संवेदनशीलता🥺
माझं अति संवेदनशील होणं कधी कधी मला फार भयानक वाटू लागतं.छोट्या छोट्या गोष्टी ज्या इतरांसाठी नॉर्मल असतात त्या गोष्टी मात्र मला रडायला भाग पाडतात.इमोशनल असणं हे जरी मी माझी ताकद समजत असलो तरीही मला कधी कधी हे विचित्र वाटतं असतं.संवेदनशीलता मी काही केल्या लपवू शकत नाही.कितीही लपवली तरीही ती आपसूकच डोळ्याच्या वाटे बाहेर पडते.मागे पंचायत 2 बघताना शेवटच्या सिन ला आईच्या मांडीवर डोकं टेकून किती रडलो होतो याची मला कल्पना नाही..
असंख्य पुस्तके वाचत असताना सुद्धा हे नेहमी घडतं असतं.एखादं प्रसंग वाचून डोळ्यांतून अश्रू कधी येतात हे मला सुद्धा कळतं नाही.रडायचं नाही हे अनेक वेळा स्वतःला बजावून सुद्धा मी स्वतःला थांबवूच शकत नाही.कोणाला रजा देणे मला फार अवघड जात.एखाद्याला प्रथमच भेटलो असलो तरीही निरोप देताना मनात एक वेगळीच भावना दाटून आलेली असते.हे असं का घडतं नेमकं ठाऊक नाही.एवढा संवेदनशील का आणि कशामुळे झालो काही आयडिया नाही.पण हे सुद्धा पुस्तक वाचनाने,पुस्तक जगल्याने किंवा काही प्रसंग जास्तच फील केल्याने झालं असावं बहुतेक..आणि मुळात हेच आपण Humanist असल्याचा पुरावा असावं..न भेटलेल्या लोकांनी गैरसमज करून घेतले तरी चालतील पण एकदा भेटलेल्या माणसांनी आपल्याबद्दल कुठलाही गैरसमज करून घेऊ नये.एवढी तरी माणुसकी आणि प्रामाणिकता आपल्यात जिवंत आहे हे याचं सबुत असेल कदाचित.💙🙂
Humanist🥰
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा