द डायरी ऑफ एन फ्रॅंक 💙

तुम्ही आजचा गुगलने बनवलेला डुडल बघितला का ?🤔

"अँन फ्रॅंक" ज्यूंच्या शिरकाणात बळी गेलेली एक ज्यूधर्मीय मुलगी होती.दुसर्‍या महायुद्धाच्या काळात हिटलरच्या ज्यू द्वेषामुळे घाबरून तिच्या कुटुंबातली चार व आणखी चार माणसे मिळून ऍम्स्टरडॅम येथील एका इमारतीच्या वरच्या मजल्यावर जवळजवळ दीड दोन वर्षे लपून राहिली होती. या अवधीत त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागलं होतं. तरीही आज ना उद्या आपली सुटका होईल या आशेवर ती जगत होती..ऍनला तिच्या तेराव्या वाढदिवशी तिचे वडील एक डायरी देतात. त्या दिवसापासून ती रोजनिशी लिहायला सुरवात करते, ती त्या सर्व मंडळींना पकडून छळगृहात नेईपर्यंत. तिथे अतिशय हालअपेष्टा सोसताना त्या आठांपैकी सात जणंना मृत्यू गाठतो. फक्त ऍनचे वडील ऑटो फ्रँक जगून वाचून सुटून परत येतात. त्यांना ऍनची ती डायरी सापडते. 

त्या डायरीचे संकलन करून ती ते छापतात. यात व्यक्तींची नावे काल्पनिक होती. परंतु युद्धसमाप्तीला अर्धशतक लोटल्यानंतर परत संपूर्ण रोजनिशी काही काटछाट न करता छापलेली आहे.
"लाईफ ऑफ अ यंग गर्ल "या नावाने तीची ही डायरी प्रसिद्ध झाली होती.या डायरीला प्रकाशित होऊन आज 75 वर्षे झाली.यामुळे गुगलने डुडल बनवून "एन फ्रॅंक" ला Tribute केलंय.. ही डायरी पुस्तक रुपात मराठी मध्ये सुद्धा अनुवादित झालेली असून मेहता पब्लिकेशनने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे तर मंगला निगुडकर यांनी मराठी अनुवाद केला आहे..मराठी पुस्तकाचं नाव:- " डायरी ऑफ अँन फ्रॅंक "हे आहे.
तिच्या या डायरीची आजपर्यंत जगातल्या जवळजवळ 70 भाषेत भाषांतरे झाली आहेत..🙂

जमलं तर नक्की वाचा...💙

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼