We Read मधून पुस्तके मागवायची प्रोसेस नेमकी काय आहे ?🤔♥️
1)दररोज उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या पुस्तकाची माहिती आपल्या We Read व्हाट्सअप्प ग्रुप,प्रत्येकाला वयक्तिक,टेलिग्राम चॅनल आणि fb पेजवर शेअर करण्यात येत जाईल.. यासोबतच आठवड्यातुन शनिवार किंवा रविवारी उपलब्ध असलेल्या वाचनीय पुस्तकांची एक यादी शेअर केल्या जाईल..
2)यातील कोणतेही पुस्तक तुम्हाला हवे असेल तर सरळ सरळ 7066495828 या व्हाट्सअप्प नंबरवर पुस्तकाचं नाव कळवायचं आणि आपला संपूर्ण पत्ता पाठवायचं.
3)तुम्हाला एकूण बिलिंग Details देण्यात येतील.दिलेल्या नंबरवर तुम्ही पुस्तकाची पेमेंट केल्यावर Ss काढून पाठवायचं.
4)दुसऱ्याच दिवशी तुम्हाला व्यस्थित पॅकिंग करून पुस्तके भारतीय पोस्टाने पाठवून भारतीय पोस्टाची Recipt देण्यात येईल.
5)प्रत्येक पुस्तकावर किमान 25 ते 30 % सवलत असेल व कोणतेही पुस्तक पाठवण्याचं खर्च अजिबात घेतल्या जाणार नाही.
6)तुम्हाला हव्या असलेल्या कोणत्याही पुस्तकाची मागणी खूप तुम्ही We Read ला करू शकता..ते तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येईल.
7)पुस्तक मागवल्यावर ते पुस्तक मिळेपर्यंत संपूर्ण जबाबदारी ही We Read ची असेल.काही कारणाने पुस्तक गहाळ झालं किंवा व्यवस्थित मिळालं नाही तर तुम्हाला दुसरं पुस्तक पाठवण्यात येईल.
8)We Read संबंधित काही तक्रार वगैरे असेल तर तुम्ही मला आणि हर्षल ला Msg करू शकता.आम्ही नेहमी तत्पर असू.
9)We Read चा उद्देश तळागाळातील वाचकांपर्यंत वाचनीय पुस्तके सवलतीत घरपोच पोहोचवणे हा असून पोहोचवली पुस्तके वाचली सुद्धा गेली पाहिजे हा आहे.एकंदरीत वाचकांना वाचायला प्रवृत्त करणे हा आपला मुख्य लक्ष्य असणार आहे आणि कायम हाच असेल.पुस्तक फक्त वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश्य आपला कधीही नव्हता तर वाचनीय पुस्तक पोहोचवण्याचं आणि ते पुस्तक वाचलं गेलं पाहिजे हा आपला नेहमीपासून उद्देश्य राहिला आहे आणि कायम हाच असेल..
10)We Read मध्ये उपलब्ध असलेलं प्रत्येक पुस्तक हे वाचनीय आणि दर्जेदार असेल एवढं नक्की..आपण Well Research आणि त्याबद्दल पूर्ण वाचून,समजून घेऊनच पुस्तक उपलब्ध करून देत आहोत..त्यामुळे Without कोणतीही शंका तुम्ही We Read ने Recommended केलेलं पुस्तक बिंदास मागवू शकता..
11)व्हाट्सअप्प, फेसबुक,इंस्टाग्राम पासून युट्युब पर्यत पुस्तकांचा प्रसार करणे व जास्तीत जास्त चांगले,सुजान वाचक घडवणे.वाचन संस्कृती वाढवणे हा We Read सुरु करण्यामागचा उद्देश होता आणि तो सर्वांच्या सहकार्यामुळे सफल होतोय याचा खूप आनंद आहे.
12)वेळोवेळी We Read अंतर्गत वाचकांसाठी वेगवेगळे उपक्रम आपण राबवत जाणार आहोत.
13)नियमितपणे वेगवेगळ्या विषयावरची वाचनीय आणि महत्वपूर्ण पुस्तकांची यादी शेअर करून वाचकांना पुस्तकाबद्दल कल्पना देण्यात येईल..कोणतं पुस्तकं वाचावं आणि का वाचावं ? हा प्रश्नच वाचकांना पडू न देणे हा We read चा टार्गेट असेल.
14)लवकरच We Read ची एक सुंदर वेबसाईट आणि युट्युब चॅनल सुद्धा सुरू होईल.जे पूर्णपणे पुस्तकांनाच Dedicated असेल.
15)वाचकांना वाचनाची आवड कशी निर्माण होईल ?पुस्तकांशी मैत्री कशी निर्माण करता येईल ? यासोबतच पायरसी, कॉपीराईट बद्दल सुद्धा जणजागृती करण्याचं आपला प्लॅन आहे आणि असेल.
16)पुस्तकासंबंधीत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी We Read कायम सज्ज असेल.एकंदरीत वाचनाचे महत्व आपण प्रत्येकाला पटवून देणार आहोत.♥️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा