We Read अंतर्गत25 हटके आणि महत्वपूर्णवाचनीय पुस्तकांची यादी...♥️
कृपया यादी पूर्ण वाचावी आणि आपल्या वाचन प्रेमीं मित्रांसोबत शेअर करावी..🌱
संपर्क :- We Read ♥️
https://wa.me/7066495828
जॉईन ग्रुप :- https://chat.whatsapp.com/HC172mr6hrrJ7iNYTV1nrx
__________________________________________
1)शिवकालीन महाराष्ट्र -डॉ.अ रा
We read :-225 घरपोच (शिपिंग फ्री)
शिवकालीन महाराष्ट्र' या ग्रंथात, समकालीन साधनांच्या साहाय्याने १७ व्या शतकातील आर्थिक जीवनाचा विचार प्रथमच इतक्या विस्तृतपणे मांडला आहे. मराठ्यांचे राज्य म्हणजे लुटारूंचे राज्य अथवा लष्करी राजवट अथवा सरंजामशाही नसून ते 'बहुत' जनांसी आधारू असे लोकांचे राज्य होते, त्या राज्याच्या राजमुद्रेत 'भद्राय' राजते अशी अक्षरे होता, आणि 'धाकुटपणा'पासून माणसाचे माणस वळखतात असे अभिमानाने म्हणणा-या 'स्वामी'ने निर्माण केलेले ते 'कल्याणकारी' राज्य होते त्याचा विस्तार छोटासा असला तरी 'आर्थिकदृष्ट्या' त्याला स्थैर्य येण्यासाठी शिवरायांनी केलेल्या प्रयत्नांचे येथे विवेचन केले आहे आणि हेच या ग्रंथाचे आगळे-वेगळेपण आहे.
2)अभंग तुकयाचे ( चिकित्सात्मक अभ्यास)
-प्रा. डॉ. द. वा. पटवर्धन
We read :-540 घरपोच (शिपिंग फ्री)
संत तुकारामांच्या अलौकिक जीवनावर आणि त्यांच्या प्रतिभाशाली अभंगसृष्टीवर विपुल साहित्य उपलब्ध आहे. त्या साहित्यामध्ये आपल्या अंगभूत वैशिष्टयांमुळे विशेष उठून दिसेल, असा हा प्रबंध आहे... तुकारामांच्या अभंगांमध्ये त्यांच्या आत्मचरित्राचे जे प्रतिबिंब पडले आहे, त्यावरून त्यांच्या जन्म-निर्याण शकांची निश्चिती करणारा हा प्रबंध त्यांच्या समर्थ रामदासांशी व शिवाजी महाराजांशी झालेल्या भेटींबाबतही साधकबाधक चर्चा करतो. तुकारामांचा आध्यात्मिक जीवनविकास कसा होत गेला, त्यांना कोणकोणते पारमार्थिक अनुभव आले, त्यांना भक्तिपंथ बहु सोपा का वाटला, याचा तौलनिक अभ्यास या ग्रंथात आढळतो. त्यांच्या ऐहिक आणि पारमार्थिक शिकवणीचे मुद्देसूद विवेचन जसे आपल्यासमोर येते, तसाच त्यांच्या अभंगांचा साहित्यशास्त्रीय आस्वादही घेतला जातो. बाबांच्या शिकवणुकीवर, तत्त्वज्ञानावर आणि कवित्वावर देशीविदेशी टीकाकारांनी घेतलेल्या वेगवेगळया आक्षेपांची यथोचित दखल घेत पुढे जाणारा हा ग्रंथ अखेरीस त्यांच्या अवतारसमाप्तीच्या पद्धतीवर विशेष प्रकाशझोत टाकतो. तुकारामांच्या अभंगांची विविधांगी चिकित्सा करणा-या या ग्रंथाचे सर्वांत महत्त्वपूर्ण वैशिष्टय म्हणजे त्यांच्या सदेह वैकुंठगमनाची पातंजल योगसूत्रांच्या आधाराने केलेली उकल. सिद्धिसामर्थ्याने आपला देह आपल्या इच्छेनुसार पंचमहाभूतांत विलीन करून घेता येतो, असे स्पष्टपणे सांगणारी सूत्रे पातंजलयोगशास्त्रात आहेत, हे अभ्यासकांना पूर्वीपासूनच माहीत होते. तथापि तुकारामांच्या सदेह वैकुंठगमनाची आणि पातंजलयोगसूत्रांची सांगड घालण्याची प्रायोगिक कल्पकता यापूर्वी कुणी दाखवली नव्हती. आपल्याला ॠद्धिसिद्धि प्राप्त झाल्या असल्याची आपल्या अभंगांमधून असंख्य वेळा ग्वाही देणा-या तुकारामांच्या वैकुंठगमनाची अशी उपपत्ती लावून दाखवणारे साधार विवेचन हे प्रा. डॉ. द. वा. पटवर्धन यांच्या या प्रबंधाचे पताकास्थान आहे. ज्या प्रबंधासाठी मुंबई विद्यापीठाने प्रा. पटवर्धन यांना विद्यावाचस्पती (डॉक्टरेट) ही पदवी प्रदान केली, तो हा प्रबंध आता संतसाहित्याच्या अभ्यासकांना आणि भाविकांना उपलब्ध होत आहे. तुकारामविषयक मराठी साहित्याच्या दालनात मोलाची भर घालणारा हा ग्रंथ त्या संतश्रेष्ठाबद्दलचे आपले आकलन अधिक समृद्ध करणारा ठरेल, यात काहीच शंका नाही. '
3)बँकांविषयी सर्व काही -विद्याधर अनास्कर
We read :-210 घरपोच (शिपिंग फ्री)
पूर्वी दिवाणखान्यात रेंगाळणारे बँकिंग आता आपल्या थेट माजघरापर्यंत पोचले आहे. श्रीमंत-गरीब, नागरी-ग्रामीण असा ग्राहकांच्या बाबतीत भेद न करणा-या बँकिंगने उदारीकरणाच्या गदारोळात गेल्या 10-12 वर्षांत शब्दशः कात टाकली आहे. ग्राहकभिमुख होता होता या बँकिंगने ग्राहकांना पुरते गोंधळवूनही टाकले आहे. बँकिंगविषयी सर्व काही हे अशा गोंधळलेल्या ग्राहकांच्या मनात येणा-या असंख्य महत्त्वाच्या प्रश्नांना समर्पक, थेट आणि नेमकी उत्तरे देणारे पुस्तक आहे. वाचकांशी सरळ संवाद साधत, त्यांच्या शंकांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणारे, त्यांच्या अडचणींवर मार्ग सुचवणारे असे हे आगळे पुस्तक लिहिले आहे विद्याधर अनास्कर या अभ्यासू, अनुभवी आणि जातिवंत बँकरने. बँकिंगविषयीच्या आपल्या सामान्यज्ञानाला छेद देणारी, क्वचित चकित करणारी, नवीनतम माहितीने भरलेली अशी ही उत्तरे आहेत; त्यामुळे फक्त बँक ग्राहकांनीच नव्हे तर बँकिंग क्षेत्राशी संबंधित प्रत्येकाने आपल्या संग्रही ठेवावे आणि वारंवार संदर्भासाठी चाळत राहावे, असे हे पुस्तक ठरले आहे. '
4)स्वार्थातून सर्वार्थाकडे -डॉ. अजय ब्रम्हनाळकर
We read :-400 घरपोच (शिपिंग फ्री)
हवेतले इमले बांधून पृथ्वीतलावर कुणीही सुखाने जगू शकत नाही. जगायचे जर जमिनीवर आणि तेही समाजाचा एक घटक म्हणून, तर समूहाचे अर्थशास्त्र आणि मानस समजून घेणे भाग आहे. सुखी समाज निर्माण करण्यासाठी आदर्श हवेतच. पण आदर्शांच्या पतंगाची दोरी किती लांब ठेवायची; आणि ती हातातून सुटली, तर पतंग कुठेही भरकटू शकतो, याचे भान येण्यासाठी अर्थशास्त्राचे भान हवे आणि मानसशास्त्राचेसुद्धा ! अर्थशास्त्रामागील मानसशास्त्राचा रंजक मागोवा घेणारे चार्ल्स व्हीलन यांचे ‘नेकेड इकॉनॉमिक्स हे जगप्रसिद्ध पुस्तक आता मराठीत.
5)महिलांविषयीचे कायदे -| अॅड. व्ही. पी. शिंत्रे
We read :-225 घरपोच (शिपिंग फ्री)
आज भारतात सर्वच क्षेत्रांमध्ये स्त्रिया आघाडीवर आहेत. परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुली बाजी मारताना दिसत आहेत. एका बाजूला ही उत्साहवर्धक स्थिती, तर दुसऱ्या बाजूला बहुसंख्य स्त्रियांना त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी अजूनही झगडावे लागते आहे, तारेवरची कसरत करावी लागते आहे. कधीकधी तर ही कसरत खुद्द न्यायसंस्थेलाच करावी लागते आहे की काय, अशी परिस्थितीसुद्धा उद्भवते. या परिस्थितीतून मार्ग काढू इच्छिणाऱ्या सर्वांना हवी असते कायद्यांबद्दलची नेमकी माहिती. स्त्रीचे हक्क अबाधित राहावेत, तिला जगण्याचे बळ लाभावे या हेतूने राज्यघटनेपासून भारतीय दंड विधानापर्यंत आणि केंद्र सरकारपासून राज्य सरकारपर्यंत अनेकांनी भरपूर तरतुदी केल्या आहेत, योजना आखल्या आहेत. त्या सर्वांची तपशीलवार माहिती देणारे अत्यंत उपयुक्त पुस्तक.
6)कथा अकलेच्या कायद्याची -प्रा. डॉ. मृदुला बेळे
We read :-250 घरपोच (शिपिंग फ्री)
चोर चोरी करू शकत नाही, शासक कर लावू शकत नाही, भाऊबंदांमध्ये वाटणी होत नाही आणि तिचे ओझेही वहावे लागत नाही. अशी संपत्ती म्हणजे बौद्धिक संपदा. तरीसुद्धा तिचेही रक्षण करावेच लागते. अगदी व्यक्तिगत पातळीपासून सामूहिक अन् राष्ट्रीय स्तरापर्यंत ही सृजन संपत्ती जपावी लागते, वाढवावी लागते. ही बौद्धिक संपदा तुम्हाला देत असते विशिष्ट हक्क. पेटंट, कॉपीराइट, ट्रेडमार्क, भौगौलिक निर्देशक, इंडस्ट्रियल डिझाइन - अशा अनेक प्रकारांनी हे हक्क तुम्हाला मिळतात. कसे मिळवायचे हे हक्क? कसे राखायचे हे हक्क? कुणी या हक्कांचा भंग केल्यास तो रोखायचा कसा? राष्ट्रीय अन् आंतरराष्ट्रीय कायद्यांची यात काय भूमिका असते? अशा अनेक मुद्द्यांबाबत मोलाचे मार्गदर्शन करणारे - संशोधक-उद्योजकांपासून लेखक-प्रकाशकांपर्यंत, गीतकार-संगीतकारांपासून नाट्य-चित्रपट दिग्दर्शकांपर्यंत, चित्रकार-छायाचित्रकारांपासून इंजिनीअर-तंत्रज्ञांपर्यंत, साऱ्या सर्जनशील व्यक्तींना त्यांच्या अनमोल निर्मितीचे भान करून देणारे - कथा अकलेच्या कायद्याची '
7)GST सर्वांसाठी
We read :-200 घरपोच (शिपिंग फ्री)
GST - वस्तू - सेवा - कर. म्हणजे नेमके काय काय येते या नव्या करप्रणालीत? या नव्या व्यवस्थेने गोष्टी महाग होणार की स्वस्त? माझा हॉस्पिटलचा अन् औषधांचा खर्च वाढणार का? माझ्या कारखान्यातील उत्पादनाची किंमत मी वाढवायची की घटवायची? आणि किती? मुलीचं लग्न काढलंय. कार्यालय अन् केटरिंगचा खर्च वाढणार की वाचणार? माझा मुलगा अमेरिकेला चाललाय शिकायला. विमानाच्या तिकिटात किती फरक पडणार? छोटंसं जनरल स्टोअर माझं, पण त्यात किती तरी लहान-मोठया वस्तू. आता त्यांच्या किमती कशा ठरवायच्या? • बडया कारखानदारांपासून छोटया-मोठया व्यापाऱ्यांपर्यंत • डॉक्टरांपासून औषधविक्रेत्यांपर्यंत • मालवाहतूक, प्रवासीवाहतूकदारांपासून ब्यूटीसलून चालवणाऱ्यांपर्यंत • नोकरी करणाऱ्या पगारदारांपासून उद्योजक अन् बांधकाम व्यावसायिकांपर्यंत • घरमालक-भाडेकरूंपासून हॉटेल अन् चित्रपट व्यावसायिकांपर्यंत • लेखक-प्रकाशक-मुद्रकांपासून कलाकार अन् क्रीडापटूंपर्यंत • उत्पादक अन् सेवापुरवठादारांपासून सामान्य ग्राहकांपर्यंत प्रत्येकाच्या दैनंदिन अन् व्यावसायिक जीवनावर परिणाम घडवणाऱ्या GST - गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सचे सोपे विवरण करणारे GST - सर्वांसाठी '
8)ग्राहक राजा, सजग हो -विवेक वेलणकर
We read :-165 घरपोच (शिपिंग फ्री)
वीजमंडळ, रेशनकार्ड, गॅस • बँका, विमासेवा • टेलिफोन, मोबाईल • हाउसिंग सोसायटी विषयक नियम • विविध शासकीय सेवा • माहितीचा अधिकार • ग्राहक संरक्षण कायदा • केंद्र अन् राज्य सरकारची तक्रार-निवारण यंत्रणा रोजच्या आयुष्यातील अशा कितीतरी बाबींमध्ये आपण सारेजण ग्राहकाच्याच भूमिकेत वावरतो. गुणवत्तापूर्ण वस्तू अन् सेवा मिळण्याचा अधिकार ग्राहक म्हणून साऱ्यांनाच असतो. मात्र बरेचदा आपल्याला आपल्या या अधिकाराची जाणीव नसते. दैनंदिन जीवनातल्या कितीतरी गरजांबद्दलच्या अशा आपल्या अधिकारांची उपयुक्त माहिती देणारे - हरघडी येणाऱ्या अडचणींवर खात्रीशीर उपाय सांगणारे - ग्राहक राजा, सजग हो !
9)महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर : संघर्ष आणि समन्वय -नामदेव चं कांबळे
We read :-350घरपोच (शिपिंग फ्री)
महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर. आधुनिक भारताच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे हे दोन लोकोत्तर नेते. प्रत्यक्ष जीवनात जरी ते दोघे अनेकदा समोरासमोर उभे ठाकले, तरीही आता नव्या संदर्भात त्या दोघांच्या विचारांचा समन्वय घालून प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करणे गरजेचे आहे. हे दोन्ही महापुरुष दोन ध्रुवांसारखे लांब आहेत, असे वाटते; तथापि त्यांचे शाश्वत संदेश लक्षात घेऊन त्यांमध्ये सुसंवाद कसा साधता येईल, याचा हा प्रामाणिक प्रयत्न.
'10)जे आले ते रमले - सुनीत पोतनीस
We read :-385घरपोच (शिपिंग फ्री)
शेकडो हजारो वर्षांपासून जगाच्या विविध प्रदेशांमधून विविध धर्मांचे, विविध संस्कृतींचे लोक भारतातील समृद्धीने आकर्षित होऊन येथे आले आणि स्थायिक झाले. यातील काही सत्ता कमावण्यासाठी, काही नोकरी-व्यवसायासाठी तर काही धर्मप्रचारासाठी आले. येथे सत्ता कमावताना आणि ती राखताना अनेकांनी येथील स्थानिकांशी राजनैतिक धूर्तता आणि क्रूरतेने व्यवहार केले. परंतु त्यातील अनेकांनी त्यांच्या विविध क्षेत्रांमध्ये भारतीयांसाठी कितीतरी चांगले कार्यही केले, अनेक येथेच स्थायिक होऊन भारतीय भूमीशी एकरूप झाले. अशा भारतप्रेमींपैकी अनेक जण आता विस्मृतीत गेले आहेत. या भारतप्रेमींच्या मौलिक योगदानाचा आढावा...
11)वसुंधरेचे शोधयात्री- डॉ. अनुराग लव्हेकर
We read :-445घरपोच (शिपिंग फ्री)
अज्ञाताबद्दलचे कुतूहल अन् अज्ञाताचा वेध घेण्याची जिज्ञासा यांमुळे अनेक धाडसी प्रवासी वसुंधरेच्या विविध भागांचा शोध घेत राहिले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अन् पराकाष्ठेच्या जिद्दीमुळे ज्ञानाची नवनवीन क्षितिजे उदयास आली. निर्मिती, व्यवसाय, वितरण, व्यापार, उद्योग, प्रवास, अर्थकारण, धर्मकारण, राजकारण, इतिहास, भूगोल अशा मानवी जीवनाच्या अनेक आयामांवर या शोधयात्रांचा अमिट ठसा उमटला. ज्या भागांतून हे प्रवास घडले; त्या त्या भागांत कला, वास्तू, शिल्प, संगीत, साहित्य, धर्म, जीवनमूल्ये आदींची देवाणघेवाण होत राहिली - कधी सहकार्यातून, तर कधी संघर्षातून. ‘भूगोलाच्या रंगमंचावर इतिहासाचे नाट्य सादर होत असते.’ या विधानाची प्रचिती देणार्या - आपल्या शोधयात्रांमधून नवा इतिहास घडवणार्या शोधनायकांची गाथा.
12)पिरॅमिडच्या प्रदेशात- डॉ. अच्युत बन
We read :-225घरपोच (शिपिंग फ्री)
इजिप्त म्हणजे साडेचार हजार वर्षांची प्राचीन संस्कृती. इजिप्त म्हणजे फारोह, नाईल, ममीज् अन् अवाढव्य मंदिरे. पण या सर्वांहून ठळक वैशिष्ट्य म्हणजे इजिप्तचे पिरॅमिड. प्राचीन जगातील आश्चर्यांपैकी आधुनिक जगापर्यंत पोहोचलेले एकमेव आश्चर्य म्हणजे इजिप्तचे हे पिरॅमिड. या प्राचीन संस्कृतीच्या अवशेषांचे, वास्तूंचे अन् प्रतीकांचे वेधक दर्शन घ्यायचे असेल, तर चला जाऊ सफरीला.
13)मनू’चे अरण्य -डॉ.संदीप
We read :-225घरपोच (शिपिंग फ्री)
‘मनू’ हे नाव आहे पेरू देशाच्या दक्षिणेला उगम पावणाऱ्या अन् नंतर महाकाय अॅमेझॉनला मिळणाऱ्या एका नदीचे. अॅमेझॉनचे खोरे म्हणजे पृथ्वीतलावरील जैवविविधतेने सर्वांत समृध्द अशी जागा. पक्ष्यांची रंगीबेरंगी पिसारी दुनिया असो, हजारो प्रकारच्या वेगवेगळया वनस्पतींचे बहरलेले विश्व असो, जलचर अन् उभयचर प्राण्यांपासून कीटक अन् सस्तन प्राण्यांपर्यंतच्या हजारो प्रजाती असोत, या साऱ्या विविधांगी, विविधरंगी जीवसृष्टीला अंतरंगात सामावून घेणारे मनूचे अरण्य. पेरू देशाच्या आग्नेय भागात अँडीज पर्वताच्या उतारावर वसलेल्या या सदाहरित घनदाट जंगलात एका झपाटलेल्या निसर्गप्रेमीने मनसोक्त भटकंती केली. त्या भटकंतीतून नजरेपुढे साकार झालेले, शब्दांतून अन् छायाचित्रांमधून पानांवर उमटलेले ‘मनू’चे अरण्य '
14)या जीवनाचे काय करू? - डॉ. अभय बंग
We read :-250घरपोच (शिपिंग फ्री)
अभय बंग यांच्या ‘माझा साक्षात्कारी हृदयरोग’ पुस्तकाने महाराष्ट्राच्या हृदयाला व जीवनशैलीला हात घातला. ‘कोवळी पानगळ’ अहवालाने महाराष्ट्राच्या सामाजिक संवेदनशीलतेला हलवले. ‘निर्माण’ या उपक्रमाने युवा पिढीसमोर नवी क्षितिजे उभी केली. आता ते महाराष्ट्राशी संवाद करत आहेत, एका खास प्रश्नावर. या जीवनाचे काय करू? माणसासमोर उभा असलेला एक सनातन प्रश्न! आपल्या जन्मासोबतच हा प्रश्नही जन्माला येतो. त्याचे उत्तर शोधल्याशिवाय समाधान नाही!! ...पण हा शोध सोपाही नाही. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात मदत व्हावी, या हेतूने घेऊन येत आहोत... अभय बंग यांनी विविध विषयांवर लिहिलेल्या लेखांचा व दिलेल्या भाषणांचा निवडक संग्रह.
15)गुडमॉर्निंग! नमस्ते!
We read :-225घरपोच (शिपिंग फ्री)
बालकुपोषण ही केवळ आदिवासी अन् आर्थिकदृष्टया निम्नस्तरातील वर्गाची समस्या नाही. मध्यमवर्गातही ती कमीअधिक प्रमाणात आढळते. ही समस्या सोडवणे शासनाची जबाबदारी आहे, असे म्हणून हात झटकणे ही शुद्ध आत्मवंचना आहे. महाराष्ट्रात लाखभर अंगणवाडी सेविका आणि साहाय्यिका तुटपुंज्या साधनांनिशी या समस्येशी लढत आहेत. पण तेवढे पुरेसे नाही. कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक पातळीवरही प्रयत्न व्हायला हवेत. महाराष्ट्रात राजमाता जिजाऊ मिशन यासाठी भरीव काम करत आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधील अंगणवाडयांच्या प्रत्यक्ष पाहणीतून कुपोषणविरोधी लढयाचा मांडलेला लेखाजोखा. '
16)मंत्र गुंतवणुकीचा
We read :-250 घरपोच (शिपिंग फ्री)
अर्थनियोजनापासून आर्थिक उद्दिष्टांपर्यंत वाटचाल करण्याचे बहुविध मार्ग असतात. पैशाची गुंतवणूक आणि त्यासाठीचे विविध पर्याय म्हणजे अशा मार्गांवरची वाटचाल. कोणता पर्याय निवडावा? पीपीएफ? शेअर्स? म्युच्युअल फंड? सोने? स्थावर मालमत्ता? पेन्शन स्कीम? कोणताही पर्याय निवडायचा; तर संशोधन, अभ्यास आणि अनुभव म्हणजे यशस्वी गुतंवणुकीचा पाया. वस्तूचे योग्य मूल्यांकन करण्याची क्षमता, इतरांना न दिसलेली गोष्ट हेरणे आणि यथायोग्य विश्लेषण हे यशस्वी गुंतवणू्कदारासाठी आवश्यक गुण. या गुणांच्या आधारे यशस्वी गुंतवणुकीची पायाभरणी कशी करावी, हे सर्वांना उलगडून दाखवणारा || मंत्र गुंतवणुकीचा ||
17)मुस्लिम मनाचा शोध -शेषराव मोरे
We read :-750 घरपोच (शिपिंग फ्री)
मुस्लिम मन मुख्यत: इस्लाममधून घडलेले आहे. ‘मुस्लिम मनाचा शोध’ म्हणजे पर्यायाने मूळ इस्लामचा अभ्यास होय. मूळ इस्लामचा अभ्यास म्हणजे मूलत: तीन गोष्टींचा अभ्यास : मुहंमद पैगंबरांचे चरित्र, कुरआन व हदीस. या तीनही बाबी परस्पराधारित आहेत. पैगंबर चरित्राचा अभ्यास केल्याशिवाय कुरआनातील वचनांचा अन्वयार्थ कळत नाही. ‘कुरआन’ म्हणजे एक प्रकारे प्रेषितांच्या जीवनाचे प्रतिबिंब होय. ‘प्रेषितांच्या उक्ति व कृती’ म्हणजे ‘हदीस’ होय. ‘हदीस’ म्हणजे एक प्रकारे कुराणाचा शब्दकोश होय. कुराणातील वचनांचा अर्थ लावण्यासाठी ‘हदीस’चाही आधार घ्यावा लागतो. या तीनही बाबींचा एकत्रित अभ्यास केला, तरच मूळ इस्लामचे सम्यक आकलन होऊ शकते. असा अभ्यास करून लिहलेला हा ग्रंथ आहे. प्रेषितांनंतरच्या काळात इस्लाममध्ये अनेक पंथ निर्माण झाले. पण या सर्व पंथांना एकमताने मान्य असणारा हा मूळ इस्लाम प्रत्येकाने समजून घेणे काळाची गरज आहे. '
18)सरकारी मुसलमान
We read :-230 घरपोच (शिपिंग फ्री)
मुस्लिम नागरिक सरकारी अधिकारी बनतात आणि नियमानुसार कामगिरी बजावतात, त्यावेळी त्यांना बन्याचदा ‘सरकारी मुसलमान’ असं काहीशा हेटाळणीच्या सुरात म्हटलं जातं. असं का? या पुस्तकात लेफ्टनंट जनरल जमीर उद्दिन शाह यांनी या चक्रावून टाकणाऱ्या ‘पदवी’चा खुलासा केलेला आहे. लेखकाच्या ७० वर्षांच्या समृद्ध आयुष्याचा लेखाजोखा या पुस्तकात आहे. त्यांच्या कुटुंबानंच चालविलेल्या मदरशामध्ये त्यांच्या शिक्षणाची सुरुवात झाली. त्यानंतर ते बोर्डिंग स्कूलमध्ये शिकले. सैन्यातली त्यांची कारकीर्द चाळीस वर्षांची झाली. १९७१ च्या बांगलादेश मुक्तिसंग्रामात त्यांनी भाग घेतला. त्याखेरीज गुजरातमध्ये सन २००२ मध्ये गोध्रा रेल्वे जळितकांडानंतर उसळलेल्या दंगली शमविण्याची जबाबदारी सैन्याच्या ज्या डिव्हिजनला दिली गेली, तिचे कमांडर शाह हे होते. त्याबद्दलच्या प्रकरणामध्ये लेखकांनी पोलिस, निमलष्करी दल आणि सेना दल यांच्या भूमिकांबद्दलची त्यांची मतंही स्पष्टपणे मांडली आहेत.
19)जावेद अख़्तर : नव्या सूर्याच्या शोधात -मंगला गोडबोले
We read :-250 घरपोच (शिपिंग फ्री)
जावेद अ़ख्तर म्हणजे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व. ‘सलीम-जावेद’ या जोडगोळीनं एके काळी एकाहून एक यशस्वी चित्रपटांची माळ लावली. त्यानंतरही जावेद यांच्या लेखणीतून किती तरी गाजलेल्या पटकथा अन् कैक संस्मरणीय चित्रपटगीतं उमटली. ‘तरकश’ अन् ‘लावा’ या कवितासंग्रहांमध्ये बुद्धी अन् मन, विचार अन् भावनांचा समन्वय त्यांनी साधला. त्यांची चित्रपटकारकीर्द यशानं झळाळणारी, तर त्यांची वेळोवेळी केलेली वक्तव्यं वादाचा धुराळा उडवणारी. आपलं भारतीयत्व, आपला विवेकवाद, आपली धर्मनिरपेक्षता, आपलं ‘एथेइस्ट’ असणं या सर्वांचा जाहीर स्वीकार करणारे, त्या सार्याचा सार्थ अभिमान बाळगणारे अन् त्यानुसार हिरिरीनं वागणारे जावेदजी. त्यांच्या या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारं चरित्र.
20)अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान - विश्वास पाटील
We read :-360 घरपोच (शिपिंग फ्री)
अण्णा भाऊ साठे... गरीब, दलित, शोषित, या सर्वांच्या वेदनेचा उद्गार अन् पिळवणूक झालेल्या स्त्रियांच्या आक्रोशाचा हुंकार... आयुष्यभर काटे-निखारे तुडवत वंचितांच्या जागृतीची मशाल चेतवणारे खंदे लेखक... मायमराठीसाठी डफावर थाप मारून संयुक्त महाराष्ट्राची रणलावणी गात दिल्लीपर्यंत धडक मारणारे शाहीर... डॉ. होमी भाभा, नर्गिस, बलराज सहानी, शैलेंद्र, आचार्य अत्रे, कॉम्रेड डांगे अशा राष्ट्रीय दिग्गजांना प्रभावित करणारे कलावंत... अण्णा भाऊंच्या कार्यकर्तृत्वाच्या दशदिशा धुंडाळून, दुर्मीळ कागदपत्रं शोधून, अण्णांचं जीवन व साहित्य समृद्ध करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा खास शोध घेऊन; कादंबरीकार विश्वास पाटील यांनी लिहिलेली वाङ्मयीन चरित्रगाथा अण्णा भाऊंची दर्दभरी दास्तान
21)क्लोज एनकाउंटर्स - पुरुषोत्तम बेर्डे
We read :-285 घरपोच (शिपिंग फ्री)
क्लोज एनकाउंटर्स’ मध्ये दिसणारा कामाठीपुरा हा सत्तर आणि ऐंशीच्या दशकातला आहे. यातल्या चोवीस भागांतून पुरुषोत्तम बेर्डे आपलं बालपण, पौगंड आणि तारुण्य यांच्या साक्षीने अनेक माणसांच्या आयुष्यांच्या आत डोकावतो. मराठी साहित्यातली व्यक्तिचित्रांची दोन तालेवार पुस्तकं मला चटकन आठवतात. एक अर्थातच पुलंचं ‘व्यक्ती आणि वल्ली’ आणि दुसरं जयवंत दळवींचं ‘सारे प्रवासी घडीचे’. दोन्ही पुस्तकांची साहित्यिक गुणवत्ता मोठी आहे. ‘क्लोज एनकाउंटर्स’ मध्ये या दोन्ही पुस्तकांपेक्षा एक गोष्ट अधिक आहे. ती म्हणजे भौगोलिक सलगता. कामाठीपुऱ्याच्या सोळा गल्ल्या. त्यातली अखंड चालणारी राडेबाजी. सिनेमा आणि गल्ली क्रिकेट. पुरुषोत्तमने स्वत: मोकळं होण्याची जी प्रक्रिया अनुभवली त्याचं फलस्वरूप म्हणजे हे पुस्तक.
22)सती ते सरोगसी
We read :-185 घरपोच (शिपिंग फ्री)
कोर्टाची पायरी चढणं नको, असंच बहुसंख्य महिलांना वाटत असतं. पण आता काळ बदललाय. जिथं कधीकाळी सतीबंदीचा कायदाही बिचकत करावा लागला होता, तिथंच आज ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ला कायद्याची मान्यता द्या, असा दबाव येतोय. जिथं स्वत: जन्माला घातलेल्या मुलावरसुद्धा बाईचा कायदेशीर अधिकार नव्हता, तिथंच आज ‘सरोगसी’द्वारे मूल मिळवण्याचा अधिकार हवासा वाटतो आहे. स्त्रीचा, तिच्या आणि समाजाच्याही मानसिकतेचा हा लांबलचक प्रवास समजून घेण्यासाठी आणि कायद्याबद्दलची किमान साक्षरता मिळवण्यासाठी सर्व महिलांनी हे पुस्तक वाचायलाच हवं.
23)जीवनकोंडी -परेश ज. म.
संतोष शेंडकर
We read :-185 घरपोच (शिपिंग फ्री)
राज्यात जवळपास २०० साखर कारखाने….
ऑक्टोबर ते एप्रिल असा ६-७ महिन्यांचा गळीत हंगाम ….
त्या काळात कारखान्यातील परिसरात ऊसाच्या फडांवर लाखो मजूरकुटुंब पोटापाण्यासाठी आपली घरं, शेती, गावं सोडून येतात. या हंगामात स्त्रियांना सोसाव्या लागणाऱ्या आरोग्य समस्या, मुलांच्या शिक्षण समस्या, आर्थिक समस्या असे अनेक गंभीर प्रश्न या स्थलांतरित मजुरांसमोर आ वासून उभे असतात. जीवनकोंडीच जणू! याच समस्यांचा सखोल अभ्यास गेल्या ५ वर्षांत टाटा ट्रस्टस्तर्फे ‘टीम आशा’ने सोमेश्वर साखर कारखाना परिसरात केला. त्या आधारेच अनेक जटील प्रश्नांची चर्चा या पुस्तकात केलेली आहे.
शिक्षण, कामगार, मानव अधिकार, शेती अशा क्षेत्रांतील कार्यकर्ते, अभ्यासक, विचारवंत आणि धोरणकर्ते यांच्यापर्यंत हा विषय पोचवून ऊसतोडणी मजुरांची जीवनकोंडी सुटावी यासाठीच हा एक विधायक प्रयत्न
24)गुड मुस्लीम बॅड मुस्लीम
We read :-375 घरपोच (शिपिंग फ्री)
चांगला’ मुसलमान कोण? ‘वाईट’ मुसलमान कोण? – हे कुणी ठरवलं? कसं ठरवलं? का ठरवलं? मुळात ‘गुड मुस्लीम’, ‘बॅड मुस्लीम’ या संकल्पनांचा व ‘राजकीय ओळखीं’चा उद्भवच कसा झाला? अशा अनेक प्रश्नांच्या अंगाने ‘शीत युद्धा’नंतरच्या काळातील जागतिक राजकारणाचं अभ्यासपूर्ण व मार्मिक विश्लेषण करणाऱ्या ‘गुड मुस्लीम-बॅड मुस्लीम’ या महमूद ममदानी लिखित मूळ इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद.
महमूद ममदानी हे एक जागतिक कीर्तीचे अभ्यासक आणि मानववंश शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या मते, पाश्चात्त्यांनी जाणीवपूर्वक अशा स्वरूपाच्या सुलभ व्याख्या केल्या की, पाश्चात्त्य संकल्पनांनी संस्कारित तो म्हणजे ‘गुड मुस्लीम’ आणि आधुनिक-पूर्व विचारांना धरून ठेवणारा वा कडव्या विचारांचा तो ‘बॅड मुस्लीम’. एकंदरीतच, १९६०च्या दशकातील व्हिएतनाम युध्द ते ‘९/११’च्या घटनेनंतरचा काळ या दरम्यान अमेरिका व त्यांच्या पाश्चात्य मित्रराष्ट्रांनी आपल्या राजकीय उद्दिष्टांसाठी मुस्लीम समाजसमूहांची ‘धार्मिक ओळख’ आणि ‘राजकीय ओळख’ यांची कशी हेतुपुरस्सर सरमिसळ केली आणि त्याचे किती विपरीत परिणाम संभवले, त्याचा उलगडा ममदानी या पुस्तकाद्वारे करू पाहतात. प्रदीर्घ संशोधन व विश्वासार्ह संदर्भांच्या आधारे त्यांनी हे पुस्तक सिध्द केलं आहे.
जागतिक राजकारणातील अनेक अज्ञात गोष्टींवर, घटनांवर नव्याने प्रकाश टाकून अनेक गैरसमजुती दूर करू पाहणारं आणि जागतिक शांततेच्या दृष्टीने सर्वांनाच विचारप्रवृत्त करू पाहणारं असं हे पुस्तक…
‘गुड मुस्लीम बॅड मुस्लीम!
25)माझा धनगरवाडा - धनंजय धुरगुडे
We read :-455 घरपोच (शिपिंग फ्री)
शेळ्या-मेंढ्यांसोबत आपला कुटुंबकबिला घेऊन पोटासाठी रानोमाळ भटकणारा एक धनगर आपल्या पोरांना शिकवायचं असा निश्चय करतो, आणि बापाचं हे स्वप्न उराशी घेऊन धनगरवाड्यातलं एक कोकरू बिचकत बिचकत शाळेत जाऊ लागतं…
वादळवारा असो, वा सतत बदलणारा मुक्काम असो, काबाडकष्ट करून ते आपलं शालेय शिक्षण पूर्ण करतं. नंतर शहरामध्ये जाऊन उच्च शिक्षण घेतं. शिक्षणासाठी प्रसंगी मोलमजुरी करून ‘बापाचं स्वप्न पूर्ण करायचंच’ असा निर्धार करतं आणि स्वत:च स्वत:ला प्रेरित करत राहतं!
आत्मभान जागृत झालेल्या एका धनगराचं हे विलक्षण आत्मकथन… या कथनात लेखक धनंजय धुरगुडे धनगर समाजाच्या रूढी-चालीरीती आणि जीवनपद्धती यांचं जिवंत चित्रण करतात. त्यांचे पारंपरिक धनगरी खेळ, गजीनृत्य व सण-उत्सव यांचं शब्दचित्र रेखाटतात, आणि शिक्षणामुळे झालेला आपला विकास सांगत धनगर समाजाचं वास्तववादी दर्शन घडवतात.
एका धनगराने अस्सल धनगरी शैलीत प्रथमच चितारलेला हा – माझा धनगरवाडा!
धन्यवाद ♥️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा