दिवस काही घर बांधून राहत नाही....♥️
व्यक्त होत जा,बोलत जा कुटुंब व मित्रांच्या सोबत वेळ घालवत जा.मनातलं दुःख मनातच दाटून ठेवत जाऊ नका,तो इतर चांगल्या मित्रांसोबत शेअर करत जा. "शरीराची जखम उघडी केल्याने चिघळते, तर मनाची जखम उघडी ठेवल्याने बरी होते'हा वाक्य एकदम योग्य आहे.मित्रांनो आत्महत्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नाही.आजकाल तरुणांमध्ये नैराश्य खूप वाढत चाललं आहे..
सतत बिघडणाऱ्या तब्येतीमुळे व समाजात घडत जाणाऱ्या घटनेमुळे काही 2 वर्षांपूर्वी मी सुद्धा याचा सामना केला आहे आणि यातून बाहेर आलोय.अचानकच नैराश्याने मला सुद्धा गाठलं होत घरी/बाहेर कुठेच करमत नव्हतं,फार एकटं एकटं वाटत होतं,कोणत्याही कामात मन लागत नव्हतं,रोज रोज तेच तेच हे कधी पर्यत चालणार ??हाच विचार मनात फिरत होता, आपला जगून फायदा तरी काय ??एवढं हे कशासाठी करायचं ??समाज काही सुधरत नाही मग आपण एवढं अट्टाहास का करायचं ?? CSE सोडून एखादा व्यवसाय करावा आणि आपण आपलं बघावं कोणी तिकडे मरत तर मरू द्या, त्याच आपल्याला काय करायचं ?? कशाला उगीच समाज/देश/गरीबांच्या बाबतीत विचार करायचं ??इत्यादी इत्यादी प्रश्न मनाला भेडसावत होते..
आपण सुद्धा दारू/सिगारेट प्यावी तर कधी आपण आपली जीवनयात्रा संपवावी असा सुद्धा विचार काही वेळा मनात आला..पण नाही मी मनाशी एकच गाठ बांधली होती काहीही झालं तरी मात्र हार मानायची नाही...ही तर जस्ट आपली सुरुवात आहे. एवढ्या लवकर काही विशेष न करताच, आपण जर हार मानून घेऊ तर आपण षंढच की.आपल्याला कुटुंबासाठी/समाजासाठी काहीतरी नक्की करायचं आहे.अश्याप्रकारे एखाद्या भेकड सारखं आपल्या कुटुंबाला अर्ध्यात सोडून कधीही जायचं नाही..
त्यामुळे पुन्हा पुस्तकांशी मैत्री केली,अनेक चांगले चित्रपट बघितले,सिद्धार्थ गौतम बुद्ध वाचले, बुद्ध समजून घेतले त्यांच्याशी जणू मैत्रीच केली.जुने तुटलेले मित्र जुडवायला सुरुवात केली ज्यांना मी फालतू वृत्ती मुळे बोलत नव्हतो,त्यांना बोलायला व वेळ द्यायला सुरुवात केली ,सोशल मीडिया व प्रत्यक्षात अनेक नवीन मित्र जोडले त्यांच्याशी फोन व प्रत्यक्षात बोललो, प्रत्येकांशी चांगलं आणि आपुलकीने वागायला सुरुवात केली,कुटुंबाला मनातलं सर्व सांगायला सुरुवात केली,प्राण्यांशी मैत्री केली त्यांच्यासोबत जास्तच आपुलकीने वागायला सुरुवात केली,मनातील 'Negative Thoughts' काढून फेकून दिले,सकाळ संध्याकाळ योगा व बाहेर फिरायला सुरुवात केली,नेहमी सकारात्मक विचार करायला सुरुवात केली,देशातील फालतू गोष्टीवर/राजकारणावर/धर्मावर विचार करणे बंद केले,न्यूज चॅनेल बघणे तर एकदमच बंद केले. फालतू छोटछोट्या गोष्टीच टेंशन घ्यायचं बंद केलं, नकारात्मक लोकांशी संबंध तोडले,कोणालाही फोनवर जास्त न बोलता प्रत्यक्ष भेटून बोलणं सुरू केलं,कधीही कोणाच्याही समारंभात न जाणारा मी प्रत्येकाच्या समारंभात जायला सुरुवात केली,भूतकाळ व भविष्यकाळाबद्दल विचार न करता फक्त आणि फक्त वर्तमानकाळात जगायला सुरुवात केली, आयुष्याचा प्रत्येक क्षण एन्जॉय करायला सुरुवात केली....
तर टेंशन घ्यायचं नाही जास्त. दिवस काही घर करून राहत नाही.4 दिवस सुखाचे तर 4 दुःखाचे निघूनच जातात.रात्रीच्या पहाट होतेच ना ? त्यामुळे बिंदास जगा.
मेल्यावर पैसा/ग्लॅमर,द्वेष-मत्सर काहीच कामी येत नाही.एकदा गेलेलं आयुष्य परत मिळतं नाही.आपण जेवढं विचार करतो आयुष्य तेवढं वाईट नाहीच.आयुष्य सुंदर आहे त्याकडे बघण्याचा फक्त दृष्टिकोन लागतो बस्स..आणि हा दृष्टीकोन तुम्हाला चांगली पुस्तके आणि चांगली माणसं देतात..♥️
मिलजुल के रहो और प्यार करो...बस्स चीज यही तो रहती हैं..♥️
Humanist Moin🙏✍️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा