पोस्ट्स

वपुर्झा मराठी पुस्तकं अनुभव ❤️🌼 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

वपुर्झा....🌼❤️

इमेज
व.पु. काळे यांचं हे पुस्तक हातात घेतलं नि वाचताना मला जणू आयुष्याच्या रंगीबेरंगी सुगंधांनी भरलेल्या अत्तराच्या कुपीत हरवून गेल्यासारखं वाटलं. ही 258 पृष्ठसंख्या असलेली ललित लेखसंग्रहाची कादंबरी एक सुंदर अनुभव आहे जिथे आपण माणसाच्या साध्या पण खोल भावनांमध्ये, त्याच्या रोजच्या जगण्यातल्या सुख-दु:खात नि विचारांच्या लाटांमध्ये गुंतत जातो. व.पु. चं लेखन इतकं हृदयाला भिडणारं अन् सहज आहे की त्यांच्या शब्दांनी मला माणुसकीचा, प्रेमाचा नि आयुष्याचा खरा सुगंध जाणवला. त्यांनी शब्दांतून जीवनातल्या छोट्या छोट्या क्षणांचा असा खजिना उलगडलाय की मी वाचता वाचता त्या भावविश्वात रमलो.‘वपुर्झा’ ही कोण्या कथा-कहाणी वगैरेचं पुस्तक नाही, तर व.पु. यांच्या लघुकथा, ललित लेख नि वैचारिक तुकड्यांचा संगम आहे, जो माणसाच्या नात्यांचा नाजूकपणा, त्यातली गुंतागुंत अन् आयुष्याची साधी सत्यं उलगडतो.  व.पु. म्हणतात, “कोणतंही पान उघडा आणि वाचा, ‘वपुर्झा’ हे पुस्तक कोणासाठी? ज्यांना मोत्यातील चमक बघायची आहे अशा वेड्यांसाठी ” हे वाक्य मला खूप आवडलं, कारण खरंच यातील प्रत्येक लेख जणू एका वेगळ्या अत्तरासारखा आहे.आपल...