तू जमीन आहेस, नोकरी हे फक्त पीक आहे!
तू जमीन आहेस, नोकरी हे फक्त पीक आहे! (The Last Standup) आज एक अतिशय विचार करायला लावणारी कथा वाचली.🌼 एका IT कर्मचाऱ्याची ही कथा आहे. पण ती फक्त एका व्यक्तीची गोष्ट नाही. ती आजच्या कॉर्पोरेट जगाची, बदलत्या तंत्रज्ञानाची, बेरोजगारीची, मध्यमवर्गीय कुटुंबांच्या स्वप्नांची अन् माणूस म्हणून जगण्याचा विसर पडलेल्या आपल्या आयुष्याची गोष्ट आहे. 2013 मध्ये बिहारमधील एका तरुणाला पुण्यातील एका IT कंपनीत नोकरी मिळते. त्याच्या वडिलांनी मुलाला इंजिनिअरिंग शिकवण्यासाठी स्वतःची गव्हाची शेती विकलेली असते. मुलाचं ऑफर लेटर हातात धरताना वडिलांच्या डोळ्यांत एकच स्वप्न असतं, आता मुलाचं आयुष्य सुरक्षित होईल, आपले कष्ट सार्थकी लागतील. मुलगाही मेहनत करतो. हळूहळू त्याची प्रगती होते. तो टीम लीडर बनतो, मॅनेजर होतो. स्वतःचा फ्लॅट घेतो, गाडी घेतो, EMI सुरू होतात. आई नातेवाईकांना अभिमानाने सांगते, माझा मुलगा MNC मध्ये मॅनेजर आहे. पण या यशाच्या प्रवासात तो नकळत आपल्या माणसांपासून दूर जातो. वडिलांना फोन करायला वेळ नसतो. मुलीसोबत खेळायला वेळ नसतो. ऑफिसमधील मीटिंग, डेडलाईन्स, क्लायंट कॉल्स अन् प्रमोशन यांनाच आयुष्या...