डायरी पेज नंबर :-1 💙

Be Unique💙

प्रत्येक व्यक्तीची आपली स्वतःची एक ओळख असते.त्याने त्या ओळखीनुसार जगायला हवं.इतरांकडून काही बोध घ्यावं,नवीन काहीतरी शिकावं पण इतरांसारखंच बनायचं प्रयत्न करू नये.किंवा सरळ सरळ समोरच्या व्यक्तीच्या वागण्याची,बोलण्याची,राहण्याची नक्कल तरी अजिबात करू नये.इतरांची कॉपी करताना माणूस आपली स्वतःची ओळख हरवून देतो.दुसरं बनने मला पटतं नाही तर मला पहिला मी बनने हे कायम बेस्ट वाटते.🙃

आपली एक वेगळी ओळख निर्माण करता यायला हवी.इतरांपेक्षा हटके काहीतरी करता यायला हवा.गर्दीचा हिस्सा न बनता वेगळं काहीतरी करता यायला हवं.असं मला सुरुवातीपासून वाटतं आलं आहे.म्हणून मी माझे स्वतःचे सिध्दांत आणि रुल बनवले आहे.त्या रुलनुसारच मी चालत असतो.कोणाला ते पटो अथवा न पटो मला त्याने काहीही फरक पडत नसतो. मी माझ्या मर्जीने आजपर्यंत जगत आलोय आणि जगणार आहे.

कुठलाही विचार न करता समोरचा व्यक्ती हे करतोय तर मी सुद्धा हेच करायला हवं,समोरचा असा जगतोय, वागतोय,बघतोय,वाचतोय तर मी सुद्धा असंच वागायला,जगायला,वाचायला,बघायला आणि शिकायला हवं ही धारणा मला पूर्णपणे चुकीची वाटते.या व्यक्तीला ही माणसे ओळखतात तर मला सुद्धा त्या माणसांनी ओळखायला हवं हा अट्टाहास करणे मला खरंच विचित्र आणि हास्यास्पद वाटतं.

आपण आपल्याला ओळखणाऱ्या व जीव लावणाऱ्या माणसांना प्राधान्य द्यायला हवं.कारण सुखात येण्यापेक्षा दुःखात सहभागी असणारी माणसं नेहमीच महत्वाची असतात. सोशल मीडियावर 100 Love React, कंमेंट करणारे खूप असतात.पण प्रत्यक्षात किती तुमच्या अडचणीत सोबत असतात हे महत्त्वाचं असतं आणि असणार आहे कायम.

प्रत्येक व्यक्तीची शैक्षणिक, भौगोलिक, सांस्कृतिक, आर्थिक पार्श्वभूमी वेगवेगळी असते. समोरचा एकाद्या सुशिक्षित घरात जन्माला आलेला असतो आणि आपण एखाद्या अडाणी घरात.त्याला सुरुवातीपासून संसाधन,मार्गदर्शनाची कमतरता नसते.तर आपल्या नशिबी अठरा विश्व नेहमी दारिद्र्यच आलेलं असतं.कितीही नाही म्हटलं तरीही आजूबाजूच्या वातावरणाचा,कुटुंबाच्या वागणुकीचा प्रभाव हा व्यक्तीवर पडलेला असतोच.आजूबाजूला असलेला माहोल मॅटर करतोच.त्यामुळे आपण या अश्या व्यक्तीकडून नक्कीच शिकावं,बोध घ्यावं.या समोरच्या व्यक्तीच्या चांगल्या सवयी,गुण अंगीकारावे.व आपली एक वेगळी ओळख निर्माण करावी.कोणाला महत्व देण्यापेक्षा आधी स्वतःला व आपल्या कामाला महत्व द्यावं.कोणी आपल्या recognition द्यावी म्हणून व्यर्थ झटण्यापेक्षा असं काहीतरी काम करायला हवं की समोरच्यांनी आपल्याला recognition द्यायला हवी.समोरून कोणाचीही जी हुजुरी करणे हा मला फालतूपणा वाटतो.स्वाभिमान, आत्मसमान फार महत्वाचा घटक असतो आणि तो असायला हवा आयुष्यात.

स्वतःला कधीही कोणापेक्षाही कमी समजू नये.नेहमी I am The Best म्हणतं आपण आपल्या वेगवेगळ्या मार्गाने मार्गक्रमण करायला हवं.असं मला नेहमी वाटतं असतं..आता हे किती प्रमाणात बरोबर किंवा चूक आहे.याची मला आयडिया नाही.कारण मी सध्या चुकतोय आणि त्या चुकातूनच शिकतोय..😇

©Moin Humanist✍️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼