पार्टनर ♥️
"तू भ्रमत आहासी वाया" नंतर वाचलेली वपु ची ही दुसरी कादंबरी..याआधी मी वपु काळे यांच वपुर्झा,आपण सारे अर्जुन,तप्तपदी,दोस्त,पाणपोई आणि इतर काही पुस्तके वाचलेली होतीच.यापैकी वपुर्झा मी नेहमी सोबत घेऊनच वावरत असतो.पार्टनर ही कादंबरी मी पूर्वीच वाचली होती.या कादंबरीवर आधारित चित्रपट "श्री पार्टनर"सुद्धा मी बघितला होता.पण सध्या मी मानसशास्त्र अभ्यासतोय. यामुळे पुन्हा एकदा वपु च्या साहित्याकडे वळावं आणि काही निवडक पुस्तके वाचून काढावी असा माझा प्लॅन आहे.
कारण वपु Is Love ♥️त्यांच्या प्रत्येक पुस्तकामध्ये भरभरून तत्वज्ञान असतो.मुळात ज्याकाळी मी वपु वाचले होते त्यावेळी मला तत्वज्ञानाचं त सुद्धा माहिती नव्हतं.फक्त वाचायचं म्हणून वाचलं होतं.पण आता वपु वाचायचे नाहीत तर अनुभवायचे आहेत त्यांच्या सानिध्यात राहून आयुष्याकडे त्यांच्या दृष्टीकोनातून बघायचं आहे.कारण वेगवेगळ्या गोष्टींकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन खरंच अफलातून होता जो त्यांच्या प्रत्येक पुस्तकातून आपल्याला अनुभवायला मिळतं असतो.वपु जरी आज हयात नसले पण ते आणि त्यांचे तत्वज्ञानी विचार कायम त्यांच्या पुस्तकातून जिवंत असतील आणि असंख्याना जगण्याची प्रेरणा देत राहणार एवढं नक्की.कारण वपुचं लिखाण खरंच जखमेवर फुंकर मारायचा काम करतो.त्यामुळेच आजूबाजूचं सर्वकाही विसरून फक्त वाचतच राहावं असंच कायम वाटते राहते.
तर मी पार्टनर ही कादंबरी दुसऱ्यांदा वाचलीच नाही तर अनुभवली.या सफरीत माझी भेट झाली ती श्री आणि त्याच्या पार्टनर सोबत.मुळात हा पार्टनर मला दुसरं तिसरं कोणी नाही तर वपु हा अवलियाच वाटला.प्रचंड आवडलेली ही कादंबरी मला खूप काही देऊन आणि शिकवून गेली." नरक म्हणजे काय, तर आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणुस न जाणे म्हणजे नरक.” अशी सुरुवात करून माझ्या मनावर पहिल्या पानापासून ताबा मिळवणाऱ्या या कादंबरीबद्दल लिहावं तेवढंच कमी आहे.यातील साध्या सरळ असलेल्या कथेने मला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवलं.यातून मला खूप काही नवीन समजलं उमजल.अनेक प्रश्नांची उत्तरे मला या कादंबरीने दिली.यातील काही वाक्यांनी मला अंतर्मुख केलं तर काहींनी विचार करायला भाग पाडलं.यातील श्री असो अथवा त्याचा नाव नसलेला पार्टनर या दोन्ही मित्रांनी मला फार प्रेमात पाडलं आहे. जणू मी यांच्याच सानिध्यात वावरतोय.
तशी तर ही एक साधी सोप्पी प्रेम आणि कौटूंबिक कहाणी आहे.यामध्ये वेगवेगळे पात्र आहेत.श्री,किरण,
अरविंद,श्री ची आई आणि पार्टनर आणि यामध्ये सर्वांत जास्त भाव खाऊन जातो तो श्री ला भेटलेला अनामिक असलेला हाच "पार्टनर"जो आपल्याला काहीतरी वेगळं शिकवून जातो."एखादं चित्रपट बघत असताना कसं आपण आपला आवडता पात्र कधी स्क्रीनवर येतो याची वाट बघत असतो ?तसंच कधी पार्टनर कथेत येतो याची आपण वाट बघत राहतो.आणि जेव्हा जेव्हा पार्टनर कथानकात येतो.तेव्हा तेव्हा आपल्या चेहऱ्यावर एक वेगळंच स्मित येऊन जातो.श्री आणि किरण ची ही प्रेम कहाणी आणि नंतरची सांसारिक कहाणी आहे.आणि या कहाणी मध्येच सुख,दुःख,प्रेम, विरह,वाद-विवाद,रुसण-फुगणं आणि मानवी भावनांचा कल्लोळ आहे.जे वाचत असतांना प्रत्येकाला ही कथा आपल्या स्वतःचीच वाटतं असते.
एवढं नक्की..🌿
बाकी याबद्दल लिहायला,बोलायला खूप काही आहे. पण माझ्यामते तुम्ही ते या 150 पृष्ठसंख्या असलेल्या या कादंबरीतच अनुभवायला हवं.त्यामुळे आवर्जून वाचा.आणि आपल्या पार्टनरचा शोध घ्या.तो तुम्हाला नक्कीच मिळेल आणि जरी मिळाला नाही तरीही तुम्ही मात्र नक्की कोणाचं तरी पार्टनर बनुच शकता..🌿
शुभेच्छा सर्वांना..😊
शेवटी नेहमीप्रमाणे यातील मला आवडलेले विचार म्हणा किंवा तत्वज्ञान :- ♥️
★ज्या माणसाच्या बाबतीत प्रेमाची वाटचाल लग्नाच्या मंडपात संपते तो वाया गेला.
★माणूस गर्दीचा झाला म्हणजे हरवत नाही . एकटा राह्यला की हरवतो.
★आमचा देव दगडाचा नाही . आम्ही दगडात देव पाहणारी माणसं आहोत .
★शरीराच्या एका गरजे पुरतीच बाईला पुरुष आणि पुरुषाला बाई हवी असते . बाकी निसर्गाच्या गरजा प्रत्येकाच्या एकेकट्या च्या असतात .
★माणसाची नजर ज्या वस्तूकडे असते , तीच वस्तू त्याला पहायची आहे , तसं त्या माणसाकडे पाहणाऱ्या इतरांना वाटतं.
★सौंदर्याची ओढ वाटणं ही जिवंतपणाची खून असते.
★स्वतःच नाव विसरणं ह्यात मस्त आनंद आहे . खरं तर आपल्याला नावच नसतं . बारशाला नाव ठेवतात ते देहाचं.
★डोळे आणि स्पर्श , शब्दांपेक्षा छान बोलतात.
¶ दोन इंच लांबीच्या जिभेवर पदार्थ असतो , तोवर ' चव .' खाली उतरला की ' घास .' सुगंधाचं नातं नाकाशी , घशातून आत गेल्यावर ती फक्त ' हवा .' खरंतर सगळ्या पंचेंद्रियाच नातं रसिकतेशी नसून तृप्तिशी असतं . तो क्षण संपला की रसिकता संपली . इतर अनेक गरजांपैकी ' तृप्ती ' ही गरज आहे . जो गरजू आहे , त्याला व्यवहार सांभाळावा लागतो . व्यवहार नेहमीच साधतो असा नाही . तो सत्यासारखा कटू असतो . ज्या मनात रसिकता असते त्याच मनात कटुता असते .
★गणिताच्या उत्तरासारखी तुम्ही आयुष्याकडे अपेक्षा करता आणि जास्त दुःखी होता . आयुष्य काही गणिताचं कोड नाही लगेच सुटायला .
★जो मागं राहणार आहे , त्याचंच खरं मरण आहे . मरणारी व्यक्ती सुटून जाणार आहे . ज्याला आघात सहन करायला मागे राहायचं आहे , त्याचं खरं मरण आहे.
★नजर शाबूत असलेला बाप मुलाला एकदाच जन्म देऊन थांबत नाही . आयुष्यभर तो जन्मच देत असतो .
©️Moin Humanist🌿
मी वाचलेली पुस्तके ♥️
पुस्तक वाचायला भाग पाडणारा अवलिया...🙏आता पार्टनर वाचावंच लागेल...
उत्तर द्याहटवा