पोस्ट्स

Walden Book Review लेबलसह पोस्ट दाखवत आहे

वॉल्डन 💜

इमेज
गेल्या काहीच दिवसांपूर्वी वॉल्डन या पुस्तकाचा नुकताच प्रकाशित झालेला मराठी अनुवाद वाचून समाप्त झालं. आणि तेव्हापासून मी फक्त आणि फक्त वॉल्डन,थोरो आणि निसर्गाच्या सानिध्यातच वावरतोय..एकंदरीत मी थोरो गुरूच्या प्रेमात पडलोय.त्यांना मी मनापासून निसर्गाबद्दल माझं गुरू मानलं आहे. जेव्हा पासून मी हे पुस्तक वाचून संपवलय तेव्हापासून मी त्याला परत कपाटात ठेवलेच नाही.वॉल्डनला मी माझ्या नजरेसमोरच ठेवले आहे आणि नेहमी असेच ठेवीन.वॉल्डन या पुस्तकाने मला निसर्ग,प्राणी,पक्षी,किटक,झाडं,नदी इत्यादी वर सदा प्रेम करावे हे शिकवलंय.. इ.सन १८५४ रोजी प्रकाशित झालेल्या वॉल्डन या पुस्तकातील थोरो गुरूचे विचार आजच्या युगात सुद्धा तेवढेच प्रासंगिक आहेत.त्याकाळापेक्षा आजच्या काळात थोरो गुरूच्या विचारांची सर्वात जास्त गरज विश्वाला आणि समस्त मानवजातीला आहे.स्वार्थी मानवाच्या हाताने निसर्गाचा होत असलेला वऱ्हास थांबवण्यासाठी आपल्याला थोरो गुरुजींच्या विचारांना समोर ठेऊनच चालावे लागेल..आजच्या धावपड व धकाधकीच्या मानवी जीवनात आपण जरा थांबून निसर्गाच्या सानिध्यात राहायला हवे.निसर्ग आपल्याला कोणत्याही गोष्टीची कधीही आणि केव्...