नदिष्ट 💜
काही दिवसांपूर्वी मनोज बोरगावकर सर लिखित #नदिष्ट या अफलातून कादंबरीचा मनोरंजक, सुंदर आणि खूप काही शिकवून जाणारा प्रवास संपला..BookTuber विनम्र बाभल यांच्या नवीन युट्यूब चॅनेल वरील पहिलाच विडिओ #नदिष्ट या कादंबरीवर होता.तो व्हिडिओ बघितल्या पासून मला नदिष्ट वाचण्याची जबरदस्त उत्सुकता लागली होती.कारण त्यांनी त्या व्हिडिओ मध्ये ज्याप्रकारे या कादंबरीच वर्णन केले होते ते बघून तर न वाचताच अक्षरशः मी या कादंबरीच्या प्रेमात पडलो होतो.त्यामुळे लगेच ही कादंबरी खरेदी करण्यासाठी ऍमेझॉन वर search केलं पण तेथे उपलब्ध नसल्याने निखिल दादा वाघमारे यांना Msg केला..आणि त्यांच्या कडून अक्करमाशी, पुन्हा अक्करमाशी आणि नदिष्ट मागवून घेतली आणि काहीच दिवसांत नदिष्ट मला येऊन मला मिळाली.. सर्वप्रथम तर मी या कादंबरीला हातात घेऊन मुखपृष्ठ पासून तर बॅक कव्हर पर्यत निहाळलं..मुखपृष्ठावरील नदिष्ट हा नाव आपलं विशेष लक्ष वेधून घेतो.या साडेतीन अक्षराच्या नावात आपल्याला नदीमायचे दर्शन होतात..एकदम सुंदर आणि अप्रतिम फॉन्ट या नावाला दिलं गेलंय.. मुखपृष्ठावर असलेलं नदीच आणि नदीत उमटणारं त्या आकाशाच प्रतिबिंब आपल्य...