पोस्ट्स

टाईम मॅनेजमेंट लेबलसह पोस्ट दाखवत आहे

प्रभावी नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन 💜

इमेज
मी जास्त सेल्फ हेल्प पुस्तके वाचत नाही किंवा मला ती जास्त आवडत नाही…सेल्फ म्हणजे स्वतःची स्वतः मदत करणे आणि ही पुस्तके आपल्याला ती शिकवत असतात.. मी आजपर्यंत मोजकीच या प्रकारातील पुस्तके वाचली आहे पण ती सुद्धा कुठली प्रेरणा घ्यायला वगैरे नाही तर फक्त महत्वपुर्ण काही टिप्स घ्यायला..ही पुस्तके वाचून काही वेळ आपल्याला फुल प्रेरणा मिळते,आयुष्यात सर्वकाही खूप खूप सोपं आहे असं वाटायला लागते,आता या पुस्तकांत सांगितलेलं आहे तसं केलं तर यश आपलंच आहे अस वाटायला लागते.. अशी पुस्तके लिहून आजपर्यंत शेकडो लेखक करोडपती झालेली आहेत पण ही अशी पुस्तके वाचुन फक्त या पुस्तकाच्याच भरवश्यावर राहणाऱ्या व्यक्तींनी आपला फ़क्त वेळ वाया घालवला आहे असे मला वाटते आणि अनेक जण प्रकारातले माझ्या नजरेत आहेत...ही पुस्तके एक औषधी सारखी काम करत असतात.ही आपल्याला बरे करते परंतु त्याचे परिणाम केवळ तात्पुरते असतात..एखाद्या सेल्फ हेल्प पुस्तकाच्या भरवश्यावर राहून तुम्ही कधीही यशस्वी होऊच शकत नाही त्यासाठी तुम्हाला योग्य ती कृती सुद्धा करावी लागेलच....वरी सांगितल्या प्रमाणे मी फक्त आजपर्यंत मोजकीच सेल्फ पुस्तके वाचली आहेत आणि त...