साखळीचे स्वातंत्र्य ♥️

खरोखर "हंगर स्टोन" चं काम करणार एक अप्रतिम पुस्तकं 🌿 अशक्य वाटणाऱ्या किंवा कधी ध्यानीमनीही नसणाऱ्या शक्यतांचा प्रत्यय ‘ब्लॉकचेन’मुळे आपल्याला येऊ लागला आहे. केंद्रीकरणामुळे निर्माण होणारी मक्तेदारी थांबणे, त्यामुळे विकेंद्रीकरणाचे वाढणारे महत्त्व, योग्य व्यक्तींना योग्य मोबदला मिळवून देण्याचे स्वप्न, पारदर्शकता, माहितीचा योग्य मोबदला, एकाधिकारशाही किंवा संघशाहीपासून सुटका करून घेण्यासाठी तंत्रज्ञानाचे महत्त्व अशा विचारांचे पुनरुत्थान झाले. ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाकडे एखादी तांत्रिक भपकेदार जादूगिरी म्हणून न पाहता, या विचारांचे द्योतक म्हणून पाहिले तर या तंत्रज्ञानाचा विकास वा वापरदेखील त्या दिशेने होईल. कारण हे विचार अमलात आणण्यासाठी फक्त ‘ब्लॉकचेन’ पुरेसे नाही, त्यास इच्छाशक्ती, नेतृत्व, जनसामान्यांचा आधार वा योग्य दबाव, हे सारे आवश्यक आहे. कोणतीही महत्त्वाची गोष्ट ‘किचकट, गुंतागुंतीची’ आहे किंवा हा ‘फक्त तज्ज्ञ मंडळींचा विषय’ आहे असे दर्शवून तीपासून जनसामान्यांना दूर ठेवले जाते. ही नीती आर्थिक, वैज्ञानिक, सामाजिक, राजकीय वा वित्तीय क्षेत्रांमध्ये सर्रास वापरली ...