थोडं मनातलं ♥️
आयुष्यात आजपर्यंत फक्त एकाच वेळी तुटून पडलो त्याबद्दल व्यक्त व्हावं वाटलं.🌿 2017 ला 12th पास झालो.पुण्याला गेलो,काही कारणाने परत येऊन घरीच राहून अभ्यास करायचं ठरवलं.काकाच्या बंद पडलेल्या खोलीत स्वतःचा विश्व बनवलं.हाच आपला पहिला वहिला 'स्टडी बंकर'होय.2018 ते 2019 Cse चा मनापासून सर्वकाही विसरून अभ्यास केलं.अवांतर वाचन सुरूच होतं. 2019 च्या ऑक्टोबर मध्ये अनपेक्षितपणे आरोग्याने साथ सोडली आणि येथूनच मी मागे पडत गेलो.येथून अभ्यास बंद झाला.परत परत हॉस्पिटलमध्ये जाऊन अस्वस्थ वाटतं होतं त्यामुळेच एकटेपणाची सुद्धा जाणीव व्हायला सुरुवात झाली.गल्लीत जवळचा म्हणावं तसं कोणीही मित्र नव्हतं.होती ती फक्त 'अर्पिता' तिला बोलूनच थोडं छान वाटायचं. आमचं एकमेकांवर खूप म्हणजे खूप प्रेम होतं.खूप काही वेगळी स्वप्ने बघितलेली होती आम्ही. 'Long Distance Relationship' असून सुद्धा आम्ही एकमेकांच्या जवळच होतो असं वाटायचं.एकंदरीत खूप भारी होतं आमचं नातं.पण परत परत आजारामुळे मी पूर्णपणे तुटलो होतो.माझं भविष्य अंधकारात दिसतं होतं.दिशा मिळतं नव्हती.समजून घेणारं आणि समजावून सांगणार ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा