पोस्ट्स

रारंग ढांग मराठी पुस्तक अनुभव लेबलसह पोस्ट दाखवत आहे

रारंग ढांग 💙

इमेज
काही दिवसांपूर्वी प्रभाकर पेंढारकर सर लिखित 168 पृष्ठ संख्या असलेली ही कादंबरी वाचण्यात आली.1981 साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीबद्दल अनेक वेळा अनेक जणांकडून ऐकलं होतं तर याबद्दल खूप काही वाचलं सुद्धा होतं. त्यामुळे एकदा फायनली वाचून अनुभव घ्यावा म्हटलं आणि वाचून पूर्ण केलीच.आणि आज माझा अनुभव शेअर करतोय.एकंदरीत ही कादंबरी वाचून झाल्यावर एका सुंदर प्रवासावरून आल्याचा आनंद मला मिळाला.या कादंबरीची थीम आणि कथानक भन्नाट आणि खिळवून ठेवणारं असून उत्कंठा वाढवणारं आहे.एकदा हातात घेतल्यावर वाचून पूर्ण केल्याशिवाय खाली ठेवताच येणारं नाही या धातनीतील ही कादंबरी.खूप काही शिकवणारी व आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देणारी ही कादंबरी आहे.अनेक बाबीवर विचार करायला भाग पाडणारी आणि सैनिक म्हणून काम करताना किती वेगवेगळी मानसिक आव्हानं पेलावी लागतात याची जाणीव करून देणारी ही एक सुंदर कादंबरी आहे. या कादंबरीची कथा,यातील पात्र आणि प्रसंगाचे केलेले वर्णन सर्वकाही फारच अप्रतिम जमून आलं आहे.कादंबरीत एक सुद्धा चित्र नसताना सर्वकाही कथानक आपल्या डोळ्यासमोर घडतोय असा भास आपल्याला होतो.वाचत असता...