जग बदलणारे ग्रंथ या आगळ्या वेगळ्या पुस्तकाच्या लेखिका दिपा देशमुख मॅम यांना दिलेला अभिप्राय ❤️
नमस्ते मॅम...🙏
मी नुकतेच आपले "जग बदलणारे ग्रंथ"हे अप्रतिम,भन्नाट, सुंदर आणि महत्वपूर्ण विषयावर लिहलेले पुस्तक वाचून पूर्ण केले..खरंच मनापासून सांगतो मला खूप खूप आवडलं हे पुस्तक.महान पुस्तकांबद्दल एवढी छान आणि महत्वपूर्ण माहिती ती सुद्धा एवढ्या सोप्या शब्दांत एकाच ग्रंथात वाचायला मिळणे हे खरंच अफलातून आहे...सुरुवातीलाच आपले मनोगत वाचून मी खूपच भारावून गेलो.आपण आपले मनोगत ज्यापद्धतीने वाचकाला सुंदर माहिती देत व्यक्त केले ते मी आजपर्यंत वाचलेल्या मनोगतात मला सर्वांत जास्त आवडले...बिब्लिओथेका अलेक्झांड्रिया या ग्रंथालयाबद्दल आपण जी माहिती दिली ती वाचून मला फार फार आनंद झाला आणि एकदम वेगळं वाटलं.आपला वाचन प्रवास एकंदरीत मनाला भावून गेला.पुस्तक वाचनाचे फायदे,पुस्तके का वाचावे ? याबद्दल सुद्धा थोडक्यात आपण जे मार्गदर्शन केलंय ते प्रत्येक वाचकांसाठी खूप महत्वपूर्ण ठरेल.पुस्तकात जागोजागी आपण दिलेली माहिती ही ज्ञानात खूप खूप भर घालणारी असून यावरून आपण घेतलेली मेहनत जाणवली.एकाच पुस्तकातून तुम्ही 50 पुस्तकांची थोडक्यात वाचकांना सफर करून आणली यासाठी मी आपले आभार मानायला हवे..
एकूण 50 जग बदलणाऱ्या ग्रंथाबद्दल आपण जी शानदार मौल्यवान माहिती दिली आहे खरंच त्याला तोड नाही ती माझ्यासारख्या शेकडो वाचकांना खुप खूप उपयोगी पडणार यात शंका नाही.अश्या एका महत्वपूर्ण विषयांवर हे पुस्तक येणं मनाला एक सुखद धक्का देऊन गेलं..आपण ग्रंथात नमूद केलेल्या 50 पुस्तकांपैकी मी काही पुस्तके वाचलेली असून लवकरात लवकर बाकीची पुस्तके सुद्धा वाचणे हा माझा एक ध्येय बनलेलं आहे ते आपल्या या पुस्तकामुळेच..मला काही अश्या पुस्तकाबद्दल माहिती मिळाली ज्याचे मी कधी नाव सुद्धा ऐकलं,वाचलं नव्हतं.आता त्याबद्दल वाचून तर कधी संग्रही करून वाचतो आणि कधी नाही असं झालं आहे.. आपल्या मनोगतापासून सुरू होणारा हा मनमोहक पुस्तकाचा प्रवास कधी कॅपिटल इन द ट्वेन्टी फर्स्ट सेंच्युरी पर्यत येऊन समाप्त होतो हे वाचकाला कळत सुद्धा नाही एवढं वाचक यामध्ये गुंतून जातो हे फक्त आणि फक्त आपल्या सुंदर लिखाणामुळेच..
पुस्तकाचा मुखपृष्ठ सुद्धा अफलातून झालं आहे पृथ्वीच ग्लोब आणि त्यावर पुस्तकांचे फोटो बघून जाम भारी वाटतं.3D इफेक्ट मुळे तर अजूनच उठून दिसतंय.हेन्री डेव्हिड थोरो हे माझे गुरू त्यांच्या Civil Disobedience या पुस्तकाचा फोटो बघून मला फारच आनंद झाला.सुरुवातीला
इंडेक्स वाचताना थोरो गुरुजींच वॉल्डन हे पुस्तक ऍड नसल्याने मी थोडा निराश झालो होतो पण आपल्या मनोगतात आपण दुसऱ्या भागात ते ऍड करू असं म्हटलं हे वाचून मला फार फार आनंद झाला आणि मी जाम खुश झालो..या पुस्तकाचे पुढे सुद्धा वेगवेगळे नवीन भाग येतील याची मला खात्री आहे..मी माझ्यापरीने कमीतकमी १०० वाचकांच्या पर्यत तरी हे पुस्तक पोहोचवणार आणि वाचनाची आवड असणाऱ्या मित्रांना सुद्धा हे पुस्तक भेट देणार हे आपल्याला या ठिकाणी मी एका वाचकाच्या नात्याने वचन देतोय..हे पुस्तक एक मैलाचा दगड ठरणार आणि अनेकांना संदर्भासाठी कामी येणार हे नक्की..मी लवकरच याबद्दल माझा अनुभव लिहिनच पण तूर्तास वाचल्या वाचल्या माझ्या मनातील भाव तुटक्या फुटक्या शब्दांत मी आपल्याला देण्यावाचून राहू शकलो नाही..एखाद्या लेखकाला पुस्तक वाचून अभिप्राय प्रथमच देतोय...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा