पोस्ट्स

द लिजेंड ऑफ थोरो 💜

इमेज
थोरो हा नाव मी पूर्वी कोठेतरी वाचलं आणि ऐकलं होतं. तेव्हापासूनच मला त्यांच्या बाबतीत वाचायचं होत आणि खूप खूप जाणून घ्यायचं होत..मी त्यांच्या साहित्याचा शोध घ्यायला सुरुवात केली पण त्यांच सर्व साहित्य हा इंग्रजी भाषेत उपलब्ध असल्याने मी निराश झालो होतो कारण मला विशेष हे मराठीत हवे होते.अशातच मला १९६५ साली त्यांच्या ‘वॉल्डन’ या पुस्तकाचा दुर्गा भागवत मॅम यांनी केलेल्या ‘वॉल्डनकाठी विचारविहार’ या नावाच्या अनुवादाबद्दल माहिती मिळाली.मी हे पुस्तक खूप शोधलं पण कोठेही मिळालं नाही..यामुळे मी काही इंटरनेट वर उपलब्ध असणारे काही आर्टिकल्स वाचले तर युट्युबर उपलब्ध असलेले काही व्हिडिओस बघितले पण हवी तेवढी माहिती मला काही मिळाली नाही.अशातच मागच्या वर्षी जुलै महिन्यात फेसबुकवर Vishal दादाची थोरोबद्दल एक अप्रतिम आणि शानदार पोस्ट बघितली.त्या पोस्टमध्ये थोरोचे एकंदरीत जे विचार ऍड केले होते ते वाचून तर मी कमालीचा आनंदीत झालो मी ती पोस्ट सेव सुद्धा करून ठेवली.आणि येथूनच काही काळासाठी तरी माझ्या डोक्यातून Exit केलेल्या थोरोने माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा शानदार Entry केली.मी पुन्हा दुर्गा भागवत यांच्या पुस्...

माचीवरला बुधा 💜

इमेज
दिवसागणिक जसे आजकाल भयानक दिवस येत आहे त्यामुळे कधीकधी आयुष्यात काहीच रोमांचित राहिलेले नाही असे विचार मनात दाटून येत आहेत..कोरोना,लॉकडाउन आणि वाढत्या मेहंगाईने सामान्य मानसाचं कंबरड मोडलं आहे..जनमानसात नैराश्य वाढलेलं आहे त्यामुळे कधीकधी जगायचं नेमकं कसं ?? हा प्रश्न मनात येऊन जातो..शहर,समाज सर्व सोडून दूर जंगलात कोठेतरी निसर्ग,प्राणी आणि पुस्तकांच्या सानिध्यात निघून जावं असं वाटायला लागते..बालपणापासूनच जेव्हापासून दूरदर्शनवर मोगलीची जंगल बुक ही Animated सिरीयल येत होती तेव्हापासूनच मला जंगल,प्राणी,पक्षी,झाडं-झुडपांची आणि त्यांच्या सानिध्यात राहायची आवड लागलेली आहे.पुढे जसजसे मी गौतम बुद्ध अभ्यासले,गुरू थोरो लिखित वॉल्डन वाचलं तेव्हा पासून तर माझी ही आवड खूप म्हणजे खूपच वाढली आहे..माझं नेहमीच एक स्वप्न आहे की आयुष्याच्या एका स्टेज नंतर सर्व काही सोडून एखाद्या छोट्याश्या खेड्यात लांब एक छोटीशी जमीन घेऊन तेथे एक छोटंसं घर बांधायचं आणि आयुष्यात संग्रही केलेले सर्व पुस्तके घेऊन तेथे वास्तव्याला जायचं..तेथे अनेक झाडे लावून त्यांचं संगोपन करायचं.शेकडो मांजरी, कुत्रे,बकऱ्या,कोंबड्या पाळायच्य...

बुद्धांच्या_संस्कारक्षम_गोष्टी 💜

इमेज
काही दिवसांपूर्वी मी एक पुस्तक वाचलं आणि ते वाचून खूप प्रभावित झालो.ते पुस्तक मी अनेक लेकरांना वाचून दाखवलं त्यामधील उत्कृष्ट गोष्टी सांगितल्या आणि त्या अनेक लेकरांना आवडल्या हे विशेष.त्या पुस्तकाच्या ५ प्रति मागवून मी चार प्रति वेगवेगळ्या समाजातील ४ मुलांना सप्रेम भेट म्हणून सुद्धा दिल्या.त्यामुळे अनेक दिवसांपासून त्याबद्दल लिहायचं होत पण मी आजच्या दिवसाचीच वाट बघत होतो..आज विशेष बौद्ध पौर्णिमा निमित्त त्या छोटेखानी पुस्तकाबद्दल माझ्या मनातील दोन शब्द लिहितोय...ते पुस्तक म्हणजे सागर शिंगणे लिखित "बुद्धांच्या संस्कारक्षम गोष्टी (सचित्र) हे ५६ पृष्ठसंख्या असलेलं पुस्तक होय.. 444 या पुस्तकात डॉ.आ.ह साळुंखे लिखित "सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध "या ग्रंथातील निवडक व संस्कारक्षम ११ गोष्टींचे संपादन केलेले आहे.. या ११ अकरा निवडक गोष्टीतून आपल्याला तथागत बुद्धांचे विचार समजतात.प्रत्येक गोष्टींतून काहीतरी उत्कृष्ट शिकवण मिळते..बुद्धांचे उपदेश,त्यांच्या जीवन चरित्रातील वेगवेगळ्या गोष्टींवर अनेक पुस्तके प्रकाशित झाली असताना या पुस्तकाची गरज का पडली त्यावर लेखक म्हणतात...

प्रतिपश्चंद्र 💜

इमेज
   १७ जून २०२० रोजी संध्याकाळी ही कादंबरी मला येऊन मिळाली..आणि लगेच ७ वाजेपासून मी बाकी काम बाजूला सोडून ही कादंबरी वाचायला सुरुवात केली आणि २१ जून २०२० रोजी दुपारी या अप्रतिम कादंबरीचा माझा एक विलक्षण व रोचक प्रवास समाप्त झाला...डॉ.प्रकाश कोयाडे सर लिखित या कादंबरीबद्दल तसे तर माझ्याजवळ काही शब्दच नाही पण इतरांना सुद्धा या ग्रेट कादंबरी बद्दल माहिती व्हावी यामुळेच आज मी मागील वर्षी लिहलेले माझं अनुभव येथे शेअर करतोय...एकंदरीत ही कादंबरी माझ्या मनात घर करून गेलेली आहे आणि मी यामध्येच सध्या हरवलेलो आहे.. कधी कधी कसं एखाद्या चित्रपट अथवा पुस्तकाचा हँगओव्हर काही दिवस आपल्या मनातून उतरत नाही, आपण त्यामध्ये एकदमच हरवून जातो ही कादंबरी त्यातुनच एक आहे..जी वाचून समाप्त झाल्यावर सुद्धा आपला पिच्छा सोडत नाही.आपल्या हृदय व मनावर ताबा घेते।।कादंबरीतील एकएक पात्र आपल्या हृदयात घर करून जातो.(रवि, आदित्य,प्रियल,प्रशिक,अजित माने,ज्योती,रामचंद्रन आणि चंद्रकांत मोरे) आपण एखाद्या पात्राला स्वतःशीच रिलेट करत जातो जणू तो पात्र आपणच आहोत कधी त्या पात्राला काय झालं तर आपल्याला स्वतःलाच ...

रावण -राजा राक्षसांचा 💜

इमेज
शरद तांदळे सर लिखित #रावण_राजा_राक्षसांचा ही कादंबरीचे वाचन तीन दिवसांपूर्वी संपले...या कादंबरीत मी एवढा गुंतलो होतो की त्याचा Hangover अजूनही जरासा सुद्धा उतरलेला नाही...मी रावणाच्या त्या काळात जगतोय अस मला वाटत आहे आणि याचं कारण लेखकाचं एकदम सोप्या आणि स्पष्ट भाषेत केलेलं उत्कृष्ट लिखाण जो वाचल्यावर आपण या कादंबरीत हरवुन गेल्या शिवाय राहत नाही...म्हणूनच मी आज ३ दिवसानंतर या कादंबरीबद्दल माझा अनुभव लिहितोय त्यामुळे नक्कीच वाचा !! प्रकाश सरांच्या #प्रतिपश्चंद्र या जबरदस्त कादंबरीच्या नंतर मी पुन्हा एक भन्नाट/जबरदस्त कादंबरीच्या शोधात होतो एवढ्यातच मला या कादंबरीची आठवण झाली जी मला अनेक दिवसांपासून वाचायची होतीच म्हणून लगेच ऑर्डर केली आणि मिळताच लगेच वाचायला सुरुवात केली...कारण काही महिन्यांपूर्वी वाल्मिकी रामायण वाचल्यापासून मला श्रीराम व रावणाच्या बाबतीत जाणून घ्यायची इच्छा होती आणि यामुळेच मी श्री रामचंद्रांच्या बाबतीत बऱ्याच पैकी माहिती घेतली सुद्धा..श्री रामाच्या बद्दल सार लिखाण झालेलं आहे,चित्रपट व टीव्ही सिरीज मधून सुद्धा त्यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे...आणि या...

गांधी का मरत नाही 💜

इमेज
महात्मा गांधी म्हटल्यावर नजरेसमोर येतो तो एक वृद्ध गोल चष्मा घालून हसणारा म्हतारा ज्याची भेट रोज कोठे ना कोठे होत असते..कधी एखाद्या पुस्तकात तर कधी एकाद्या चौकाच्या पुतळ्यात बाकी चलनी नोटांवर तर रोज होतेच आणि आज तो त्या नोटांपर्यतच मर्यादित आहे की काय ??अशी एक शंका येते !!कारण गांधीजी बद्दल सध्या जो द्वेष/तिरस्कार वाढलेला आहे तो खरंच विचार करायला भाग पाडणारा आहे..गांधीजींचे जेवढे अनुयायी होते तेवढेच त्यांचे विरोधक सुद्धा आहे..कोणीही त्यांच्यावर काहीही बोलून /त्यांना शिव्या देऊन तोंडसुख घेऊ शकतो कारण या होणाऱ्या विरोधाच्या विरोधात बोलायला त्यांच्या मागे कोणताही एक विशेष समाज किंवा जात उभी राहत नाही.गांधी हे कोणत्याही समाज/जातीचे नसून ते पूर्ण देशाचे आहेत किंवा मग ते कोणाचेच नाही.. ज्या गांधीला संपूर्ण विश्व मानतो,ज्या व्यक्तीपासून अल्बर्ट आईन्स्टाईन,नेल्सन मंडेला,मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर,बराक ओबामा ,स्टिव्ह जॉब्स सारखे दिगग्ज प्रेरित होतात, ज्याच्यावर सर्वात जास्त पुस्तके लिहली गेलेली असून अनेक देशात त्यांचे पुतळे उभारलेले आहेत त्यांच्या सन्मानार्थ टपालांची जेवढी तिकिटे निघाली आहेत ...

मी सरासरी किती रुपयांची आणि कशाप्रकारे पुस्तके खरेदी करतो ??💜

इमेज
आजकाल पुस्तके ही खूप महाग झालेली आहे,चांगली पुस्तके वाचायची असल्यास चांगली रक्कम मोजावी लागते.पण मला नेहमी स्वतःच्या मालकीचीच पुस्तके वाचावीसी वाटते आणि एकदा वाचलेले पुस्तक स्वतःपासून दूर करावेसे वाटत नाही यामुळे मी शक्यतोर पुस्तके विकत घेऊनच वाचतो.आता विद्यार्थी दशेत असल्याने पैशासाठी सध्यातरी वडिलांवरच मी अवलंबून आहे.मला कोणतेही पुस्तक विकत घेण्यासाठी ते कधीही मनाई करत नाही ते जरी अशिक्षित असले तरीही त्यांना वाचनाची किंमत चांगल्याप्रकारे ठाऊक आहे.मी काही महिन्यांपूर्वी सरळ सरळ पुस्तकांच्यासाठी वडिलांना पैसे मागायचो आणि एकंदरीत ४-५ हजार रुपयांची पुस्तके खरेदी करायचो.असे करत करतच माझ्याजवळ एक मोठा पुस्तकांचा संग्रह /खजिना जमा झाला आणि माझं वाचन वाढतच गेलं..काही दिवसांनी मी आता वडिलांच्या कडून पुस्तकांच्या साठी पैसे  घेणे बंद केले आणि स्वतःचा वयक्तिक खर्च कमी करून पुस्तकासाठी पैशाची सेविंग करायला सुरुवात केली.यासाठी मी एक वेगळं गुल्लक बनवलं आणि २,५,१० -५० जे मिळेल ते जमा करायला सुरुवात केली. रोज मला वडिलांच्या कडून खर्च साठी १०० रु मिळत असतात मी यामधूनच २५ रु रोज जमा करायला सुरुवात ...