुपूर्द करायचा आहे.उद्या मी नसणार पण माझी पुस्तके ही योग्य त्या हातात नक्कीच असतील हा माझा ठाम विश्वास आहे..
आता मी माझ्या पुस्तकांची काळजी कशी घेत असतो किंवा आपण कशी घ्यायला हवी याबद्दल काही टिप्स पाहूया..
१)पुस्तके कपाटात/बुकशेल्फ मध्ये ठेवताना आधी ते स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावे.
२)कपाट/बुकशेल्फ मध्ये खाली व्यवस्थित न्युजपेपर लावून त्याच्यावर पुस्तके ठेवावी.
३)पुस्तकांच्या कापाटात पुस्तक लावतांना खूप गर्दी करुन लावू नये.मोकळी पुस्तके ठेवावी.जेणेकरून एखादं पुस्तक बाहेर काढताना किंवा परत ठेवताना अवघड जाणार नाही.पुस्तके नीट रचून ठेवावीत. अस्ताव्यस्त ठेवल्यास लवकर फाटतात. आकारानुसार न ठेवल्यास जागा जास्त लागते. सारख्या आकाराची पुस्तके एकावर एक रचून ठेवावीत.
४)शक्योतर आपण शालेय पुस्तकांना लावत होतो त्याच प्रकारे पुस्तकांना प्लास्टिक कव्हर करून घ्यावे..पुस्तकाचा मुखपृष्ठ आपल्याला ठीक प्रकारे दिसेल याच प्रकारचं कव्हर लावावा..
५)बुकशेल्फमध्ये चंदनाची काडी,लवंग सोबतच डांबर गोळ्या ठेवाव्यात..
६)पुस्तक लावताना विषय,जेनरनुरूप अथवा लेखक/लेखिकेच्या नावानुसार लावावीत.कमीतकमी हाताळली जातात.ठेवताना सोयीचे होते.
७)पुस्तकावर खुणा,चित्र रंगवणे,रेघा मारणे टाळावे.शक्योतर जमल्यास पुस्तकांवर लिहू नये..
८)पुस्तकांची नियमित साफसफाई करत रहावी.आठवड्यातून किंवा 15 दिवसांतुन एकदा तरी पुस्तके Rearrange करून ठेवावी..
९)पुस्तकं स्वच्छ हातांनी हाताळावीत.
पुस्तक वाचतांना खाण्यापिण्याचे पदार्थ दूर ठेवावेत.पुस्तक वाचत असताना हाताला घाम आल्यावर पुस्तकाला थोडं बाजूला ठेऊन हात चांगल्या प्रकारे पुसून घ्यावे त्यानंतर पुस्तक हातात घ्यावे.
१०)पुस्तक वाचत असताना बुकमार्क वापरावे.पान दुमडू नये किंवा उघडं ठेऊन कोठे जाऊ नये.व्यवस्थित बुकमार्क ठेऊन पुस्तक बंद करून पुस्तक योग्य त्या ठिकाणी ठेवूनच बाहेर जावे.
१२)वाचून पूर्ण केलेली पुस्तके वेगळी ठेवावी.जेणेकरून परत परत तीच पुस्तके आपल्या हातात येणार नाही.
१३)शक्य होईल हार्डकॉव्हर असलेली पुस्तकेच खरेदी करावी.आता पेपरबॅक आणि हार्डकॉव्हर असा ऑपशन आपल्याला मिळत असतो.हार्डकॉव्हर पेपरबॅकच्या तुलनेत थोडं महाग असतो पण त्याचा फायदा होतो.माझा प्रथम प्राधान्य नेहमी हार्डकॉव्हरला असतो.
१४)तुमची पुस्तके जिथे ठेवली आहेत त्या ठिकाणी तापमानाचे नियमन करा. लायब्ररी आणि संग्रहालये तापमान 66-68°F च्या आसपास ठेवण्यासाठी सामान्य नियम पाळतात, हा एक चांगला नियम आहे..
१५)शक्य होईल तर आपली पुस्तके कोणालाही वाचायला देऊ नये.एखादा पुस्तक प्रेमी असेल किंवा त्याला पुस्तकावर प्रेम असेल त्यालाच पुस्तक द्यावे अन्यथा टाळावे.तुमच्या पुस्तकाची काळजी तुमच्यापेक्षा चांगली कोणीही घेऊ शकणार नाही एवढं नक्की. मला याबाबतीत खूप खराब अनुभव आलेला आहे.2-3 वेळा मी इतरांना वाचायला पुस्तके दिली तर प्रत्येक वेळी मला पुस्तकं खराब अवस्थेत मिळाली त्यामुळे मी माझी पुस्तके कधीही कोणालाही देत नाही.
१६)पुस्तके उघडी ठेऊ नये. कपाट,बुकशेल्फ किंवा रॅकेत ठेवावी.पुस्तके उघडी ठेवली तर त्यांना उंदरांपासून धोका असतो. त्यासाठी पुस्तके पत्र्याच्या किंवा लाकडी पेटीत ठेवावीत. घरात लाकडी किंवा लोखंडी कपाट असेल तर त्यात पुस्तके ठेवावीत.उंदीर पुस्तके कुरतडतात त्यामुळे संपूर्ण पुस्तक खराब होते.
१७)पुस्तके मातीच्या भिंती वर ठेवली व तेथे ओलसरपणा असेल तर वाळवी लागते. वाळवी पुस्तकाची संपूर्ण पाने खराब करते. पुस्तकाला छिद्रे पडतात. त्यामुळे पुस्तके खराब होतात. कुंभारीण माशी व कोळी या कीटकांपासून ही पुस्तके खराब होतात. पुस्तक एकाच जागी खूप दिवस तसेच पडून राहिल्यास या कीटकांचा उपद्रव होतो. त्यामुळ पुस्तके नियमित हाताळत राहावी. त्यांची निगा राखावी सतत त्यांची साफसफाई करत रहावी.पुस्तके जास्तीत जास्त सुक्या जागेवर राहतील याची नेहमी काळजी घ्यावी.
१८)पुस्तकाची पाने चाळत असताना आरामशीर पाने बदलावी.जास्त घाई केल्यावर पुस्तकाचं पृष्ठ फाटू शकते.त्यामुळे सावकाश पृष्ठ हाताळावे.यासोबतच बोटाला थुंकी लावून पाने उलटवू नये.ही सवय चांगली नाही.पुस्तकाला आणि आपल्या आरोग्याला या सवयीने नुकसान होतो.
१९) कोणतेही पुस्तक दोऱ्याने, टाचणीने किंवा डिंकाने चिकटवलेले असते ती बांधणी खराब होऊ नये यासाठी पुस्तक १२० अंश यापेक्षा जास्त उघडू नये. पुस्तक उघडलेले असताना पालथे घालू नये. उघडलेले पुस्तक पाठीमागे दुमडू नये. त्यामुळे बांधणी खराब होते व पाने ढीली होतात. बांधणी खराब झाली तर पुस्तकाची सर्व पाने वेगळी होतात. त्यासाठी बांधणीची योग्य काळजी आपण घ्यायला हवी..
२०)वजनाने जड असलेले पुस्तक आपण शक्योतर बुकहोल्डर वर ठेवूनच वाचावे.याने आपला हात दुःखत नाही व हात दुःखल्याने पुस्तक खाली पडण्याचा धोका सुद्धा कमी होतो.
इत्यादी...
तर मी या प्रकारे पुस्तकांची काळजी घेत असतो आणि तुम्ही सुद्धा याप्रकारेच घेऊ शकता ..काही चुकलं असेल तर नक्कीच कळवा आणि काही अभिप्राय,टिप्स असतील तर ते सुद्धा द्या..
धन्यवाद ❤️🙂
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा