एका जंगलाची कथा ❤️



काही दिवसांपूर्वी राजेंद्र ठोंबरे लिखित एका जंगलाची कथा हे नवकोर आणि हटके कन्सेप्ट वर लिहलेलं पुस्तक वाचण्यात आलं.निसर्ग,पर्यावरण,जंगल, प्राणी,पक्षी इत्यादी गोष्टींवर लिहलेलं मला वाचायची जाम आवड आहे.या पुस्तकाच्या टायटल आणि मुखपृष्ठावरूनच हे पुस्तक वाचण्याची मला फार उत्सुकता होती.काही दिवसांपूर्वी मिळताच हे 83 पृष्ठसंख्या असलेलं पुस्तक वाचून पूर्ण केलं.आणि अपेक्षेप्रमाणेच मला हे पुस्तक आवडलं.वाचताना कोठेही थोडं सुद्धा बोअर न करता या पुस्तकाने मला शेवटपर्यंत गुंतवून ठेवलं होतं..भन्नाट विषय,हटके कन्सेप्ट आणि जबरदस्त विषय असलेलं हे एक छोटंसं आणि गोड पुस्तक फार वाचनीय आहे.वाचताना फेव्हरेट जंगल बुकची सतत आठवण येत होती.या पुस्तकातील पात्र डोळ्यासमोर फिरतात.

जंगलातील शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यांचे एकमेकांविरुध्द भयंकर युद्ध झाले तर ?शाकाहारी प्राण्यांनी आपली मांसाहारी प्राण्याकडून होणाऱ्या शिकारीविरुद्ध बंड केलं तर ?पृथ्वीचं अस्तित्व आहे तेव्हापासून सुरू असलेली अन्नसाखळी व जंगलाचे कायदे कोणी बदलून पाहिले तर ??
इत्यादी काही प्रश्नांच्या उत्तराबद्दल कल्पनाच केली तर किती रंजक आणि वेगळं वाटतं.
किती वेगळा आणि हटके कन्सेप्ट आहे ना?याचं सेम कन्सेप्ट वर राजेंद्र दादा याचं हे नवीन पुस्तक आधारित आहे.

सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये असलेल्या एक घनदाट जंगलात घडलेली ही कथा आहे.जंगलामधून कृष्णा नदी वाहत असते.जंगलात सर्व प्राणी गुण्यागोविंदाने राहत असतात..अनेक कथांप्रमाणे या कथेत सुद्धा सिंह जंगलाचा राजा असतो.निसर्गनियमानुसार,जंगलाच्या त्याच कायद्यांवर लाखो वर्षापासून जंगल चालत असतो.जंगलाच्या या जीवनाला एक दिवस अनपेक्षित धक्का बसतो. जेव्हा कृष्णा नदीत एका टोपलीत वाहून आलेलं एक मानवी मुलं झिप्री नामक माकडीनीला सापडतो.आणि बघता बघता ही बातमी संपूर्ण जंगलात पसरते.जंगलाचा राजा सिंह झिप्री माकडीनिला या मुलाचा सांभाळ करण्याची परवानगी देतो.
हा मुलगा जंगलात वाढती रमतो ; जंगलाचा एक भाग होतो ..पण माणसाची बुद्धी जंगलासमोर नवीन संकट उभं करायला सुरुवात करते.हा कृष्णा जंगलाचे कायदे बदलू पाहतो यांतून प्राण्यांमध्ये संघर्षाची ठिणगी पड़ते..प्राण्यांत शाकाहारी विरुद्ध मांसाहारी असे दोन गट पडतात. आणि या दोन्ही गटातील  हा संघर्ष वाढत जाऊन प्राण्यांमध्ये घनघोर महायुद्ध घडतं..आता युद्धाचे परिणाम काही चांगले नसतातच.ते असतात फारच भयंकर.

या महायुद्धात कोण जिंकतो ? जंगलाचे कायदे बदलतात का ? कृष्णाचं पुढे काय होतं ?यानंतर जंगलावर स्वार्थी माणसाचं आणखी एक मोठं संकट कोसळतं. या संकटाचा सामना कृष्णा आणि प्राणी कश्याप्रकारे करतात ? जंगलाच्या भविष्यात पुढे काय लिहिलेलं असतं ? हे बघणं फारच रोचक आहे.बळ  विरुद्ध बुद्धी , भूक विरुद्ध विचार , माणूस विरुद्ध जंगल या संघर्षाची रंजक,चित्तवेधक आणि विचारगर्भ कथा वाचणे फार भारी अनुभव ठरतो.खूप काही विचार करायला भाग पाडणाऱ्या या पुस्तकाने कळत/नकळत खूप काही शिकवलं सुद्धा.

या पुस्तकातील आवडलेली व भावलेली काही वाक्ये..❤️

"जंगलात कोणताच प्राणी कोणत्या झाडावर वा जमिनीवर अधिकार दाखवू शकत नाही.या जगात जन्मलेल्या प्रत्येक सजीवाचा जमिनीवर समान हक्क आहे.हा निसर्गाचा नियम आहे."

"जमीन आपली माता आहे,तर वृक्ष आपला पिता आहे.तेच आपल्याला अन्न पाणी देऊन जगवतात.त्यांचा जीव घेणे महापाप आहे.

"जे आपण बनवू शकत नाही.ते आपण बिघडवू नये.वाईट वृत्ती कायम लहान गोष्टीपासून सुरू होते.आपलं अनुकरण इतर करतात."

प्रकल्पापेक्षा प्राण्यांचा जीव आणि जंगल महत्त्वाचं वाटतं आहे . पूर्ण सजीवसृष्टी एका बाजूला आणि माणूस एका बाजूला आहे . माणूस जमिनीचा प्रत्येक तुकडा , प्रत्येक बेट , प्रत्येक डोंगर , पर्वत बळकावत आहे . अतिक्रमण करत आहे . प्राण्यांना हटवून त्यांची जागा काबीज करत आहे . हे कुठेतरी थांबलं पाहिजे .

 " जंगल कोणीही तोडलं तरी होणारं प्रदुषण सर्वांना समान भोगावं लागतं.

So नक्की वाचा.नवीन लेखकांना,नवीन विषयांना सहकार्य करा.मराठी साहित्य फार समृद्ध आहे.विभिन्न आणि नवीन वाचत रहा.फक्त एकाच साच्यात अडकून राहू नका ही विनंती...❤️

©Moin Humanist✍️
मी वाचलेली पुस्तके ❤️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼