पोस्ट्स

संजय सोनवणी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

असुरवेद 💜

इमेज
शेवटी आज असुरवेद या रोचक आणि सांस्कृतिक श्रद्धा उध्वस्त करणाऱ्या कादंबरीचे वाचन पूर्ण झाले.संजय सोनवणी सर लिखित २४० पृष्ठसंख्या असलेल्या या कादंबरीसोबतचा प्रवास हा माझ्यासाठी एकंदरीत अफलातून असा ठरला.या तीन दिवसांच्या वाचनात मला खूप काही नवीन व महत्वपूर्ण माहिती मिळाली ज्यावर विश्वास करणे जरी कठीण असले तरीही लेखकांनी ते ज्याप्रकारे योग्य व तार्किक संदर्भ आणि गृहीतके देऊन आपल्यासमोर सादर केले आहे ते आपल्याला विचार करायला नक्कीच भाग पाडतात.कादंबरी लिहण्यासाठी लेखकांनी घेतलेली मेहनत व केलेला अभ्यास हे आपल्याला पावलोपावली वाचन करत असताना जाणवतो. या जॉनर ची #प्रतिपश्चंद्र वाचलेली ही माझी पहिली कादंबरी होती तर #असुरवेद ही दुसरी ठरली.या जॉनर मध्ये इतिहासातील एखादा प्रसंग घेऊन त्याला  थोडी काल्पनिकतेची जोड दिलेली असते व एक जबरदस्त कथा गुंफून एखाद्या रहस्यमय खजिन्याचा शोध या जॉनरच्या पुस्तकामधुन घेतल्या जातो.शोध,प्रतिपश्चंद्र, विश्वस्त या तिन्ही कादंबऱ्यामध्ये एखाद्या रहस्यमयी खजिन्याचा शोध घेतला गेला आहे तर याच जॉनरच्या #असुरवेद या कादंबरीमध्ये एका अज्ञात #वेदाचा शोध घेण्यात आल...