We Read saturday ची 19 वी वाचनीय 80 पुस्तकांची यादी 💙
https://wa.me/7066495828
__________________________________________
1)कोसला -भालचंद्र नेमाडे
मुळ किंमत - 425₹
We read Price - 375₹घरपोच.(शिपिंग फ्री)
भालचंद्र नेमाडे यांची ‘कोसला’ ही कादंबरी स्वतःचे असे वेगळेच प्रभावीपण सिद्ध करणारी आहे. आजच्या काळाचे प्रतिबिंब तिच्यात पुरेपूर उतरले असून ती केवळ एखाद्या तात्कालिक समस्येला हाताळत नाही. कादंबरीच्या आवक्याला पुरेल असाच एक मोठा विषय उकलण्याचा प्रयत्न तिच्यातून लेखकाने केला आहे. समाजाशी माणूस कसा अगतिकपणे, अजाणतेपणी गुंतलेला आहे आणि स्वतःचे असे महत्त्वपूर्ण एकटेपणच या समाजात किती दुर्लभ आहे, वरकरणी अगदी सामान्य वाटणाऱ्या जीवनक्रमातून मोठ्या भेदक रीतीने पटवून देण्याचा जो प्रयत्न नेमाडे यांनी ‘कोसला’मध्ये केला आहे तो मराठी कादंबरीच्या जगात सर्वस्वी पहिलाच मानावा लागेल.
2)गांधी उद्यासाठी~ दिलीप कुलकर्णी
मुळ किंमत - 600₹
We read Price - 525₹घरपोच.(शिपिंग फ्री)
'मोहनदास करमचंद गांधी. दीडशे वर्षांपूर्वी जन्मलेला एक सामान्य माणूस आपल्या अफाट कर्तृत्वाने महात्मा बनला. आश्चर्य असे की, जाऊन सात दशके लोटली, तरी गांधी संपलेले नाहीत! त्यांचे विचार अद्यापि जिवंत आहेत. नुसतेच ‘जिवंत आहेत’ असे नाही; तर जगभर प्रसार पावताहेत. त्यांचा सर्वत्र अभ्यास होत आहे, अनेकांना ते अद्यापि प्रेरणा देत आहेत. ह्याचे कारण एकच : त्या विचारांचा मूलगामीपणा आणि व्यापकता. ह्यातूनच ते बनलेत वैश्विक आणि सार्वकालिक. मग आज ज्या समस्या भारताला, जगाला भेडसावत आहेत; त्यांवर ह्या विचारांतून कोणता आणि कसा मार्ग दिसतो? ह्या दृष्टीने गांधी-विचारांकडे पाहण्याचा, त्यांच्या भविष्यकालीन उपयोगितेवर सारे लक्ष केंद्रित करून त्यांतून ‘उद्या’साठी योग्य मार्ग शोधण्याचा हा प्रयत्न. गांधी उद्यासाठी '
3)मंत्र गुंतवणुकीचा~ अरविंद परांजपे
285₹घरपोच.(शिपिंग फ्री)
अर्थनियोजनापासून आर्थिक उद्दिष्टांपर्यंत वाटचाल करण्याचे बहुविध मार्ग असतात. पैशाची गुंतवणूक आणि त्यासाठीचे विविध पर्याय म्हणजे अशा मार्गांवरची वाटचाल. कोणता पर्याय निवडावा? पीपीएफ? शेअर्स? म्युच्युअल फंड? सोने? स्थावर मालमत्ता? पेन्शन स्कीम? कोणताही पर्याय निवडायचा; तर संशोधन, अभ्यास आणि अनुभव म्हणजे यशस्वी गुतंवणुकीचा पाया. वस्तूचे योग्य मूल्यांकन करण्याची क्षमता, इतरांना न दिसलेली गोष्ट हेरणे आणि यथायोग्य विश्लेषण हे यशस्वी गुंतवणू्कदारासाठी आवश्यक गुण. या गुणांच्या आधारे यशस्वी गुंतवणुकीची पायाभरणी कशी करावी, हे सर्वांना उलगडून दाखवणारा || मंत्र गुंतवणुकीचा ||
4)तेलगी स्कॅम -संजय सिंह
255₹घरपोच.(शिपिंग फ्री)
एका पत्रकाराच्या हाती एक रिपोर्ट लागतो. वरवर कंटाळवाणा वाटणारा हा अहवाल. पण त्याची ब्रेकिंग न्यूज होताच अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. असं काय असतं या अहवालात? हा अहवाल असतो, तेलगीच्या महाघोटाळ्याचा. एका रात्रीत डान्सबारमध्ये कोटभर रुपये उधळणारा तेलगी. त्याच रात्री सुरक्षा यंत्रणेच्या रडारवर येतो. आणि तपास यंत्रणेचीही मती गुंग होते. राजकारण आणि प्रशासनातली बडी धेंडं त्याला सामील असल्याची चर्चा सुरू होते.
5) ‘‘द डायरी ऑफ अॅन फ्रँक
195₹घरपोच.(शिपिंग फ्री)
’ हे जागतिक साहित्य-विश्वातील एक अमोल लेणे आहे. एका तेरा वर्षीय मुलीची ही अनुभव-गाथा वाचताना; डोळ्यांत टिपूसही येणार नाही, अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. दुस-या महायुद्धाच्या काळात ज्यू लोकांचा जो छळ झाला, त्यातील अघोरी अनुभव वाट्याला आलेली ही बालिका. आईवडील, बहिण आणि अन्य चार व्यक्ती नात्झी भस्मासुरापासून दूर पळत, एका इमारतीत लपून-छपून जीवन कंठू लागतात. पण दोन वर्षांतच त्यांना हुडवूÂन काढण्यात येते आणि जर्मन छळछावणीत सर्वांची रवानगी होते. कसेबसे वडील मात्र वाचतात. अॅनच्या मृत्युनंतर तिची डायरी वडिलांच्या हाती आली आणि १९४७ साली ती जेव्हा प्रसिद्ध झाली; तेव्हा तिचे वाङ्मयीन आगळेपण वाचकांच्या तात्काळ ध्यानात आले. महायुद्धात मानवी जीवन किती कवडीमोल झाले होते, वांशिक वर्चस्वाच्या खोट्या कल्पनेपायी इतरांचा अमानुष छळ करण्यासाठी मनुष्य कसा प्रवृत्त होतो, याचे प्रत्ययकारी चित्रण तर या डायरीत आहेच; पण एका उमलत्या कळीच्या भावभावनांना तिने आपल्या लेखनात यथेच्छ, कोणताही आडपडदा न ठेवता, वाट मोकळी करून दिली आहे. ‘‘मला मृत्युनंतरही जगायचे आहे, आणि म्हणून देवाने दिलेल्या या देणगीबद्दल मी अत्यंत ऋणी आहे’’ असे तिने लिहिले. ही देवाची देणगी; म्हणजे तिच्यात वसणा-या सर्व भावभावनांना शब्दांत पकडण्याचे सामथ्र्य. गेल्या ४० वर्षांत या पुस्तकाच्या लाखो प्रति खपल्या!
6) नावीन्याच्या शोधात~वाँडर वूमन
We read - 215₹घरपोच (शिपिंग फ्री)
या प्रश्नांचा शोध घेताना मार्शिया यांच्या असं लक्षात आलं की, मुळातच या स्त्रिया त्यांच्या आत अशांत असल्याने त्या आतल्या कोलाहलातच धडपडत राहतात. त्यामुळे त्यांच्या तणावाचं व्यवस्थापन हा मुख्य प्रश्न नसून त्या कोण आहेत, आणि त्यांना आयुष्यात काय करायचं आहे, हे प्रश्न त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत. या शोधातूनच या पुस्तकाची र्नििमती झाली आहे. या पुस्तकामध्ये अशा स्त्रियांच्या आशा-आकांक्षा-इच्छा यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच खरी उदाहरणं देऊन त्यांच्या आधारे, स्त्रीदेखील कशी यशस्वी होऊ शकते हे पटवून दिलं आहेत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, आपल्या आतली शांतता आणि स्व-ओळख प्राप्त करण्यासाठी वेगवेगळे मानसिक व्यायाम आणि प्रत्यक्ष करून बघायचे कृती-कार्यक्रमही यात दिले आहेत. त्यामुळे हे पुस्तक स्त्रियांना उद्देशून लिहिलं असलं, तरी ते पुरुषांनीही मर्मदृष्टी देईल, हे नक्की.
7)माझा धनगरवाडा~धनंजय धुरगुडे
मुळ किंमत - 500₹
We read Price - 450₹घरपोच.(शिपिंग फ्री)
आत्मभान जागृत झालेल्या एका धनगराचं हे विलक्षण आत्मकथन… या कथनात लेखक धनंजय धुरगुडे धनगर समाजाच्या रूढी-चालीरीती आणि जीवनपद्धती यांचं जिवंत चित्रण करतात. त्यांचे पारंपरिक धनगरी खेळ, गजीनृत्य व सण-उत्सव यांचं शब्दचित्र रेखाटतात, आणि शिक्षणामुळे झालेला आपला विकास सांगत धनगर समाजाचं वास्तववादी दर्शन घडवतात.
एका धनगराने अस्सल धनगरी शैलीत प्रथमच चितारलेला हा – माझा धनगरवाडा!
8)अनिताला जामीन मिळतो-अरुण शौरी
मुळ किंमत - 450₹
We read Price - 395 ₹घरपोच(शिपिंग फ्री)
श्री. अरुण शौरी हे राष्ट्रीय हिताचा विचार करणारे विचारवंत असून, ते प्रत्येक नागरिकाच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचादेखील तितक्याच हिरिरीने पुरस्कार करतात. आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनेबद्दल ते जागरूकपणे विचार करतात आणि देशातील सध्याच्या राजकीय-सामाजि परिस्थितीचेदेखील त्यांना उत्तम भान आहे. घटना आणि परिस्थितीचे विश्लेषण करून त्यात सुधारणा होण्यासाठी ते वाचकासमोर करण्यायोग्य कृतीदेखील मांडतात आणि वाचकाला कृती करण्यास उद्युक्तदेखील करतात. आणि याच तळमळीने त्यांनी ‘अनिता गेट्स बेल’ पुस्तकात व्यवस्थेसमोर काही प्रश्न उभे केले आहेत.
9)गोष्ट पैश्यापाण्याची- प्रफुल्ल वानखेडे
Paperback/new
मुळ किंमत - 250₹
We read Price - 235₹घरपोच.(शिपिंग फ्री)
आपली बुद्धी असो की पैसा योग्य ठिकाणी वापरले तरच त्याला किंमत. तसाच मूल्ये यांचा प्रगतीमध्ये महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे पैसा, मूल्ये आणि त्याबरोबर होणारी कृती योग्य दिशेने राहिली तर आपल्याला अग्रेसर राहण्याचे गणित जुळविता येते. त्यातून जीवनात ठरवलेली ध्येयं गाठता येतात. त्यादृष्टीने आपल्याजवळ असलेल्या या गोष्टींचे योग्य कृतीमध्ये रुपांतर करण्यासाठी हे पुस्तक अतिशय मार्गदर्शक ठरणारे आहे.
10)डियर तुकोबा~विनायक होगाडे
225₹ घरपोच(शिपिंग फ्री)
'तुकारामायण', 'मीडिया ट्रायल ऑन तुकोबा' आणि 'डियर तुकोबा' अशा तीन रुपात लेखकांनी त्यांना झालेले तुकारामदर्शन आपल्यापर्यंत पोहोचविलेले आहे. ते अत्यंत प्रभावी आणि गुंतवून टाकणारे तर आहेच, खेरीज ते आपल्या मनात विचारांचे हिंदोळ-कल्लोळ मातविणारे आहे. चारशेंवर वर्षांआधी तुकोबांनी आपल्यात पेरलेली सांस्कृतिक जनुके आजही आपल्यात वाहती असल्याने तुकोबा समकालीनच आहेत, हे ढळढळीत सत्य होय. म्हणूनच होगाडे यांनी काळाची काही मोडतोड, खेचाखेच केली आहे असे अजिबातही वाटत नाही. आज ज्या प्रकारच्या राजकीय, सामाजिक आणि मानसिक स्थितीत एक समूह म्हणून आपण जगत आहोत, त्या वर्तमानात तुकोबांची अशी आठवण होणे, करणे आवश्यकच आहे, हे होगाडे यांनी फार प्रत्ययकारी प्रकारे केले आहे. आधीच्या कविता आणि अखेरीचे स्फुट यांच्या बळावर ही 'ट्रायल' फार सामर्थ्याने उभी करून होगाडे यांनी फार वेधक आणि महत्वाचे सांस्कृतिक जागरण मांडले आहे.
11)महात्मा गांधीं आणि त्यांचा भारतीय संघर्ष’ ~जोसेफ लेलिव्हेल्ड
मुळ किंमत - 495₹
We read Price - 425₹ घरपोच.(शिपिंग फ्री)
हे पुस्तक गांधींच्या जीवनाचा सर्वांगीण वेध घेतं. गांधींनी पाहिलेली मोठ्या कार्याची स्वप्ने, सामाजिक मूल्यांचे त्यांना आलेले भान आणि अहिंसक प्रतिरोधाचे त्यांचे तत्त्वज्ञान परक्या उपखंडात (दक्षिण आफ्रिकेत त्यांनी घालविलेल्या दोन दशकांत) कसे फुलले, पोसले गेले आणि त्यांना ‘महात्मा’ म्हणून डोक्यावर घेणाऱ्या भारताने त्यांची तत्त्वं कशी पायदळी तुडवली, याचे वर्णन या पुस्तकात आहे. महात्मा गांधी एक प्रतिाQष्ठत वकील, जो राजकीय आणि सामाजिक कृति-कार्यक्रमांना स्वत:ला वाहून घेताना पंचा गुंडाळलेला संन्यासी कसा होतो याचे मनोज्ञ दर्शन या पुस्तकातून घडते. या नेत्याने दीर्घ काळापासून उभारलेल्या अहिंसक चळवळीचे पर्यवसान शेवटी भारताच्या विभाजनात, पाकिस्तानच्या निर्मितीत कसे झाले आणि जातिसंहाराच्या रक्तपाताने डागाळलेला हा प्रवास अखेरीस त्यांच्या स्वत:च्या हत्येपाशी जाऊन कसा थांबला, याचे वर्णनही या पुस्तकात आहे.
12)राजश्री शाहू छत्रपती – धनंजय कीर
मुळ किंमत - 725₹
We read Price - 755₹घरपोच(शिपिंग फ्री)
धनंजय कीर ह्यांनी लिहिलेले हे शाहू छत्रपतींचे चरित्र आहे. व्यक्ती वादग्रस्त आणि ज्या समाजात ती वावरली तो समाजही वादळी. या दोघांचे वस्तुनिष्ठ आणि अभिनिवेशरहित चित्रण करणे अवघड. पण किरांकडे चरित्र लेखनाची किमया आहे. ‘नामूलं लिख्यते’ ही धारणा आहे आणि चरित्रविषयांप्रमाणे रूप घेणारी लेखनकला आहे. त्यामुळे हे चरित्र वाचनीय झाले आहे. समाजक्रांतीचा प्रेषित असणारा मनुष्यच महान ठरतो, हे कीरांच्या चरित्रलेखनाचे सूत्र आहे. सावरकर, आंबेडकर, फुले यांच्या चरित्र-परंपरेतील, शाहू छत्रपती हे एक पुढचे पाऊल आहे.
13)अवघा देहचि वृक्ष जाहला - वीणा गवाणकर
We Read -250₹घरपोच (शिपिंग फ्री)
"माणूस इथूनतिथून एकच आहे, यावर माझा विश्वास आहे. सर्व सजीव परस्परावलंबी आहेत, परस्परपूरक आहेत. पृथ्वीबाबत आपण न्याय्य वर्तन केलं नाही, तर या ग्रहावर आपण टिकून राहणं अशक्य आहे. कोणताही विकास पूर्ण समजुतीनंच व्हायला हवा. सर्व प्रकारच्या संजीवांचा त्यात विचार व्हायला हवा. निसर्गातील संतुलन राखलं गेलं पाहिजे... खनिज, वनस्पती, प्राणी, माणूस... सर्वांमध्ये! " हे विचार आहेत रिचर्ड बेकर यांचे. वृक्षांचे संगोपन, संवर्धन आणि संरक्षण यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्चणार्या पर्यावरणरक्षकाची ही प्रेरणादायी चरितकहाणी...
14)त्याने गांधींना का मारलं - अशोक कुमार पांडेय
New/paperback
मुळ किंमत - 300₹
We read Price - 250₹ घरपोच.
हे पुस्तक स्वातंत्र्यलढ्यात विकसित झालेल्या अहिंसा
आणि हिंसा या तत्त्वज्ञानांच्या दरम्यानच्या गुंतागुंतीच्या
सामाजिक-राजकीय कारणांचा शोध घेत गांधींच्या
हत्येमागची कारणं समोर आणतं. त्याबरोबरच
गांधीहत्येला योग्य (?) ठरवणाऱ्या कारणांच्या मुळांशी
जाऊन त्यांची पुराव्यानिशी शहानिशा करतं. हे पुस्तक
गांधी हत्येच्या कटातील फक्त अस्पर्श पैलूच उघड करत
नाही, तर अखेरीस गांधीहत्येचं कारण असलेल्या
वैचारिक षड्यंत्राचा बुरखा फाडण्यातही ते यशस्वी ठरतं.
15)किटाळ-लक्ष्मण माने
We read - 275₹ घरपोच.
उपरा’कार लक्ष्मण माने...कैकाडी समाजातल्या या माणसाने शिक्षण घेतलं, प्रतिष्ठा मिळवली, लोकप्रियताही मिळवली...यशवंतराव चव्हाण, शरद पवार, अनिल अवचट, डॉ. बाबा आढाव यांच्यासारख्या नामवंतांच्या हृदयात स्थान मिळवलं...असंख्य वंचितांना मार्गाला लावलं...वंचितांच्या मुलांसाठी शिक्षणसंस्था सुरू केली...आमदारही झाले...पद्मश्रीपर्यंत मजल मारली...आणि वयाच्या साठीनंतर जीवनाची कृतार्थता त्यांना धन्य करत असतानाच त्यांच्यावर आलं एक `किटाळ’...साधंसुधं नव्हे...सहा बायकांवर बलात्कार केल्याचं...आणि मग...माध्यमांनी केलेली बदनामी, सगळ्या कुटुंबावरच झालेला आघात, पोलीस कोठडीत, न्यायालयीन कोठडीत अनुभवावा लागलेला नरक...त्या दरम्यान आलेले काही भले अनुभव...मनात चाललेलं द्वंद्व... याबद्दलचं निवेदन...त्यांच्याच संस्थेत काम करण्याऱ्या बायका का उलटल्या त्यांच्यावर? विद्रूप चेहऱ्याच्या माणसांनी रचलेल्या षड्यंत्रातून बाहेर पडण्यासाठी माने यांनी केलेला संघर्ष त्यांच्याच जळजळीत भाषेत...
16)समिधा – साधना आमटे
We read - 325₹ घरपोच.
बाबा आमटे यांच्या लोकविलक्षण जीवनाला साथ देत असताना साधनाबाईंनी अपार कष्ट केले. अग्निदिव्ये म्हणावीत अशा प्रसंगांतून निर्भयपणे वाटचाल केली आणि हे सारे सहजतेने व आनंदाने सोसताना त्यांनी स्वतःच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्यही टिकविले. बाबा आमटे यांच्यासह जीवन जगताना आलेले कडू-गोड अनुभव त्यांनी ‘समिधा’मध्ये मांडले आहेत.
17)डॉ.बाबासाहेब आंबेडकर – धनंजय कीर
मुळ किंमत - 900₹
We read Price - 785 ₹घरपोच(शिपिंग फ्री)
एवढी तेवढी प्रतिकूलता कोणाच्याही वाट्याला कधीमधी येते. पण जन्माबरोबरच प्रतिकूलता डोंगरासारखी पुढ्यात हजर असलेल्या माणसाने काय करावे? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात प्रतिकूलतेने जे तांडव घातले ते पचवून बाबासाहेब माणूस म्हणून प्रस्थापित झाले, चैतन्याने लक्षलक्ष उजळून निघाले. ती दीप्ती अशी अभिनव होती की तिने बाबासाहेबांच्या कोटीकोटी बांधवांना जागृत करून ‘मदायत्तं तु पौरुषं’चा मंत्र त्यांच्या प्राणांत भरला आणि त्यांना माणूस म्हणून जगायला शिकवले.
18)पुन्हा तुकाराम – दिलीप पुरुषोत्तम चित्रे
मुळ किंमत - 550₹
We read Price - 475₹घरपोच.(शिपिंग फ्री)
पुन्हा तुकाराम’ मराठी साहित्य कोपर्निकन क्रांती करणारी कृती आहे असे म्हणण्यात अतिशयोक्ती नाही. मराठी काव्यविश्वाच्या केंद्रस्थानी तुकोबा आणि इतर कवी परिघावर अशी एक प्रकारची उत्पाती उलटापालट चित्रे यांनी घडवून आणली.
…मुद्दा तुकारामगाथेचे वारंवार काळजीपूर्वक परिशीलन करून (ही (एक प्रकारची वारीच) तिच्यात अनुस्युत असलेली काव्याची संकल्पना स्पष्ट करणे, स्वत: तुकोबांच्या काव्यजाणिवेवर प्रकाश टाकणे आणि त्यातून काव्यसमीक्षेची काही मूल्ये हाती लागतात का हे पाहणे, तसेच त्यांचा मराठी संवेदनस्वभावाशी आणि संस्कृतीशी ऐतिहासिक परिप्रेक्ष्यातून संबंध जोडून आवश्यक होते हा आहे. चित्र्यांनी नेमके हेच केलेले आहे. परंतु हे करताना त्यांना अपरिहार्यपणे मानदंड परिवर्तनाकडे (Paragigm Shift) जावे लागले आहे. आणि नेमकी इथेच मराठी समीक्षकांची गोची झालेली दिसून येते.
19) रणगंधाचे गारुड – ना. धों. महानोर
We read Price - 355₹घरपोच.(शिपिंग फ्री)
आज लिखित पत्रांची संस्कृती जवळपास लोप पावण्याच्या अवस्थेत आलेली असताना आडबाजूच्या गावी राहणाऱ्या एका कवीला आलेली ही पत्रे पत्रांच्या केवळ संख्येच्याच दृष्टीने नव्हे तर ती धाडणाऱ्या व्यक्तींचे व विषयांचे वैविध्य याही दृष्टीने अगदी विस्मयजनक म्हणावीत अशीच आहेत….
या पत्रसंग्रहाला ‘रानगंधाचे गारूड’ हे शीर्षक अनेक अर्थांनी अन्वर्थक वाटते. शहरी सभ्यतेत वाढलेल्यांना अपरिचित असलेला रानगंधाचा दरवळ, त्याची अनवट उन्मादकता, अनोखा व अस्वस्थ करणारा, भुरळ पाडणारा व सर्वव्यापी असलेला परिमल या सगळ्या गोष्टी ध्यानात घेता रानगंध ही प्रतिमा ना. धों. महानोरांच्या व्यक्तिमत्त्वाशी एकदम सुसंवादीच ठरते.
20)नाझी भस्मासुराचा उदयास्त -वि.ग कानिटकर
Paperback/New
मुळ किंमत - 525₹
We read Price - 485₹ घरपोच.(शिपिंग फ्री)
नाझी भस्मासुराच्या उदयास्ताचा इतिहास सांगण्याची आवश्यकता
अशाकरिता आहे की, या पर्वातील विलक्षण घटनांची ओळख
सर्वांनाच झाली पाहिजे. लोकशाही मृत्युशय्येवर कशी जाते?
हुकुमशहा सत्तेवर कसे येतात? राजकारणातले यश नेहमीच
डागाळलेले का असते? युद्धाने प्रश्न सुटतात का? या व अशा
अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी या इतिहासाची मदत होईल.
21)द हंग्री टाइड-अमिताव घोष
मुळ किंमत - 550₹
We read Price - 450₹घरपोच.(शिपिंग फ्री)
हंग्री टाइड ही कलकत्ता आणि बंगालच्या उपसागरातील बेटांच्या विशाल द्वीपसमूहातील एक समृद्ध गाथा आहे. बेटांचा हा विशाल द्वीपसमूहच अमिताव घोष यांच्या नवीन कादंबरीची मांडणी करतो. सुंदरबनमध्ये समुद्राच्या भरती १०० मैलांपेक्षा जास्त अंतरापर्यंत पोहोचतात आणि दररोज हजारो हेक्टर जंगल नाहीसे होते आणि काही तासांनंतर पुन्हा उगवते. याच पार्श्वभूमीवर दुर्मीळ डॉल्फिनच्या शोधात आलेली पियाली, तिला डॉल्फिन शोधण्यात सहाय्यक ठरणारा फोकीर, कनाई या प्रमुख पात्रांभोवती फिरणारी ही कादंबरी घडते.खारफुटीच्या जंगलातली समृद्ध जलसंपदा, वाघोबाच्या भीतीनं आदिवासी जीवनात उदयाला आलेल्या लोककथा आणि जंगल भयाचं आव्हान पेलतही निसर्गावर मनमुराद प्रेम करणाऱ्या माणसांची ही गोष्ट आहे. जी सुंदरबनच्या जंगलातून अनहद प्रवास घडवते.
22)अग्निपंख -डॉ.एपीजे अब्दुल कलाम
Binding: Paperback
पृष्ठ संख्या - 195
मुळ किंमत - 220₹
We Read किंमत -220₹ घरपोच (शिपिंग फ्री)
डॉ. ए पी जे अब्दुल कलाम. या आत्मचरित्रात त्यांनी एका बाजूने आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारतानाच दुस-या बाजूला अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडणही फार सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे. हे पुस्तक केवळ डॉ. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र नसून स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञानविषयक लढाईचे एक स्पंदन आहे. जागतिक शस्त्रस्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे; तसेच स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे ते मनोहारी खंडकाव्यही आहे. '
23)सेपियन्स -युवाल नोवा हरारी
Paperback/New
मुळ किंमत - 500
We read Price - 400 घरपोच.(शिपिंग फ्री)
१ लाख वर्षांपूर्वी माणसाच्या कमीत कमी
६ जाती पृथ्वीवर राहत होत्या. आज फक्त एकच शिल्लक आहे.आपण होमो सेपिअन्स
आपण पृथ्वीवर अधिसत्ता कशी स्थापन केली?
आपल्या भटक्या पूर्वजांनी एकत्र येऊन शहरं आणि
राज्य कशी स्थापन केली?
देव, राजे आणि मानवी हक्क अशा गोष्टींवर आपण कसा
विश्वास ठेवायला लागलो?
आणि येणाऱ्या सहस्रकांमध्ये आपलं जग कसं असेल?
माणसाची विचारपद्धती, त्याचं वर्तन, त्याची बलस्थानं आणि त्याचा
भविष्यकाळ यांबद्दलच्या आपल्या सगळ्या समजुतींना आव्हान देणारं
विचारप्रवर्तक पुस्तक... सेपिअन्स!
24)भावनिक प्रथमोपचार घराच्याघरी ~ डॉ. हमीद दाभोलकर
We read - 200₹घरपोच (शिपिंग फ्री)
प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी - • टेन्शन येते, अपयशाला सामोरे जावे लागते • कधी रागाचा भडका, तर कधी दु:खाचा पूर भेटतो • नकोशा घटना घडतात • व्याधींचा, वार्धक्याचा सामना करावा लागतो • नाती जुळतात, नाती तुटतात; कौटुंबिक नाती बिनसू लागतात • लैंगिक समस्या उद्भवतात. या सार्याचा सांधा शरीराइतकाच जुळलेला असतो मनाशी. मानसिक व्याधींसाठी डॉक्टरांकडे जाण्याच्या खूप आधी गरजवंत व्यक्तीला आधार मिळू शकतो कुटुंबीयांकडून, नातेवाइकांकडून, सुहृदांकडून, हितचिंतकांकडून, शासनाकडून आणि अवघ्या समाजाकडून. सामाजिक स्वास्थ्याची, मानसिक आरोग्याची जपणूक करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला जाणकार बनवणारे -
25)अखेरची लढाई
मुळ किंमत - 240₹
We read - 190₹घरपोच (शिपिंग फ्री)
अखेरची लढाई ही कादंबरी सवाई माधवराव पेशवे आणि नाना फडणीसांच्या जीवनातील विविध घटना-प्रसंगांवर आधारित आहे. नाना फडणीस उणीपुरी दोन तपे पेशवाईच्या कारभारात होते. सवाई माधवराव पेशव्यांच्या माता-पित्याचे अकाली निधन झाल्यानंतर पेशवाईचा वारस म्हणून त्यांनी सवाई माधवरावांची डोळ्यांत तेल घालून काळजी घेतली. त्यांचा आपल्या पुत्राप्रमाणे सांभाळ केला.
26)खऱ्या शिक्षणाच्या शोधात -डेव्हिड ग्रीबल
We read -325₹ With शिपिंग घरपोच
खऱ्या शिक्षणाच्या शोधात ' या पुस्तकात ब्रिटन, इव्कॅडोर, भारत, इस्त्रायल , जपान, न्यूझीलंड, स्विझरलँड आणि अमेरिका या देशांतील शाळांचे वर्णन आहे. शाळेची पूर्ण फी भरण्यास तयार असलेल्या आणि चोखंदळपणे निवडलेल्या पालकांच्या नात मुलांपासून ते इतर शाळांनी बाद केलेल्या, तसचं दारिद्रयात खितपत पडलेल्या कुटुंबातील मुलांपर्यंत सर्व प्रकारची मुलं या शाळांचे विद्यार्थी आहेत. शाळांचे परिसरदेखील तितकेच वैविध्यपूर्ण आहेत. त्यांत उपेक्षितांची वस्ती असलेली हार्लेम सिटी आहे. दिल्लीतला आश्रम आहे.
27)एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर
मुळ किंमत -250₹
We read किंमत - 225₹ घरपोच (शिपिंग फ्री)
अधिकाधिक उपभोगांच्या हव्यासामुळे,
एका विचित्र वळणावर
सारी मानवजात येऊन ठेपली आहे.
आता आपल्या सर्वांपुढे केवळ दोनच
पर्याय उरलेले आहेत.
नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश करणार्या
आजवरच्या या आत्मघातकी मार्गावर
हताशपणे वाटचाल करायची
किंवा परत मागे फिरून कार्व्हरने
दाखवलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या
संवर्धन-विकास-उपयोग-पुनर्भरण
या शाश्वत कृषिसंस्कृतीचा स्वीकार करायचा.
भावी पिढ्यांच्या सुख-समृद्धीचा पाया
घालायचा असेल तर
प्रत्येक सुजाण नागरिकाने वाचायलाच
हवे असे पुस्तक.
28)स्टार्टअपविषयी सर्व काही -अनंत सरदेशमुख
Binding: पेपरबॅक
मुळ किंमत -300₹
We Read किंमत -275₹घरपोच (शिपिंग फ्री)
स्टार्टअप म्हणजे नेमकं काय, इथपासून स्टार्टअप उद्योजकांची अपेक्षित गुणवत्ता, उद्योगकल्पनेचा शोध, उद्योगाची आखणी, भांडवलउभारणी, स्टार्टअपची रचना आणि व्यवस्थापन, स्टार्टअपचा वाढविस्तार अशी चौफेर नि समग्र मांडणी करणारं मराठीतलं एकमेव सोपं आणि माहितीपूर्ण पुस्तक... स्टार्टअपविषयी सर्व काही अनंत सरदेशमुख यांचे ‘स्टार्टअपविषयी सर्व काही' हे पुस्तक माहितीपूर्ण, बोधप्रद व स्फूर्तिदायक आहे. रंजक संवादातून विषयाची प्रस्तुती, एका बैठकीत पुस्तकाचे पूर्ण वाचन करायला लावते.
29)मऱ्हाटा पातशाह -केतन कैलास पुरी
Paperback/New
मुळ किंमत - 300₹
We read Price - 255₹ घरपोच.(शिपिंग फ्री)
अजिबात कसली अलंकारिक भाषा नाही कि जड शब्दाची सद्दी नाही. सहजसोपी आणि प्रत्येकाला समजेल अशा भाषेनं शिरसवाडी समृद्ध आहे.शिरसवाडी म्हणजे डोंगराच्या कुशीत वसलेल्या एका छोट्या गावाची आणि गावातल्या साध्याभोळ्या लोकांची निर्मळ गोष्ट. प्रत्येकानं वाचावा आणि आपल्या घरातल्या ग्रंथालयात जपून ठेवावा, असा हा ऐवज आहे.
शिवाजी महाराजांच्या सर्वात पहिल्या चित्राची निर्मिती ज्या प्रसंगी झाली, त्याचे केलेले वर्णन.. एका उत्कृष्ट चित्रकाराकडून.. एक असा व्यक्ती जो शिवाजी महाराजांना भेटला, त्यांची चित्रे काढली.. पण आजही इतिहासाच्या पानांमध्ये हरवला आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व समकालीन चित्रांचा, त्यांच्या राजयोगी व्यक्तिमत्वाचा ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे घेतलेला मागोवा म्हणजेच “मन्हाटा पातशाह”….
30)भंडारभोग आणि चौंडक' - राजन गवस
मुळ किंमत - 420₹
We Read - 375₹ घरपोच (शिपिंग फ्री)
रूढीपरंपरांचा बळी म्हणजे देवदासी... याच रूढीपरंपरांचा आणखी एक बळी म्हणजे जोग्या! ग्रामीण भागात असे देवीला वाहिलेले किती तरी जोगते आढळतात. यांचं जीवन देवदासीपेक्षाही भयावह...! देवदासी झुलवा लावू शकते. एखाद्या पुरुषाची रखेल म्हणून राहू शकते. ती मेली, तर प्रेताला माणसं जमतात. कुणाच्या तरी बांधाला जागा मिळते; पण जोगत्याच्या तिरडीला माणूसच मिळणं कठीण... त्याचा स्पर्शही इंगळीसारखा... त्याच्या नशिबी फक्त अंधार... तोही पुरुषासारखा पुरुष असतो; पण रूढीपरंपरांच्या ओझ्यानं त्याला सगळंच गमवावं लागतं तर,
आपल्या समाजातील देव, धर्म, अनिष्ट रूढीपरंपरांचा बळी म्हणजे देवदासी. `जोगतीण देवाची, मालकी गावाची` ही आपल्या बोलीतील म्हण तिच्या जगण्याचं सार सांगते. देवाच्या नावावर समाजातील राक्षसी वृत्तींनी निर्माण केलेल्या प्रथेच्या बळी ठरलेल्या देवदासी स्त्रियांची होरपळ `चौंडकं` ही कादंबरी वाचकांसमोर ठेवते. स्त्रीदु:खाचा नेमका वेध, बोलीची सर्व सामर्थ्य पचवून राजन गवस यांनी `चौंडकं`मध्ये घेतला आहे. `सुली`च्या व्यक्तिरेखेतून एक ठसठशीत वेदना आपल्यासमोर येते. देवदासीच्या जगण्यातील सर्व दु:ख आणि तिच्या समस्यांचा वेध घेणारी कादंबरी म्हणून `चौंडकं`ची नोंद विशेषत्वानं करावी लागेल.
31)जॉर्ज ऑर्वेल ~ विशाखा पाटील
मुळ किंमत - 400₹
We read Price - 365₹घरपोच.(शिपिंग फ्री)
जॉर्ज ऑर्वेल ‘१९८४’ आणि ‘अॅनिमल फार्म’ या कलाकृतींनी जागतिक साहित्यात मोहर उमटवणारा निर्भीड कादंबरीकार. धारदार, तर्कशुद्ध आणि स्फटिकशुभ्र भाषेत लिहिणारा निबंधकार. हुकूमशाही आणि साम्राज्यशाहीचा कट्टर विरोधक. अनुभवांच्या शोधात बेघर फिरस्त्यांसोबत राहणारा मानवतावादी. जिवावर उदार होऊन लढणारा शूर सैनिक.
हळव्या मनाचा बाप. हा मनस्वी लेखक कसा जगला? त्याचे सार्वकालिक ठरलेले विचार कोणत्या विलक्षण अनुभवांच्या मुशीतून घडले? कोणत्या विचारांचं बीज पेरत होता तो? त्याच्या आयुष्याची आणि साहित्याची ही कहाणी.
32)झांबळ -समीर गायकवाड
मुळ किंमत - 280₹
We Read - 255 घरपोच (शिपिंग फ्री)
भेटलेली माणसे घनदाट होती !
थेट पोचायास कोठे वाट होती ?
कवीश्रेष्ठ सुरेश भट यांच्या ह्या काव्यपंक्ती आहेत.
काळजाला हात घालण्याची ताकद या ओळींत
आहे. याच तोलामोलाची माणसं या कथांत
भेटतील, ही माणसं अनेकाथांनी घनदाट होती.
त्यांच्यातली माणुसकी ओतप्रोत होती, मानवी
जीवन मूल्यांवरचा त्यांचा विश्वास अफाट होता,
त्यांची नाती अतुट मायेची होती आणि मुख्य
म्हणजे अंधाराच्या उंबऱ्यावरच्या प्रकाशखुणा
त्यांच्या भाळी होत्या. ही माणसं आपल्या
अवतीभवतीच असतात तरीही त्यांच्यातल
वेगळेपण आपल्याला उशिराने जाणवतं.
33)अर्थसाक्षर व्हा - अभिजित कोलपकर CA
मुळ किंमत - 400₹
We read Price - 355₹घरपोच.(शिपिंग फ्री)
आपण कमावलेले पैसे कुठे जातात हे समजत नसेल आणि तुम्हाला आर्थिक यश प्राप्त करुन समाधानी आयुष्य जगायचे असेल तर हे पुस्तक उपयोगी आहे.
तुमचे उत्पन्न किती आहे यापेक्षा मिळवलेल्या पैशाचा विनियोग तुम्ही कसा करावा, योग्य आर्थिक नियोजन करुन विविध ध्येये कशी साध्य करावी, विमा व कर्ज व्यवस्थापन कसे करावे, सुयोग्य गुंतवणूक करुन तुमच्या बचतीच्या पैशाला कसे कामाला लावावे याचे उत्तम मार्गदर्शन ’अर्थसाक्षर व्हा’ मधे वाचायला मिळते
34)आर्टिफिशियल इंटेलिजन्स -अच्युत गोडबोले
मुळ किंमत - 250₹
We read किंमत - 225₹घरपोच (शिपिंग फ्री)
आर्टिफिशियल इंटेलिजन्स १९५० च्या दशकांपासून बघितलं गेलेलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं स्वप्न अनेक खाच खळगे पार करत मशीन लर्निंग, डीप लर्निंग, न्यूरल नेटवर्क्स, नॅचरल लँग्वेज अशा अनेक तंत्रज्ञानांच्या मदतीनं आता पूर्णत्वास येतंय. कला क्षेत्रासकट सगळ्या क्षेत्रात धुमाकूळ घालायला ते आता सज्ज झालंय. या कल्पनेमागचा इतिहास, वेगवेगळ्या तंत्रज्ञानांची ओळख, त्याचे उपयोग, त्याचे भविष्यात होणारे विपरीत परिणाम, UBI या सगळ्याचा वेध घेणारं पुस्तक म्हणजे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’
35)फुकटचेच सल्ले~डॉ.रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी
185₹ घरपोच (शिपिंग फ्री)
वाचाल तर वाचाल, असे आम्हाला शिकवले गेले होते. म्हणून आम्ही वाचत गेलो आणि वाचलेले जे काही होते त्यामुळेच संपन्नपणे वाढलो. अलीकडेही ‘वॉचाल' तर बिघडाल असे पोटतिडकीने सांगूनही वाचनावर बहिष्कार का टाकला जात आहे, याचा उलगडा होऊ शकत नाही. अनुत्तरित प्रश्नांवर खूप चिंतन करून उत्तर शोधायचे असते म्हणून आम्ही त्या शोधात वेळोवेळी जे काही लिहीत गेलो त्यातील काही लिखाण ‘फुकटचे सल्ले' म्हणून या पुस्तकात एकत्रितपणे दिले आहे.हे सल्ले फुकटचे असले तरी त्यांना अनुभवांचा आधार आहे. म्हणून ते महत्त्वाचे ठरतात. तेव्हा सदरचे पुस्तक विकत घेऊन आमचे हे फुकटचे सल्ले आपल्या जीवनात उपयोगात आणाल अशी आशा आहे.
36)छावा -शिवाजी सावंत
मुळ किंमत - 750₹
We read Price - 675₹घरपोच
आजतागायत संभाजीमहाराजांच्या पराक्रमाच्या वर्णनाची मोहिनी कायम राहिली आहे. संभाजीराजांचे तामसी, अविचारी रूप पुसून टाकून संवेदनशील, हळवं, करारी आणि देशप्रेमी रूप या चरित्रातून दृगोचर होतं. 'संभाजीराजे खरच व्यसनांध असते, तर शेवटच्या कठोर साजेच्या प्रसंगी पारच ढासळले असते. कारण ती साजाच तेवढी क्रूर आणि अमानवी होती, ' असं सावंत दाखवून देतात.
37)आंबेडकर अनुयायांच्या नजरेतून
Paperback/new
मुळ किंमत - 250₹
We read Price - 225₹घरपोच.(शिपिंग फ्री)
प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या डॉ . भी . रा . आंबेडकर यांच्याजवळ जाण्याचा एक प्रयत्न म्हणजे हे पुस्तक आहे . आंबेडकरांना जन्मभर साथ केलेला आणि त्यांच्या सोबतच अस्ताला गेलेल्या क्षणभंगुरतेचे पुनरुज्जीवन हा यामागचा उद्देश आहे .
38)मी संदर्भ पोखरतोय -पवन नालट
मुळ किंमत - 280₹
We read Price - 250₹घरपोच (शिपिंग फ्री)
मला माहीत होतं थडग्यांवर जीव लावणारी माणसं सर्वच धर्मांत असतात माणसांवर जीव लावणारी माणसं सापडत नाहीत कुठेही! धर्मानं बांधल्या होत्या कधीच्याच कबरी माणसाचं अस्तित्व खोल पुरून कधी मंदिरावर उभारलेल्या कळसामधून कधी मशिदीवर रोवलेल्या चंद्रकोरीमधून माणसांच्या विचारांना विचारांनी तिलांजली देणारी माणसं विवेकाचा कत्लेआम करत असतात दररोज...
39)मोठी माणसं -नरेंद्र चपळगावकर
मुळ किंमत - 300₹
We Read -255₹घरपोच (शिपिंग फ्री)
पारतंत्र्य आणि स्वातंत्र्य यांच्या संधिकाळात आपल्या समाजजीवनावर अनेक व्यक्तींनी प्रभाव टाकला, त्यातील काहींची ही व्यक्तिचित्रे . त्यांची कार्यक्षेत्रे, त्यांचे राजकीय विचार, त्यांच्या कार्यपद्वती आणि त्यांच्या जीवननिष्ठाही वेगवेगळ्या असल्या तरी त्यांच्यात एक समान सूत्र आहे.
40)लोकांचे संविधान~रोहित डे 🌱
मुळ किंमत-500₹
425₹घरपोच (शिपिंग फ्री)
संविधानवाद ही वसाहतोत्तर भारताची नियामक चौकट कशी झाली, हे सांविधानिक व प्रशासकीय प्रक्रियांच्या सामाजिक इतिहासाद्वारे उलगडून दाखवण्याचा प्रयत्न प्रस्तुत पुस्तकात केला आहे. काहीएक सहेतूक कथन उभं करण्यापेक्षा नागरिक व वसाहतोत्तर राज्यसंस्था यांच्यात झालेल्या अनेक सांविधानिक झगड्यांच्या सूक्ष्म तपशिलांची मांडणी इथे केली आहे.
या पुस्तकात चार प्रकरणं आहेत आणि त्यांना त्या-त्या क्षेत्रात प्रबळ ठरलेल्या अग्रगण्य खटल्याचं नाव दिलं आहे. प्रचलित कायदेशीर निवाड्याच्या औपचारिक शिस्तीला आणि लोकाभिमुख कायदाविषयक लेखनाच्या प्रकाराला मानवंदना म्हणून प्रकरणांना अशी शीर्षकं दिली आहेत. अर्ल स्टॅन्ली गार्डनर यांनी पेरी मॅसन या मध्यवर्ती पात्राला घेऊन लिहिलेल्या कायदा क्षेत्रातील रहस्यकथा किंवा जॉन मॉर्टिमर यांनी लिहिलेल्या न्यायालयीन नाट्यांवर आधारित कादंबऱ्या अजूनही भारतात लोकप्रिय आहेत. खालिद लतिफ गौबा व कैलाशनाथ काटजू यांच्यासारख्या वकिलांनी प्रसिद्ध खटल्यांविषयी लिहिलेली विषयाधीनतेकडे कलणारी पुस्तकं खूप विक्री ठरली आहेत.
41)द आंत्रप्रन्योर - शरद तांदळे
Paperback/new
मुळ किंमत - 250
We read Price - 220 घरपोच.(शिपिंग फ्री)
द आंत्रप्रन्योर हे पुस्तक माणसाला विशेषता तरुणांना स्वताची औकात दाखऊन देणारं पुस्तक आहे. शरद तांदळे सरांनी त्यांचा जीवन प्रवास मंडला आहे. ते वाचतांना असे वाटले की माझा आणि त्यांचा जीवन प्रवास सारखाच आहे.
42)बा भीमा (कॉमिक्स) भाग -1 ♥️
185₹घरपोच (शिपिंग फ्री)
43)आपले भवताल -डॉ.नितीन हांडे
मुळ किंमत - 200
We read किंमत - 185₹ घरपोच (शिपिंग फ्री)
44)डोंगरी ते दुबई - हुसैन झैदी
मुळ किंमत -495₹
We read किंमत - 395₹ घरपोच (शिपिंग फ्री)
मुंबईवर ६० वर्षे आपला प्रभाव पाडणारे गुंडाच्या टोळ्यांचे डॉन होते. त्यात हाजी मस्तान, करीम लाला, वरदराजन मुदलियार, छोटा राजन, अबू सालेम हे होते. पण या सर्वांवर कडी केली ती दाऊदने. या सर्वांची तपशीलवार माहिती काढून अभ्यासपूर्वक त्यांच्यावर लिहिलेले हे पहिलेच पुस्तक आहे.
45)श्रीमानयोगी -रणजित देसाई
मुळ किंमत -570₹
We read- 485₹घरपोच (पाठवण्याचा खर्च नाही)
श्रीमान योगी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील अतिशय उत्कृष्ट कादंबरी आहे. या कादंबरीचे एकूण अकरा भाग आहेत आणि प्रत्येक भागात अनेक प्रकरणं आहेत. पूर्ण कादंबरीत कुठेही घटनांच्या तारखा आणि साल न दिल्याने वाचणे सुसह्य होते. श्रीमान योगी...हे नक्की चरित्रलेखन आहे की आत्मकथन असा पानोपानी प्रश्र्न पडावा इतक्या मधूर आणि आत्मीय शब्दसंपन्नतेत सखोल मांडणी तेही भावनीक ओल कुठेही हलू न देता.
46)सलोख्याचे प्रदेश -सबा नक्वी
मुळ किंमत - 250₹
We read किंमत - 225₹घरपोच (शिपिंग फ्री)
भारतात अनेक जाती - धर्मांचे लोक राहतात. प्रत्येक समाजाच्या चालीरीती, रूढी परंपरा वेगळ्या असतात. तरी 'अनेकतात एकता' म्हणतो त्याप्रमाणे येथील प्रमुख हिंदू व मुस्लीमांच्या परंपरा, सण, उत्सव, एकत्र साजरे होतात.
अशा काही ठिकाणी भेट देऊन तेथील समजाचे चित्रण सवा नक्वी यांनी 'सलोख्याचे प्रदेश' मधून दाखविले आहे.
47)लॉर्ड्स ऑफ द डेक्कन – अनिरुद्ध कणिसेट्टी
मुळ किंमत - 500₹
We Read -455₹घरपोच (शिपिंग फ्री)
नपेक्षा -अशोक शहाणे
मुळ किंमत - 250₹
We read किंमत - 225घरपोच (शिपिंग फ्री)
48)पारधी -गिरीश प्रभुणे
मुळ किंमत - 450₹
We read Price - 400₹घरपोच.(शिपिंग फ्री)
समाजाने वेशीबाहेर ढकललेल्या आणि ख-याखु-या स्वातंत्र्यापासून आजही वंचित राहिलेल्या एका अन्यायग्रस्त जमातीची ही आक्रोशकथा आहे... त्या जमातीच्या व्यथावेदनांशी समरस होऊन त्या सग्यासोय-यांच्या उत्कर्षासाठी झटणा-या एका तळमळीच्या कार्यकर्त्याने ही मांडलेली कैफियत आहे...
49)पर्व -डॉ.एस.एल. भैरप्पा
मुळ किंमत - 550₹
We read Price - 485₹ घरपोच.(शिपिंग फ्री)
व्यासरचित महाभारतातील आभाळाएवढ्या उंचीची पात्रे; परंतु सगळ्यांचे पाय मातीचे. अवघी जीवनमूल्ये कसोटीला लावणारे समरप्रसंग. संघर्ष. प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व वेगळे. प्रत्येकाच्या प्रेरणा वेगळ्या. प्रत्येकाचे प्राक्तनही वेगळे. त्याचबरोबर अनेक चमत्कार; दैवी शाप; दैवी वर. मानवी पातळीपेक्षा वेगळ्या पातळीवर जाणारे कथानक.
50)महात्मा जोतीराव फुले – धनंजय कीर
मुळ किंमत - 475₹
We read - 425₹घरपोच (शिपिंग फ्री)
51)तेल नावाचं वर्तमान -गिरीश कुबेर
मुळ किंमत :-325₹
We read Price :-295₹घरपोच (शिपिंग फ्री)
गेली अनेक दशकं तेलाच्या विहिरींतून आणि तेलवाहिन्यांतून बरंच ‘काळं सोनं' वाहून गेलं. पण गेल्या दीड-दोन दशकांत घडलेल्या उलथापालथींमुळे तेल एका नव्या वळणावर स्थिरावलं. तापलेल्या वसुंधरेची चिंता वाहणाऱ्या पर्यावरणजाणिवांनी तेलाच्या उपयुक्ततेलाच आव्हान दिलं. इतकी शतकं तेलावर पोसल्या गेलेल्या, औद्योगिक प्रगतीची फळं चाखणाऱ्या, निसर्गावर मात करू पाहणाऱ्या या माणूस नावाच्या प्राण्याच्या यापुढच्या जगण्याचा आधार वसुंधरेच्या गर्भातून निघणारं हे खनिज तेल असेल का? तेलाच्या रक्तरंजित इतिहासानंतर तितक्याच रक्तरंजित वर्तमानाचा वेध.
52)संताजी घोरपडे -रवि मोरे
मुळ किंमत - 250₹
We read Price - 225₹ घरपोच.(शिपिंग फ्री)
53)नास्तिकयात्रा -सुनील दांडेकर
मुळ किंमत -350₹
We read किंमत - 325₹ घरपोच (शिपिंग फ्री)
या पुस्तकाचा उद्देश
तुम्हाला काही पटविण्याचा वा विकण्याचा नाही,
तर काही विचार तुमच्यासमोर तपासायला ठेवण्याचा आहे.
कोणत्याही विचारसरणीबद्दल तुम्हाला साशंक बनवण्याचा आहे.
मग तो विचार विज्ञानातला असो वा देवाधर्माचा !
देव आणि धर्म याबाबतीत आधुनिक विज्ञानाने
जे प्रश्न उपस्थित केले आहेत
आणि अनेक क्षेत्रांमधील अनेक प्रश्नांची
विज्ञानाने जी समर्पक उत्तरे दिली आहेत,
त्यांचा गोषवारा वाचकापर्यंत पोहचविणारी
तर्कवादाच्या दिशेने टाकलेली पाच पावले म्हणजे
नास्तिकयात्रा
54)झाडाझडती - विश्वास पाटील
मुळ किंमत - 425₹
We read Price - 385₹घरपोच.(शिपिंग फ्री)
तुमच्या बागा फुलाव्यात, ऊसमळे झुलावेत, साखर कारखाने निघावेत, यंत्रं चालावीत, तुमच्या घराघरात वीज खेळावी, म्हणून आम्ही आमची गावं आणि आमचं भवितव्य धरणाच्या घशात कोंबलं. विकासाचा नारळ फोडण्यासाठी दगड म्हणून आमची डोकी वापरलीत. खोबरं तुम्हाला मिळालं आणि आम्ही पाण्यासाठी, साध्या स्मशानासाठी भिका मागायच्या. जिवंतपणी आणि मेल्यावरही झडती चालूच. गाव आणि देव पाठीवर बांधून चालणार्याे हजारो धरणग्रस्तांची मन सुन्न करणारी कादंबरी. '
55)औरंगजेब -यदुनाथ सरकार(मराठी)
मुळ किंमत - 550₹
We read किंमत - 500₹घरपोच (शिपिंग फ्री)
56)फुलेल तेव्हा बघू -विनोदकुमार शुक्ल
मुळ किंमत - 300₹
We read किंमत - 255घरपोच (शिपिंग फ्री)
57)रफ स्केचस -सुभाष अवचट
मुळ किंमत - 400₹
We read Price - 355₹घरपोच.(शिपिंग फ्री)
58)धर्म आणि समलैंगिकता -देवदत्त पट्टनायक
(अनुवाद -सोनाली नवांगुळ)
मुळ किंमत - 220₹
We read Price - 200₹घरपोच
59)गढीवरून -राजा गायकवाड
मुळ किंमत -300₹
We Read - 255₹ घरपोच (शिपिंग फ्री)
कृषी-परंपरेतल्या बहुजनांच्या आणि त्यातल्या जराश्या उच्च स्थानावर बसलेल्या किंवा फलाण्या जातीत जन्म घेतल्यामुळे आपण उच्च स्थानावरच आहोत, असं समजून वागणाऱ्या माणसांच्या आत असलेले मानसिक-सामाजिक-सांस्कृतिक आणि राजकीय गंड यांना हात घालणाऱ्या कथा या संग्रहामध्ये बहुसंख्येने आहेत.
60)कास्ट मॅटर्स -सूरज एगंडे
Paperback/New
मुळ किंमत - 460₹
We read Price - 385₹घरपोच.(शिपिंग फ्री)
या स्फोटक पुस्तकात, जगातल्या अनेक खंडांमध्ये शिक्षण घेतलेले पहिल्या पिढीचे दलित अभ्यासक, जातीबाबत खोलवर रुजलेल्या धारणा आणि तिचं बहुस्तरीय स्वरूप विशद करतात. दररोज नरकयातना भोगावा लागणारा दलित आणि प्रेम व विनोदबुद्धीनं भारलेली त्याची अपूर्व बंडखोरीही यात आढळते. दलितांमधील अंतर्गत जातीभेदांपासून ते उच्चभ्रू दलितांचं वर्तन आणि त्यांच्यातील आधुनिक काळातल्या अस्पृश्यतेची विखुरलेली रूपं ब्राह्मणी सिद्धांताच्या अटळ प्रभावाखाली कार्यान्वित असतात. जोवर दलित सत्ता मिळवण्यासाठीच्या लढ्यात नेतृत्वस्थानी नसतील आणि ब्राह्मणवादाविरोधात ब्राह्मण उभे राहणार नाहीत, तोवर जातीचं अस्तित्व राहणार असल्याची मांडणी एंगडे करतात.
61)अवणी T1 -नवाब शफाअत अली खान
मुळ किंमत - 250₹
We read Price - 225₹घरपोच
62)एकलव्य -विजय देवडे
मुळ किंमत - 390₹
We Read -355₹घरपोच (शिपिंग फ्री)
63)जात समजून घेताना~ Gail Omvedt
मुळ किंमत-250₹
We read -225₹ With शिपिंग घरपोच
हे पुस्तक म्हणजे जात आणि जातिअंताचा संघर्ष या ऐतिहासिक विषयाचा अंतर्दृष्टीने घेतलेला अभ्यासपूर्ण शोध आहे. भारतीय परंपरा म्हणजेच हिंदू परंपरा आणि ब्राम्हणी परंपरा ; ब्राम्हण्यवाद म्हणजेच हिंदू धर्म असे स्वाभाविकपणे गृहीत धरले जाते. अंतर ब्राम्हण्यवाद म्हणजे वेदांवर आधारित भारतीय संस्कृती अशा धारणेवर आधारित आणि भारतीय संस्कृतीचा मूळ वारसा आर्याच्या परंपरेतील आहे अशा समग्र गृहीतकाला ही मांडणी आव्हान देते. भारतातील सेक्युलर भूमिकेचा पुरस्कार करणारेसुद्धा याच ‘ब्राम्हण्यवादी दृष्टिकोनात अडकले आहेत.
64)मेळाघाटावरील मोहोर, डॉ.रवींद्र आणि स्मिता कोल्हे
मुळ किंमत - 350₹
We Read किंमत -325₹घरपोच (शिपिंग फ्री)
एका आगळ्या समाजपरिवर्तनाच्या प्रयोगाची ही कहाणी मेळघाट म्हणजे सातपुडा पर्वतातील घनदाट अरण्यप्रदेश. येथे तापी-खापरा-सिपना या नद्यांच्या संगमावरचं गाव बैरागड. दारिद्रयानं पोखरलेलं, आजारानं ग्रासलेलं, अज्ञानात पिचलेलं हे छोटं गाव . १९९० च्या आसपास डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे येथे आले.
65)इंडियाज मोस्ट फिअरलेस
मुळ किंमत -280₹
We Read किंमत -245₹घरपोच (शिपिंग फ्री)
66)शिरसवाडी आणि कंट्या -गणेश बर्गे
मुळ किंमत - 500₹
We read Price - 425₹घरपोच.(शिपिंग फ्री)
67)गणिका, महात्मा आणि एक इटालियन ब्राह्मण – मनू एस. पिल्लई
मुळ किंमत-400₹
355₹ घरपोच (शिपिंग फ्री)
जातव्यवस्थेवर उपरोधात्मक लिहिणारा तंजावूरच्या मराठा घराण्यातील राजपुत्रापासून ते हिंदू
मंदिरातील मस्लीम देवतेपर्यंत-एक गणिका, जी योद्धा-राणी बनली तिच्यापासून ते ग्रामोफोनवर
गाणाऱ्या गणिकेपर्यंत स्तनविहीन स्त्रीपासून ते तीन स्तन असलेल्या देवीपर्यंत- आणि पवित्र
संस्कृतची भक्ती करणार्या ब्रिटिश माणसापासून ते व्हिक्टोरिया महाराणीपर्यंत – या पुस्तकातले
विविध विषयांवरील निबंध भारताच्या भूतकाळाकडे बघण्याची एक खिडकीच उघडतात. त्या
खिडकीतून दिसणारे समृद्ध जग पाहून आपण थक्कच होतो. आणि विचार करू लागतो की, यातील
कितीतरी गोष्टी आपण विसरूनच गेलो आहोत आणि कितीतरी गोष्टी आपण जाणूनबुजून पुसून
टाकल्या आहेत.
68)अखेरचे शिलेदार -पी.साईनाथ
मुळ किंमत - 300₹
We Read -255₹घरपोच (शिपिंग फ्री)
69)बिग बिलियन स्टार्टअप - मिहीर दलाल
मुळ किंमत :-300₹
We read Price :-250₹घरपोच (शिपिंग फ्री)
ई - कॉमर्स , उद्योजकता आणि आपल्या खरेदीच्या सवयी आणि जीवनशैलीला संपूर्णतः नवं स्वरूप देणाऱ्या भारताच्या सर्वात मोठ्या स्टार्टअपचा विश्वासार्ह वृत्तान्त . आय . आय . टी . पदवीधर सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल ह्या दोघांनी बंगलोरमधील एका घरातून चालू केलेलं ' फ्लिपकार्ट पुढे भारतातील सर्वात मोठं ई - कॉमर्स स्टार्टअप बनलं .
70)रिच डॅड पुअर डॅड -रॉबर्ट कियोसाकी
मुळ किंमत-499₹
445₹ घरपोच (शिपिंग फ्री)
गरीब आणि मध्यमवर्गीय लोक पैशांसाठी काम करतात. जीवन तुमच्याशी बोलत नाही, ते तुम्हाला धक्का देतं. प्रत्येक धक्का ही सूचना असते की यातून काही शिक, धडा घे, बदल.
तुमची समस्या तुम्ही स्वतः आहात. तुम्ही स्वतःला बदलू शकता, शिकू शकता, जास्त समजदार बनू शकता.
71)महामाया निळावंती -सुमेध
मुळ किंमत-350₹
We read -325₹ With शिपिंग घरपोच
1992 साली घडलेली एक अजब घटना. एक बाप निळावंतीची पोथी शोधत सह्याद्रीच्या जंगलात येतो. त्याच्यासोबत आहे त्याच्या मुलाचा बर्फात अन मिठात ठेवलेला मृतदेह. ह्या जतन केलेल्या मृतदेहाला जिवंत करण्यासाठी बाप जंगजंग पछाडतो. शेवटी त्याला अनपेक्षितरित्या जंगलात साक्षात निळावंतीचं अस्तित्व सापडतं. बाप आपल्या मुलाच्या मृतदेहाला जिवंत करू शकतो का? वनदेवता निळावंती अजूनही अस्तित्वात आहे का? तिची भाषा म्हणजे कोणती भाषा? निळावंती जर आजही अस्तित्वात असेल तर चारशे वर्षांपूर्वी ती मेली नव्हती का?
72)ब्रेव्ह न्यू वर्ल्ड-अल्डस हक्सले
We read -325₹ With शिपिंग घरपोच
ज्याप्रमाणे पोलादाशिवाय मोटरगाड्या आणि विमानं बनवता
येणार नाहीत, त्याचप्रमाणे सामाजिक अस्थैर्याशिवाय
शोकांतिका लिहिणं शक्य होणार नाही.
ब्रेव्ह न्यू वर्ल्ड १९३२मध्ये प्रसिद्ध झाली तेव्हा हक्सले आणि
त्याचे वाचक दोघांनाही या कादंबरीतील जग हे भयंकारी
डिस्टोपियन जग आहे याची कल्पना होती. पण सांप्रत काळी
‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’ वाचणाऱ्यांची ही एक युटोपिया आहे अशी
चुकीची कल्पना होण्याची शक्यता आहे.
उपभोक्तावादाची वाटचाल अशीच चालू राहिली तर हक्स्लेंच्या
कल्पनेतील जग वास्तवात आलेलं पाहण्याचे दिवस दूर नाहीत.
आजकाल सुख आणि समाधान हेच सर्वोच्च मूल्य झाले आहे.
उपभोक्त्यांचे जास्तीतजास्त समाधान करण्यासाठी जैवतंत्रज्ञान
आणि सामाजिक अभियांत्रिकीचा होणारी वाढता वापर
आपल्याला एका भयंकारी विनाशाच्या दिशेने कसा घेऊन
चालला आहे हे तुम्हाला समजून घ्यायचे असेल तर ब्रेव्ह न्यू
वर्ल्डमधील विज्ञान आणि तंत्रज्ञान, सुखी समाधानी जीवन आणि
आयुष्याचा अर्थ यावरील सखोल ऊहापोह वाचलाच पाहिजे.
73)केदारनाथ 17 जून -डॉ.प्रकाश कोयाडे
मुळ किंमत-390₹
We read -340₹ With शिपिंग घरपोच.
जोपर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत ही गिधाडे जवळ
येत नसतात ! ते आपल्या मरणाची वाट पाहत घिरट्या घालत आहेत,
म्हणूनच आपण मरायचं नाही..."
"आपल्याला जिवंत रहावंच लागेल!"
एका सत्य घटनेवर आधारीत कादंबरी...केदारनाथ १७ जून !
74)लैंगिकता शिक्षण -डॉ.विठ्ठल प्रभू
मुळ किंमत - 250₹
WE Read :- 225₹घरपोच (शिपिंग फ्री)
हा विषय तसा नाजूक आणि स्फोटकसुद्धा. तरीही, लैंगिकता हा तुम्हां-आम्हां सर्वांच्या आयुष्याचा एक अविभाज्य पैलू आहेच. त्यामुळेच लैंगिकता या विषयाबाबतचे संकोच, दडपणं, गाढ अज्ञान अन् गैरसमजही दूर व्हायला हवेत. म्हणून याबाबत ‘योग्य’ काय आणि ‘अयोग्य’ काय, हे सा-यांना समजेल, अशा वैज्ञानिक परिभाषेत लिहिलेलं, ‘वाचावंच’ असं, एका अधिकारी तज्ज्ञाचं पुस्तक. '
75)सो गुड दे कान्ट इग्नोर ~कॅल न्यूपोर्ट 🌱
225₹घरपोच (शिपिंग फ्री)
‘सो गुड दे कान्ट इग्नोर यू’ हे कॅल न्यूपोर्ट यांचं पुस्तक अलीकडेच मराठीत प्रसिद्ध झालं आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद संयोगिता ढमढेरे यांनी केला आहे. दुर्मीळ आणि मूल्यप्रधान कौशल्येच तुम्हाला महान बनवतात, या आशयाला धरून असलेलं हे पुस्तक यशस्वी होण्यासाठी मोलाचं मार्गदर्शन करतं.आपल्याकडील कौशल्यांना अथक परिश्रमाची जोड दिली तर अधिकाधिक संधींची दारे खुली होतात आणि त्यातूनच यशाचा मार्ग सापडतो.
76)अर्ली इंडियन्स ~टोनी जोसेफ
मुळ किंमत-399₹
We Read -345₹घरपोच (शिपिंग फ्री)
आपण भारतीय कोण आहोत ?
आपण कुठून आलो आहोत ?
या गहन प्रश्नांची उत्तरं जाणण्यासाठी पत्रकार टोनी जोसेफ आपल्याला ६५,००० वर्ष मागे म्हणजे जेव्हा आधुनिक मानवांचा किंवा बुद्धिमान मानवांचा पहिला समूह आफ्रिकेतून भारतीय उपखंडामध्ये प्रवेशला त्या कालात घेऊन जातात . अगदी अलीकडेच उपलब्ध झालेल्या डीएनएच्या पुराव्यांचे दाखले देत त्यांनी भारतामध्ये झालेल्या आधुनिक मानव समूहांच्या मोठ्या आणि महत्त्वाच्या स्थलांतरांचा पाठपुरावा केला आहे . त्यामध्ये इसवी सनपूर्व ७००० ते इसवी सनपूर्व ३००० दरम्यान इराणच्या प्रदेशातले शेतकरी समूह तसेच इसवी सनपूर्व २००० ते इसवी सनपूर्व १००० दरम्यान मध्य आशियातील गवताळ प्रदेशातून आलेले पशुपालक आणि इतर स्थलांतरितांचा समावेश आहे . जनुकीय शास्त्रातील आणि याविषयीच्या अन्य संशोधनांतील निष्कर्षांच्या आधारे आपला भूतकाळ उलगडत जाताना जोसेफ भारतीय इतिहासातील काही विवादात्मक आणि खळबळजनक प्रश्नांकडे आपलं लक्ष वेधतात .
77)Atheist with Gandhi' (मराठी)
175₹ घरपोच (शिपिंग फ्री)
आस्तिकता आणि नास्तिकता दोन परस्पर विरोधी मताची माणसे एकमेकांशी चर्चा करत आहेत. परस्परांना तपासून बघत आहेत. मात्र या चर्चेत खंडनमंडन किंवा वादावादीचा खणखणाट नाही. चर्चेच्या ओघात दोघेही एकमेकाला समजून घेतात आणि दोघांमधील नाते अधिकाधिक दृढ होत जाते. गांधीजींच्या निधनानंतर तीन वर्षांनी गोरांनी या आठवणी लिहिल्या आणि तत्कालीन गांधीवादी विचारवंत किशोरीलाल मधुबाला यांनी प्रस्तावनेत या आगळ्यावेगळ्या संबंधाची वैचारिक उकल केली.
78)साद घालतो कालाहारी -मार्क आणि डेलिया ओवेनस
मुळ किंमत-530₹
475₹ घरपोच (शिपिंग फ्री)
'क्राय ऑफ कालाहारी’ हे पुस्तक म्हणजे कालाहारी वाळवंटात सात वर्षे राहिलेल्या मार्क आणि डेलिया ओवेन्स यांच्या जंगली प्राण्यांच्या सहवासातील अनुभवांवर आधारित कादंबरी आहे. त्याचा मंदार गोडबाले यांनी मराठी अनुवाद केला आहे. बदली कपड्यांचा एक जोड आणि एक दुर्बीण वगळता बाकी विशेष काही न घेता मार्क आणि डेलिया या तरुण अमेरिकन जोडप्याने प्राणिजीवनाचा अभ्यास करण्यासाठी आफ्रिकेचे विमान पकडले. तिथे पोहोचल्यावर एक जुनाट लँडरोव्हर गाडी विकत घेऊन त्यांनी कालाहारी वाळवंटात (डिसेप्शन व्हॅली) खोलवर मजल मारली.
79)इन्व्हेस्टॉनॉमी ~ प्रांजल कामरा
245₹ घरपोच (शिपिंग फ्री)
तुम्हाला शेअर बाजारात पैसे गुंतवायला भीती वाटते का?
गुंतवणूक सुरू करण्याआधी आपण त्यात तज्ज्ञ असले पाहिजे असे तुम्हाला वाटते
का?
हा सगळा प्रकार म्हणजे बेटींग, जुगार आणि नशीब यांचा आहे असे वाटते का?
असे प्रश्न तुम्हाला पडत असतील तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे म्हणून समजा
आधुनिक मूल्यात्मक तत्वे काय आहेत एवढेच इन्व्हेस्टॉनॉमी समजावून सांगत नाही
तर ते शेअर बाजारातील बरीच गुपितेही आपल्यासमोर उघड करते. पीके म्हणतात की,
‘एखादा मॅट्रीक पास झालेला माणूसही शेअर मार्केटमध्ये जोरदार गुंतवणूक करत
असतो.’या सगळ्याला तशी मानसिकता लागते. तशी मानसिकता जोपासण्यासाठीच
तर या पुस्तकाचा घाट घालण्यात आला आहे.
जेवढे जेवढे तुम्ही जास्त शिकाल तेवढे तेवढे तुम्ही त्यात चक्रवाढ व्याजाने तरबेज
बनाल हे सांगणे नलगे.
80)डेझर्टर -विजय देवधर
मुळ किंमत-425₹
We read -345₹ With शिपिंग घरपोच.
गंथर बान्हमान यांच्या 'आय डेझर्टेड रोमेल' या पुस्तकाचा विजय देवधर यांनी केलेला हा अनुवाद आहे.
हे पुस्तक म्हणजे एक अद्भूत साहस कथा आहे. अनेक साहसी घटना आणि थरारक प्रसंगामुळे ते रोमांचकारी
झाले आहे. बान्हमान यांचे स्वानुभव आणि कल्पना यांची बेमालूम सरमिसळ असलेले हे कथानक आहे.
~We Read❤️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा