जिवलग मित्राला लिहलेलं पत्र ❤️
माय डियर Harshal ♥️
लव यु फॉरेव्हर !!
कसा आहेस ? तु नेहमीप्रमाणे ठीक असशील ही खात्री आहे.
आणि तुझा अभ्यास सुद्धा उत्कृष्ट पद्धतीने सुरू असेल यात काही वाद नाही.तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत आम्हाला हे तुला सुद्धा माहिती आहेच.आणि तु त्या पूर्ण करणार यात काहीच वाद नाही.
(हे वाचून Pressure वगैरे घेऊ नको बरं का )
तुला बघून माझ्यासारख्या मुलाला उच्चशिक्षणाची प्रेरणा मिळाली आहे.तुझी जिद्द,इच्छाशक्ती,आत्मविश्वास आणि उच्चशिक्षणासाठी असलेली धडपड बघून खूपच भारी वाटतं मला.
स्वतःसाठी जगणारे,शिकणारे खूप असतात रे पण इतरांसाठी जगणारे,धडपडणारे खूप कमी असतात आणि यातूनच तु एक आहेस.याचा मला अभिमान आहे आणि कायम असणार आहे.
आयुष्यात एवढं खडतर प्रवास,संघर्ष करून तु कधी थांबला नाही आणि योग्य त्या मार्गावर चालत राहिला आणि इतरांना नेहमी शिक्षणासाठी प्रेरणा देत राहिला हे खूप महत्त्वाचं आहे.यासाठी तुला घट्ट मिठी.
(तूर्तास माझ्याकडून मारून घे )
तु त्या दिवशी मला फोनवर विश्वासाने तुझ्या भूतकाळाबद्दल सर्वकाही सांगितलं. तेव्हा मी निःशब्द झालो होतो गड्या.तेव्हा काय रिऍक्ट करावं काय बोलावं ? हेच मला कळतं नव्हतं.पण फोन ठेवल्यावर मी विचाराच्या चक्रात गुंतलो होतो एवढं नक्की.तेव्हा तुझी मनाची अवस्था काय असेल ? तुला तेव्हा कसं वाटतं असेल ? याबद्दल विचार करूनच अक्षरशः मी रडलो होतो भाई खरंच.नेहमी गाणी गुणगुणत असणारा,गोड हसणारा,हसवणारा,इतरांना शिकवणारा आणि कोणालाही आपल्या बोलण्याने, वागण्याने आणि अभ्यासाने आपलासा करून घेणारा हा मुलगा एवढ्या कमी वयात एवढा Mature असेल आणि याने एवढ्या समस्यांचा सामना केला असेल हे मला पटतं नव्हतं.ही गोष्ट कोठेतरी मनाला दुःख देत होती,काट्यासारखी टोचत होती. त्याकाळी मी तुझ्या सोबत नव्हतो याची एक खंत मला वाटतं होती..
पण तेव्हा मनाला एकच गोष्ट सांगितली की,
चल, कोई ना !! आता तर आपण सोबत आहोत.सुखात नसलो तरी मी माझ्या भाईच्या/मित्राच्या दुःखात तर आवर्जून सहभागी असेलचं.जब कोई नहीं रहेगा तब तेरा भाई तेरे साथ होगा.
हा प्रॉमिस माझा !!
तुझा अभ्यास,वाचन,वक्तृत्व,विचार यामधून प्रत्येक क्षणी तुझी समाज,देशाबद्दल असलेली तळमळ अधोरेखित होते..तुला भेटलो,बोललो तुझ्यासोबत घालवलेले ते 6/7 दिवस माझ्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले दोस्त.तुझा प्रेमळ,भोळा स्वभाव मनाला खूप भावून गेला.तुझी
तु दाखवलेली काळजी माझ्या हृदयात घर करून गेली गड्या. विशेष तु ज्या प्रकारे वेरूळ येथे तुझ्या मांडीवर माझं डोकं ठेऊन डोकं दाबलं ते मी आयुष्यात कधीही विसरू शकत नाही.
औरंगाबाद येथे ती आपली पहिलीच भेट होती याचा मला आता सुद्धा विश्वास बसत नाही यार.पहिल्याच भेटीत आपला जो एक हृदयाचा बॉण्ड जुडला तो कधीही न तुटणारा आहे.तुला रजा देताना मी किती भावनिक झालो होतो ते मी शब्दांत सांगू शकत नाही.तु गेल्यावर घरी येईपर्यंत काहीतरी हरवल्यासारखं मला सारखं सारखं वाटत होतं.उत्साह कमी झाला होता.
पहिल्याच भेटीनंतर तु गेल्यावर माझ्या डोळ्यातुन अचानकच अश्रू निघाले यावरून आपला बॉण्ड किती भारी जुडला होता हे आपण समजू शकतो..हैदराबाद सारख्या शहरातून तू मला विशेष भेटायला एवढा लांब प्रवास करून आलास त्यासाठी काय बोलू यार ?ते तुझ्यासोबतचे दिढ दिवस मला कायम आठवत राहतात.मला ते नाशिक,औरंगाबाद,वेरूळचे तुझ्यासोबतचे क्षण नेहमी आठवतात.
मग नंतर तु सुलतानपूरला माझ्याकडे आला.
तेव्हा जो आनंद झाला होता तो विचारूच नको.तु येतोय या आनंदाने मी माझे सर्व वेदना विसरून गेलो होतो.नुकताच ऑपरेशन झाला आहे हे मी विसरून मी जमेल तेवढी तुझ्या स्वागतासाठी तैयारी केली होती.तु येण्याच्या एक दिवस अगोदर मला आनंदाने झोपच आली नव्हती एवढा आनंद मला झाला.
तु माझ्यासोबत घरी 4/5 दिवस राहिला.आपल्या स्टडी बंकर मध्ये येणारा माझ्यासाठी तु एक सेलिब्रिटी होता.माझ्या आयुष्यातील एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्त्व माझा सखा माझ्या घरी प्रथमच आला होता हे मी कधीही विसरू शकत नाही.
आपण पुढील 4-5 दिवस सोबत राहिलो,सोबत जेवण केलं,वेगवेगळ्या ठिकाणी भेट दिली,बाईकवर प्रवास केला,विवेक रीजन डॉक्युमेंटरी बघितली, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली,गप्पा मारल्या आणि खूप खूप बोललो हे कधीही न विसरता येणाऱ्या गोष्टी आहेत.तुझ्या सोबत घालवलेले ते काही दिवस माझ्या आयुष्यातील कधीही न विसरता येणाऱ्या बेस्ट क्षणापैकी एक होते.तु जेव्हा परत जात होता तेव्हा मी अनेक वेळा रडलो.तु गेल्या एक आठवडा तुझी आठवण सतत येत होती आणि येत असते.
आयुष्यामध्ये भरपूर नाती आहेत काही नाती जन्मताच असतात तर काही नाती जोडली जातात मानली जातात पण त्या सर्व नात्यांपैकी मैत्री हे नात सगळ्यात ग्रेट असतं
एक मित्रच असतो ज्याच्या समोर आपण आपल्या मनातलं सर्वकाही स्पष्टपणे बोलतो, आपल दु:ख वेदना सर्वकाही त्याच्यासोबत शेअर करतो आणि माझ्यासाठी हा तु आहेस.
तु आयुष्यात खूप खूप शिकून मोठा व्हावा.तुझ्या हातून अनेक समाजोपयोगी कार्य घडावे अशी माझी प्रार्थना आहे.मला तुला खूप मोठा होताना बघायचं आहे.
आणि हा दिवस लवकरच येणार आहे.
एवढं Fixed आहे.
आयुष्यात असंख्य मित्र आले गेले पण तू त्यामध्ये अपवाद आहेस.
एका गाण्याच्या Lyrics सारखा की,
"तेरे जैसा कौन हैं और किसका नाम लुं ??
तुझ्याबद्दल चुकून सुद्धा स्वार्थी आणि वाईट विचार मनात येत नाही.तु आयुष्यात नेहमीच यशस्वी व्हावे असेच मनापासून कायम वाटतं असते.तुझ्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण व्हाव्या.तुला संसारातील सर्व सुख/समृद्धी मिळावी अशी माझी कायम प्रार्थना असते.तुझ्याबद्दल किती आणि काय लिहावं हे सुद्धा मला कळतं नाही.एक पुस्तक लिहू शकतो मी एवढं तुझ्याबद्दल लिहण्यासारखं आहे.तु नकळतपणे खूप काही दिलं आहे आणि देत आहे.तुला रोज बोलून एक ऊर्जा मिळते एवढंच मी सांगू शकतो.तुझ्यासाठी नेहमीच खूप काही करावं वाटतं आलं आहे. तुला कधीच कोणताही दुःख नसावा तु नेहमी हसत आणि खुश रहावा असं मला वाटते.तुझ्यावर येणारा प्रत्येक दुःख माझ्यावर यावा एवढची माझी मागणी आहे.
Like या माझ्या आवडत्या Lyrics नुसार..
हो दिल चाहता है तेरे सब दर्द लेले
अपनी उमर भी तुझे मै यार दे दु
सांसों का क्या है ,
सांसे है आनी जानी
कुर्बान दोस्ती पे सौ जिंदगानी..
तर...
जिन्दगी एक अजब मोड़ पे आ खड़ी थी
और तुम आये, और तुम आये
हर खुशी साथ मेरा छोड़ कर जा रही थी
और तुम आये, और तुम आये !
या गाण्याच्या Lyrics प्रमाणे तु माझ्या आयुष्यात आला आणि तुझ्या येण्याने सर्वकाही व्यवस्थित झालं हे मात्र खरंय.
मैं कितना तन्हा था ऐ दोस्त एक तेरे बिना
तेरा दिल भी था खाली-खाली एक मेरे बिना
तू जो मिला ऐसा लगा
बिखरा हुआ सपना सजा
मोहब्बत की बहारों से
ये दामन भर दिया तूने
मेरी वीरान राहों में
उजाला कर दिया तूने
उजाला कर दिया तूने
ये रौशनी तेरे दम से है
सारी खुशी तेरे दम से है
ये दोस्ती तेरे दम से है
या lyrics प्रमाणे खरंच मित्रा ये दोस्ती तेरे दम से ही है.
तर माझ्या आयुष्यात तुझ्या महत्वाबद्दल या Lyrics सांगतात..
कोई पूछे जो मुझसे के वो रब कैसा है
उसे बता दूं के वो मेरे यार (हर्षल) जैसा है !!
बाकी तुला सर्वकाही सांगितलं आहेच आणि सांगत असतो. त्या गोष्टी पत्रात रिपीट होतील म्हणून लिहीत नाही.तु आला सर्वकाही चेंज झालं.दृष्टिकोन बदलला आणि आयुष्य सुद्धा.आईवडील,बाबासाहेब ,पुस्तकानंतर तु माझ्या आयुष्यात खूप महत्वाचा आहेस.माझ्या कुटुंबाचा एक हिस्सा आहेस.आयुष्यात सर्वकाही होत पण एक हक्काचा जिवाभावाचा मित्र नव्हता जो मला समजून घेऊ शकत होता,ज्याच्या साठी मी चित्रपटातील मित्रतावरील एखादं गाणं फिल करू शकत होतो.मित्रता संबंधित एखादं गाणं ऐकल्यावर डोळ्यासमोर येणारा चेहरा नव्हता ही कमी तुझ्या येण्याने कमी झाली.
यासाठी पुन्हा एकदा तुला मिठी...
शेवटी भाईजान...
ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे
तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे..
एवढं कायमसाठी प्रॉमिस....
तर चल आता इमोशनल वगैरे होऊ नको पत्र वाचून..
फक्त माझं काहीही आजपर्यंत चुकलं वगैरे असेल किंवा कळत नकळतपणे मी तुला त्रास वगैरे दिला असेल तर त्यासाठी मोठ्या मनाने मला माफ कर एवढंच...(जोकिंग)
लव यु सो मच
दोस्त,शेठ,साहेब,सखा,भाई,बॉस आणि Friend..
-तुझाच मानवतावादी मित्र
- Moin Humanist✍️
खरं आहे मोईन भाई...आपल्या मित्राबद्दल आपण लिहायला घेतलं तर एक पुस्तकही कमी पडेल...आपण हर्षल बद्दल जे पत्र लिहिलं आहे...हे वाचूनच आपली दोस्ती किती सच्ची आहे हे समजतं... मित्र म्हणजे आपली सावली असते...कधी कितीही दुरावा आला तरी ती शेवट पर्यंत आपल्या सोबत असते...मित्राच वर्णन हे शब्दात होऊच शकत नाही...मला जर कोणी विचारलं मित्र या शब्दाची व्याख्या सांग...तर मी हेच सांगेल की ज्या व्यक्तीच वर्णन हे शब्दात करता येणार नाही तो म्हणजे मित्र...आपल्या दोस्तीला कोणाची नजर नको लागो हीच सदिच्छा...
उत्तर द्याहटवा