परका ♥️

2 दिवसांपूर्वी 'आल्बेर काम्यू'या साहित्य साठी नोबेल पुरस्कार मिळालेल्या लेखकाच्या मुळ फ्रेंच भाषेत 1942 साली 'लेत्रांजे' तर लंडनमध्ये 'द आऊटसायडर' या नावाने प्रकाशित झालेल्या 'कादंबरीचं नुकतंच आलेलं मराठी अनुवाद 'परका' वाचून पूर्ण केलं.मराठीमधे अनुवाद अवधूत डोंगरे यांनी केला आहे.जो एकंदरीत फार वाचनीय झालेला आहे. फ्रेंचांची वसाहत असणारा 1930-40 च्या दरम्यानचा उत्तर आफ्रिकेतला अल्जीरिया देश. त्याची राजधानी अल्जीअर्स. या अल्जीअर्समध्ये राहणाऱ्या 'मेर्सो' च्या आईचं निधन होतं. मेर्सो तिच्या दफनविधीला उपस्थित राहतो. नंतर मेर्सोच्या आयुष्यात कमी- अधिक व्याप्तीच्या अनेक घटना घडत राहतात. काही घटनांना तो नुसता साक्षी असतो, तर काही घटनांमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग असतो. दरम्यान, ऊन, आजूबाजूचे आवाज, माणसं, गाड्या हे सगळं त्याला जाणवत राहतं. मग अशातच अनपेक्षितपणे समुद्रकिनारी त्याच्या हातून खून होतो. त्याच्या विरोधात खटला उभा राहतो. हे सगळं कसं होत जातं? खून का होतो ? खटल्यात काय होतं? या सगळ्याची गोष्ट खुद्द मेर्सोच्या तोंडून सांगणारी 'परका' ...