पोस्ट्स

वाचन प्रवास लेबलसह पोस्ट दाखवत आहे

माझा वाचनाचा प्रवास 💜

इमेज
मी एकंदरीत ७ वीच्या द्वितीय सत्रापासून अभ्यासाला सुरुवात केली.यापूर्वी माझ्या आयुष्याची गाडी ही काळोखाच्या दिशेने जात होती एकंदरीत माझा काहीच खरं नव्हतं,शाळेत जाण्याच्या नावावरच माझ्या अंगावर काटा यायचा बाकी अभ्यास/वाचन तर खूप लांबची गोष्ट होती.(इत्यादी तुम्हाला माहिती आहेच) इयत्ता पाचवी पासून न्यूनगंडाने माझी गाडी जी घसरली ती सलग अडीच वर्षे घसरलेलीच होती.या अडीच वर्षात मी फक्त आणि जुगार खेळलो,दिवसभर शेतात व गावाच्या नदीवरच पडलेलो असायचो.माझ्या आयुष्याचे अडीच वर्षे असेच गेले आणि एकूण या अडीच वर्षानंतर दिवाळीच्या सुट्टीत प्रत्येकाच्या आयुष्यात येतो तसाच माझ्या आयुष्यात एक लाईफ चेंजिंग मुमेंट किंवा प्रसंग आला आणि येथूनच मी पूर्णपणे बदललो. तो प्रसंग म्हणजेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावरील जब्बार पटेल यांनी दिगदर्शीत केलेला चित्रपट बघणे.हा चित्रपट माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा चित्रपट बनला आणि हा चित्रपट बघून मी एकंदरीत बदललो किंवा सुधारलो..माझी आणि डॉ.बाबासाहेबांची ही पहिलीच मानसिकरीत्या भेट होती या आधी मला समजलेले आंबेडकर फक्त आणि फक्त जय भीम वाल्यांच्या पूर्तच मर्यादित होत...