डायरी पेज नंबर :-1 💙

Be Unique💙 प्रत्येक व्यक्तीची आपली स्वतःची एक ओळख असते.त्याने त्या ओळखीनुसार जगायला हवं.इतरांकडून काही बोध घ्यावं,नवीन काहीतरी शिकावं पण इतरांसारखंच बनायचं प्रयत्न करू नये.किंवा सरळ सरळ समोरच्या व्यक्तीच्या वागण्याची,बोलण्याची,राहण्याची नक्कल तरी अजिबात करू नये.इतरांची कॉपी करताना माणूस आपली स्वतःची ओळख हरवून देतो.दुसरं बनने मला पटतं नाही तर मला पहिला मी बनने हे कायम बेस्ट वाटते.🙃 आपली एक वेगळी ओळख निर्माण करता यायला हवी.इतरांपेक्षा हटके काहीतरी करता यायला हवा.गर्दीचा हिस्सा न बनता वेगळं काहीतरी करता यायला हवं.असं मला सुरुवातीपासून वाटतं आलं आहे.म्हणून मी माझे स्वतःचे सिध्दांत आणि रुल बनवले आहे.त्या रुलनुसारच मी चालत असतो.कोणाला ते पटो अथवा न पटो मला त्याने काहीही फरक पडत नसतो. मी माझ्या मर्जीने आजपर्यंत जगत आलोय आणि जगणार आहे. कुठलाही विचार न करता समोरचा व्यक्ती हे करतोय तर मी सुद्धा हेच करायला हवं,समोरचा असा जगतोय, वागतोय,बघतोय,वाचतोय तर मी सुद्धा असंच वागायला,जगायला,वाचायला,बघायला आणि शिकायला हवं ही धारणा मला पूर्णपणे चुकीची वाटते.या व्यक्तीला ही माणसे ओळखतात तर मला सु...